पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी उस्ताद गुलाम मुस्तफा खान साहेब यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
एका ट्वीट मधे पंतप्रधान म्हणाले,"उस्ताद गुलाम मुस्तफा खान साहेब यांच्या निधनामुळे आपले सांस्कृतिक जग निराधार झाले आहे. ते संगीत क्षेत्रात सन्माननीय होते, सर्जनशीलतेचा उत्तम नमुना होते ज्यांचे कार्य पिढ्यानपिढ्या ल़ोकांना आकर्षित करत राहील. त्यांच्याशी संवाद साधल्याच्या अनेक रम्य आठवणी माझ्याकडे आहेत.त्यांच्या कुटुंबियांना आणि प्रशंसकांना माझी श्रध्दांजली.
The passing away of Ustad Ghulam Mustafa Khan Sahab leaves our cultural world poorer. He was a doyen of music, a stalwart of creativity whose works endeared him to people across generations. I have fond memories of interacting with him. Condolences to his family and admirers. pic.twitter.com/jZy7eVhW68
— Narendra Modi (@narendramodi) January 17, 2021


