सर्वांचा सल्ला ऐका, मात्र तुमची इच्छा असेल तरच तुमचा पॅटर्न बदला: पंतप्रधान
उत्सुकता निर्माण व्हावी आणि आकलन सुधारावे, या दृष्टीने विद्यार्थ्यांना आधीच माहिती देण्याचा पंतप्रधानांनी शिक्षकांना दिला सल्ला
ध्येये आवाक्यात असली पाहिजेत, पण ती सहज साध्य होणारी नसावीत - ध्येय निश्चित करा आणि कृती करा: पंतप्रधान
मनाची मशागत करा, मग मनाशी सुसंवाद साधा आणि त्यानंतर अभ्यासाच्या विषयांची पेरणी करा, यामुळे तुम्हाला यश मिळण्यास मदत होईल: पंतप्रधान
अभ्यास, कौशल्ये, विश्रांती आणि छंद यांचा समतोल राखणे हीच प्रगतीची गुरुकिल्ली आहे: पंतप्रधान
पुस्तके ज्ञान देतात, पण केवळ सरावानेच व्यावसायिक कौशल्य प्राप्त होते: पंतप्रधान
भूतकाळाचा विचार करण्यात वेळ वाया दवडू नका, भविष्यात काय करायचे आहे याचा विचार करा: पंतप्रधान
शिक्षण केवळ परीक्षांसाठीच नाही, तर जीवनासाठी आहे; परीक्षा स्वतःचे मूल्यांकन करण्यासाठी असतात: पंतप्रधान
काहीतरी बनण्याची नव्हे, तर करण्याची आकांक्षा बाळगा: पंतप्रधान
वर्तमान ही देवाने दिलेली सर्वात मोठी 'भेट' आहे - येथे आणि आता जगा: पंतप्रधान
तुम्ही एखाद्या क्षणात जितके अधिक रमून जाल, तितका तो क्षण तुम्हाला जास्त काळ आठवतो: पंतप्रधान
सहयोगी शिक्षणामुळे प्रत्येकाला सुधारणा करण्यास मदत होते: पंतप्रधान
पुनरावलोकन करा आणि हुशार व्हा: पंतप्रधान
आधी तुमचा शालेय पाया मजबूत करा, स्पर्धा परीक्षांमध्ये कालांतराने विजय मिळेलच: पंतप्रधान
मुलांना त्यांच्या क्षमता, योग्यता आणि आवडीनुसार फुलू देण्याचा सल्ला पंतप्रधानांनी पालकांना दिला.
स्वतःच्या छंदांचे व्यावहारिक उत्पादनांमध्ये रूपांतर करा आणि ते विनामूल्य सामायिक करा, प्रतिपुष्टीमुळे नवीन कल्पनांना आणि यशाला चालना मिळते: पंतप्रधान
स्वतःला ओळखा, जीवनात मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्या: पंतप्रधान
परीक्षा या सणांसारख्या असतात, त्या साजऱ्या करा: पंतप्रधान
खरा आत्मविश्वास आंतरिक सत्यातून येतो, तुम्ही जसे आहात तसेच खरे रहा: पंतप्रधान
आरामदायी परिस्थिती जीवनाला आकार देत नाही, तर तुमची जगण्याची पद्धत आकार देते: पंतप्रधान
स्वप्न न पाहणे हा एक गुन्हा आहे - नेहमी स्वप्न पाहा: पंतप्रधान
स्वतःच स्वतःचा आधार बना, आपल्या सामर्थ्याचा उत्सव साजरा करा: पंतप्रधान
मोठी स्वप्ने बघा, कमी भीती बाळगा - चरित्रे वाचा: पंतप्रधान
स्वच्छता राखणे हे सर्वोच्च प्राधान्य आणि आपले कर्तव्य आहे: पंतप्रधान
तंत्रज्ञान एक महान शिक्षक आहे, त्याचा स्वीकार करा, कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या क्षमता वाढवते: पंतप्रधान
कृत्रिम बुद्धिमत्तेचा सूज्ञपणे वापर करा, आपले ज्ञान वाढवा: पंतप्रधान

पंतप्रधान: चला, आता सुरु करूया, सांगा !

विद्यार्थी: मी सानवी आचार्य, मी तुमच्याच राज्यातून म्हणजे  गुजरातमधील  आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे की,  पालक आमची चिंता करतात  आणि शिक्षक देखील आम्हाला मदत करतात. मात्र मुख्य मुद्दा तेव्हा येतो , जेव्हा शिक्षक आम्हाला अभ्यासाची एक वेगळी पद्धत सुचवतात. पालक वेगळ्या पद्धतीने सांगतात की या पॅटर्ननुसार अभ्यास करा आणि विद्यार्थ्यांमध्ये तर वेगळाच  ट्रेंड सुरु असतो, त्यामुळे त्यावेळी आम्ही गोंधळून जातो की कोणती पद्धत  बरोबर आहे.

पंतप्रधान: हे बघा,  आयुष्यभर हे असेच असते. मी पंतप्रधान झाल्यानंतरही, कुणी सांगते , असं करा, कुणी सांगतो असं करा.  तुम्ही घरी जेवताना पहा,सगळे

भाऊ: बहिणी जेवायला बसलेले असतील, प्रत्येकाची जेवण्याची पद्धत वेगळी असेल. कुणी भाजीपासून सुरुवात करेल.

विद्यार्थी: हो, सर!

पंतप्रधान: कुणी डाळीने सुरु करेल.

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: कुणी पोळी , भाजी आणि डाळ सगळे एकत्र करेल. प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे की नाही ?

