शेअर करा
 
Comments

आम्ही, ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिका या राष्ट्रांचे नेते आज पहिल्यांदाच ‘क्वाड’ साठी प्रत्यक्ष भेटलो आहोत. या ऐतिहासिक प्रसंगी, आम्ही आमच्या भागीदारीमधली कटिबद्धता आणि प्रदेशाविषयी,- जो आमच्यातील सामाईक सुरक्षा आणि समृद्धीचा आधार आहे- एक मुक्त आणि खुल्या हिंद-प्रशांत महासागर क्षेत्र, जे अत्यंत सर्वसमावेशक आणि लवचिक आहे.सहा महिन्यांपूर्वी आमची अखेरची भेट झाली होती. मार्चपासून, कोविड-19 महामारीमुळे संपूर्ण जगच अनेक संकटांचा सामना करत आहे; हवामान बदलविषयक संकट अधिक गहिरे झाले आहे; प्रादेशिक सुरक्षेचा प्रश्न अधिकाधिक गुंतागुंतीचा होत चालला आहे, आणि आपल्या सर्वच देशांना वैयक्तिक आणि सामूहिक अशा दोन्ही दृष्टीने त्याचा काही ना काही तरी फटका बसतो आहे. मात्र, या सगळ्या परिस्थितीत आपल्यातील सहकार्य, पूर्णपणे अबाधित आहे.

ही क्वाड शिखर परिषद आपल्या सर्वांसाठी आणि संपूर्ण जगासाठीही भारत-प्रशांत महासागर क्षेत्राकडे आणि आपल्याला जे साध्य करायचे आहे,त्यासाठीची आपली योजना, याकडे  पुन्हा एकदा लक्ष केंद्रीय करण्याची संधी घेऊन आली आहे. आज आपण सर्व एकत्रितपणे, पुन्हा एकदा अशी कटिबद्धता व्यक्त करतो, की हिंद -प्रशांत महासागर क्षेत्रात मुक्त, खुली, नियमांवर आधारलेली व्यवस्था, जी आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार आणि कुठल्याही बळजबरीपासून मुक्त असेल, अशी सुरक्षा आणि समृद्धी, हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात प्रस्थापित करण्यासाठीची आमची कटिबद्धता व्यक्त करत आहोत. कायद्याच्या राज्यासाठी, संचाराच्या आणि कुठल्याही भागात उड्डाणाच्या स्वातंत्र्यासाठी,  विवादांचे शांततामय निराकरण, लोकशाही मूल्ये आणि देशांच्या प्रादेशिक एकात्मतेसाठी एकत्रित उभे आहोत.

यासाठी, एकत्र आणि आमच्यां विविध भागीदारांसोबत काम करण्यासाठीही आम्ही कटिबद्ध आहोत. आसियानच्या एकतेला आणि मध्यवर्ती स्थानाला आमचा भक्कम पाठींबा असल्याचा पुनरुच्चार आम्ही करतो आहोत. आसियान तसेच तिचे सदस्य देश- जे हिंद-प्रशांत महासागर क्षेत्राच्या हृदयस्थानी आहेत, त्यांच्यासोबत एकत्रित काम करण्यास आम्ही प्राधान्य देणार असून, वास्तविक आणि सर्वसमावेशक मार्गांनी हे काम कामही करणार आहोत.  याच अनुषंगाने, आम्ही हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात सहकार्यविषयक, सप्टेंबर 2021 च्या युरोपीय महासंघाच्या धोरणाचे स्वागत करतो आहोत. 

आमच्या पहिल्या बैठकीपासून, आम्ही जगासमोर असलेल्या काही महत्वाच्या आव्हानांचा सामना करण्यात लक्षणीय प्रगती केली आहे. कोविड महामारी, हवामान बदलाचे संकट आणि महत्वाच्या तसेच उदयोन्मुख तंत्रज्ञानाशी सबंधित ही आव्हाने होती.

