1. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून मालदीवचे राष्ट्राध्यक्ष महामहीम श्री इब्राहीम मोहमद सोलिह भारताच्या औपचारिक भेटीवर आले आहेत.

2. 17 नोव्हेंबर 2018 मध्ये पदभार स्वीकारल्यापासून राष्ट्राध्यक्ष सोलिह यांची ही तिसरी भारत भेट आहे. सोलिह यांच्या समवेत उच्च स्तरीय सरकारी शिष्टमंडळ भारत भेटीवर आले आहे. वित्त मंत्री इब्राहीम अमेर, आर्थिक विकास मंत्री फय्याज इस्माईल, कुटुंब आणि सामाजिक सेवा मंत्री ऐशथ मोहंमद दीदी आणि व्यापार प्रतिनिधी मंडळ यांचा यामध्ये समावेश आहे.

3. या भेटीदरम्यान राष्ट्राध्यक्ष सोलिह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत नवी दिल्लीत प्रतिनिधी स्तरावर चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष सोलिह आणि त्यांच्यासमवेत आलेल्या प्रतिनिधी मंडळासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोजन समारंभही आयोजित केला.

4. राष्ट्राध्यक्ष सोलिह यांनी या भेटीदरम्यान भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेतली आणि भारताच्या 15 व्या राष्ट्रपती पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचीही राष्ट्राध्यक्ष सोलिह यांनी भेट घेतली. भारत दौऱ्याच्या पुढच्या टप्यात राष्ट्राध्यक्ष सोलिह मुंबईला भेट देणार असून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही ते भेट घेणार आहेत

5. भौगोलिकदृष्ट्या निकट, ऐतिहासिक, सांस्कृतिक सबंध आणि सामायिक मुल्ये यावर भारत-मालदीव यांच्यामधली द्विपक्षीय भागीदारी आधारलेली आहे. भारतीयांच्या मनात आणि भारताच्या ‘शेजारी सर्वप्रथम’ या धोरणात मालदीवचे विशेष स्थान आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले. राष्ट्राध्यक्ष सोलिह यांनी आपल्या सरकारच्या ‘भारत – सर्वप्रथम धोरण’ याचा पुनरुच्चार केला. अलीकडच्या काळात द्विपक्षीय भागीदारीचा झपाट्याने विस्तार होत असल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. या विस्ताराचा दोन्ही देशांमधल्या नागरिकांना लाभ झाला आहे. परस्परांना लाभदायी व्यापक भागीदारी अधिक बळकट आणि सखोल करण्यासाठीच्या कटीबद्धतेचा उभय नेत्यांनी पुनरुच्चार केला.

6. कोविड –19 महामारीच्या काळात मालदीव सरकार आणि मालदीवमधली जनता यांच्या समवेत राहिल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष सोलिह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारचे आभार मानले. भारताने केलेल्या वैद्यकीय आणि वित्तीय सहाय्यामुळे, महामारीतून निर्माण झालेल्या आरोग्य आणि आर्थिक परिणामांवर मात करण्यासाठी मालदीवला मदत झाली. मालदीवला कोविड – 19 लस भेट देणारा भारत हा पहिला भागीदार होता. यशस्वी लसीकरण अभियान, महामारीनंतर आर्थिक आघाडीवर वेगाने घेतलेली उसळी, लवचिकता यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष सोलिह आणि मालदीवच्या जनतेचे अभिनंदन केले.

7. संरक्षण आणि सुरक्षा, गुंतवणूक प्रोत्साहन, मनुष्यबळ विकास, हवामान आणि उर्जा यासह पायाभूत सुविधा विकास या क्षेत्रात सहकार्यासाठी संस्थात्मक संबंध अधिक दृढ करण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष सोलिह यांनी मान्यता दिली.