विद्यार्थी: हो  सर!

पंतप्रधान: तुमची  स्वतःची काय आहे , तुम्ही त्यांची नक्कल करता का?

विद्यार्थी: नाही सर!

पंतप्रधान: तुम्ही तुमच्या पद्धतीने जेवता, मग मजा येते ना ?

 

विद्यार्थी: हो  सर!

पंतप्रधान: तर, काही लोक असे असतात, ज्यांना वाटते की मी रात्री चांगला अभ्यास करू शकतो.  काही लोकांना वाटते  पहाटे 4:00  वाजता उठून अभ्यास करेन. प्रत्येकाची स्वतःची पद्धत असते.

विद्यार्थी: हो  सर!

पंतप्रधान: पण काही लोक लबाडी करतात.  रात्री आईला सांगतात, "नाही, मी उद्यापासून सकाळी अभ्यास करणे सुरू केले आहे." जेव्हा आई त्यांना सकाळी उठवायला येते तेव्हा ते म्हणतात, "नाही, मी नाही उठत ,  ते टाळत  राहतात.

विद्यार्थी: हो  सर!

पंतप्रधान: पहिली गोष्ट म्हणजे, तुमची स्वतःची जी पद्धत आहे त्यावर पूर्ण विश्वास ठेवा. पण नवीन पद्धतींबाबत जे सूचना देतात, त्यांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐका, ते समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि मग त्यात तुम्हाला वाटले की माझी पद्धत तर आहे , पण जर मी यात ही गोष्ट जोडली तर ते चांगले होईल. पण कुणी सांगते म्हणून करू नका, तुमच्या स्वतःच्या अनुभवानुसार करा. आता जसे परीक्षा पे चर्चा जेव्हा मी सुरु  केली तेव्हा एक पॅटर्न होता. आता, मी हळूहळू त्यात सुधारणा करत आहे.

विद्यार्थी: हो  सर!

पंतप्रधान: मी बदलत आहे. यावेळी मी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन केले. तर  मी देखील माझा पॅटर्न बदलला, पण मी मूळ पॅटर्न सोडला नाही.

विद्यार्थी: हो  सर!

विद्यार्थी: त्यांचा स्वभावही खूप छान होता. त्यांचे वागणे खूप मैत्रीपूर्ण होते  आणि आम्हा सर्व मुलांमध्ये  ते छान  मिसळले होते.  पंतप्रधानांनी आम्हाला सांगितले की आपण सर्वांच्या पद्धती ऐकून घेतल्या पाहिजेत आणि प्रत्येकातून चांगले घेतले पाहिजे . आपण आपल्या पद्धतींवर लक्ष केंद्रित करायचे आहे.  सगळ्यांमधील चांगले आपल्यला घ्यायचे आहे  आणि तीच पद्धत हळूहळू आपल्याला पुढे न्यायची आहे.

 

विद्यार्थी: नर्मदे सर!

पंतप्रधान: नर्मदे हर!

विद्यार्थी: सर माझे नाव आयुष तिवारी आहे.  सर, तर माझा प्रश्न असा आहे की बऱ्याचदा आपण शाळेच्या किंवा शिक्षकांच्या गतीशी जुळवून घेऊ शकत नाही आणि जे राहून जाते ते पूर्ण करायच्या नादात पुढचे धडे राहून जातात आणि आम्ही मागे राहतो. तेव्हा अशा परिस्थितीत आम्ही  त्याला कशा प्रकारे सामोरे जायला हवे ?

पंतप्रधान: म्हणजे  शिक्षकांविरुद्ध तुमची तक्रार आहे ?

विद्यार्थी: नाही  सर!

पंतप्रधान: पण तू शिक्षकाविरुद्ध अतिशय हुशारीने आपली तक्रार मांडलीस. त्यामुळे मी शिक्षकांसाठी उत्तर देतो.

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: शिक्षकांचा प्रयत्न असावा की विद्यार्थ्यांची ही गती आहे. त्याच्या एक पाऊल पुढे माझी गती असेल, जास्त नाही. आपले लक्ष्य  असे असायला हवे, जे आपल्या आवाक्यात असेल, पण मुठीत नाही.

विद्यार्थी: हो सर!

विद्यार्थी: सर, "एक्झाम वॉरियर" मध्ये लिहिले आहे , मंत्र 26, लक्ष्य आवाक्यात असले पाहिजे पण ते सहज साध्य होणारे नसावे.

पंतप्रधान: वाह! तुम्ही सगळे लक्षात ठेवता ?

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: हे पहा,  50 पावले पुढे गेला तर विद्यार्थी म्हणेल, अरे, तो तर गेला, हे माझे काम नाही. ज्याप्रमाणे शेतकरी आपल्या शेताची मशागत करतो, त्याचप्रमाणे विद्यार्थ्याच्या मनाची मशागत केली पाहिजे. यासाठी कोणती पद्धत आहे? समजा, जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात ते इतिहासाचा हा धडा शिकणार आहेत, तर 1 जानेवारीला सांगून टाका की  मी पहिल्या आठवड्यात  इतिहासाचा हा धडा शिकवेन, दुसऱ्या आठवड्यात  इतिहासाचा हा धडा शिकवेन, तिसऱ्या आठवड्यात इतिहासाचा हा धडा शिकवेन. त्यामुळे तुम्हाला समजेल की पुढील  3 आठवड्यांमध्ये हे:हे तीन विषय येणार आहेत. मग ते म्हणतील, असे करा, मी शिकवण्यापूर्वी तुम्ही वाचायला सुरुवात करा. वाचून या, कुणाला विचारून या.

