पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने आसाममधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 15 वरील गोहपूर ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 715 वरील नुमालीगड या दरम्यान 4 पदरी प्रवेश नियंत्रित हरित संपर्क जोडणीविषयक बांधकामाला काल मंजुरी दिली आहे. याअंतर्गत ब्रह्मपुत्रा नदीखाली 15.79 किमी लांबीच्या रस्ते आणि रेल्वे बोगद्याचा (Road cum Rail Tunnel) समावेश आहे. हा संपूर्ण प्रकल्प एकूण 18,662 कोटी रुपये भांडवली खर्चासह अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (EPC - Engineering Procurement Construction) तत्त्वावर विकसित केला जाणार आहे.

सध्या, NH-52 वरील सिलघाटजवळील विद्यमान कालियाभंभोरा रस्ते पुलावरून NH-715 वरील नुमालीगड आणि NH-15 वरील गोहपूर यांच्यामधील अंतर 240 किमी इतके आहे. नुमालीगड, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि विश्वनाथ शहरातून कराव्या लागणाऱ्या या प्रवासासाठी सध्या 6 तास लागतात. या आव्हानावर मात करण्यासाठी, ब्रह्मपुत्रा नदीखालून रस्ते आणि रेल्वे बोगद्यासह गोहपूर ते नुमालीगड दरम्यान ही 4-पदरी संपर्क जोडणी उभारण्याचा हा प्रस्ताव आहे. पाण्याखालून जाणारा अशा प्रकारचा हा भारतामधील पहिला आणि जगातील दुसरा रस्ते आणि रेल्वे बोगदा असणार आहे. या प्रकल्पामुळे आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि ईशान्य भारतातील इतर राज्यांना मोठा लाभ होणार आहे. यामुळे मालवाहतुकीची कार्यक्षमता वाढेल, व्यावसायिक वाहतुकीसाठीचा खर्च कमी होईल आणि या प्रदेशातील सामाजिक-आर्थिक विकासालाही गती मिळेल.

हा प्रकल्प दोन मुख्य राष्ट्रीय महामार्गांसह (NH-15 आणि NH-715) आणि दोन रेल्वे मार्गांशी जोडला जाणार आहे. यात गोहपूरच्या बाजूला नॉर्थ फ्रंटीअर रेल्वेअंतर्गतच्या रंगिया विभागांतर्गत रंगिया-मुकोंगसेलेक रेल्वे विभाग आणि नुमालीगडच्या बाजूला तिनसुकिया विभागांतर्गतच्या फुरकाटिंग-मरियानी लूप लाईन विभागाचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे आसाममधील महत्त्वाच्या आर्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक वाहतूक केंद्रांना अविरत संपर्क जोडणी उपलब्ध होणार आहे. यासोबतच या प्रकल्पामुळे 11 आर्थिक केंद्रे, 03 सामाजिक केंद्रे, 02 पर्यटन केंद्रे आणि 08 व्यावसायिक वाहतुकीची केंद्रे परस्परांशी जोडली जाणार आहेत, त्यामुळे बहुआयामी एकात्मिकीकरणाला चालना मिळणार आहे. यासोबतच या प्रकल्पामुळे 04 प्रमुख रेल्वे स्थानके, 02 विमानतळ आणि 2 देशांतर्गत जलमार्गांसोबतचा संपर्क जोडणीही विस्तार आहे. त्यामुळे या प्रदेशासाठी वस्तूमाल आणि प्रवाशांच्या जलद वाहतुकीची सोय उपलब्ध होणार आहे.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, धोरणात्मक दृष्टीकोन आणि इथल्या प्रादेशिक आर्थिक विकास, मुख्य आर्थिक केंद्रांसोबतच्या संपर्क जोडणीचे बळकटीकरण या बाबतीत या प्रकल्पाची भूमिका महत्त्वाची असणार आहे. यामुळे व्यापार तसेच औद्योगिक विकासासाठीच नव्या पर्यायांचे मार्ग प्रशस्त होणार आहेत. या प्रकल्पामुळे अंदाजे 80 लाख मनुष्य दिवसांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारही निर्माण होणार आहे. परिणामी या प्रकल्पाच्या आसपासच्या प्रदेशात विकास आणि समृद्धीची नवी दारे खुली होणार आहेत.

या कॉरिडॉरचा नकाशा :

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/CCEATwimTubeTBMpic1402202601H9.jpg

प्रकल्पाचा सविस्तर तपशील:

वैशिष्ट्ये

तपशील

प्रकल्पाचे नाव

आसाम राज्यात अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (EPC) तत्वावर मोडवर ब्रह्मपुत्रा नदीखाली प्रत्येकी 2 पदरी ट्विन ट्यूब टीबीएम रस्ते बोगद्याचे बांधकाम आणि एका ट्यूबमध्ये रेल्वे पायाभूत सुविधांची तरतूद, प्रकल्पाची एकूण लांबी 33.7 किमी.

