केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत केलेल्या आपल्या भाषणात या वर्षीचा अर्थसंकल्प आपल्या देशाच्या आर्थिक परिवर्तनाला कसा हातभार लावेल याचे सर्वसमावेशक चित्र मांडले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. “त्यांनी रिफॉर्म एक्सप्रेस, सूक्ष्म मध्यम आणि लघु उद्योगांना पाठबळ, कौशल्य विकास, पुढच्या पिढीच्या पायाभूत सुविधांना प्रोत्साहन, आरोग्यसेवा, शिक्षण आणि अन्य क्षेत्रांना चालना देण्याचे प्रयत्न अशा मुद्द्यांवर भर दिला”, असे पंतप्रधान म्हणाले.
एक्स या समाज माध्यमावरील संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे:
“लोकसभेतील आपल्या भाषणात, अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी यांनी या वर्षीचा अर्थसंकल्प आपल्या देशाच्या आर्थिक परिवर्तनात कसा हातभार लावेल याचे सर्वसमावेशक चित्र मांडले. त्यांनी रिफॉर्म एक्सप्रेस, एमएसएमईंना पाठिंबा, कौशल्य विकास, पुढच्या पिढीच्या पायाभूत सुविधांना प्रोत्साहन, आरोग्यसेवा, शिक्षण आणि अन्य क्षेत्रांना चालना देण्याचे प्रयत्न अशा मुद्द्यांवर भर दिला."
@nsitharaman
In her speech in the Lok Sabha, Finance Minister Smt. Nirmala Sitharaman Ji gave a comprehensive picture of how this year’s Budget will contribute to our nation’s economic transformation. She emphasised on Reform Express, the support to MSMEs, skilling, push to next-gen…
— Narendra Modi (@narendramodi) February 12, 2026