विद्यार्थी: हो  सर!

पंतप्रधान: गुगलवर जाऊन  काही करायचे असेल तर ते तिथे करा आणि परत या.

विद्यार्थी: हो  सर!

पंतप्रधान: आणि मग जेव्हा तुम्हाला  प्रत्यक्षात धडा शिकवतील  तेव्हा काय होईल?

विद्यार्थी: सर, आमच्यात कुतूहल निर्माण होईल.

विद्यार्थी: सर, आम्हाला उत्सुकता असेल. आम्हाला अधिक चांगले समजेल कारण आम्ही आधी वाचले असेल.

विद्यार्थी: अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित होईल.

पंतप्रधान: मानसी!

विद्यार्थी: सर, जर आम्हाला एखादा धडा खूप रोचक वाटला, तर आम्हाला तो आणखी समजून घ्यावा , अधिक जाणून घ्यावा असे वाटेल, ज्यामुळे आम्हाला त्या धड्याची अधिक चांगल्या प्रकारे उजळणी होईल.

 

पंतप्रधान: सांगा, सोपे काम आहे ना ?

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: मग तुम्हाला त्या शिक्षकांची भराभर शिकवण्याची समस्या जाणवेल का ?

विद्यार्थी: नाही सर!

पंतप्रधान: नाही जाणवणार. तुम्ही मागे राहिलात अशी भावना निर्माण होईल का ?

विद्यार्थी: नाही सर!

पंतप्रधान: का ? कारण तुम्ही शिक्षकांपेक्षा एक पाऊल पुढे गेलात.

विद्यार्थी: हो  सर!

पंतप्रधान: मनाची मशागत करा, मग मन एकाग्र  करा आणि नंतर तुम्हाला कोणते विषय शिकायचे आहेत ते निवडा. मग तुम्ही  विद्यार्थी नेहमीच यशस्वी व्हाल.

विद्यार्थी: माननीय पंतप्रधानांसोबत समोरासमोर बसून , त्यांना प्रश्न विचारण्याची आणि त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी सर्वांनाच मिळत नाही. त्यांनी संगितले की, शिक्षकाच्या दोन पावले मागे राहण्याऐवजी, जर आपण त्यांच्या दोन पावले पुढे राहिलो तर आपण त्यांच्या मागे राहूच  शकत नाही.

विद्यार्थी: नमस्कार  सर!

पंतप्रधान: नमस्कार !

विद्यार्थी: मी श्रेया प्रधान, सिक्किममधून आले आहे. सर  एक स्व:रचित गाणे आहे. हे 3 भाषांमध्ये लिहिले आहे.

पंतप्रधान: अरे वाह!

विद्यार्थी: हिंदी, नेपाळी आणि बंगाली भाषेत. तर, हे एक देशभक्तीपर गाणे आहे.

पंतप्रधान: हो, ते ऐकव बरं!

विद्यार्थी: मी त्या गाण्‍याचे  शीर्षक "आपल्या, भारताची भूमी" असे ठेवले आहे.

पंतप्रधान: म्हणजे, तुला कविता लिहिण्याची आवड आहे का?

विद्यार्थी: होय, सर! सर, मी बहुतेक वेळा तर निसर्गाबद्दल लिहिते.

पंतप्रधान: चांगले आहे, निसर्गाबद्दल लिहिणे.

विद्यार्थी: मी मानवतेबद्दलही एक:दोनदा लिहिले आहे, सर !

पंतप्रधान: मला ते गाउून दाखव बरं !

विद्यार्थी: आपला भारत ऋषींची भूमी आहे. आपला भारत ऋषींची भूमी आहे. विविधतेत एकता आहे, शांतीचे वातावरण आहे. विविधतेत एकता आहे, शांतीचे वातावरण आहे. देव: देवतांवर प्रेम करणारे लोक, मानवता एक आहे असे म्हणूया.

पंतप्रधान: शाब्बास! खूप सुंदर! खूप सुंदर! तू देशाच्या एकतेबद्दल लिहिले, गायन केलेस. एक भारत, श्रेष्‍ठ भारत. मानसी, तुला काही गायचे आहे का बेटा?

विद्यार्थी: होय, सर!

पंतप्रधान: कोणते गाणे म्हणणार?

विद्यार्थी: सर, मला एक गाणे म्हणायची इच्छा आहे.

पंतप्रधान: हो, तू ऐकव !

 

विद्यार्थी: सर, हे गाणे माझ्या आईने लिहिले आहे आणि ते विद्यार्थ्यांना समर्पित आहे.

पंतप्रधान: अरे व्वा छान,  गाउून दाखव बरं !

विद्यार्थी: पुढे जात राहा, पुढे जात राहा. काहीतरी करत राहा, काहीतरी करत राहा. संपूर्ण जग तुमच्या मागे आहे, अडचणींशी, आव्हानांशी लढत राहा.

(बढ़ता चल, तू बढ़ता चल। करता चल, कुछ करता चल। सारी दुनिया तेरे पीछे, मुश्किलों से लड़ता चल।)

पंतप्रधान: व्वा!

विद्यार्थी: संपूर्ण जग तुमच्या मागे आहे, अडचणींशी लढत राहा. पुढे जात राहा, पुढे जात राहा.

(सारी दुनिया तेरे पीछे, मुश्किलों से लड़ता चल। बढ़ता चल, तू आगे बढ़ता चल।)

पंतप्रधान: व्वा! अद्भुत! कृपया तुमच्या आईला माझ्यावतीने अभिनंदन सांग.

विद्यार्थी: सर, धन्यवाद!