आर्थिक सहकार्य आणि दोन्ही देशांच्या जनतेमधील संबंध

8. व्हिसा- मुक्त प्रवास, सुलभ हवाई कनेक्टीव्हिटी, आदानप्रदान कार्यक्रम, वाढते सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध यांच्या अंमलबजावणीतून उभय देशांच्या जनतेमधल्या वाढत्या संबंधांचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. मालदीवच्या पर्यटन बाजारात भारत हा सर्वोच्च स्त्रोत म्हणून पुढे येत असून आर्थिक लवचिकतेमध्ये योगदान देत आहे. महामारीच्या काळात निर्माण करण्यात आलेल्या द्विपक्षीय एअर ट्राव्हल बबलची, पर्यटन संबंध विस्तारण्यातल्या भूमिकेची दोन्ही नेत्यांनी दखल घेतली. मालदीवमध्ये रूपे कार्डचा वापर कार्यान्वित करण्यासाठी सुरु असलेल्या कामाचे उभय नेत्यांनी स्वागत केले आणि द्विपक्षीय पर्यटन तसेच आर्थिक आंतर संबंधाना चालना देण्यासाठी आणखी उपाययोजनांबाबत विचार करण्यालाही त्यांनी मान्यता दिली. भारतीय शिक्षक, परिचारिका, डॉक्टर, कामगार आणि व्यावसायिक यांच्या मालदीवमधल्या अनमोल योगदानाची दोन्ही नेत्यांनी दखल घेतली. मालदीवमध्ये नुकत्याच सुरु करण्यात आलेल्या नॅशनल नॉलेज नेटवर्कचे त्यांनी स्वागत केले आणि देशात ते अधिक व्यापक करण्यासाठी काम करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. 

9. भेटीदरम्यान दोन्ही देशातल्या व्यापार धुरिणांमधल्या संबंधांचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले आणि मत्स्यपालन, पायाभूत सुविधा, नविकरणीय उर्जा, पर्यटन, आरोग्य, माहिती-तंत्रज्ञान यासह इतर क्षेत्रे सीमापार गुंतवणूक आणि भागीदारी द्वारे व्यापक आर्थिक संबंधांसाठी महत्वाची क्षेत्रे आहेत असे यावेळी सांगण्यात आले. दक्षिण आशियाई मुक्त व्यापार करार, साफ्टा अंतर्गत, मालदीवच्या ट्युना उत्पादनासाठी फ्रंटियर बाजारपेठ म्हणून भारताची संभाव्य क्षमता उभय नेत्यांनी जाणली. 2019 पासून द्विपक्षीय व्यापाराच्या विकासाबाबत दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. सप्टेंबर 2020 पासून भारत आणि मालदीव यांच्यातल्या थेट मालवाहू जहाज सेवेच्या कार्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष सोलिह यांनी नोंद घेतली आणि या सेवेद्वारे द्विपक्षीय व्यापार वृद्धी शक्य व्हावी अशी इच्छा प्रदर्शित केली.

विकास भागीदारी

10. कोविड- 19 महामारी आणि इतर जागतिक आर्थिक आव्हाने असूनही विकास भागीदारीत साध्य केलेल्या लक्षणीय प्रगतीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष सोलिह यांनी आढावा घेतला. भारत- मालदीव विकास भागीदारीत, अलीकडच्या काळात झपाट्याने वाढ झाली आहे. यामध्ये पायाभूत प्रकल्प, समुदाय स्तरीय अनुदानित प्रकल्प आणि क्षमता वृद्धी प्रकल्पांचा समावेश आहे. हे प्रकल्प पूर्णपणे मालदीवच्या आवश्यकतेवर आधारित असून पारदर्शी प्रक्रियेद्वारे आणि दोन्ही सरकारच्या सहकार्यात्मक भूमिकेतून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

11. 500 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सच्या ग्रेटर माले प्रकल्पाच्या पायाभरणीसाठीच्या आभासी कार्यक्रमात दोन्ही नेते सहभागी झाले. अनुदान आणि भारताकडून सवलतीच्या दरातल्या कर्जाच्या आधारे हा कनेक्टीव्हिटी प्रकल्प उभारण्यात येत आहे. मालदीवमधल्या हा सर्वात मोठा पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेवर पूर्ण होईल याची सुनिश्चिती करण्याचे निर्देश दोन्ही नेत्यांनी अधिकाऱ्यांना दिले. या प्रकल्पामुळे माले आणि व्हिलीन्गली, गुल्हीफालहू आणि थीलाफुशी बेटे यामधले दळणवळण सुधारण्याबरोबरच वाहतूक खर्च कमी होऊन लोक केन्द्री आर्थिक विकासाला चालना मिळेल जी या दोन देशांमधल्या शाश्वत मैत्रीचे प्रतिक आहे.

