पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात सोफी आणि विदा या भारतीय लष्करातील ‘चीफ ऑफ आर्मी स्टाफ कंमेंडेशन कार्डस’ या पुरस्काराने सन्मानित श्वानांचा उल्लेख केला. ते म्हणाले, आपल्या लष्करामध्ये, आपल्या सुरक्षा दलांकडे, असे कितीतरी बहादूर श्वान आहेत त्यांनी अनेक बॉम्बस्फोट आणि दहशतवादी कारवायांना रोखण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे, आयईडी आणि दारुगोळा शोधून काढल्याची त्यांनी अनेक उदाहरणे दिली. बीड पोलिसांनी साथीदार सदस्य श्वान रॉकी याला संपूर्ण सन्मानाने अखेरचा निरोप दिला, रॉकीने 300 पेक्षा अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना मदत केली होती, याचादेखील पंतप्रधानांनी उल्लेख केला.

स्थानिक प्रजातीच्या श्वानांबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले, त्यांच्या पालनासाठी येणारा खर्च कमी आहे आणि ते भारतीय वातावरणात सामावले जातात. सुरक्षा संस्था स्थानिक प्रजातीच्या श्वानांना आपल्या सुरक्षा पथकात समाविष्ट करत आहेत. भारतीय कृषी संशोधन संस्थेने स्थानिक प्रजातीचे श्वान अधिक चांगले आणि लाभदायक ठरण्यासाठी त्यावर संशोधन केले आहे. त्यांनी श्रोत्यांना एक तरी स्थानिक प्रजातीच्या श्वानाचे पालन करावे, यासाठी प्रेरित केले.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
After year of successes, ISRO set for big leaps

Media Coverage

After year of successes, ISRO set for big leaps
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 26 डिसेंबर 2025
December 26, 2025

India’s Confidence, Commerce & Culture Flourish with PM Modi’s Visionary Leadership