पंतप्रधान: आईने खूप प्रेरणादायी काव्य लिहिले आहे!

विद्यार्थी: सर, माझे एक YouTube चॅनेल, एक फेसबुक पेज आणि एक इंस्टाग्राम पेजसुध्‍दा आहे.

पंतप्रधान: अरे व्वा!

विद्यार्थी: होय, सर! माझ्या फेसबुक पेजवर दीड लाख फॉलोअर्स आहेत.

पंतप्रधान: दीड लाख !

विद्यार्थी: मला खूप मजा आली आणि त्यांना भेटणे हा माझ्यासाठी एक खूप चांगला आणि अभिमान वाटावा असा क्षण आहे.

पंतप्रधान: सर्वजण या, इथे सर्वांनी बसा! बरं, मी आज तुम्हा सर्वांचे स्वागत केले आहे. आसामी लोक त्याला गमोछा असं  म्हणतात. ही सर्वात मोठी गोष्ट आहे, ती माझी आवडती गोष्ट आहे. मला या गमोछाची विण खूप आवडते. दुसरे म्हणजे, ते आसाममध्ये, विशेषतः ईशान्येकडील महिला सक्षमीकरणाचे प्रतीक आहे. ते घरी बनवले जाते आणि तिथे मातृशक्ती, महिला शक्ती कशी कार्य करते हे पाहून मला त्यांच्याविषयी खूप आदर आणि सन्मान वाटतो. म्हणून, मला आज तुम्हां सर्व  मुलांना हाँ  आसामी गमोछा द्यावासा वाटला.

विद्यार्थी: धन्यवाद, सर! धन्यवाद, सर!

विद्यार्थी: माझे नाव सबावत वेंकटेश आहे.

पंतप्रधान: हो, वेंकटेश गारू, मला सांग!

विद्यार्थी: तर, सर, मला तंत्रज्ञान आणि रोबोटिक्समध्ये खूप रस आहे. तुम्ही आजकाल अनेक वेळा सांगितले आहे की कौशल्ये अधिक महत्त्वाची आहेत आणि बाहेरही लोक म्हणतात की, गुण अधिक महत्त्वाचे आहेत. कौशल्य महत्वाचे आहे, गुण अधिक महत्वाचे आहेत, यासंबंधी खूप सारखा विचार केला जात असल्यामुळे आपल्या मनामध्‍ये एक भीती निर्माण होते, मग मला सांगा की कौशल्य अधिक महत्वाचे आहे की गुण अधिक महत्वाचे आहेत?

पंतप्रधान: असे जे मनात असते ना, की हे महत्वाचे आहे की ते महत्वाचे आहे; खाणे महत्वाचे आहे की झोपणे महत्वाचे आहे, अभ्यास करणे की खेळणे महत्वाचे आहे. या प्रश्नाचे खूप सामान्य उत्तर म्हणजे : प्रत्येक गोष्टीत संतुलन असले पाहिजे. जर तुम्ही एका बाजूला झुकला तर मग तुम्ही पडाल की नाही?

 

विद्यार्थी: होय, सर!

पंतप्रधान: आणि जर तुम्ही योग्य संतुलन राखले तर तुम्ही कधी पडणार का?

विद्यार्थी: नाही, सर!

पंतप्रधान: तर, ही एक साधी बाब आहे. आता, दुसरी गोष्ट म्हणजे, दोन प्रकारची कौशल्ये आहेत. एक म्हणजे जीवन कौशल्ये. दुसरी म्हणजे व्यावसायिक कौशल्ये. कोणी मला विचारेल, "सर, मी जीवन कौशल्यांवर लक्ष केंद्रित करावे की,  व्यावसायिक कौशल्यांवर? मी म्हणेन, "तुम्ही दोन्हीवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे." आता, मला सांगा, अभ्यासाशिवाय, निरीक्षणाशिवाय, ज्ञान लागू केल्याशिवाय कोणतेही कौशल्य मिळवता येते का?

विद्यार्थी: नाही, सर!

पंतप्रधान: तर, कौशल्याचा प्रारंभच मुळी ज्ञान मिळविण्‍याने होत असतो .

विद्यार्थी: हो, सर!

पंतप्रधान: तर, त्याचे महत्त्व कमी नाही. समजा आपण चांगला अभ्यास केला आहे, पण अचानक आपल्या पालकांना बाहेर जावे लागते. आता आपण उपाशी आहोत. स्वयंपाकघरात सगळं काही सामान भरलेले आहे, पण आपल्याला ते कसे वापरायचे, त्या सामानाचा पदार्थ कसा करायचा, काय करायचे, कोणत्या डब्यात काय आहे, ते कसे बाहेर काढायचे, हे काही कळत नाही; हे का बरं समजत नाही? कारण, आपण कधीच लक्ष दिले नाही. जीवन कौशल्य ही जीवनाची दैनंदिन दिनचर्या आहे आणि आपली जीवन कौशल्य कशी सुधारायची. ती अधिकाधिक चांगली कशी बनवायची, हे लक्षात घेतले पाहिजे. मी सकाळी किती वाजता उठतो? मी किती वाजता झोपायला जातो? मी व्यायाम करतो का? मी माझ्या वयानुसार व्यायाम करतो का? मी नवीन व्यायाम शिकतो का? ज्यावेळी मी एखाद्या व्यक्तीला भेटायला जातो तेव्हा मी आत्मविश्वासाने बोलू शकतो का? मी रेल्वे स्टेशनवर जातो आणि मला तिकीट कुठून घ्यायचे हे माहिती  नसते. मग मी दहा लोकांना विचारतो, "मला माझं तिकीट कुठून मिळेल?" तर, आपण ही जीवन कौशल्य आत्मसात केली पाहिजेत.

