"काशी हे शतकानुशतके ज्ञान,चर्चा,परिसंवाद,संस्कृती आणि आध्यात्मिकतेचे केंद्र राहिले आहे"
"शाश्वत विकासाची उद्दिष्टे मागे पडू न देणे ही लोकांची सामूहिक जबाबदारी आहे"
"अविकसित क्षेत्र म्हणून ओळखले गेलेल्या शंभराहून अधिक आकांक्षित जिल्ह्यांमध्ये लोकांचे जीवन सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत"
"डिजिटायझेशनने क्रांतिकारी परिवर्तन घडवले असून तंत्रज्ञानाचा वापर लोकांना सक्षम करण्यासाठी, डेटा पुरवण्यासाठी आणि सर्वसमावेशकता सुनिश्चित करण्यासाठी एक साधन म्हणून केला जात आहे"
"भारतात नद्या,झाडे,पर्वत आणि निसर्गातील सर्व तत्त्वांचा आम्ही अतीव आदर करतो "
"भारत महिला सक्षमीकरणापुढे जाऊन महिलाप्रणीत विकास करत आहे"

सन्माननीय महोदय, महिला  आणि सद्गृहस्थ हो,

लोकशाहीची  जननी असलेल्या देशाच्या  सर्वात प्राचीन आणि   उत्साहाने सळसळत्या, जीवंत अशा शहरात मी आपल्या  प्रत्येकाचे हार्दिक स्वागत करतो. जी 20 अंतर्गत  विकास मंत्र्यांच्या बैठकीसाठी हे शहर अगदी योग्य स्थान आहे. काशी हे शतकानुशतकांपासून  ज्ञान, चर्चा, वाद-विवाद, संस्कृती आणि अध्यात्माचे केंद्र राहिले आहे. हे शहर म्हणजे  भारताच्या वैविध्‍यपूर्ण  वारशाचे सार- सत्व  आहे आणि  देशाच्या सर्व भागांतील लोकांसाठी एक अभिसरण बिंदू म्हणून काम करते. जी-20 विकास कार्यक्रम  काशीपर्यंत पोहोचला आहे,  याचा मला आनंद आहे.

महामहिम,

‘ग्लोबल साऊथ’ साठी विकास हा मूळ गाभ्याचा, महत्वाचा मुद्दा आहे. कोविड महामारीचा ‘ग्लोबल साऊथ’ मधील देशांवर गंभीर परिणाम झाला. त्याचबरोबर  भू-राजकीय तणावामुळे अन्न, इंधन आणि खतांच्या संकटांनी आणखी एक धक्का दिला आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही  घेतलेले निर्णय संपूर्ण मानवतेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. शाश्वत विकासाचे  उद्दिष्ट आपण सर्वजण मागे पडू देणार नाही,   ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, यावर माझा ठाम विश्‍वास आहे. विकास प्रक्रियेत कोणीही मागे राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. हे साध्य करण्यासाठी आमच्याकडे कृती योजना आहे, असा सशक्त संदेश या गटाने जगाला देणे अत्यावश्यक आहे.

महामहिम,

आपले प्रयत्न सर्वंकष, सर्वसमावेशक, न्याय्य आणि शाश्वत असले पाहिजेत. शाश्‍वत विकासाचे ध्‍येय पूर्ण करण्यासाठी आपण गुंतवणूक वाढवली पाहिजे आणि अनेक देशांना भेडसावणाऱ्या कर्जाच्या जोखमींवर उपाय शोधले पाहिजेत. ज्यांना गरज आहे, त्यांना कर्जे उपलब्ध होतील, याची खात्री करताना,  पात्रता निकषांचा विस्तार करण्‍यासाठी बहुपक्षीय वित्तीय संस्थांमध्ये सुधारणा केल्या पाहिजेत.  भारतात, आम्ही शंभराहून अधिक आकांक्षीत  जिल्हे,  जे अल्प-विकासाचे केंद्र होते, तेथील  लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी असे प्रयत्न केले आहेत. आमचा अनुभव असे दर्शवतो की,  हे जिल्हे  आता देशातील वाढीचे उत्प्रेरक म्हणून उदयास आले आहेत. जी- 20 अंतर्गत विकास मंत्र्यांना विकासाच्या या मॉडेलचा अभ्यास करण्याचे आवाहन मी करतो.  ‘एक्सेल रेटिंग अजेंडा 2030’ साठी कार्य करत असताना, तुम्हाला कदाचित हे मॉडेल उपयोगी ठरेल.

