ऑस्ट्रेलियाच्या मजूर पक्षाने (Labor Party) फेडरल निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपपंतप्रधानांचे केले अभिनंदन
भारत-ऑस्ट्रेलिया सर्वंकष धोरणात्मक भागीदारीला आज पाच वर्षे पूर्ण, ही भागीदारी अधिक दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी केली चर्चा
उपपंतप्रधान मार्लेस यांनी सीमेपलीकडून होत असलेल्या दहशतवादाविरोधातील भारताच्या लढ्याला ऑस्ट्रेलियाचा पाठिंबा असल्याचा मुद्दा पुन्हा केला अधोरेखित

ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री, रिचर्ड मार्लेस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान मार्लेस यांनी अलीकडेच झालेल्या फेडरल निवडणुकीत ऑस्ट्रेलियाच्या मजूर पक्षाने (Australian Labor Party) ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

या भेटीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि ऑस्ट्रेलियामधील सर्वंकष धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठीच्या कल्पनांची देवाणघेवाण केली. या धोरणाला आज पाच वर्षे पूर्ण झाली झाली आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांनी संरक्षण उद्योग क्षेत्रात सहकार्यपूर्ण भागीदारी, लवचिक पुरवठा साखळी, अत्यावश्यक खनिजे, नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्याचा विस्तार करण्याचे महत्वही अधोरेखित केले. स्थिर, सुरक्षित आणि समृद्ध भारत प्रशांत क्षेत्रासाठी द्विपक्षीय सहकार्याची दिशा ठरवण्यात सामायिक दृष्टीकोन आवश्यक असल्याची बाबही त्यांनी नमूद केली.
ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान मार्लेस यांनी सीमेपलीकडून होत असलेल्या दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढ्याला ऑस्ट्रेलियाचा पाठिंबा असल्याचा मुद्दा पुन्हा अधोरेखित केला.

यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षाच्या अखेरीस भारतात होणार असलेल्या वार्षिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान अल्बानीज यांना आमंत्रितही केले.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Short trip, big results: 7 crucial deals inked by PM Modi in UAE

Media Coverage

Short trip, big results: 7 crucial deals inked by PM Modi in UAE
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 15 मे 2026
May 15, 2026

Viksit Bharat Unleashed: PM Modi's Blueprint Delivers Energy Independence, Tech Boom, and Diplomatic Dominance