घानाच्या राष्ट्रपतींकडून 'द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना', या घानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित होणे, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे.

मी राष्ट्रपती महामा, घाना सरकार आणि घानाच्या जनतेचे यासाठी मनापासून आभार मानत आहे. मी या सन्मानाचा, 140 कोटी भारतीयांच्या वतीने नम्रपणे स्वीकार करत आहे.
मी हा सन्मान आमच्या तरुणांच्या आकांक्षा, त्यांचे उज्ज्वल भविष्य, आमच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेला आणि परंपरांना तसेच भारत आणि घाना यांच्यातील ऐतिहासिक संबंधांना समर्पित करत आहे.



