पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने इन-स्पेस (IN-SPACE) च्या देखरेखीखाली, अंतराळ क्षेत्रासाठी समर्पित  1000 कोटी व्हेंचर कॅपिटल फंड  स्थापन करायला मंजुरी दिली.

आर्थिक परिणाम:

प्रस्तावित 1,000 कोटी रुपये व्हेंचर कॅपिटल फंड चा उपयोग करण्याचा कालावधी निधीचे कार्यान्वयन सुरू झाल्यापासून पाच वर्षांपर्यंतचा आहे. गुंतवणुकीच्या संधी आणि निधीची  आवश्यकता, यानुसार निधीची सरासरी वापराची रक्कम प्रति वर्ष  150-250 कोटी रुपये इतकी राहील, असा अंदाज आहे. आर्थिक वर्षानुसार निधी वापराची प्रस्तावित आकडेवारी पुढील प्रमाणे:

S.No.

 

Financial Year

 

Estimate (In Rs.Crores)

 

I

 

2025-26

 

150.00

 

2

 

2026-27

 

250.00

 

3

 

2027-28

 

250.00

 

4

 

2028-29

 

250.00

 

5

 

2029-30

 

100,00

 

 

 

Total Envelope (VC)

 

1000.00

 

गुंतवणुकीची प्रस्तावित वैयक्तिक श्रेणी . 10- 60 कोटी रुपये इतकी असून, कंपनीच्या उलाढालींचा टप्पा, तिच्या विकासाचा प्रवास आणि राष्ट्रीय अंतराळ क्षमतांवर पडणारा कंपनीचा संभाव्य प्रभाव, यावर ते अवलंबून असेल. सूचक भागभांडवली गुंतवणूक श्रेणी पुढील प्रमाणे:

  • विकासाचा प्रारंभिक टप्पा: रु.10 कोटी – रु.30 कोटी
  • विकासानंतरचा टप्पा  : रु.30 कोटी – रु.60 कोटी

गुंतवणुकीच्या वरील  श्रेणीच्या आधारे , या निधीच्या मदतीने अंदाजे 40 स्टार्टअप्सना पाठबळ मिळण्याची अपेक्षा आहे.

तपशील :

भारताच्या अंतराळ क्षेत्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी धोरणात्मक दृष्टीने या निधीचे नियोजन करण्यात आले असून, पुढील महत्वाच्या उपक्रमांद्वारे, राष्ट्रीय प्राधान्यक्रमांना अनुसरून, नवोन्मेश आणि आर्थिक विकासाला चालना देणे, हे याचे उद्दिष्ट आहे:

  1. भांडवली गुंतवणूक
  2. भारतातील कंपन्यांचे अस्तित्व टिकवणे.
  3. वाढती अंतराळ अर्थव्यवस्था
  4. अंतराळ तंत्रज्ञानाच्या विकासाला गती देणे.
  5. जागतिक स्पर्धात्मकतेला चालना देणे.
  6. आत्मनिर्भर भारताला पाठबळ देणे.
  7. गतिशील नवोन्मेष  परीसंस्थेची निर्मिती.
  8. आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीला चालना देणे.
  9. दीर्घकालीन शाश्वतता सुनिश्चित करणे.

वरील मुद्यांवर लक्ष केंद्रित करून, भारताला आघाडीच्या अवकाश अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून धोरणात्मकदृष्ट्या स्थान देणे, हे या निधीचे उद्दिष्ट आहे.

फायदे :

  • विकासानंतरच्या टप्प्यासाठी अतिरिक्त निधी आकर्षित करून वाढता प्रभाव निर्माण करण्यासाठी भांडवली गुंतवणूक जेणेकरून  खासगी गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण होईल.
  • भारतात स्थित अंतराळ कंपन्यांचे अस्तित्व कायम ठेवणे आणि भारतीय कंपन्यांच्या परदेशात जाण्याच्या प्रवृत्तीला आळा घालणे
  • पुढील दहा वर्षांत भारतीय अंतराळ अर्थव्यवस्थेच्या पाचपट विस्ताराचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने खासगी अवकाश उद्योगाच्या विकासाला गती देणे
  • अंतराळ तंत्रज्ञानामध्ये प्रगती करून खासगी क्षेत्राच्या सहभागाने भारताचे नेतृत्व मजबूत करणे
  • जागतिक स्पर्धात्मकतेला चालना.
  • आत्मनिर्भर भारताला पाठबळ.

