पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 डिसेंबर 2023 रोजी दुबई मध्ये कॉप 28 (COP 28) परिषदेच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हरझोग यांच्या बरोबर द्विपक्षीय बैठक घेतली.

दोन्ही नेत्यांनी सध्या चालू असलेल्या इस्रायल - हमास संघर्षावर विचार विनिमय केला. पंतप्रधानांनी 7 ऑक्टोबरच्या दहशतवादी हल्ल्यात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आणि ओलीसांच्या सुटकेचे स्वागत केले.

संघर्षग्रस्त जनतेसाठी मानवतावादी मदतीच्या सातत्त्यपूर्ण आणि सुरक्षित वितरणाच्या गरजेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. भारताचे द्विराष्ट्रवादाला समर्थन असल्याचे सांगून, इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षावर संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे जलद आणि दीर्घकालीन तोडगा काढण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

इस्रायेलचे राष्ट्राध्यक्ष हरर्झोग यांनी भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या यशाबद्दल पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले आणि भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉरच्या शुभारंभाचे स्वागत केले.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
'Make in India' radar programme to help Tejas track targets gets Rs 2,205 crore boost

Media Coverage

'Make in India' radar programme to help Tejas track targets gets Rs 2,205 crore boost
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 01 ऑगस्ट 2026
August 01, 2026

Aatmanirbhar Bharat Delivers: Indigenous Power, Farmer Prosperity & Blue Economy