भारताने कोविड –19 विरुद्ध लसीकरण मोहिमेला दि. 16 जानेवारी, 2021 रोजी यशस्वी प्रारंभ केल्याबद्दल शेजारी राष्ट्रांच्या नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारचे अभिनंदन केले आहे.

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी व्टिटर या समाज माध्यमाव्दारे म्हटले आहे की, ‘‘कोविड-19 लसीकरण कार्यक्रम सुरू केल्याबद्दल आणि त्यांनी शेजारी मित्रराष्ट्रांविषयी दाखवलेल्या औदार्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन!''

 

श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी एका व्टिटमध्ये म्हटले आहे की, ‘‘कोविड-19 विरोधात लसीकरण मोहिमेव्दारे नरेंद्र मोदी आणि भारत सरकारने महत्वपूर्ण पाऊल उचलल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. या विनाशकारी महामारीचा आता अंत होण्यास प्रारंभ झाला आहे, हे आपण पहात आहोत.’’

 

मालदीव प्रजासत्ताकचे अध्यक्ष इब्राहिम मोहमेद सोलिह यांनी एका व्टिटमध्ये म्हटले आहे की, ‘‘ कोविड-19 पासून भारतीयांच्या संरक्षणासाठी लसीकरणाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम प्रारंभ केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारचे अभिनंदन. या प्रयत्नामध्ये तुम्ही नक्कीच यशस्वी होणार,  या बद्दल मला विश्वास आहे आणि अखेर आपण कोविड-19 चे संकट संपुष्टात आल्याचेही पाहणार आहोत.’’

भूतानचे पंतप्रधान डॉ. लोते त्शेरिंग यांनी व्टिट केले आहे की, ‘‘भारतामध्ये कोविड-19 विरोधात लसीकरण मोहीम आज सुरू होत आहे. या महत्वाकांक्षी मोहिमेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनतेचे मी अभिनंदन करू इच्छितो. अनेक प्रश्न निर्माण करणा-या महामारीचा विनाश करण्यासाठी योग्य उत्तर आता आपल्याला मिळाले आहे, अशी आशा करतो.’’

 

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Rolls-Royce joins with HAL at the wheel to make India a major aerospace hub

Media Coverage

Rolls-Royce joins with HAL at the wheel to make India a major aerospace hub
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 15 मे 2026
May 15, 2026

Viksit Bharat Unleashed: PM Modi's Blueprint Delivers Energy Independence, Tech Boom, and Diplomatic Dominance