कोविड-19 ला प्रतिसाद देण्यासाठी तसेच मदत कार्यासाठीची आमची भागीदारी, क्वाडसाठी एक नवा ऐतिहासिक पैलू आहे. त्या अंतर्गत, आम्ही क्वाड लस तज्ञ गट स्थापन केला, ज्यात आमच्या सर्व सरकारांमधील तज्ञ प्रतिनिधीचा समावेश होता. या लढाईत एकमेकांशी घट्ट बंध निर्माण करत, हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात  आरोग्य सुरक्षा आणि विशेषतः कोविड-19 ला प्रतिसाद देण्यासाठी आमचे नियोजन अधिक समन्वयाने करण्याचे प्रयत्न या माध्यमातून करण्यात आले. असे करतांना, आम्ही आपापल्या देशातील कोविड महामारीची सद्यस्थिती आणि त्याचा सामना करण्यासाठीचे आमचे प्रयत्न, एकमेकांना सांगितले. एकूणच प्रदेशातील  कोविड-19 संकटाचा सामना करतांना, आमच्या राजनैतिक तत्वांवर भर देत, सुरक्षित, प्रभावी, गुणवत्ता-पूर्ण लस निर्मिती आणि सर्वांना लसीची समान उपलब्धता, यासाठीचा अधिक सक्रियपणे समन्वय स्थापन केला. हे करतांना बहुराष्ट्रीय स्तरावरील कोवॅक्स सुविधेशी सांगड देखील घातली गेली. कोवॅक्सच्या माध्यमातून लसींना आर्थिक सहाय्य देत असतांनाच, ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिका या देशांनी, जागतिक पातळीवर, लसींच्या सुरक्षित आणि प्रभावी अशा 1.2 अब्ज मात्रा देण्याचा संकल्प केला आहे. आणि  या कटिबद्धतेचा भाग म्हणून आतापर्यंत आम्ही यापैकी 79 दशलक्ष सुरक्षित, प्रभावी आणि गुणवत्तापूर्ण लसींच्या मात्रा हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रातील, देशांना वितरीत केल्या आहेत.

क्वाड लस भागीदारीअंतर्गत,  बायोलॉजीकल ई एलटीडी, ची उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी अतिरिक्त निधी देण्यात आला आहे, त्यामुळे, या लसीचे अतिरिक्त उत्पादन या वर्षअखेरपर्यंत, भारतात होण्याची शक्यता आहे. आमच्या मार्चमधील, घोषणेच्या अनुषंगाने, तसेच जागतिक पुरवठा साखळीत सातत्याने येणारा व्यत्यय लक्षात घेता, सध्या लस उत्पादनाचा विस्तार करून, नव्याने उत्पादित लसीचा हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रातल्या देशांना आणि जगालाही पुरवठा करु, तसेच यासाठी कोवॅक्स सुविधेसारख्या बहुराष्ट्रीय उपक्रमांशी देखील समन्वय साधला  जाईल. ज्याच्या मदतीने, गरीब आणि मध्यम वर्गातील नागरिकांसाठी एक सुरक्षित, प्रभावी आणि गुणवत्तापूर्ण कोविड-19 लसनिर्मिती करणार आहे. लस उत्पादनाच्या पुरवठा साखळीसाठी लस निर्मितीचे महत्त्व आम्ही जाणून आहोत.

