अ.क्र.

शीर्षक

संक्षिप्त वर्णन

1.

संरक्षण आणि सुरक्षा सहकार्यावरील संयुक्त जाहीरनामा (जेडीडीएससी)

 

विद्यमान सुरक्षाविषयक संयुक्त जाहीरनाम्याचे (2009) नूतनीकरण करतो. यामध्ये सैन्यांची आंतरकार्यक्षमता, क्षमता बांधणी, सागरी क्षेत्र, संरक्षण औद्योगिक सहकार्य, सायबर सुरक्षा आणि तंत्रज्ञान, दहशतवादविरोधी मोहीम, मानवतावादी सहाय्य आणि आपत्कालीन मदत (एचएडीआर) आणि UNCLOS, ASEAN, PIF, IORA मध्ये एकसंध दृष्टिकोन यांची  सहकार्याची क्षेत्रे म्हणून नोंद घेण्यात आली आहे.

 

 

2.

सागरी सुरक्षा सहकार्य आराखडा (एम एस सी आर)

माहितीची देवाणघेवाण, क्षमता विकास आणि कार्यान्वयन समन्वय यांना प्रोत्साहन देऊन सागरी सुरक्षा सहकार्य वाढवतो.

3.

 

भारत-ऑस्ट्रेलिया यांचे ऊर्जा सुरक्षेबाबत संयुक्त निवेदन

भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा सुरक्षेसाठी दोन्ही देशांच्या वचनबद्धतेची नव्याने पुष्टी करते.

4.

भारत-ऑस्ट्रेलिया नागरी अणु कराराच्या प्रशासकीय व्यवस्थेला अंतिम स्वरूप देणे

2014 मध्ये स्वाक्षरी झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया नागरी अणु कराराला कार्यान्वित करते, आणि ऑस्ट्रेलियाकडून भारताला युरेनियमचा पुरवठा सक्षम करते.

5.

सायबर, महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान, पुरवठा साखळी यांच्यासाठी ऑस्ट्रेलिया-भारत भागीदारी (पीएसीटीएस)

सायबर आणि सायबर-सक्षम महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान सहकार्यावरील 2020 च्या चौकटीतील व्यवस्थेवर आधारित आहे. राष्ट्रीय आणि प्रादेशिक सुरक्षेला पाठिंबा देणे, महत्त्वपूर्ण पुरवठा साखळ्यांना अधिक लवचिक बनवण्यासाठी सहकार्याला प्रोत्साहन देणे तसेच महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा व डिजिटल लवचिकतेमधील सहकार्य अधिक दृढ करणे, हे याचे उद्दिष्ट आहे.

6.

भारतीय तटरक्षक दल (आयसीजी) आणि ऑस्ट्रेलियाची सागरी सीमा कमांड (एमबीसी) यांच्यातील सामंजस्य करार

भारतीय तटरक्षक दल आणि सागरी सीमा कमांड यांच्यात सागरी कायदा अंमलबजावणी, कार्यक्षेत्राची जागरूकता आणि सागरी सीमा संरक्षण या क्षेत्रात सहकार्य प्रस्थापित करतो.

7.

2028-29 साठी ऑस्ट्रेलियन संरक्षण महाविद्यालयात भारतीय लष्करी प्रशिक्षकासाठी ऑस्ट्रेलियाकडून आमंत्रण

2028-29 मध्ये ऑस्ट्रेलियन डिफेन्स कॉलेजमध्ये भारतीय लष्करी प्रशिक्षकाच्या नियुक्तीची घोषणा

8.

 पश्चिम ऑस्ट्रेलिया सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (एम एस डी ई) आणि तांत्रिक आणि उच्च शिक्षण मंत्रालय (टीएएफई) यांच्यात खाणकाम आणि खाणकाम उपकरणे, तंत्रज्ञान आणि सेवा (एम ई टी एस) क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार.

 

खाणकाम कार्यप्रणाली, खाण सुरक्षा, खनिज प्रक्रिया, खाण यंत्रसामग्री इत्यादी उप-क्षेत्रांमध्ये शैक्षणिक उत्कृष्टतेचे केंद्र विकसित करण्यासाठी‌ भुवनेश्वर येथील राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेत (एन एस टी आय) खाणकाम उपकरणे, तंत्रज्ञान आणि सेवा या विषयातील उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येत आहे. यामुळे राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र आणि पश्चिम ऑस्ट्रेलिया येथील टीएएफई यांच्यात विद्यार्थी/प्रशिक्षणार्थींची देवाणघेवाण शक्य होईल.

 

9.

फ्लिंडर्स विद्यापीठाला भारतात (बेंगळुरु) कॅम्पस स्थापन करण्यासाठी इरादापत्र (एल ओ आय) सुपूर्द करणे

यामुळे बंगळूरू येथे फ्लिंडर्स विद्यापीठाचा कॅम्पस स्थापन करणे शक्य होईल.

 

10.

राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषद आणि ऑस्ट्रेलियन स्किल्स क्वालिटी अथॉरिटी यांच्यात उद्देशपत्रावर स्वाक्षरी

तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण क्षेत्रात गुणवत्तेच्या हमीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या उपक्रमामुळे व्यावसायिक प्रशिक्षण प्रणालीची नियामक चौकट अधिक मजबूत होणार असून, प्राधान्य क्षेत्रांतील व्यवसाय मानकांचे सह-विकसन आणि संरेखन होणार आहे. तसेच अधिकाऱ्यांचा क्षमता विकास, कर्मचारी देवाणघेवाण, संयुक्त कार्यशाळा आणि संशोधन उपक्रमांना चालना मिळणार आहे.

 

11.

प्राचीन भारतीय वस्तूंची पुनर्प्राप्ती

या उपक्रमांतर्गत भारतात 3 प्राचीन वस्तू परत आणण्यात येत आहेत:

 

a. भगवान शिवाचे वाहन मानला जाणारा पवित्र नंदी बैल

[वर्णन: तामिळनाडू, भारत, 11वे ते 12वे शतक, ग्रॅनाइट]

 

b. शुभ काली (भद्रकाली) त्रिशूळासहित

[वर्णन: तामिळनाडू, भारत, 11वे शतक, कांस्य]

 

c. षडानन स्कंद (कार्तिकेय)

[वर्णन: तामिळनाडू, भारत, 12वे शतक, बेसॉल्ट]

 

12.

रूफटॉप सोलर प्रशिक्षण अकादमीचे कार्यान्वयन

गांधीनगर इथल्या पंडित दीनदयाळ ऊर्जा विद्यापीठात हवामान बदल, पर्यावरण आणि पाणी विभाग (डीसीईईडब्ल्यू), हरित रोजगारांसाठी क्षेत्र कौशल्य परिषद (एसएससीजीजे) आणि रिन्यू यांच्या सहकार्याने ही अकादमी स्थापन करून कार्यान्वित करण्यात आली. या उपक्रमाचा उद्देश 2000 महिला आणि युवकांना सौर तंत्रज्ञ, स्थापक आणि सहाय्यक म्हणून प्रशिक्षण देणे हा आहे. हा उपक्रम जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधानांनी सुरू केलेल्या ‘पीएम सूर्य घर योजना’ आणि भारताच्या हरित ऊर्जा प्रवासाला पाठबळ देणारा आहे.

13.

ऑस्ट्रेलिया-कॅनडा-भारत तंत्रज्ञान आणि नवोन्मेष भागीदारी अंतर्गत सामंजस्य करार

ऑस्ट्रेलिया–कॅनडा–भारत तंत्रज्ञान आणि नवोन्मेष भागीदारी (एसीआयटीआय) अंतर्गत उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात त्रिपक्षीय सहकार्य वाढवण्याचा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे.

14.

जिओसायन्स ऑस्ट्रेलिया आणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण यांच्यात सामंजस्य करार

2015 मध्ये स्वाक्षरी  झालेल्या वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्याच्या करारावर आधारित हा नवीन करार करण्यात आला. प्रगत अन्वेषण पद्धतींचा अवलंब, क्षमता विकास, कौशल्य वृद्धी तसेच जीएसआयच्या पायाभूत सुविधांचे तांत्रिक उन्नतीकरण आणि आधुनिकीकरण हा याचा उद्देश आहे.

 

 

15.

औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) आणि आयपी ऑस्ट्रेलिया यांच्यात पारंपरिक ज्ञान डिजिटल ग्रंथालय वापर करार

आयपी ऑस्ट्रेलिया यांच्यात पारंपरिक ज्ञान डिजिटल ग्रंथालय (टीकेडीएल) डेटाबेसचा वापर शक्य करतो

16.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद आणि मेलबर्न विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

सीएसआयआर आणि मेलबर्न विद्यापीठ यांच्यात भविष्यातल्या सहकार्यासाठी संबंध प्रस्थापित करतो यामध्ये औषध लक्ष्य ओळख, प्रशिक्षण कार्यक्रम आणि प्राध्यापक देवाणघेवाण यांसारख्या संयुक्त संशोधन कार्यक्रमांचा समावेश आहे.

 

17.

सत्यजित रे चित्रपट आणि टेलिव्हिजन संस्था, कोलकाता आणि ग्रिफिथ फिल्म स्कूल, साउथ ब्रिस्बेन यांच्यात सामंजस्य करार

शैक्षणिक सहकार्य, संयुक्त प्रकल्प, कार्यशाळा, लघुकालीन प्रशिक्षण कार्यक्रम किंवा उन्हाळी शाळा यांसाठी लवचिक आणि खुल्या सहकार्याची रूपरेषा निश्चित करण्यात आली.

18.

व्हिक्टोरिया विद्यापीठाला मंजुरीपत्र प्रदान

व्हिक्टोरिया विद्यापीठाला गुरुग्राम इथे आपला कॅम्पस स्थापन करून चालवण्याची परवानगी

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
From 'chalta hai' to 'badal sakta hai': Decoding PM Modi's Punctuality narrative

Media Coverage

From 'chalta hai' to 'badal sakta hai': Decoding PM Modi's Punctuality narrative
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 23 ऑगस्ट 2026
August 23, 2026

From Free Coaching to 400+ Space Startups — India’s Atmanirbhar Leap Under PM Modi