सन्माननीय महोदय,

तुमच्यासमोरील महत्त्वाच्या समस्यांपैकी एक म्हणजे डेटाचे वाढते विभाजन. अर्थपूर्ण धोरण तयार करणे, संसाधनांचे कार्यक्षम वाटप आणि प्रभावी सार्वजनिक सेवा वितरण यासाठी उच्च दर्जाचा डेटा महत्त्वाचा आहे.तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण हे डेटाचे विभाजन कमी करण्यात मदत करणारे एक महत्त्वाचे साधन आहे.भारतात डिजिटलायझेशनने क्रांतिकारी बदल घडवून आणला आहे. तंत्रज्ञानाचा वापर लोकांना सक्षम करण्यासाठी, डेटा सुलभ करण्यासाठी आणि सर्वसमावेशकता सुनिश्चित करण्यासाठी एक साधन म्हणून केला जात आहे. भारत आपला अनुभव भागीदार देशांसोबत सामायिक करण्यास इच्छुक आहे. मला आशा आहे की तुमच्यात होत असलेल्या चर्चे मधून परस्पर संवाद वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणारा डेटा, विकासासाठी उपयुक्त ठरणारा डेटा आणि विकसनशील देशांमध्ये वितरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या डेटाला प्रोत्साहन देण्यासाठी मूर्त कृती होतील.

सन्माननीय महोदय,

भारतात आम्ही नद्या, झाडे, पर्वत आणि निसर्गातील सर्व घटकांचा खूप आदर करतो. आमचा पारंपारिक भारतीय विचार ग्रहानुरूप जीवनशैलीला प्रोत्साहन देतो. गेल्या वर्षी, संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांच्या उपस्थितीत, मी अभियान लाइफ(LiFE)- जीवनशैली सुरू केली. मला आनंद आहे की, हा गट लाइफ(LiFE) अभियान संबंधित उच्च-स्तरीय तत्वे  विकसित करण्यासाठी काम करत आहे. हवामान बदलाच्या मुद्यावर हे महत्त्वपूर्ण योगदान असेल.

सन्माननीय महोदय,

शाश्वत विकासाची ध्येय (SDGs) साध्य करण्यासाठी लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरण हे विषय महत्त्वपूर्ण  ठरतात. भारतात आम्ही केवळ महिला सक्षमीकरणापुरते मर्यादित राहिलेलो नाहीत तर आमचे ध्येय महिलांच्या नेतृत्वाखालील विकास आहे. या महिला केवळ विकासाचा जाहीरनामा ठरवत नाहीत तर त्या वृद्धी आणि बदलाच्या माध्यम  देखील आहेत. महिलांच्या नेतृत्वाखालील विकासासाठी बदल घडवून आणणारी प्रभावी अशी कृती योजना अंगीकारण्याचे मी तुम्हाला आवाहन करतो.

सन्माननीय महोदय,

भारताच्या कालातीत परंपरांमुळे काशी शहराची एक वेगळीच अशी ओळख आहे. मला आशा आहे की तुम्ही तुमचा सर्व वेळ चर्चांमध्ये आणि खोल्यांमध्ये घालवणार नाही! मी तुम्हाला बाहेर जाण्यासाठी, आनंद लुटण्यासाठी आणि काशीचे चैतन्य अनुभवण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. आणि, मी हे फक्त काशी माझा मतदारसंघ आहे म्हणून सांगत नाही! मला विश्वास आहे की गंगा आरतीचा अनुभव घेतल्याने आणि सारनाथला भेट दिल्याने तुम्हाला तुमचे अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी प्रेरणा मिळेल. अजेंडा 2030 चा प्रचार करण्यासाठी आणि जगाच्या दक्षिणेकडील भागाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला तुमच्या सर्व चर्चेत यश मिळो अशी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.  

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
iPhone exports hit record ₹2 trillion in final year of smartphone PLI

Media Coverage

iPhone exports hit record ₹2 trillion in final year of smartphone PLI
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares a Sanskrit Subhashitam highlighting how enthusiasm and positive energy lead to success
April 30, 2026

Prime Minister Shri Narendra Modi today shared a Sanskrit Subhashitam highlighting that enthusiasm and positive energy inspire a person to remain consistently active in their actions.

The Prime Minister noted that this unwavering enthusiasm leads all those efforts to success which a person resolves to accomplish.

The Prime Minister posted on X:

"कर्मशील और ऊर्जावान देशवासी ही राष्ट्र की सबसे बड़ी शक्ति हैं, जिनके परिश्रम से विकास की नई राहें तय होती हैं। इनके प्रयासों से देश समृद्धि, आत्मनिर्भरता और उन्नति के शिखर को छूता है।

अनिर्वेदो हि सततं सर्वार्थेषु प्रवर्तकः।

करोति सफलं जन्तोः कर्म यच्च करोति सः॥"
Enthusiasm and positive energy inspire a person to remain consistently active in their actions. This unwavering enthusiasm leads all those efforts to success which a person resolves to accomplish.