गेले कित्येक महिने, महामारीचे संकट  या प्रदेशात आणि जगभरातही असतांना आम्ही, आतापर्यंत आम्ही समाधानकारक प्रगती केली आहे. क्वाड नेत्यांनी बायोलॉजिकल-ई LTD लसीच्या उत्पादनाचे स्वागत केले आहे. यात, आमच्या क्वाड गुंतवणुकीच्या माध्यमातून, आम्ही 2022 च्या अखेरपर्यंत, किमान एक अब्ज सुरक्षित आणि प्रभावी कोविड लसींचे उत्पादन करणार आहोत. आज, आम्हाला हे जाहीर करण्यात अत्यंत अभिमान वाटतो आहे, की, या पुरवठ्यामधील प्राथमिक पाऊल म्हणून आम्ही हिंद-प्रशांत आणि जगातली महामारी संपवण्यास तत्काळ मदत करण्यास आम्ही तत्पर आहोत. कोवॅक्ससह सर्व देशांना सुरक्षित आणि प्रभावी लसींचा पुरवठा करण्याची मोहीम ऑक्टोबरपासून पुन्हा सुरु करण्याच्या भारताच्या घोषणेचेही आम्ही स्वागत करतो. जपानदेखील त्यांच्या कोविड-19 संकट प्रतिसाद आपत्कालीन पुरवठा कर्जाच्या माध्यमातून 3.3 अब्ज डॉलर्सची मदत करुन, प्रादेशिक भागीदारांना लस देण्यास मदत करत आहे. ऑस्ट्रेलिया, 212 दशलक्ष डॉलर्सचे अनुदान दक्षिणपूर्व आशिया आणि प्रशांत महासागर क्षेत्रातल्या देशांना लस घेण्यासाठी देणार आहे. त्याशिवाय, क्वाड अंतर्गत. शेवटच्या घटकापर्यंत लस पुरवठा करण्यासाठी, ऑस्ट्रेलिया 219 दशलक्ष डॉलर्स इतका अतिरिक्त निधीही वितरीत करणार आहे.

आम्ही वैद्यकीय चाचण्या आणि जीनोम सर्वेक्षणासाठीच्या क्षेत्रात, आमचे विज्ञान आणि तंत्रज्ञान (S&T) क्षेत्रातील सहकार्य देखील अधिक दृढ करणार आहोत. जेणेकरुन, आम्ही ही महामारी संपवण्यासाठीच्या प्रयत्नांना अधिक गती देऊ शकू आणि उत्तम आरोग्य सुरक्षितता निर्माण करू शकू. संपूर्ण जगाचे लसीकरण करण्यासाठी सहकार्य करण्यास अन लोकांचे जीव वाचवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. पुन्हा एकदा जगाची उभारणी करत, जागतिक आरोग्य सुरक्षितेसाठी वित्तसहाय्य आणि राजकीय नेतृत्व अधिक दृढ करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही सर्व देश 2022 मध्ये एक संयुक्त महामारी सज्जता अभ्यास देखील करणार आहोत

हवामान संकटाचा सामना करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आणि त्यावर त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे.  पॅरिस करारात नमूद  तापमान मर्यादा आवाक्यात ठेवण्यासाठी क्वाड देश एकत्र काम करतील आणि ते पूर्व-औद्योगिक पातळीपेक्षा 1.5 अंश सेल्सियस पर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करतील. यासाठी, क्वाड देश सीओपी 26 द्वारे महत्वाकांक्षी एनडीसी बाबत माहिती देण्याची क्वाड देशांची इच्छा आहे आणि ज्यांनी आधीच हे केले आहे त्यांचे स्वागत  आहे. हिंद -प्रशांत  क्षेत्रातील प्रमुख हितधारकांपर्यंत पोहोचण्यासह जागतिक महत्वाकांक्षा वाढवण्यासाठी क्वाड देश त्यांच्या मुत्सद्देगिरीने  समन्वय साधतील. आमचे कार्य -: हवामान महत्वाकांक्षा, स्वच्छ-ऊर्जा नावीन्यपूर्ण संशोधन आणि वापर, आणि हवामान अनुकूलन, लवचिकता आणि सज्जता तीन संकल्पनाधारित  क्षेत्रांमध्ये विभागलेले आहे.  2050 पर्यंत शून्य उत्सर्जनाचे जागतिक उद्दिष्ट साध्य करण्याच्या उद्देशाने योगदान देतील  आणि राष्ट्रीय परिस्थिती विचारात घेतील.  योग्य क्षेत्रीय डीकार्बोनायझेशन प्रयत्नांचा राष्ट्रीय स्तरावर  पाठपुरावा करत आहोत, ज्यात नौवहन आणि बंदर परिचालन  आणि स्वच्छ-हायड्रोजन तंत्रज्ञानाच्या वापराचा उद्देश आहे. आम्ही जबाबदार आणि लवचिक स्वच्छ-ऊर्जा पुरवठा साखळी स्थापन करण्यासाठी सहकार्य करू आणि आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा आणि हवामान माहिती प्रणालीसाठी आघाडी  मजबूत करू. सीओपी 26 आणि जी 20 मधील यशस्वी निष्कर्षांसाठी क्वाड देश एकत्र काम करतील जे या क्षणी आवश्यक हवामान महत्वाकांक्षा आणि नावीन्यपूर्ण संशोधन  करत आहेत.

