शेअर करा
 
Comments
The CA community looks after the economic health of society: PM Modi
A country where a select few loot, cannot scale new heights; government will continue to take tough stand against those who have looted: PM
On one hand, there is a Swachh Bharat Abhiyaan and there is a movement to clean the nation from the menace of corruption: PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सनदी लेखापाल स्थापना दिनानिमित्त मोठ्या प्रमाणावर उपस्थित सनदी लेखापालांना नवी दिल्ली येथे संबोधित केले.

देशभरात विविध ठिकाणी व्हिडिओ लिंकद्वारे बघत असणाऱ्या दर्शकांना संबोधित करतांना पंतप्रधानांनी सनदी लेखापाल हे समाजाचे आरोग्य आणि सुव्यवस्था राखणारे डॉक्टर्स असल्याचे सांगितले. त्यांनी आर्थिक जगताचे तुम्ही ऋषीमुनी आहात, असे सांगतांना पंतप्रधान म्हणाले की, जगभरात भारतीय सनदी लेखापाल त्यांच्या उत्कृष्ट वित्तीय कौशल्यामुळे प्रसिद्ध आहेत.

जेव्हा भारताची कुठल्याही कठीण परिस्थितीतून उभारुन येण्याची क्षमता आहे, तेव्हा हा विकास समाजातील लहान प्रमाणावरील लोकांना भ्रष्टाचारापासून रोखण्यासाठी परावर्तीत करतो.

त्यांनी केंद्र सरकारने मागील तीन वर्षात घेतलेल्या विविध महत्वपूर्ण निर्णयांचे स्वागत करतांना विमुद्रीकरण, काळा पैशांविरुद्ध मोहिम आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण याचा विशेष उल्लेख केला.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, 3 लक्ष संस्था परीक्षणाअंतर्गत आल्या असून, विमुद्रीकरणानंतर निरीक्षणा अंती हे आढळून आले आहे. ते म्हणाले की, एक लाख संस्थांनी नियमांचे उल्लंघन केले असून, त्यांना रजिस्टार ऑफ कंपनीज्‌मधून काढून टाकण्यात आले आहे. त्यांनी केंद्र सरकारने राष्ट्राच्या हितार्थ घेतलेला हा धाडसी निर्णय आहे, असे पुनरुच्चारीत केले.

कर भरण्यासंदर्भात बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, करदात्यांना सल्ला देतांना सनदी अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय हित हा मुद्दा प्रामुख्याने लक्षात ठेवावा. त्यांनी उपस्थित सनदी लेखापाल व्यवसायिकांना तसेच वकीलांना, ज्यांनी स्वातंत्रलढ्यात महत्वाची भूमिका निभावली त्यांचे उदाहरण देत, अशा महान व्यक्तिंचा आदर्शांचे पालन करावे, अशी विनंती केली. यामुळे वस्तू आणि सेवा करासह आर्थिक एकात्मिकतेचे नवीन युग उदयास येईल.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्याला वर्ष 2022 मध्ये 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त सनदी लेखापालांनी एका विशिष्ट ध्येयाने कार्यक्रम आखावा. जागतिक स्तरावरील चार मोठ्या अंकेक्षण संस्थांबाबत बोलतांना त्यांनी भारतीय सनदी लेखापालांना वेगळ्या चार जागतिक ॲडिट संस्थांची निर्मिती करण्याबाबत सांगितले.

त्यांनी प्रसिद्ध अर्थ वेत्ता चाणक्य याचे उदाहरण देतांना सांगितले की, भारत वर्ष 2022 मध्ये जेव्हा स्वातंत्र्याची 75 वर्ष मनवत असेल, ही सुयोग्य संधी लेखापालांनी न दवडता, राष्ट्रनिर्मितीमध्ये स्वत:चे योगदान द्यावे.

 Click here to read full text speech

Explore More
76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन
World TB Day: How India plans to achieve its target of eliminating TB by 2025

Media Coverage

World TB Day: How India plans to achieve its target of eliminating TB by 2025
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 मार्च 2023
March 24, 2023
शेअर करा
 
Comments

Citizens Shower Their Love and Blessings on PM Modi During his Visit to Varanasi

Modi Government's Result-oriented Approach Fuelling India’s Growth Across Diverse Sectors