एआय इम्पॅक्ट समिटच्या पार्श्वभूमीवर क्रोएशियाचे पंतप्रधान आंद्रे प्लेंकोविच यांनी आज  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून आंद्रे प्लेंकोविच 18-21 फेब्रुवारी 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या एआय इम्पॅक्ट समिटमध्ये सहभागी होण्यासाठी भारत दौऱ्यावर आले आहेत. क्रोएशियाच्या पंतप्रधानांनी भारताला दिलेली ही पहिलीच भेट आहे. दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि गुंतवणूक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कनेक्टिव्हिटी, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि परस्परांच्या नागरिकांमधील संबंध यासह विस्तृत क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा केली. ऐतिहासिक भारत-ईयू एफटीएच्या निष्कर्षाचे स्मरण करून त्यांनी द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्यासाठी कराराची लवकर अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही विचारांची देवाणघेवाण झाली. दोन्ही देशांच्या जनतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर दोन्ही बाजूंनी भर दिला.

भारताच्या योग आणि आयुर्वेदाच्या समृद्ध परंपरेबद्दल क्रोएशियाची रुची आणि विश्वास, याची पंतप्रधान मोदी यांनी प्रशंसा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून 2025 मध्ये क्रोएशियाला ऐतिहासिक भेट दिली होती. भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच क्रोएशिया भेट होती.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Khichdi To Moringa Paratha: 7 Traditional Foods PM Modi Loves

Media Coverage

Khichdi To Moringa Paratha: 7 Traditional Foods PM Modi Loves
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 26 ऑगस्ट 2026
August 26, 2026

Accountability Meets Ambition: Record Low NPAs, Record Defence Output, Record Digital Adoption Under the Leadership of PM Modi