Dr. Werner Hoyer, President, European Investment Bank meets Prime Minister Modi
European Investment Bank appreciates India’s strong and proactive measures in the field of climate change

युरोपियन गुंतवणूक बँकेचे अध्यक्ष डॉ. वॉर्नर होयर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बँकेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी यांनी एक वर्षांपूर्वी भारत-युरोपियन युनियन शिखर परिषदेच्या वेळी युरोपियन गुंतवणूक बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. नवी दिल्लीत बँकेचे विभागीय कार्यालय स्थापन करण्यासाठी पाठिंबा देण्याचे स्पष्ट केले होते. आज या कार्यालयाचे उद्‌घाटन झाले.

यावेळी झालेल्या चर्चेत पंतप्रधान मोदी यांनी वातावरण बदल आणि शाश्वत पर्यावरणाबद्दलच्या भारताच्या धोरणांबद्दल माहिती दिली. युरोपियन गुंतवणूक बँकेने लखनौ मेट्रोसह इतर शाश्वत पर्यावरण प्रकल्पांसाठी भारताला एक दशलक्ष युरोचे कर्ज दिले आहे.

वातावरण बदलाबाबत भारताच्या मजबूत आणि स्वयंप्रेरीत उपायांची प्रशंसा केली आणि या दिशेने भारत करत असलेल्या प्रयत्नांना बँकेचा सातत्याने पाठिंबा मिळत राहील असे स्पष्ट केले.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
West Asia conflict: 59 India-bound vessels transited Hormuz since war

Media Coverage

West Asia conflict: 59 India-bound vessels transited Hormuz since war
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 22 जुलै 2026
July 22, 2026

From Scholarships to Homes to High-Speed Rail: Inclusive Growth Under PM Modi’s Leadership