रोजगार निर्मिती क्षमतेसह एकूण प्रभाव:

प्रस्तावित निधी अपस्ट्रीम, मिडस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीममधील संपूर्ण अंतराळ पुरवठा साखळीतील स्टार्टअप्सना पाठबळ देऊन भारतीय अंतराळ क्षेत्रात रोजगार निर्मितीला चालना देईल अशी अपेक्षा आहे. यामुळे व्यवसायांचा विस्तार , संशोधन आणि विकासात गुंतवणूक , आणि त्यांच्या मनुष्यबळाचा विस्तार करायला सहाय्य मिळेल. प्रत्येक गुंतवणूक इंजिनीअरिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा ॲनालिसिस आणि मॅन्युफॅक्चरिंग यांसारख्या क्षेत्रात शेकडो थेट रोजगार आणि पुरवठा साखळी, लॉजिस्टिक्स आणि व्यावसायिक सेवांमध्ये हजारो अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करू शकते. मजबूत स्टार्टअप परिसंस्थेला चालना देऊन, हा निधी केवळ रोजगार निर्माण करणार नाही, तर कुशल मनुष्यबळ विकसित करेल, नवोन्मेशाला चालना देईल, आणि अवकाश बाजारपेठेत भारताची जागतिक स्पर्धात्मकता वाढवेल.

पार्श्वभूमी :

भारत सरकारने, 2020 च्या अंतराळ क्षेत्रातील सुधारणांचा एक भाग म्हणून, अंतराळ क्षेत्रातील उपक्रमांमध्ये खासगी क्षेत्राच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी IN-SPACE ची स्थापना केली. IN-SPACE ने भारताच्या अंतराळ अर्थव्यवस्थेच्या विकासाला पाठबळ देण्यासाठी रु. 1000 कोटी व्हेंचर कॅपिटल फंडचा प्रस्ताव ठेवला आहे. भारताची अंतराळ अर्थव्यवस्था सध्या S8.4 अब्ज इतकी असून 2033 पर्यंत $44 अब्ज चा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट आहे. जोखीम भांडवलाची महत्वाची गरज पूर्ण करणे, हे या निधीचे उद्दिष्ट आहे, कारण पारंपरिक कर्जदार अशा उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअपला निधी उपलब्ध करायला तयार नसतात. मूल्य साखळीत अंतराळ क्षेत्रातील जवळजवळ 250 स्टार्टअप्स उदयाला येत असून, त्यांचा विकास सुनिश्चित करण्यासाठी आणि देशातील प्रतिभा परदेशात जाण्यापासून रोखण्यासाठी या स्टार्टअप्सना वेळेवर अर्थ सहाय्य मिळणे महत्वाचे आहे. प्रस्तावित सरकार-समर्थित निधी गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढवेल, खासगी भांडवल आकर्षित करेल आणि अंतराळ क्षेत्रातील सुधारणांना पुढे नेण्याप्रति सरकारची वचनबद्धता स्पष्ट करेल. सेबीच्या नियमांनुसार पर्यायी गुंतवणूक निधी म्हणून तो काम करेल, स्टार्टअप्सना प्रारंभिक टप्प्यातील भाग भांडवल प्रदान करेल आणि त्यांना पुढील टप्प्यात खासगी भाग भांडवल मिळवण्यासाठी सक्षम करेल.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
'Team Bharat' At Davos 2025: How India Wants To Project Vision Of Viksit Bharat By 2047

Media Coverage

'Team Bharat' At Davos 2025: How India Wants To Project Vision Of Viksit Bharat By 2047
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 22 जानेवारी 2025
January 22, 2025

Appreciation for PM Modi for Empowering Women Through Opportunities - A Decade of Beti Bachao Beti Padhao

Citizens Appreciate PM Modi’s Effort to bring Growth in all sectors