11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 76,500 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या सात प्रमुख प्रकल्पांचा पंतप्रधानांनी घेतला आढावा
प्रकल्पांना होणारा विलंब केवळ खर्चातच वाढ करत नाही तर जनतेला देखील प्रकल्पाच्या अपेक्षित लाभांपासून वंचित ठेवतो : पंतप्रधान
पंतप्रधान म्हणाले की "एक पेड माँ के नाम" अभियान प्रकल्प विकसित करताना पर्यावरणाचे रक्षण करण्यास मदत करू शकते
पंतप्रधानांनी AMRUT 2.0 चा आढावा घेतला आणि मुख्य सचिवांना या योजनेअंतर्गत कामांवर वैयक्तिकरित्या देखरेख ठेवण्याची केली सूचना
शहरांच्या वाढीची क्षमता आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन राज्यांनी योजना आखण्याची पंतप्रधानांनी केली सूचना
पंतप्रधानांनी जल जीवन मिशनशी संबंधित जनतेच्या तक्रारींचा घेतला आढावा तसेच अमृत सरोवर मिशनवर काम पुढे सुरू ठेवण्याबाबतही केली चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज आयसीटी आधारित प्रगती या मल्टी मोडल मंचाची 44 वी बैठक झाली. केंद्र आणि राज्य सरकारांचा यात समावेश असून सक्रीय प्रशासन आणि प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी हा यामागचा उद्देश आहे. तिसऱ्या कार्यकाळातील  ही पहिलीच बैठक होती.

बैठकीत, महत्त्वपूर्ण सात प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला, ज्यामध्ये रस्ते जोडणीशी संबंधित दोन प्रकल्प, दोन रेल्वे प्रकल्प आणि कोळसा, ऊर्जा आणि जलसंपदा  क्षेत्रातील प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश आहे. या प्रकल्पांची एकूण किंमत 76,500 कोटी रुपयांहून अधिक असून ते उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, ओडिशा, गोवा, कर्नाटक, छत्तीसगड आणि दिल्ली या  11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी  संबंधित आहेत .

केंद्र किंवा राज्य पातळीवरील सरकारमधील प्रत्येक अधिकाऱ्याने या वस्तुस्थितीबद्दल संवेदनशील असायला हवे की प्रकल्पांना होणारा विलंब केवळ खर्चातच वाढ करत  नाही तर जनतेला देखील प्रकल्पाच्या अपेक्षित लाभांपासून वंचित  ठेवतो यावर पंतप्रधानांनी भर दिला.

पंतप्रधान म्हणाले की "एक पेड माँ के नाम" अभियान  प्रकल्प विकसित करताना पर्यावरणाचे रक्षण करण्यात मदत करू शकते.बैठकीदरम्यान, पंतप्रधानांनी अमृत 2.0 आणि जल जीवन अभियानाशी संबंधित सार्वजनिक तक्रारींचाही आढावा घेतला.हे प्रकल्प एकत्रितपणे शहरी आणि ग्रामीण भागातील पाण्याच्या समस्यांचे निराकरण करतात. पाणी ही मूलभूत मानवी गरज आहे आणि जिल्हा स्तरावर तसेच राज्य पातळीवरील तक्रारींचा  गुणवत्तापूर्ण निपटारा राज्य सरकारांनी केला पाहिजे यावर पंतप्रधानांनी भर दिला. जल जीवन प्रकल्पांच्या यशस्वीतेसाठी पुरेशी संचालन आणि देखभाल यंत्रणा महत्त्वाची आहे आणि शक्य असेल तेथे महिला बचत गटांना सहभागी करण्यास आणि संचालन आणि देखभालीच्या कामात तरुणांना कौशल्याधारित करण्याचे पंतप्रधानांनी सुचवले. पंतप्रधानांनी जिल्हा स्तरावर जलसंपत्ती सर्वेक्षण आयोजित करण्याचा पुनरुच्चार केला आणि संसाधन शाश्वततेवर भर दिला.

अमृत 2.0 अंतर्गत कामांचे वैयक्तिकरित्या निरीक्षण करण्याचा तसेच राज्यांनी शहरांच्या वाढीची क्षमता आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन योजना बनवण्याचा सल्ला पंतप्रधानांनी मुख्य सचिवांना दिला. ते म्हणाले की, शहरांसाठी पिण्याच्या पाण्याच्या योजना बनवताना शहराभोवतीच्या भागांचाही विचार केला पाहिजे कारण कालांतराने या भागांचाही शहराच्या हद्दीत समावेश होतो. देशातील झपाट्याने होत असलेले शहरीकरण पाहता शहरी प्रशासनातील सुधारणा, सर्वसमावेशक शहरी नियोजन, शहरी वाहतूक नियोजन आणि महानगरपालिका वित्तपुरवठा या काळाच्या महत्त्वाच्या गरजा आहेत. शहरांच्या वाढत्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजनेसारख्या उपक्रमांचा लाभ घेण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुख्य सचिवांच्या परिषदेत शहरीकरण आणि पेयजल सारख्या विविध पैलूंवर चर्चा झाली होती याचे स्मरण करून देताना दिलेल्या वचनबद्धतेचा आढावा मुख्य सचिवांनी स्वतःच घ्यावा असे पंतप्रधानांनी सांगितले.

याव्यतिरिक्त पंतप्रधानांनी भारत सरकारच्या मुख्य सचिवांना आणि सचिवांना मिशन अमृत सरोवर कार्यक्रमावर कार्यरत राहण्यास सांगितले. अमृत सरोवरांचे पाणलोट क्षेत्र स्वच्छ ठेवावे व ग्रामसमितीच्या सहभागाने आवश्यकतेनुसार या जलकुंभांचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे, असेही ते म्हणाले.

प्रगतीच्या 44 व्या बैठकीपर्यंत, 18.12 लाख कोटी रुपये किमतीच्या 355 प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.

 

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
India's energy sector records rapid growth in last 10 years, total installed capacity jumps 56%

Media Coverage

India's energy sector records rapid growth in last 10 years, total installed capacity jumps 56%
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM pays tributes to Dr. Syama Prasad Mukherjee on his Balidan divas
June 23, 2025

The Prime Minister Shri Narendra Modi today paid tributes to Dr. Syama Prasad Mukherjee on his Balidan Divas.

In a post on X, he wrote:

“डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी को उनके बलिदान दिवस पर कोटि-कोटि नमन। उन्होंने देश की अखंडता को अक्षुण्ण रखने के लिए अतुलनीय साहस और पुरुषार्थ का परिचय दिया। राष्ट्र निर्माण में उनका अमूल्य योगदान हमेशा श्रद्धापूर्वक याद किया जाएगा।”