आता, दुसरा विषय व्यावसायिक कौशल्यांचा आहे. जर तुम्ही डॉक्टर बनणार असाल, तर तुमची वैद्यकीय कौशल्यं अद्ययावत असली पाहिजेत. मी विद्यापीठात ‘नंबर वन’  होतो असे नाही, म्हणून मी ऑपरेशन केले काय किंवा नाही केले काय, चालते; असे तिथे नसते. जर तुम्हाला हृदयरोगतज्ञ बनायचे असेल, तर पुस्तके तुम्हाला असे हृदय रोग तज्ञ बनण्यास मदत करू शकतात, पण फक्त ती पुस्तके वाचून तुम्ही एक हदयरोगतज्ञ  बनू  शकत नाहीत. ज्यावेळी  हृदयरोगतज्ञ म्हणून परीक्षा दिल्यानंतर जेव्हा तुम्ही प्रत्येक टप्प्यावर रुग्णाशी संवाद साधून तुमचे कौशल्य प्रत्यक्षात विकसित कराल, तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने हृदयरोगतज्ञ बनणार आहे. जर तुम्हाला वकील व्हायचे असेल, तर तुम्हाला राज्य घटनेची सर्व कलमे, या कलमाखालील शिक्षा, या कलमाखाली दिलेला जामीन, सर्वकाही माहित असेल. पण जर तुम्हाला न्यायालयात जाऊन वकील म्हणून प्रशिक्षण घ्यायचे असेल, तर तुम्हाला आधी कनिष्ठ वकील व्हावे लागेल.

विद्यार्थी: होय, सर!

पंतप्रधान: व्यावसायिक कौशल्ये शिकावी लागतात. तुम्हाला त्यातून प्रगती करावी लागते, आणि म्हणूनच, जीवन कौशल्यांशी कोणतीही तडजोड केली जात नाही. तुम्ही ती 100% साध्य केली पाहिजेत. व्यावसायिक कौशल्यांमध्ये तुम्हाला ज्या व्यवसायात रस आहे त्यामध्ये सतत नावीन्यपूर्णता आणणे हेही समाविष्ट असते. त्या क्षेत्रांमध्येही, पूर्वी हृदयरोग्यांना तंत्रज्ञानाची उपलब्धता नव्हती. आता, तंत्रज्ञान आले आहे, म्हणून तुम्ही 40 वर्षांचे असले तरीही, तुम्हाला तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा लागेल. म्हणून, शिक्षण आणि कौशल्ये जुळ्या बहीण: भावासारखी आहेत. ते वेगळे नाहीत, परंतु जीवनात कौशल्ये विकसित करणे खूप अत्यावश्यक  आहेत.

विद्यार्थी: मी एका गरीब कुटुंबातून आलेला आहे. कुटुंबालाही अभिमान वाटत आहे की माझा मुलगा इथे गेला आहे. तिथे अतिशय उत्सुकता होती, संवाद साधण्यासाठी, आम्हाला ही संधी मिळाली की आम्ही आपल्याशी संवाद साधू शकतो.

विद्यार्थी: जय हिंद सर! सर माझे नाव इमोता के श्याम आहे. मी मणिपूरमधल्या इंफाळ सैनिकी विद्यालयातून आले आहे. सर, लहानपणापासूनच आपण माझ्यासाठी मोठी प्रेरणा आहात आणि माझा वाढदिवसही तुमच्या वाढदिवसाबरोबरच येतो.

पंतप्रधान: अच्छा! मला नुकताच एका नेत्याने फोन केला होता. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी, 17 सप्टेंबरला, तर त्यांनी मला म्हटले की आपण 75 वर्षांचे झालात तेव्हा अजून 25 वर्षे बाकी आहेत, मी म्हटले. जो काळ गेला त्याची मी गणती करत नाही, जो बाकी आहे तो लक्षात घेतो आणि म्हणूनच जीवनात, मी आपणालाही सांगतो, जो काळ गेला आहे त्याची मोजदाद करण्यात आपला वेळ वाया घालवू नका. जो बाकी आहे, जीवनासाठी  त्याबाबत विचार करा. बरं, सांगा !

विद्यार्थी: सर, माझा एक प्रश्न आहे की बोर्ड च्या परीक्षा किंवा शाळेच्या एखाद्या परीक्षेसाठी तयारी करताना मागच्या काही वर्षातले प्रश्न आम्ही पाहतो आणि स्वतःच ठरवितो की कोणता धडा जास्त आवश्यक आहे, कोणता केला तर जास्त योग्य ठरेल आणि विचार करतो की परीक्षा म्हणजे गुणांचे काम आहे, परीक्षकाचे यावर जास्त लक्ष केंद्रित नसेल. असा विचार करून आम्ही तो भाग अभ्यासायचा सोडून देतो. असे करणे योग्य आहे का?

 

पंतप्रधान: कधी:कधी आपण पाहिले असेल की वर्तमानपत्रात यावेळी पेपर अतिशय कठीण होता अशा स्वरूपाच्या ठळक बातम्या येतात.

विद्यार्थी: होय सर!

पंतप्रधान: मुलांना अतिशय कठीण गेला. का बरं? अभ्यासक्रमाच्या बाहेर असतो का?

विद्यार्थी: नाही सर!

