Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Project Cheetah: How A Species Declared Extinct During Nehru Era Returned To India Under Modi Govt

Media Coverage

Project Cheetah: How A Species Declared Extinct During Nehru Era Returned To India Under Modi Govt
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे अधिकृत भेट दिली. संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले, आणि त्यांना औपचारिक मानवंदना देण्यात आली.
दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली, या दरम्यान पंतप्रधानांनी युएई वरील हल्ल्यांचा भारताकडून तीव्र निषेध नोंदवला, तसेच यूएईचे नेतृत्व आणि जनतेप्रति असलेल्या दृढ ऐक्याचा पुनरुच्चार केला. पंतप्रधानांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवास आणि अखंड वाहतूक सुनिश्चित करण्याच्या भारताच्या स्पष्ट भूमिकेचा पुनरुच्चार केला. दीर्घकालीन प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेसह, ऊर्जा आणि अन्न सुरक्षेसाठी ते अत्यंत महत्वाचे आहे.
दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला आणि ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सुरक्षा, फिनटेक, पायाभूत सुविधा, शिक्षण, संस्कृती आणि लोकांमधील परस्पर संबंध यासह अनेक क्षेत्रांमध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी' अधिक दृढ होत असल्याचे स्वागत केले. त्यांनी भारत-युएई सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या (सीईपीए) यशाची दखल घेतली, यामुळे द्विपक्षीय व्यापाराने नवी उंची गाठली आहे.

दोन्ही नेत्यांनी भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील चैतन्यपूर्ण आणि वृद्धिंगत होत असलेल्या द्विपक्षीय ऊर्जा भागीदारीची प्रशंसा केली, यामध्ये कच्च्या तेलाचा, तसेच एलएनजी आणि एलपीजी पुरवठ्याचा समावेश असून, भारताच्या ऊर्जा सुरक्षेमध्ये युएईने एक महत्वाचा भागीदार म्हणून आपली भूमिका कायम राखली आहे. सर्वसमावेशक ऊर्जा भागीदारीसाठी नवीन उपक्रमांना प्रोत्साहन देण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. या संदर्भात, त्यांनी इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्स लिमिटेड आणि अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनी यांच्यातील धोरणात्मक सहकार्य कराराचे स्वागत केले. यामुळे भारताच्या धोरणात्मक पेट्रोलियम साठ्यामध्ये युएईचा सहभाग 30 दशलक्ष बॅरलपर्यंत वाढणार असून, भारतात धोरणात्मक वायू साठे उभारण्यासाठी दोन्ही देश एकत्रितपणे काम करतील. इंडियन ऑइल लिमिटेड (आयओसीएल) कंपनी आणि अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनी (एडीएनओसी) यांच्यात दीर्घकालीन एलपीजी पुरवठ्याबाबत झालेल्या कराराचेही त्यांनी स्वागत केले.
युएईमधील (UAE) कंपन्यांद्वारे भारतात 5 अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करण्याच्या घोषणेचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. यामध्ये एमिरेट्स न्यू डेव्हलपमेंट बँके द्वारे भारतातील आरबीएल बँकेमध्ये केलेली 3 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक; अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी द्वारे भारतातील प्राधान्यक्रमाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये, भारताच्या नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर अँड इन्व्हेस्टमेंट फंडच्या सहयोगाने केलेली 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक; आणि इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीने भारतातील 'सम्मान कॅपिटल'मध्ये केलेली 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक, याचा समावेश आहे. ही गुंतवणूक, द्विपक्षीय धोरणात्मक गुंतवणूक भागीदारी मजबूत करण्याबरोबरच, भारताच्या विकासगाथे प्रति युएईची शाश्वत आणि दीर्घकालीन वचनबद्धता अधोरेखित करते.

सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून स्थिर आणि मजबूत द्विपक्षीय संरक्षण सहकार्याची दोन्ही नेत्यांनी दखल घेतली. या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये धोरणात्मक संरक्षण भागीदारीच्या आराखड्यावर स्वाक्षरी झाल्याचे त्यांनी स्वागत केले. याअंतर्गत, दोन्ही बाजूंनी संरक्षण क्षेत्रात औद्योगिक सहकार्य अधिक बळकट करणे, नवोन्मेष तसेच प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रात सहयोग, प्रशिक्षण, संयुक्त सराव, सागरी सुरक्षा, सायबर संरक्षण, सुरक्षित दळणवळण आणि माहितीची देवाणघेवाण वाढवण्यावर सहमती दर्शवली.

या दौऱ्यादरम्यान दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत खालील अतिरिक्त दस्तऐवजांवर स्वाक्षऱ्या झाल्या. या करारामुळे द्विपक्षीय सहकार्य आणखी मजबूत होईल:

  • भारत सरकारने सुरू केलेल्या सागरी विकास निधी योजनेअंतर्गत, वडीनार येथे ऑफशोअर फॅब्रिकेशनसह जहाज दुरुस्ती क्लस्टर स्थापन करण्यासंदर्भात कोचीन शिपयार्ड लिमिटेड आणि ड्रायडॉक्स वर्ल्ड, दुबई यांच्यात सामंजस्य करार.
  • जहाज दुरुस्तीमधील कौशल्य विकासाबाबत कोचीन शिपयार्ड लिमिटेड, ड्रायडॉक्स वर्ल्ड दुबई आणि सेंटर ऑफ एक्सलन्स इन मेरिटाइम अँड शिपबिल्डिंग (सीईएमएस) यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार. या करारामुळे कुशल सागरी मनुष्यबळ संघटित होऊन प्रशिक्षिण आणि रोजगारासाठी एक आराखडा तयार होईल. सोबतच, भारतीय सागरी मनुष्यबळाची क्षमता वाढेल तसेच भारत कुशल जहाजबांधणी आणि जहाज दुरुस्ती व्यावसायिकांचे जागतिक केंद्र म्हणून स्थापित होईल.
  • सी-डॅक, भारत आणि जी-42, संयुक्त अरब अमिरात यांच्या भागीदारीत 8 एक्साफ्लॉप सुपर कॉम्प्युट क्लस्टर स्थापन करण्यासाठी टर्म शीट.

दोन्ही नेत्यांनी ‘मैत्री’ (MAITRI - Master Application for International Trade and Regulatory Interface) या डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून व्हर्च्युअल ट्रेड कॉरिडॉरच्या कार्यान्वयनाचेही स्वागत केले. दोन्ही बाजूंच्या सीमाशुल्क आणि बंदर प्राधिकरणांना जोडणारी ही डिजिटल चौकट मालवाहतुक सुव्यवस्थित करेल तसेच खर्च आणि वाहतुकीचा वेळ कमी करेल. परिणामी व्यापार अधिक कार्यक्षम होईल.
पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांनी केलेल्या हार्दिक स्वागताबद्दल आणि आदरातिथ्याबद्दल त्यांचे आभार मानले तसेच त्यांना लवकरच भारत भेटीवर येण्याचे निमंत्रण दिले.