पंतप्रधान नरेंद्र मोदी नूतनीकृत जालियनवाला बाग स्मारकाचे शनिवारी, 28 ऑगस्टला लोकार्पण करणार आहेत. या स्मारकात विकसित करण्यात आलेल्या संग्रहालयाच्या दालनांचेही त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. हे स्मारक अद्ययावत करण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या विविध विकासकामांचे दर्शनही या कार्यक्रमातून घडणार आहे.