आम्ही आमच्या सामायिक मूल्यांनुसार  तंत्रज्ञानाची रचना, विकास  आणि वापर सुनिश्चित करण्यासाठी   आणि जागतिक मानवी हक्कांचा आदर करून महत्वपूर्ण   आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावर सहकार्य स्थापित केले आहे. उद्योगाबरोबर  भागीदारीमध्ये, आम्ही सुरक्षित, खुले आणि पारदर्शक 5G आणि 5G च्या पलीकडचे  नेटवर्क  तैनात करत आहोत आणि   ओपन-आरएएन सारख्या विश्वासार्ह व्हेंडर्स  आणि दृष्टिकोनांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन भागीदारांसह काम करत आहोत. 5G विविधीकरणासाठी सक्षम वातावरण निर्माण करण्यासाठी सरकारांच्या भूमिकेची दखल घेऊन, आम्ही सार्वजनिक-खाजगी सहकार्य सुलभ करण्यासाठी एकत्र काम करू आणि 2022 मध्ये खुल्या, मानकांवर आधारित तंत्रज्ञानाची व्याप्ती आणि  सायबरसुरक्षा दाखवून देऊ.

तांत्रिक मानकांच्या विकासासंदर्भात, आम्ही खुल्या, सर्वसमावेशक, खाजगी क्षेत्रातील नेतृत्वाखाली, बहु-हितधारक आणि सहमती-आधारित दृष्टिकोनाला प्रोत्साहन देण्यासाठी क्षेत्र-निहाय  संपर्क गट स्थापन करू. आम्ही आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ  सारख्या बहुपक्षीय मानकीकरण संस्थांमध्ये समन्वय आणि सहकार्य करू. आम्ही सेमीकंडक्टर्ससह महत्वपूर्ण  तंत्रज्ञान आणि साहित्याच्या पुरवठा साखळीचे मॅपिंग करत आहोत आणि पारदर्शक आणि बाजाराभिमुख असलेल्या सरकारी सहाय्य उपायांचे आणि धोरणांचे महत्त्व ओळखून  तंत्रज्ञानाच्या लवचिक, वैविध्यपूर्ण आणि सुरक्षित पुरवठा साखळीसाठी आमच्या सकारात्मक बांधिलकीचे समर्थन  करतो. आम्ही भविष्यातील महत्वपूर्ण  आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे  निरीक्षण करत आहोत, जैव तंत्रज्ञानापासून सुरुवात करत आहोत आणि सहकार्याच्या संबंधित संधी शोधत  आहोत. आम्ही आज तंत्रज्ञान संरचना, विकास, शासन आणि वापर या विषयावरील क्वाड  तत्त्वे देखील सुरु करत आहोत जी केवळ या क्षेत्रालाच नव्हे तर जगाला जबाबदार, खुल्या, उच्च दर्जाच्या नवसंशोधनासाठी  मार्गदर्शन करेल अशी आम्हाला आशा आहे.

