कर्तव्य पथावर पार पडलेल्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात भारताची एकता, सामर्थ्य आणि वारशाचे दर्शन घडवण्यात आले. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय समर स्मारकावर आदरांजली अर्पण केली. या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांची प्रमुख उपस्थिती होती. शिस्तबद्ध पद्धतीने जाणाऱ्या सशस्त्र दलांच्या पथकांनी शिस्त आणि शौर्याची चुणूक दाखवली, तर विविधरंगी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणातून भारताच्या समृद्ध विविधतेवर प्रकाश टाकण्यात आला. भारतीय हवाई दलाच्या चित्तथरारक हवाई कसरतींनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. या सोहळ्यासाठी जमलेल्या लोकांनाही पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.




























