पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. भारतीय साहित्य आणि राष्ट्रीय भावनेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे पंतप्रधानांनी स्मरण केले आहे.
यासंदर्भात ‘एक्स’ या समाज माध्यमावर पंतप्रधानांनी लिहिलेला संदेश :
‘’राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन. त्यांच्या कविता बिहारबरोबरच देशभरातील जनतेच्या मनात राष्ट्रभक्तीची अद्भुत भावना जागृत करत आल्या आहेत. त्यांच्या अनेक ओळी आजही लोकांच्या मनात रुंजी घालतात. वीरत्व आणि माणुसकीने भरलेल्या त्यांच्या तेजस्वी आणि कालातीत रचना प्रत्येक पिढीला भारतमातेच्या सेवेसाठी समर्पित राहण्याची प्रेरणा देत राहतील.’’
राष्ट्रकवि रामधारी सिंह दिनकर जी को उनकी जयंती पर कोटि-कोटि नमन। उनकी कविताएं बिहार के साथ-साथ देशभर के लोगों में राष्ट्रभक्ति की अद्भुत भावनाएं भरती आई हैं। उनकी कई पंक्तियां आज भी जनमानस में रची-बसी हैं। वीरता और मानवता से ओतप्रोत उनकी ओजस्वी और कालजयी रचनाएं हर पीढ़ी को मां…
— Narendra Modi (@narendramodi) September 23, 2025