पुढे वाटचाल करताना , आम्ही या महत्वपूर्ण  क्षेत्रांमध्ये केवळ आपले सहकार्य वाढवणार नाही, तर आम्ही ते नवीन क्षेत्रांपर्यंत विस्तारू . आमच्या प्रत्येक प्रादेशिक पायाभूत सुविधांच्या प्रयत्नांवर, स्वतंत्रपणे आणि एकत्रितपणे, आम्ही एक नवीन क्वाड पायाभूत विकास  भागीदारी सुरू करत आहोत. क्वाड देश  म्हणून, आम्ही आमच्या प्रयत्नांचा समन्वय साधण्यासाठी, प्रदेशाच्या पायाभूत सुविधांच्या गरजा जाणून घेण्यासाठी  आणि प्रादेशिक गरजा आणि संधींवर समन्वय साधण्यासाठी नियमितपणे भेटू. आम्ही तांत्रिक सहाय्य प्रदान करण्यासाठी सहकार्य करू, प्रादेशिक भागीदारांना मूल्यमापन साधनांसह सशक्त करू, आणि शाश्वत पायाभूत सुविधांच्या विकासाला  प्रोत्साहन देऊ. आम्ही जी 7 च्या पायाभूत सुविधांच्या प्रयत्नांना पाठिंबा देतो आणि युरोपीय संघासह  समविचारी भागीदारांना सहकार्य करण्यास उत्सुक आहोत. आम्ही G20 गुणवत्ता पायाभूत सुविधा गुंतवणूक तत्त्वांचे समर्थन  करतो आणि हिंद-प्रशांत क्षेत्रात  उच्च दर्जाची पायाभूत सुविधा पुरवण्याच्या आमच्या प्रयत्नांना पुन्हा जोड देऊ. आम्ही ब्लू डॉट नेटवर्कसह आमची गुंतवणूक सुरू ठेवण्यात आमच्या स्वारस्याचा पुनरुच्चार  करतो. आम्ही प्रमुख कर्जदार देशांसाठी आंतरराष्ट्रीय नियम आणि मानकांच्या अनुषंगाने खुल्या, निष्पक्ष आणि पारदर्शी कर्ज देण्याच्या पद्धतींना महत्त्व देतो, ज्यात कर्ज स्थिरता आणि उत्तरदायित्वाचा समावेश आहे आणि सर्व कर्जदारांना या नियमांचे आणि मानकांचे पालन करण्याचे आवाहन करतो.

आज, आम्ही सायबर स्पेसमध्ये नवीन सहकार्याची सुरुवात करत आहोत  आणि सायबर धोक्यांचा सामना करण्यासाठी, लवचिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आमच्या महत्वपूर्ण पायाभूत सुविधांना सुरक्षित करण्यासाठी एकत्र काम करण्याचे वचन देतो. अंतराळात आम्ही सहकार्याच्या नवीन संधीचा शोध घेऊ  आणि हवामान बदल, आपत्ती प्रतिसाद आणि तयारी, महासागर आणि सागरी संसाधनांचा शाश्वत वापर आणि सामायिक डोमेनमधील आव्हानांना प्रतिसाद देणे यांसारख्या शांततापूर्ण हेतूंसाठी उपग्रह डेटा सामायिक करू .   बाह्य अवकाशाचा शाश्वत वापर सुनिश्चित करण्यासाठी आम्ही नियम, निकष, मार्गदर्शक तत्त्वे आणि तत्त्वांबाबत चर्चा करू.