पंतप्रधान: मात्र आपल्याला तो कठीण वाटतो कारण 10 वर्षांचा जो पॅटर्न आहे, तीन:चार:पाच वर्षातले एक:एका विषयावरचे जे प्रश्न आहेत, त्यावरच तुम्ही लक्ष केंद्रीत केले.  

विद्यार्थी: होय सर!

पंतप्रधान: पूर्वी हमखास प्रश्न म्हणून यायचे, त्यानंतर महत्वाचे प्रश्न म्हणून येऊ लागले, त्यानंतर 10 वर्षांचे पेपर आपण सोडवा, तोच पॅटर्न असेल असे येऊ लागले.

विद्यार्थी: होय सर!

पंतप्रधान: मी शिकत होतो तेव्हाही हे दुखणे होते आणि ते पसरविण्याचे काम काही शिक्षकही करतात. शिक्षकांना काय वाटते की माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवावेत, माझ्या वर्गाचे गुण चांगले राहावेत, म्हणून ते काय करतात तर ज्यातून गुण मिळतील तेच शिकवितात.      

विद्यार्थी: होय सर!

पंतप्रधान: आपण पाहिले असेल उत्तम शिक्षक, सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण अभ्यासक्रम शिकवितात. संपूर्ण अभ्यासक्रमावर मेहनत घेतात. या अभ्यासक्रमाचा आपल्या जीवनात काय उपयोग आहे हे  ते जाणतात. आता तुम्ही पहा ना, एखादा खेळाडू असेल समजा तो गोलंदाज असेल, तर तो फक्त आपल्या खांद्याचे स्नायू बळकट राहिला तर तर तो उत्तम गोलंदाज बनेल का?  

विद्यार्थी: नाही सर!

पंतप्रधान: त्याला आणखी काय: करावे लागेल?

विद्यार्थी: व्यायाम करावा लागेल, योगाभ्यास करावा लागेल.

पंतप्रधान: व्यायाम करावा लागेल, संपूर्ण शरीर बळकट करावे लागेल त्याला आपल्या मनाचे सामर्थ्यही भक्कम करावे लागेल. 

 

 

विद्यार्थी: होय सर!

पंतप्रधान: त्याला आपला आहारही यासाठी अनुकूल करावा लागेल.

विद्यार्थी: होय सर!

पंतप्रधान: त्याच प्रकारे त्याला झोपही घ्यावी लागेल. चेंडू टाकतो पण त्यासाठी संपूर्ण शारीरिक तयारी करतो की नाही?  

विद्यार्थी: होय सर

पंतप्रधान: शरीराचा एखादा अवयव जरी कमकुवत राहिला, गोलंदाजी चांगली करतो, खांदे मजबूत आहेत, वेगही चांगला आहे पण पाय नीट काम करत नसतील तर तो गोलंदाजी करू शकेल का ?     

विद्यार्थी: नाही सर!

पंतप्रधान: ज्याप्रमाणे एखादा खेळाडू, आपल्या लक्ष्यप्राप्तीसाठी आणि खेळात प्राविण्य मिळविण्यासाठी त्याला आपल्या संपूर्ण शरीराची काळजी घ्यावी लागते, त्याचप्रमाणे आपण, जीवन परीक्षेसाठी नाही तर आपले आयुष्य घडविण्यासाठी शिक्षण हे एक माध्यम आहे. आपण शिक्षण योग्य घेत आहोत, अयोग्य घेत आहोत त्यासाठी वारंवार आपली परीक्षा घेतो. या ज्या परीक्षा आहेत त्या आपल्याला आपलेच परीक्षण करण्यासाठीच्या परीक्षा आहेत. परीक्षेतले गुण हे अंतिम ध्येय असू शकत नाही. संपूर्ण जीवनाचा विकास हे अंतिम उद्दिष्ट असले पाहिजे आणि म्हणूनच हा जो पॅटर्न आहे, आपण 10 प्रश्न करूया, हे करूया, असे करून आपण स्वतःला मर्यादित करता कामा नये. याचा अर्थ असा नव्हे की हेही करायचे नाही तर त्याला जर 10% दिले तर 90% आणखी करायला हवे. मी सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण जीवनात सर्वोत्तम व्हा, आपले जीवन श्रेष्ठ बनू द्या, आपले संपूर्ण जीवन उत्तम राहावे यासाठी जीवन घडवायचे आहे आणि त्यासाठी शिक्षण हे एक माध्यम आहे, माध्यम या रूपाने त्याची तयारी करायची आहे. ठीक आहे?

विद्यार्थी: होय सर!

विद्यार्थी: सर, मी आपणाला एक प्रश्न विचारू इच्छिते, ज्या विषयासाठी मला जास्त तयारी करायची आवश्यकता आहे, त्यावर जास्त लक्ष केंद्रीत न करता प्रीबोर्ड मध्ये उत्तम काम करायचे दडपणही असते. आम्ही अभ्यासात संतुलन  कसे ठेवायचे?

पंतप्रधान: हा सर्वांच्याच चिंतेचा विषय आहे. पहिल्या तिमाहीत काही विषयात चांगली कामगिरी होते, तर दुसऱ्या तिमाहीत काही विषयात चांगली कामगिरी होते, मग आपण विचारात पडतो की आता काय करू? हे करू की ते करू? आपण आपल्यातला विद्यार्थी नेहमी चैतन्यपूर्ण ठेवला पाहिजे. शिक्षणाचे ओझे होता कामा नये. आपण पूर्णतः समरस झालो पाहिजे, संपूर्ण समरसता. जर पूर्णपणे समरसता नसेल तर अर्धे:अपुरे शिक्षण जीवनात कोठेच यश देत नाही. गुण, गुण, गुण हे जे दुखणे आले आहे. मला सांगा गेल्या वर्षी बोर्डामध्ये जे एक ते दहा क्रमांकामध्ये आले होते त्यांची नावे आपल्या लक्षात आहेत का? फारच अंधुकशी आठवत असतील, इतकेच नव्हे एक महिन्यानंतर आपण जर विचारले की या वर्तमानपत्रात यांचे फोटो आले होते, नाव आले होते, कौतुक झाले होते. तरीही ते तितकेसे आपल्या लक्षात राहत नाही. त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनाही माहित असेल का की त्यांच्या शाळेतले इतके इतके विद्यार्थी झळकले होते ?     

