कॅनडाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री अनिता आनंद यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी परराष्ट्र मंत्री आनंद यांचे स्वागत केले आणि त्यांची भेट भारत कॅनडा द्विपक्षीय भागीदारीला नवी गती देण्याच्या प्रयत्नांना बळ देईल असे म्हटले.
जी 7 शिखर परिषदेसाठी यावर्षी जून महिन्यात कॅनडाला भेट दिल्याचे स्मरण करुन या भेटीत कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यासोबत अत्यंत सफल चर्चा झाल्याचे पंतप्रधान म्हणाले.
व्यापार, उर्जा, तंत्रज्ञान, कृषी आणि नागरी संबंधांमधील वाढत्या सहकार्याचे महत्वपूर्ण असल्याचे सांगितले. पंतप्रधानांनी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांना शुभेच्छा दिल्या आणि आगामी काळातील द्विपक्षीय संबंधांबाबत आपण उत्सुक असल्याचे सांगितले.
Welcomed Canada’s Foreign Minister, Ms. Anita Anand. Discussed ways to strengthen cooperation in trade, technology, energy, agriculture and people-to-people exchanges for mutual growth and prosperity.@AnitaAnandMP pic.twitter.com/GCQfbJvBh4
— Narendra Modi (@narendramodi) October 13, 2025


