गव्हाचा पुरवठा, साठा आणि निर्यातीसंदर्भातील  विविध पैलूंचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

या विषयांबाबत पंतप्रधानांसमोर सविस्तर सादरीकरण करण्यात आले. मार्च-एप्रिल 2022 या महिन्यांतील उच्च तापमानाचा पिकाच्या उत्पादनावर होणाऱ्या परिणामाबाबत त्यांना माहिती देण्यात आली.गव्हाची  खरेदी आणि निर्यातीच्या स्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

भारतातील कृषी उत्पादनांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, भारत अन्नधान्य आणि इतर कृषी उत्पादनांचा खात्रीशीर स्त्रोत म्हणून विकसित व्हावा यादृष्टीने दर्जेदार मापदंड  आणि मानके सुनिश्चित करण्यासाठी सर्वप्रकारे पावले उचलण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले.शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत सुनिश्चित  करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असलेल्या प्रचलित बाजारभावाबाबतही पंतप्रधानांना माहिती देण्यात आली.

या बैठकीला पंतप्रधानांचे प्रधान सचिव, सल्लागार, कॅबिनेट सचिव, अन्न आणि सार्वजनिक वितरण प्रणाली आणि कृषी विभागाचे सचिव उपस्थित होते.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Engineering goods exports up 10.4% in January,2026, crosses $100 billion mark in April-January Period of FY26

Media Coverage

Engineering goods exports up 10.4% in January,2026, crosses $100 billion mark in April-January Period of FY26
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 26 फेब्रुवारी 2026
February 27, 2026

Citizens Express Heartfelt Gratitude to PM Modi: Make in India Surge, Budget Reforms & India-Israel Saffron Synergy