कॉरिडॉर

NH-15 वरील गोहपूर – NH-715 वरील नुमालीगड

लांबी (किमी)

33.7 किमी

एकूण नागरी बांधकाम (CIVIL) खर्च (रु. कोटी)

11,982.36 कोटी रुपये

भूसंपादन खर्च (रु. कोटी)

716.65 कोटी रुपये

एकूण भांडवली खर्च (रु. कोटी)

18,662.02 कोटी रुपये

मोड (Mode)

अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (EPC).

प्रकल्पाची लांबी

तातडीचा प्रकल्प लांबी 33.77 किमी.

एका ट्यूबमध्ये रेल्वेसह ट्विन ट्यूब टीबीएम बोगदा

15.79 किमी.

एकूण रोड कट आणि कव्हर (Road cut & cover)

1.26 किमी.

एकूण रेल्वे कट आणि कव्हर (Rail cut & cover)

4 किमी.

जोडलेले प्रमुख रस्ते (Major Roads Connected)

राष्ट्रीय महामार्ग – NH-15 आणि NH-715

जोडलेले रेल्वे मार्ग (Rail Line connected)

गोहपूरच्या बाजूला नॉर्थ फ्रंटीअर रेल्वेच्या (NFR) रंगिया विभागांतर्गत रंगिया-मुकोंगसेलेक रेल्वे विभाग

नुमालीगडच्या बाजूला नॉर्थ फ्रंटीअर रेल्वेच्या तिनसुकिया विभागांतर्गत फुरकाटिंग-मरियानी लूप लाईन विभाग

जोडलेली आर्थिक / सामाजिक / वाहतूक केंद्रे (Nodes)

विमानतळ (02): डोनी पोलो होलोंगी विमानतळ इटानगर आणि तेजपूर विमानतळ

रेल्वे स्थानके (04): नुमालीगड रेल्वे स्थानके, गोहपूर रेल्वे स्थानके, गोलाघाट टाऊन रेल्वे स्थानक, सिमालुगुरी जंक्शन

देशांतर्गत जलमार्ग टर्मिनल (02): विश्वनाथ घाट जलमार्ग टर्मिनल, तेजपूर जलमार्ग टर्मिनल

आर्थिक केंद्रे (Economic Nodes) (11) : नुमालीगड औद्योगिक क्षेत्र, जिल्हा उद्योग केंद्र (DIC) जोरहाट, एकात्मिक पायाभूत सुविधा विकास केंद्र (IIDC) टिटाबर, औद्योगिक क्षेत्र जुनाकीनगर, औद्योगिक वसाहत नगाव, एकात्मिक पायाभूत सुविधा विकास केंद्र (IIDC) डेमो, औद्योगिक वसाहत शिवसागर, एकात्मिक पायाभूत सुविधा विकास केंद्र (IIDC) नलताली, औद्योगिक क्षेत्र डोलाबारी, मिनी औद्योगिक क्षेत्र विश्वनाथ, मल्टी-मोडल लॉजिस्टिक पार्क (MMLP) जोगीघोपा.

सामाजिक केंद्रे (Social Nodes) (03) :  01 आदिवासी जिल्हा - दिमा हासाओ; 02 आकांक्षी जिल्हे - उदलगुरी आणि दररंग

पर्यटन केंद्रे (Tourist Nodes) (02) : काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि देवपहार पुरातत्व स्थळ

जोडलेली प्रमुख शहरे / नगरे

आसाममधील नुमालीगड, तेजपूर, गोहपूर, दिब्रुगड आणि अरुणाचल प्रदेशातील इटानगर

रोजगार निर्मिती क्षमता

80 लाख मनुष्य दिवसांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार

आर्थिक वर्ष 25 मधील वार्षिक सरासरी दैनिक रहदारी (AADT)

अंदाजे 4680 पॅसेंजर कार युनिट्स (PCU)

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
‘Shortcuts will cut you short’: PM Modi’s message for youngsters at former President Kovind’s autobiography launch

Media Coverage

‘Shortcuts will cut you short’: PM Modi’s message for youngsters at former President Kovind’s autobiography launch
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 13 ऑगस्ट 2026
August 13, 2026

Aatmanirbhar in Motion: Solar Homes, Made-in-India Containers, Record Exports & a Rising Global Footprint Under the Leadership of PM Modi