12. मालदीवमधल्या पायाभूत प्रकल्पांना वित्तीय पाठबळ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत सरकार कडून 100 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचे नवे कर्ज देऊ केल्याचे जाहीर केले. याबद्दल राष्ट्राध्यक्ष सोलिह यांनी भारत सरकारचे आभार मानले असून या अतिरिक्त निधीमुळे चर्चेच्या विविध स्तरावर असलेल्या अनेक मोठ्या प्रकल्पांची अंमलबजावणी शक्य होईल असा विश्वास व्यक्त केला.

13. ग्रेटर माले मध्ये एक्झिम बँक ऑफ इंडियाच्या बायर्स क्रेडीट अंतर्गत 4000 सामाजिक गृहनिर्माण सदनिका विकासाच्या प्रगतीबाबत उभय नेत्यांनी आढावा घेतला. आपल्या नागरिकांना किफायतशीर घरे उपलब्ध करून देण्यावर मालदीव सरकारने लक्ष केंद्रित केले आहे त्याला अनुसरून या सदनिका आहेत.

14. ग्रेटर माले मध्ये आणखी 2000 सामाजिक गृहनिर्माण युनिट्स बांधण्यासाठी 119 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सच्या एक्झिम बँक ऑफ इंडियाच्या बायर्स क्रेडीट अंतर्गत वित्त पुरवठ्याला दिलेल्या मंजुरीचे उभय नेत्यांनी स्वागत केले. एक्झिम बँक ऑफ इंडिया आणि मालदीव सरकार यांच्यात या अर्थाच्या स्वारस्य पत्राच्या आदान-प्रदानाचेही या नेत्यांनी स्वागत केले. अतिरिक्त गृहनिर्माण युनिट्स साठी भारत सरकारने केलेल्या या उदार सहाय्याची राष्ट्राध्यक्ष सोलिह यांनी प्रशंसा केली. 

15. अड्डू रस्ते प्रकल्पासह 34 बेटांवर पाणी आणि सांडपाणी सुविधेसाठी तरतूद, हुकुरू मिस्कीय (शुक्रवार मशीद) जीर्णोद्धार यासह भारताने वित्तीय पाठबळ पुरवलेल्या इतर प्रकल्पांच्या प्रगतीबाबत या नेत्यांनी समाधान व्यक्त केले. गुल्हीफालहू बंदर प्रकल्पाच्या सुधारित डीपीआर मंजुरीचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले आणि अंमलबजावणीला लवकरात लवकर सुरवात करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यामुळे ग्रेटर मालेसाठी, जागतिक तोडीच्या बंदर सुविधा देण्यात येतील. माले शहरातून पुरवण्यात येणाऱ्या सुविधा इथे वसवण्यात येतील आणि त्या बंदराची जागा हे घेईल. हनीमाढू विमानतळ विकास प्रकल्प इपीसी करारावर स्वाक्षऱ्या करण्यासाठी भारतीय बाजूने अंतिम मंजुरीचेही या नेत्यांनी स्वागत केले. याची अंमलबजावणी लवकरच सुरु होणार असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. लामू इथे कर्करोग रुग्णालय उभारणी प्रकल्पाच्या व्यवहार्यता अहवालाला अंतिम स्वरूप देण्यात आल्याबद्दल आणि भारत सरकारकडून कर्जाद्वारे त्याला अंतिम वित्तीय रूप देण्यात आल्याबद्दल उभय नेत्यांनी समाधान व्यक्त केले.

16. भारताकडून दिल्या जाणाऱ्या अनुदान सहाय्याच्या मदतीने अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या समुदाय विकासाच्या 45 प्रकल्पांमधून बेटांवरील समुदायांसाठी मिळणाऱ्या सकारात्मक योगदानाचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले.

