भारतीय पंतप्रधानांच्या गेल्या 40 वर्षात पहिल्यांदाच होत असलेल्या ऑस्ट्रियाच्या आगामी भेटीबाबत ऑस्ट्रियाचे चान्सलर कार्ल नेहम्मर यांनी व्यक्त केलेल्या मतांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत.

“भारतीय पंतप्रधान गेल्या 40 वर्षात पहिल्यांदाच इथे भेट देत असल्याने ही भेट आमच्यासाठी विशेष सन्मान असून भारतासोबत 75 वर्षांचे राजनैतिक संबंध साजरे करत असल्याने ही भेट बहुमुल्य असा मैलाचा दगड ठरेल” असे ऑस्ट्रियाच्या चान्सलरनी म्हटले आहे.

या ऐतिहासिक प्रसंगी आपण हे संबंध आणखी दृढ करण्याबाबत चर्चा करणार असून सहकार्याच्या नवीन मार्गांना गवसणी घालण्यासाठी आपण उत्सुक असल्याची प्रतिक्रिया मोदी यांनी दिली आहे. 

मोदी x च्या माध्यमातून चान्सलर कार्ल नेहम्मर यांना प्रतिसाद देताना म्हणाले की:-

“कुलपती @कार्ल नेहम्मर, आपले आभार. या या ऐतिहासिक प्रसंगी ऑस्ट्रियाला भेट देणे हे खरोखरच सन्मानजनक आहे. आपल्या देशांमधील  संबंध आणखी दृढ करण्याबाबत आपण चर्चा करणार असून सहकार्याच्या नवीन मार्गांना गवसणी घालण्यासाठी आपण उत्सुक आहोत. लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्य यांची सामायिक मुल्ये मजबूत पायाची निर्मिती करतात ज्यायोगे आपण आणखी निकटतम भागीदारीची बांधणी करू.”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
'We'll provide AI skill training to 1 crore youth': PM Modi's big announcement on Independence Day 2026

Media Coverage

'We'll provide AI skill training to 1 crore youth': PM Modi's big announcement on Independence Day 2026
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 15 ऑगस्ट 2026
August 15, 2026

Azadi Ka Amrit Mahotsav Continues: PM Modi’s Independence Day Vision Unites Growth, Youth Power & National Pride