पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या आर्थिकविषयक व्यवहार  समितीने नवोदय विद्यालय योजने  (केंद्रीय क्षेत्र योजना) अंतर्गत देशात ज्‍या जिल्ह्यांमध्ये  नवोदय विद्यालये नाहीत, अशा 28 जिल्ह्यांमध्ये ती  स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. या सूची मध्‍ये महाराष्‍ट्रातील ठाणे जिल्‍ह्याचा समावेश आहे.देशात  नव्याने स्थापण्‍यात येणाऱ्या 28 नवोदय विद्यालयांची सूची जोडण्‍यात आली आहे.

देशामध्‍ये नवीन 28 नवोदय विद्यालये स्थापण्‍यासाठी एकूण  अंदाजे 2359.82 कोटी रुपये इतका निधी लागणार आहे.  हा निधि  2024-25 ते 2028-29 या पाच वर्षांच्या कालावधीमध्‍ये  खर्च केला जाईल. यामध्‍ये  भांडवली खर्चासाठी 1944.19 कोटी रूपयांची तरतूद ठेवली आहे.तर परिचालन खर्च रु. 415.63 कोटी उपलब्‍ध करून दिले आहेत.

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय संरचनेत 560 विद्यार्थ्यांच्या क्षमतेसह एक पूर्ण नवोदय विद्यालय  चालविण्यासाठी समितीने निश्चित केलेल्या निकषांच्या बरोबरीने पदे निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे, 560 x 28 = 15,680 विद्यार्थ्यांना या विद्यालयांचा लाभ घेता येईल. प्रचलित नियमांनुसार, एक पूर्ण विकसित नवोदय विद्यालय  47 व्यक्तींना रोजगार प्रदान करते आणि त्यानुसार, मंजूर  करण्‍यात आलेल्या 28 नवोदय विद्यालयांमुळे 1316 व्यक्तींना थेट कायमस्वरूपी रोजगार मिळेल. शालेय पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी बांधकाम आणि संबंधित उपक्रमांमुळे अनेक कुशल आणि अकुशल कामगारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. निवासी स्वरूपामुळे, प्रत्येक नवोदय विद्यालय स्थानिक विक्रेत्यांना अन्नधान्य , उपभोग्य वस्तू, फर्निचर, शिक्षण साहित्य इत्यादीसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी आणि न्हावी, शिंपी मोची, घरकाम आणि सुरक्षिततेसाठी मनुष्यबळ यासारख्या स्थानिक सेवा पुरवठादारांना संधी निर्माण करेल.

नवोदय विद्यालय ही  पूर्णतः निवासी, सह-शैक्षणिक शाळा आहेत.  ज्यामध्‍ये  हुशार मुलांना इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतचे उत्तम दर्जाचे आधुनिक शिक्षण दिले जाते. प्रामुख्याने ग्रामीण भागातील,  त्यांच्या कुटुंबाच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचा विचार न करता,  या शाळांमध्ये निवड चाचणीच्या आधारे प्रवेश दिले जातात. देशात दरवर्षी  अंदाजे 49,640 विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयांमध्‍ये  इयत्ता सहावीमध्ये प्रवेश दिला जातो.

आत्तापर्यंत, देशभरात 661 मंजूर नवोदय विद्यालये  आहेत [यापैकी 20 जिल्ह्यांमध्‍ये अनुसूचित जाती/जमातीच्या विद्यार्थ्‍यांची संख्या जास्त आहे तिथे   दोन  नवोदय विद्यालय आहेत . याशिवाय देशात   3 विशेष नवोदय विद्यालये आहेत]. यापैकी 653 विद्यालये  कार्यरत आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची   अंमलबजावणी दर्शवणारी आणि इतरांसाठी आदर्श शाळा म्हणून काम करत जवळपास सर्व नवोदय विद्यालयांना पीएम श्री शाळा म्हणून मान्यता दिली  आहे. या  योजनेला चांगली लोकप्रियता मिळाली  आहे आणि दरवर्षी नवोदय विद्यालयांमध्ये सहावीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अलिकडच्या वर्षांत, नवोदय विद्यालयांमध्ये मुलींची (42%), तसेच अनुसूचित जाती  (24%), अनुसूचित जमाती  (20%) आणि इतर मागासवर्गीय  (39%)  अशी  पट संख्‍या वाढत असल्याचे  दिसून येत आहे. यामुळे सर्वांसाठी दर्जेदार शिक्षण उपलब्ध झाले आहे.

सीबीएसईने घेतलेल्या बोर्ड परीक्षांमध्ये नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांची कामगिरी सर्व शैक्षणिक प्रणालींमध्ये सातत्याने सर्वोत्तम राहिली आहे. नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी शहरी भारतातील सर्वोत्कृष्ट प्रतिभेच्या बरोबरीने अभियांत्रिकी, वैद्यकीय विज्ञान, सशस्त्र सेना, नागरी सेवा इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.

 Annexure

 

S.No.

Name of the State

Name of the District in which NV is sanctioned

 

 

 

 

Arunachal Pradesh

Upper Subansiri

 

Kradadi

 

Lepa Rada

 

Lower Siang

 

Lohit

 

Pakke-Kessang

 

Shi-Yomi

 

Siang

 

 

 

Assam

Sonitpur

 

Charaideo

 

Hojai

 

Majuli

 

South Salmara Manacachar

 

West Karbianglong

 

 

 

Manipur

Thoubal

 

Kangpoki

 

Noney

 

Karnataka

Bellary

 

Maharashtra

Thane

 

 

 

 

 

 

 

Telangana

Jagityal

 

Nizamabad

 

Kothagudem Bhadradri

 

Medchal Malkajgiri

 

Mahabubnagar

 

Sangareddy

 

Suryapet

 

 

West Bengal

Purba Bardhaman

 

Jhargram

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India steps up semiconductor push, seeks to turn ‘Make In India’ into ‘Engineer in India’

Media Coverage

India steps up semiconductor push, seeks to turn ‘Make In India’ into ‘Engineer in India’
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares a Sanskrit Subhashitam, highlighting prayers for peace, well-being, and harmony with nature
September 07, 2026

Prime Minister Shri Narendra Modi shared a Sanskrit Subhashitam today, highlighting prayers for peace, well-being, and harmony with nature.

The Prime Minister wrote on X;

"शं नो वातः पवतां शं नस्तपतु सूर्यः।

शं नः कनिक्रदद् देवः पर्जन्योऽभिवर्षतु॥"

May the wind blow for us in a peaceful, wholesome, and purifying way. May the Sun shine upon us as a source of well-being and blessing. May it's warmth and light bring us comfort and joy. And may the divine Rain-God, Parjanya, shower life-giving and auspicious rain upon us.