17. गेल्या काही वर्षात क्षमता वृद्धी आणि प्रशिक्षण द्विपक्षीय भागीदारीचा प्रमुख स्तंभ म्हणून उदयाला आले असल्याचे पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष सोलिह यांनी समाधानाने नमूद केले. आयटीईसी प्रशिक्षण योजनेसोबत शेकडो मालदिवीयन्स नागरी सेवा, सीमाशुल्क सेवा, संसद, न्यायसंस्था, प्रसारमाध्यमे, आरोग्य आणि शिक्षण संस्था आणि संरक्षण आणि सुरक्षा संघटना यांच्याशी संस्थात्मक संलग्नेतेद्वारे  उपलब्ध होणाऱ्या विशेष प्रकारे तयार केलेल्या प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत. दोन्ही नेत्यांनी मालदीवचे स्थानिक सरकारी प्राधिकरण आणि भारताच्या राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेदरम्यान झालेल्या सामंजस्य कराराचे स्वागत केले ज्या करारामुळे मालदीवच्या स्थानिक शासन संस्थांना बळकटी मिळणार आहे.

संरक्षण आणि सुरक्षा

18. भारत आणि मालदीव यांच्यातील संरक्षण आणि सुरक्षाविषयक भागीदारी काळाच्या कसोटीवर सिद्ध झाली आहे आणि परदेशी मदतीने होणारे गुन्हे आणि आपत्ती निवारण या क्षेत्रातील सहकार्याचा आदर्श निर्माण करत आहे. ही भागीदारी म्हणजे हिंदी महासागरी क्षेत्रामध्ये स्थैर्य निर्माण करणारे बळ आहे. भारत आणि मालदीव यांची सुरक्षा परस्परांशी निगडित असल्याचे लक्षात घेऊन दोन्ही नेत्यांनी उभय देशांच्या सुरक्षा आणि स्थैर्यविषयक चिंतांना विचारात घेण्याच्या आणि परस्परांच्या प्रदेशांचा वापर एकमेकांना हानिकारक होईल अशा कारणांसाठी करू न देण्याच्या  आश्वासनाचा पुनरुच्चार केला.

19. दोन्ही नेत्यांनी सागरी सुरक्षितता आणि संरक्षण, सागरी विषयांबाबतची जागरुकता आणि आपत्ती निवारण यामध्ये सध्या सुरू असलेले प्रकल्प आणि क्षमतावृद्धीचे उपक्रम यांच्या माध्यमातून  सहकार्याला चालना देण्याबाबत सहमती व्यक्त केली. भारताच्या सागर अर्थात सुरक्षा आणि सर्व प्रदेशांचा विकास या दृष्टीकोनाला अनुसरून सहकार्य बळकट करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पंतप्रधान मोदी यांनी पुनरुच्चार केला.

20. दोन्ही नेत्यांनी सिफावारू येथे तटरक्षक बंदर उभारणीपूर्वीच्या टप्प्यात झालेल्या गतिमान प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.  मालदीवच्या राष्ट्रीय संरक्षण दलाची आपल्या अधिकारक्षेत्राचा वापर करण्याची आणि आपली ईईझे़ड आणि खाजण क्षेत्रांमध्ये देखरेख करण्याची क्षमता वाढवण्यामध्ये हे बंदर मालदीवच्या सरकार सहाय्यकारक ठरणार आहे. हा प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्याचे निर्देश दोन्ही नेत्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

21. भारत सरकारकडून मालदीवच्या राष्ट्रीय संरक्षण दलासाठी मालदीव सरकारला दुसरे लँडिंग असॉल्ट क्राफ्ट(LCA) आणि यापूर्वी देण्यात आलेल्या सीजीएस हुरावीच्या जागी दुसरे जहाज देण्याची पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केली. पंतप्रधान मोदी यांनी मालदीवच्या राष्ट्रीय संरक्षण दलासाठी 24 युटिलिटी व्हेईकल्स भेट देत असल्याची देखील घोषणा केली.मालदीवचे अध्यक्ष सोलिह यांनी एमएनडीएफचे आधुनिकीकरण आणि उपकरणांसाठी,भारताकडून सातत्याने मिळत असलेल्या पाठबळाबद्दल  अनुदानाच्या माध्यमातून आणि संंरक्षण प्रकल्पांसाठी 50 दशलक्ष डॉलरच्या कर्जाबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.

