नमस्कार!

मी तुम्हाला भारतातील 1.4 अब्ज लोकांकडून शुभेच्छा देत आहे.

निवडून दिलेले नेते ही  कल्पना  प्राचीन भारतात जगातील इतर देशांच्या खूप आधी  सामान्यपणे आढळणारी बाब होती. आपले प्राचीन महाकाव्य, महाभारतात, स्वतःचा नेता निवडणे हे नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे  असे वर्णन केले आहे.

आमच्या  पवित्र वेदांमध्ये  व्यापक आधार असलेल्या सल्लागार संस्थांद्वारे राजकीय शक्ती वापरल्याचा उल्लेख आहे. प्राचीन भारतात प्रजासत्ताक राज्यांचे अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत, ज्यात राज्यकर्ते वंशपरंपरेने आलेले  नव्हते. भारत हीच  खरी लोकशाहीची जननी आहे.

महामहीम,

लोकशाही ही केवळ व्यवस्था  नाही; तो देखील एक आत्मा आहे. प्रत्येक माणसाच्या गरजा आणि आकांक्षा तितक्याच महत्त्वाच्या आहेत या विश्वासावर ती आधारित आहे. म्हणूनच, भारतात  "सबका साथ, सबका विकास" हे आमचे मार्गदर्शक तत्वज्ञान आहे, ज्याचा अर्थ "सर्वसमावेशक वाढीसाठी एकत्रितपणे प्रयत्न करणे" असा आहे.

जीवनशैलीतील बदलांद्वारे हवामान बदलाविरोधात  लढा देण्याचा आमचा प्रयत्न असो,  साठवणुकीद्वारे पाणी वाचवणे असो किंवा प्रत्येकाला स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन पुरवणे असो, प्रत्येक उपक्रमाला  भारतीय नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांचे बळ मिळाले आहे.

कोविड-19 दरम्यान, भारताचा प्रतिसाद लोक-केंद्रित  होता. त्यांच्यामुळेच  भारतात निर्मित  लसींच्या 2 अब्जाहून अधिक मात्रा देणे शक्य झाले. आमच्या ''लस मैत्री'' उपक्रमाने लसींच्या लाखो मात्रा जगभरात पोहचवल्या.

याला 'वसुधैव कुटुंबकम' - एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या लोकशाही भावनेने  मार्गदर्शन केले.

महामहीम,

लोकशाहीच्या गुणांबद्दल सांगण्यासारखे बरेच काही आहे, परंतु मी एवढेच सांगू इच्छितो: अनेक जागतिक आव्हाने असूनही, भारत आज सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. हीच जगातील लोकशाहीची सर्वोत्तम जाहिरात आहे. डेमोक्रसी कॅन डिलिव्हर असे तेच  म्हणत आहे. .

या सत्राच्या अध्यक्षतेसाठी अध्यक्ष यून, तुम्हाला  धन्यवाद.

आणि आपल्या उपस्थितीबद्दल सर्व मान्यवर नेत्यांचे आभार.

खूप खूप धन्यवाद.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India to add 100 merchant ships to its fleet in 5 years: Sarbananda Sonowal

Media Coverage

India to add 100 merchant ships to its fleet in 5 years: Sarbananda Sonowal
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
पंतप्रधान 27 ऑगस्ट रोजी 'खेलो इंडिया संवाद'मध्ये तरुणांना करणार संबोधित
August 26, 2026
'खेलो इंडिया संवाद' क्रीडा, युवा नेतृत्व, नागरी जबाबदारी,स्वयंसेवा, फिटनेस आणि राष्ट्र उभारणीला एका सामायिक मंचावर आणणार
'खेलो इंडिया संवाद' अंतर्गत होणारा 'युवा संवाद' क्रीडा, ऑलिम्पिक आकांक्षा, युवा नेतृत्व, विकसित भारत आणि नशामुक्त युवा या पाच प्रमुख विषयांवर केंद्रित असेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'खेलो इंडिया संवाद'ला संबोधित करतील. भारताच्या क्रीडा प्रवासात तरुणांना सहभागी करून घेणे, त्यांच्या आकांक्षा जाणून घेणे आणि समृद्ध युवा-नेतृत्वाखालील विकसित भारतासाठी त्यांच्या विचारांचे योगदान मिळवणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

'मेरा युवा भारत' (MY Bharat) द्वारे राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 उत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रत्येक जिल्ह्यातील दोन महाविद्यालयांमधील तरुणांच्या सहभागासह देशभरात आयोजित केला जाईल. तरुणांच्या आकांक्षांना राष्ट्रीय विकासाच्या विषयपत्रिकेच्या केंद्रस्थानी ठेवून एक तंदुरुस्त, शिस्तबद्ध आणि क्रीडाप्रेमी राष्ट्र घडवण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेला अनुसरून या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.

देशव्यापी 'खेलो इंडिया संवाद' हा क्रीडा, युवा नेतृत्व, नागरी जबाबदारी, स्वयंसेवा, तंदुरुस्ती आणि राष्ट्र उभारणीला एका सामायिक मंचावर आणेल. हा उपक्रम तरुणांना देशाच्या क्रीडा आकांक्षांशी थेट जोडण्याचे माध्यम ठरेल, तसेच त्यांच्या कल्पना आणि दृष्टिकोन हे भारतातील युवा व क्रीडा परिसंस्थेमधील सतत सुरू असलेल्या संवादाचा भाग बनतील याची निश्चिती करेल.

या राष्ट्रीय कार्यक्रमानंतर तरुण सहभागी, 'माय भारत' स्वयंसेवक, स्थानिक खेळाडू आणि लोकप्रतिनिधींचा समावेश असलेले स्थानिक संवाद आयोजित केले जातील. खेळांमध्ये रस असलेले तरुण आणि भारतातील प्रमुख खेळाडू व पदकविजेते यांच्यातील थेट संवाद हे या उपक्रमाचे एक मुख्य वैशिष्ट्य असेल.

'युवा संवाद' हे या कार्यक्रमाचे एक मध्यवर्ती वैशिष्ट्य असून यामध्ये तरुण सहभागींना त्यांच्या स्वतःच्या संकल्पना, दृष्टिकोन आणि आकांक्षा व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केले जाईल. हा संवाद खालील पाच विषयांवर आधारित असेल:

  • अधिक चांगल्या सुविधा, प्रशिक्षण, क्रीडा विज्ञान आणि सर्वसमावेशक सहभागाद्वारे भारताच्या क्रीडा परिसंस्थेत सुधारणा करणे
  • वैज्ञानिक प्रतिभा शोध, पारदर्शक निवड आणि दीर्घकालीन खेळाडू विकासाद्वारे 2036 ऑलिम्पिकसाठी कलागुणांची जोपासना करणे.
  • शासन व्यवस्था मंच आणि 'माय भारत' संचालित स्वयंसेवेच्या माध्यमातून युवा नेते तयार करणे.
  • नागरी कर्तव्यभावना, भविष्याभिमुख कौशल्ये आणि संरचित स्वयंसेवेची निर्मिती करून विकसित भारतासाठी तरुणांचे सक्षमीकरण करणे;
  • अंमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात लढा देण्यासाठी 2 ऑगस्ट 2026 रोजी सुरु झालेल्या पंतप्रधानांच्या 100 आठवड्यांच्या देशव्यापी अभियानाअंतर्गत साप्ताहिक जनभागीदारी उपक्रमांद्वारे बळकट केलेल्या, क्रीडा आणि समवयस्क नेटवर्कचा वापर करून 'नशामुक्त युवा' चळवळीला प्रोत्साहन देणे.