या क्वाड फेलोशिपच्या उद्घाटनाद्वारे शैक्षणिक व व्यक्तींमधील परस्पर सहकार्यांचा नवीन अध्याय सुरू करताना आम्हाला आभिमान वाटतो आहे. श्मिट फ्युचर्स यांचे दानशूर सहकार्य, आणि अक्सेंच्युअर, ब्लॅकस्टोन, बोईंग, गुगल, मास्टरकार्ड व वेस्टर्न डिजिटल यांच्याकडून मिळणारे उदार सहाय्य यामुळे हा मार्गदर्शक फेलोशिप कार्यक्रम अग्रीम विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील 100 पदवीधर विद्यार्थ्यांन फेलोशिप देईल. या क्वाड फेलोशिपद्वारे Quadचे नेतृत्व करण्यासाठी या चार देशात  विज्ञानविषयी, तंत्रज्ञानविषयी, अभियांत्रिकी आणि गणिती  बुद्धिमत्ता असणारे नव्या पिढीचे शिलेदार आणि त्याचप्रमाणे संशोधनात रुची असणारे इतर भागीदारही तयार होतील आणि आपल्या संशोधनाद्वारे आपल्या भवितव्याला नवा  आकार देतील.

दक्षिण आशियात आम्ही अफगाणीस्तानप्रति असलेल्या आपल्या धोरणात्मक, आर्थिक आणि मानवी हक्क धोरणावर एकमेकांनी सहाय्य करू आणि UNSCR 2593 सह पुढील काही महिन्यात  दहशतवादाला आळा तसेच मानवी सहकार्य याला चालना देऊ. कोणत्याही देशावर हल्ला करण्यासाठी वा दहशतवाद्यांना प्रशिक्षण तसेच आसरा देण्यासाठी त्याचप्रमाणे दहशतवादी योजना वा दहशतवाद्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी अफगाणी सीमा वापरली जाणार नाही याचा आम्ही निर्वाळा देतो आणि अफगाणिस्तासंदर्भात दहशतवादाला आळा घालण्यास असलेल्या महत्वाचा पुनरुच्चार करतो.

आम्ही दहशतवादाला उपयोगासाठी हाताशी धरण्याचा धिक्कार करतो आणि कोणत्याही दहशतवादी गटाला दहशतवादी कृत्यासाठी वा सीमांवरील हल्ल्यांना सहाय्यभूत ठरणारे कोणत्याही प्रकारचे दळणवळण, आर्थिक किंवा लष्करी मदत नाकारण्याच्या महत्वावर भर देत आहोत. अफगाणी जनतेच्या बाजूने आम्ही उभे आहोत आणि अफगाणिस्तान सोडू इच्छिणाऱ्या कोणालाही सुरक्षित वाट काढून देण्याचे तसेच स्त्रिया, मुले आणि अल्पसंख्यांकांसह सर्व अफगाणींच्या मानवी हक्कांचा आदर करण्याचे  आवाहन तालिबानला करत आहोत.