विद्यार्थी: नाही सर!

पंतप्रधान: याचाच अर्थ या गोष्टी इतके महत्व आहे का

विद्यार्थी: काही काळ लक्षात राहते.

पंतप्रधान: काही काळच लक्षात राहते.

विद्यार्थी: हो सर! हो सर!

पंतप्रधान: त्यापेक्षा जास्त नाही आणि म्हणूनच आपण आपले लक्ष फक्त गुणांवर केंद्रित करण्याऐवजी, माझे जीवन कुठवर पोहोचले आणि त्यासाठी स्वतःला सातत्याने जोखले पाहिजे, स्वतःची परीक्षा घेत राहिले पाहिजे, फक्त वर्गात नव्हे, परीक्षा केंद्रातच नव्हे, स्वतःला जोखत राहिले पाहिजे. 

विद्यार्थी: माझा आपल्याला असा प्रश्न आहे की, जेव्हा आम्ही अभ्यास करतो, त्या वेळी आमच्या मनात इकडचे:तिकडचे बरेचसे विचार येतात, त्यामुळे आम्ही लक्ष केंद्रित करू शकत नाही, तर त्या वेळी स्वतःला शांत कसे ठेवायचे? कारण आम्ही वाचतो तर खरे, पण खूप लवकर विसरून जातो.

 

पंतप्रधान: आता जसे आज तुम्ही येथे आला आहात. आजपासून 25 वर्षांनंतर कोणी तुम्हाला आजच्या या कार्यक्रमाच्या विषयाबद्दल विचारले, तर काय होईल, विसरून जाल की लक्षात राहील?

विद्यार्थी: लक्षात राहील सर, हे खूप संस्मरणीय असेल. विद्यार्थी: सर, हा अतिशय विशेष क्षण आहे की आम्ही तुम्हाला भेटत आहोत.

पंतप्रधान: नाही, विशेष असे काही नाही. तुम्ही स्वतः यामध्ये मनापासून गुंतलेले आहात कारण जेव्हा तुम्ही घरून निघाला असाल, तेव्हा तुमच्या डोक्यात दिल्ली, पीएम, पीएमचे घर हेच विचार असतील. घरी फोन केला असेल तेव्हाही थंडी किती आहे हे न विचारता, 'अरे मी उद्या जातोय, सकाळी लवकर जायचं आहे' असंच बोलला असाल. याचा अर्थ तुम्ही यामध्ये पूर्णपणे गुंतला आहात की नाही?

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: याच कारणामुळे तुम्हाला 20 वर्ष, 25 वर्षांनंतरही इथली प्रत्येक गोष्ट लक्षात राहील.

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: दुसरी गोष्ट, एखादी गोष्ट तेव्हा लक्षात राहते जेव्हा तुम्ही संधी मिळताच ती मित्रांसोबत शेअर करता. तुमच्या वर्गात जे विद्यार्थी अभ्यासात थोडे मागे आहेत, अशा एक:दोन जणांना मित्र बनवा आणि त्यांना सांगा की मी तुम्हाला शिकवतो. जो तुमच्यापेक्षा हुशार विद्यार्थी आहे, त्याला सांगा की बाबा 5:10 मिनिटे माझ्यासोबत बस. मी हा विचार करतोय, तो योग्य आहे का? मला दुरुस्त कर. यामुळे आपल्याला दुप्पट फायदा होईल.

विद्यार्थी: हो सर!

विद्यार्थी: जेव्हा आपण त्यांचे मत घेतो, तेव्हा आपल्याला अधिक नवीन विचार सुचतात की यामध्ये अजून काय होऊ शकते?

पंतप्रधान: मग याचा फायदा होतो?

विद्यार्थी: जी सर!

पंतप्रधान: नवनवीन कल्पना सुचतात.

विद्यार्थी: जी सर!

पंतप्रधान: मग तुमचे मन पूर्णपणे मोकळे होते.

विद्यार्थी: जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला, त्यांच्याशी थेट संवाद साधला आणि त्यांनी मला समाधानकारक उत्तर दिले, तेव्हा असं वाटत होतं की आम्ही आमचं स्वप्न जगत आहोत. कारण इथे येणं प्रत्येकाच्या नशिबात नसतं. त्यामुळे मला वाटतंय की मी खूप भाग्यवान आहे.

विद्यार्थी: सर सत श्री अकाल!

पंतप्रधान: सत श्री अकाल!

विद्यार्थी: माझे नाव एकम कौर आहे. मी पंजाबमधून आले आहे. आणि माझा आपल्याला असा प्रश्न आहे की, जे 12 वीचे विद्यार्थी असतात, ते आपल्या बोर्डाच्या परीक्षेसोबतच स्पर्धा परीक्षांचीही तयारी करतात. हे योग्य आहे का? कारण त्या दोन्ही परीक्षांचे स्वरूप खूप वेगळे असते आणि त्या परीक्षा एकाच वेळी येतात?