22. अड्डू शहरात मार्च 2022 मध्ये उद्घाटन झालेल्या नॅशनल कॉलेज फॉर पोलिसिंग अँड लॉ एन्फोर्समेंट(NCPLE) स्थापन करण्यासाठी सहाय्य केल्याबद्दल अध्यक्ष सोलिह यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.

23. मालदीवमध्ये पोलिस व्यवस्था सुधारण्यामध्ये आणि बेटावरील समुदायांची सुरक्षा आणि संरक्षण सुनिश्चित करण्यामध्ये योगदान  देणाऱ्या 61 पोलिस पायाभूत सुविधांची रचना आणि बांधकाम यासाठीच्या बायर्स क्रेडीट ऍग्रीमेंटच्या देवाणघेवाणीचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले.

24. दोन्ही नेत्यांनी या क्षेत्रात प्रादेशिक आणि बहुस्तरीय पुढाकारांतर्गत साध्य झालेल्या प्रगतीचे देखील स्वागत केले. मार्च 2022 मध्ये माले येथे  5व्या कोलंबो सुरक्षा परिसंवादाच्या 5व्या बैठकीचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी अध्यक्ष सोलिह यांचे अभिनंदन केले, ज्या परिसंवादात सदस्यत्वाच्या विस्ताराबरोबरच मालदीवच्या पुढाकाराने मानवताकारी सहाय्य आणि आपत्ती निवारण या नव्या स्तंभाची भर पडली.

25. दोन्ही नेत्यांनी गेल्या महिन्यात कोची येथे आयोजित केलेल्या कोलंबो सुरक्षा परिसंवादाच्या सदस्य देशांच्या 6व्या राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारांच्या बैठकीच्या यशस्वितेची आठवण केली आणि मालदीवमध्ये आयोजित होणाऱ्या 7व्या राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारांच्या बैठकीत विधायक फलनिष्पत्तीचा विश्वास व्यक्त केला.

26. दोन्ही नेत्यांनी आपत्ती व्यवस्थापन आणि सायबर सुरक्षा क्षेत्रातील सहकार्य बळकट करण्याविषयीच्या सामंजस्य कराराच्या विनिमयाचे स्वागत केले.

27. दोन्ही नेत्यांनी दहशतवादाच्या सर्व स्वरुपांचा निषेध केला आणि मूलतत्ववाद, हिंसक कट्टरवाद, दहशतवाद आणि अंमली पदार्थांची तस्करी यांचे उच्चाटन करण्यासाठी दोन्ही देशांच्या सुरक्षा संस्थांमध्ये समन्वय आणखी जास्त प्रमाणात वाढवण्याचे आवाहन केले. दहशतवाद विरोधी संयुक्त कार्यगटाच्या एप्रिल 2021 मध्ये झालेल्या बैठकीनंतर आतापर्यंत झालेल्या प्रगतीची दखल घेत दोन्ही नेत्यांनी सायबर सुरक्षेसह विविध क्षेत्रांमधील सहकार्य अधिक बळकट करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

सहकार्याच्या उदयाला येणाऱ्या आघाड्या

28. पर्यावरण आणि नूतनक्षम उर्जा- हवामान बदलामुळे वाढत चाललेल्या आव्हानांना दोन्ही नेत्यांनी विचारात घेतले  आणि या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि आवश्यक उपायांचा द्विपक्षीय त्याचबरोबर  आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी आघाडी या बहुस्तरीय चौकटीअंतर्गत अंगिकार करण्यासाठी सहकार्य बळकट करण्याबाबत सहमती दर्शवली. भारत सरकारच्या सवलतीच्या दराच्या कर्जाने 34 बेटांवर पिण्याचे पाणी आणि स्वच्छताविषयक पायाभूत सुविधांचा विकास हा आंतरराष्ट्रीय मदतीने होत असलेला मालदीवमधील सर्वात मोठा हवामान अंगिकार प्रकल्प आहे. मालदीवने 2030 पर्यंत  निर्धारित केलेल्या नेट झिरो बनण्याच्या महत्त्वाकांक्षी लक्ष्याची पंतप्रधान मोदी यांनी प्रशंसा केली आणि पूर्ण पाठबळाची हमी दिली. यासंदर्भात दोन्ही नेत्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना नूतनक्षम उर्जा आणि ग्रिड इंटर कनेक्टिविटी या क्षेत्रातील सहकार्य बळकट करण्याचे आवाहन केले.  