हिंद प्रशांत क्षेत्रातील आपल्या भविष्याची भागीदारी निश्चित करत असतानाच क्वाड ही प्रादेशिक शांतता, स्थैर्य, संरक्षण आणि समृद्धी राखणारी मोठी शक्ती  ठरावी यासाठी दुप्पट प्रयत्न करण्याचे आश्वासन देतो. त्यादिशेने आंतरराष्ट्रीय कायद्यांचे परिपूर्ण पालन-  विशेषतः सागरी अधिपत्यांसाठीच्या, ज्यात पूर्व व दक्षिण चीन समुद्रभागांचाही समावेश आहे त्याच्यासंबधित नियमांच्या अनुषंगाने सागरी कायदा संदर्भातील संयुक्त राष्ट्रांची परिषदेत निश्चित झालेल्या कायद्यांच्या पालन आम्ही करू. लहान बेटांवर वसलेल्या देशांना विशेषतः पॅसिफिकमधील देशांना त्यांचे आर्थिक व पर्यावरणीय स्थितीस्थापकत्व राखण्यासाठी सहकार्य करण्यास आम्ही पाठिंबा देत आहोत. कोविड-19 च्या आर्थिक व आरोग्यविषयक परिणामातून सावरण्यासाठी तसेच गुणवत्ता, शाश्वत पायाभूत सुविधा आणि पॅसिफिक भूभागासाठी मोठे आव्हान ठरत असलेल्या हवामानबदलाच्या परिणामांशी जुळवून घेण्यासाठी त्यांना सहकार्य करण्यासाठी आम्ही तयार आहोत.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावानुसार उत्तर कोरियाच्या संपूर्ण निःअण्वस्त्रीकरणासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचा आम्ही निर्वाळा देतो आणि जपानी अपहरणकर्त्यांचे प्रकरण  पुर्णपणे सोडवण्याच्या आवश्यकतेवर भर देत आहोत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या बंधनांचे पालन करत, कोणत्याही चिथावणीपासून दूर राहण्याची विनंती आम्ही उत्तर कोरियाला करतो आहोत.  मुलभूत संवाद प्रक्रियेत सामील होण्याचे आवाहनही उत्तर कोरियाला करत आहोत. हिंद प्रशांत आणि इतर प्रदेशात लोकशाही स्थितीस्थापकत्वांची  बांधणी करण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. म्यानमारमधील हिंसाचार थांबवून, परदेशी नागरीकांसह इतर राजकिय बंधकांची सुटका करण्याचेही आम्ही आवाहन करत आहोत. त्याचप्रमाणे रचनात्मक संवादप्रक्रियेची सुरुवात करत लोकशाहीची पुनर्स्थापना करण्याचेही आवाहन करत आहोत.  असियान पाच कलमी सर्वसहमती त्वरीत राबवण्याचेही आम्ही आवाहन करत आहोत.  संयुक्त राष्ट्रसंघासारख्या बहुआयामी संस्थांमधील सहकार्य वाढवत आम्ही  स्वतःच्या सामायिक प्राधान्यक्रमांना बळकटी देत बहुआयामी स्थितीस्थापकत्वाचे पालन करु. आम्ही वैय्यक्तिक पातळीवर तसेच एकत्रितपणे आजच्या आव्हानांचा सामना करु आणि हा प्रदेश सर्वसमावेशकता व खुलेपणा राखत वैश्विक कायदे आणि नियमांचे पालन करत राहील अशी खात्री देऊ. सहकार्याचे सातत्य विकसित करण्याच्या दृष्टीकोनातून आमचे नेते व परराष्ट्रमंत्री वार्षिक भेटीगाठी घेतील तसेच वरिष्ठ पातळीवरील नेतेही नियमित भेटत राहतील. हा प्रदेश मजबूत होण्यासाठी आवश्यक असलेले सहकार्य निर्माण करण्यासाठीचा स्थिर वेग राखण्यासाठी आमचे कार्यगट कार्यरत असतील. 

आपल्या सर्वांचीच परिक्षा घेणारा हा कालखंड आहे. या कालखंडात हिंद प्रशांत भूमी खुली आणि स्वतंत्र राखण्यासाठी आम्ही ठामपणे कटीबद्ध आहोत.  तसेच या भागीदारीप्रति आमचे लक्ष्य महत्वाकांक्षी व दूरगामी आहे. या खंबीर सहकार्याच्या निर्धारासह आम्ही या ठिकाणी भेटत आहोत. 

Explore More
76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन
Digital transformation: Supercharging the Indian economy and powering an Aatmanirbhar Bharat

Media Coverage

Digital transformation: Supercharging the Indian economy and powering an Aatmanirbhar Bharat
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM praises German Embassy's celebration of Naatu Naatu
March 20, 2023
शेअर करा
 
Comments

The Prime Minister, Shri Narendra Modi praised the Video shared by German Ambassador to India and Bhutan, Dr Philipp Ackermann, where he and members of the embassy celebrated Oscar success of the Nattu Nattu song. The video was shot in Old Delhi.

Earlier in February, Korean embassy in India also came out with a video celebrating the song

Reply to the German Ambassador's tweet, the Prime Minister tweeted :

"The colours and flavours of India! Germans can surely dance and dance well!"