आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने आतापर्यंतची पदके जिंकण्याची सर्वोत्तम कामगिरी केली असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय खेळाडूंचे 71 पदके मिळवल्याबद्दल अभिनंदन केले आहे. पदकांची ही संख्या म्हणजे भारतीय खेळाडूंची असाधारण समर्पित वृत्ती, निर्धार आणि क्रीडाभावना यांचा दाखला आहे, असे त्यांनी सांगितले.

 पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले:

"आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने आतापर्यंतची सर्वात जास्त चमकदार कामगिरी केली आहे ! 71 पदकांसह आपण आतापर्यंतच्या सर्वोत्तम पदकसंख्येचा आनंद साजरा करत आहोत, जो आपल्या खेळाडूंची असाधारण समर्पित वृत्ती, निर्धार आणि क्रीडाभावना यांचा दाखला आहे. हे प्रत्येक पदक कठोर परिश्रम आणि खेळाविषयीचे प्रचंड प्रेम यांच्या जीवनप्रवासाला अधोरेखित करत आहे. संपूर्ण देशासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. आपल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन."

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's yuva shakti continues to make global impact: PM Modi

Media Coverage

India's yuva shakti continues to make global impact: PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 19 जुलै 2026
July 19, 2026

Exports Booming, Skies Opening, Energy Transforming — PM Modi’s India in Full Flight