29. क्रीडा आणि युवा विकास- दोन्ही नेत्यांनी मालदिवियन खेळाडूंना क्रीडा सामग्रीची भेट आणि भारतात प्रशिक्षणासह क्रीडाविषयक संबंधांचा विस्तार करण्याचे महत्त्व दोन्ही नेत्यांनी  लक्षात घेतले. क्रीडा पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 40 दशलक्ष डॉलरच्या सवलतीच्या कर्जाच्या माध्यमातून मालदीवमध्ये क्रीडाविषयक पायाभूत सुविधांच्या विकास प्रकल्पांना पुढे नेण्याचे निर्देश त्यांनी दिले. मालदीवमध्ये अनुदानाच्या अर्थपुरवठ्यामधून उभारण्यात येत असलेल्या विकास प्रकल्पांमध्ये अनेक क्रीडा विकास प्रकल्पांच्या समावेशाची देखील त्यांनी दखल घेतली. 2020 मध्ये क्रीडा आणि युवा व्यवहारविषयक सहकार्यासंदर्भात दोन्ही बाजूंनी होणाऱ्या युवा विनिमयाचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले.

बहुस्तरीय मंचावर सहकार्य

30. संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांमध्ये तातडीने सुधारणांची गरज असल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या विस्तारित आणि सुधारित सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्वासाठी भारताच्या उमेदवारीला मालदीवने दिलेल्या पाठिंब्याची पंतप्रधान मोदी यांनी प्रशंसा केली. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या 76व्या सत्राचे अध्यक्षपद भूषवण्यासाठी मालदीवच्या उमेदवारीला भारताने पाठिंबा दिल्याबद्दल अध्यक्ष सोलिह यांनी भारताचे आभार मानले. संयुक्त राष्ट्रे आणि इतर आंतरराष्ट्रीय मंचावर सामाईक चिंतांच्या बहुस्तरीय मुद्यांवर काम करणे सुरूच ठेवण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.

करार/ सामंजस्य करार

31. या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत खालील क्षेत्रांमधील सामंजस्य करार/ करार करण्यात आले.

- संभाव्य मासेमारी क्षेत्राचे भाकित करण्याच्या क्षमतेत वाढ करण्याबाबत सहकार्य

- सायबर सुरक्षा क्षेत्रात सहकार्य

- मालदीवमधील महिला विकास समित्या आणि स्थानिक शासन प्राधिकरण यांची क्षमता उभारणी

-  आपत्ती व्यवस्थापनामधील सहकार्य

- पोलिस पायाभूत सुविधा उभारण्यासाठी 41 दशलक्ष डॉलरचा बायर्स क्रेडीट करार

- 2000 सामाजिक गृहनिर्माण युनिट्सना बायर्स क्रेडिट फायनान्सिंगसाठी इरादापत्रे

32. अध्यक्ष सोलिह यांनी या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी आपले शिष्टमंडळ आणि आपल्याविषयी दाखवलेला जिव्हाळा, आपुलकी आणि आदरातिथ्य याबद्दल त्यांचे आभार मानले.

33. अध्यक्ष सोलिह यांनी भारताच्या राष्ट्रपतींना मालदीव भेटीवर येण्यासाठी दिलेल्या निमंत्रणाचा पुनरुच्चार केला. अध्यक्ष सोलिह यांनी पंतप्रधान मोदी यांना देखील मालदीव भेटीवर येण्याचे निमंत्रण दिले.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
UPI reigns supreme in digital payments kingdom

Media Coverage

UPI reigns supreme in digital payments kingdom
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister watches ‘The Sabarmati Report’ movie
December 02, 2024

The Prime Minister, Shri Narendra Modi today watched ‘The Sabarmati Report’ movie along with NDA Members of Parliament today.

He wrote in a post on X:

“Joined fellow NDA MPs at a screening of 'The Sabarmati Report.'

I commend the makers of the film for their effort.”