गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्याने आपल्या भगिनींचे जीवन अधिक सुकर होईल : पंतप्रधान
पंतप्रधानांनी सर्व एलपीजी ग्राहकांसाठी एलपीजी सिलिंडरची किंमत 200 रुपयांनी कमी करण्याचे उचलले धाडसी पाऊल

सर्व एलपीजी ग्राहकांसाठी म्हणजेच 33 कोटी गॅस जोडण्यांसाठी एलपीजी सिलिंडरची किंमत 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे.

रक्षाबंधन हा सण आपल्या कुटुंबातील आनंद द्विगुणीत करणारा दिवस असतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पीएम उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना त्यांच्या खात्यात सिलेंडरमागे 200 रुपयांचे अनुदान मिळत राहील.

सरकारने 75 लाख अतिरिक्त पीएम उज्ज्वला जोडण्यांना देखील मंजुरी दिली आहे, यामुळे एकूण पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींची संख्या 10.35 कोटी पर्यंत पोहोचणार आहे.

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या X शृंखलेला उत्तर देताना, पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;

“रक्षाबंधन हा सण आपल्या कुटुंबातील  आनंद द्विगुणित करणारा  दिवस असतो. गॅसच्या किंमती  कमी झाल्यामुळे माझ्या कुटुंबातील भगिनींना दिलासा मिळेल आणि त्यांचे जीवन अधिक सुकर होईल. माझी प्रत्येक बहीण आनंदी, निरोगी, सुखी राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.''

 

More details can be found here: https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1953241

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s power sector set for strong FY27 growth on rising demand, capacity additions: Report

Media Coverage

India’s power sector set for strong FY27 growth on rising demand, capacity additions: Report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 20 जुलै 2026
July 20, 2026

Yuva to Global Stage: How PM Modi’s Policies Are Turning India’s Youth, Farms & Factories into Growth Engines