पंतप्रधान: तुमची ही चिंता योग्य आहे. समजा एकाच वेळी एखाद्याला क्रिकेट खेळायचं आहे आणि त्याच वेळी त्याला फुटबॉलच्या सामन्यालाही जायचं आहे, तर त्याला वाटणारच की मी क्रिकेटसाठी मेहनत करू की फुटबॉलसाठी?

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: माझा असा आग्रह राहील की, तुम्हाला पहिले प्राधान्य 12 वीला द्यावे लागेल. पण जर आपण एक विद्यार्थी म्हणून आपल्या वयाशी आणि आपल्या वर्गाशी संबंधित अभ्यासक्रम पूर्णपणे आत्मसात केला असेल, तर स्पर्धा परीक्षेसाठी वेगळी मेहनत करावी लागणार नाही.

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: हे एका बाय:प्रॉडक्टसारखे असेल. काही पालकांना असं वाटतं की, या वयाआधी हे झालंच पाहिजे.

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: मग मी पालकांना सांगेन की, मुलांच्या क्षमता, योग्यता आणि आवडीनुसार त्यांना फुलू द्या.

विद्यार्थी: सर, माझा आपल्याला एक प्रश्न होता.

पंतप्रधान: हो.

विद्यार्थी: सर, मला गेमिंगमध्ये खूप रस आहे. पण माझी सोसायटी म्हणते की हे गेमिंग वगैरे सोड आणि अभ्यासावर लक्ष दे. पण मला असं वाटतं की मी माझं भविष्य गेमिंगमध्ये घडवावं. सर, मला हे कसं कळेल की मी योग्य मार्गावर चाललो आहे की चुकीच्या?

 

पंतप्रधान: आई:वडिलांचा स्वभाव कसा असतो? आधी ते ओरडत राहतात, करू नको, करू नको, करू नको.

विद्यार्थी: हो सर!

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: पण तरीही तुम्ही गुपचूप ते करत राहिलात आणि समजा तुम्ही मेडल मिळवलं, तर ते काय करतील?

विद्यार्थी: आनंदी होतील!

पंतप्रधान: ते पूर्ण गल्लीत फिरतील. बघा, माझ्या मुलाने हे केलं, माझ्या मुलाने हे केलं, माझ्या मुलाने हे केलं. म्हणजेच तुमचं यश हा त्यांचा सन्मान बनतो.

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: मग ते तुमच्याशी जोडले जातात.

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: भारतामध्ये इतक्या कथा:कादंबऱ्या आहेत, तुम्ही कधी विचार केला आहे का की मी पंचतंत्रावर एखादा गेम बनवीन, मी गेम क्रिएटर बनेन? जसं मानसीचं स्वतःचं एक पेज आहे, तसं तुम्हीही तुमचं एक सोशल मीडिया प्रोफाइल बनवा आणि तुम्ही स्वतः एक किंवा दोन गेम तयार करा आणि ते लॉन्च करा. मग तुमच्या घरच्यांना वाटेल की, अरे बघा हा इतका लहान आहे आणि 10,000 लोक त्याचे गेम्स खेळतात, 20,000 खेळतात. मग घरचे लोकच तुम्हाला कल्पना द्यायला लागतील. बघा, ती हनुमानजींची कथा आहे ना, त्यावर गेम बनव. मग म्हणतील अभिमन्यूची ती घटना आहे, गेम बनव की अभिमन्यू बाहेर कसा येईल? मग तुम्हाला नवीन कल्पना येतील आणि म्हणूनच गेमिंगमध्ये तुमची आवड असणे ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही कधीही संकोच करू नका. पण फक्त टाईमपास आणि भारतात डेटा स्वस्त आहे, तंत्रज्ञान फार महाग नाही म्हणून बस खेळत राहा, केवळ मजेसाठी खेळणे असं नको. जे जुगार चालतात ना, ते आपल्याला देशात होऊ द्यायचे नाहीत. मी आताच कायदा बनवला आहे की जे गेममध्ये जुगार खेळतात, पैसे लावतात, ते विनाशकारी आहे.

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: ते होऊ द्यायचे नाही, पण गेमिंग हे एक कौशल्य आहे आणि त्यामध्ये गती देखील असते, खूप गती असते. विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: तुमची ही सतर्कता एकप्रकारे स्वतःच्या विकासासाठीही एक उत्तम मार्ग आहे. पण सर्वोत्तम दर्जाचे गेम शोधून स्वतःचे नैपुण्य मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कराल का?

विद्यार्थी: हो सर!

विद्यार्थी: पीएमच्या निवास्थानी येणे ही माझ्यासाठी खूप उत्साहवर्धक बाब होती. ते आमच्याशी अतिशय आपुलकीने बोलत होते, ते आमचे प्रश्न नीट समजून घेत होते आणि आम्हाला खूप छान उत्तरे देत होते.

विद्यार्थी: नमस्ते सर!

पंतप्रधान: नमस्ते!

विद्यार्थी: सर आम्हाला ना आधी परीक्षेमुळे ताण यायचा, खूप चिंता वाटायची आणि हे पुस्तक वाचून आम्ही आमची चिंता पळवून लावली आहे, याचसाठी आम्ही सर्वांनी सुविचार लिहिले आहेत. I used to be scared of exams but now it is my friend मैत्री इन गुजराती. 

विद्यार्थी: म्हणजे आधी जे होतं ना आम्हाला बाकीच्यांना पाहील्यावर भीती वाटायची की भाऊ तो कसा वाचतोय, तो कसा वाचतोय, पण एक्झाम वॉरियर वाचल्यानंतर लक्षात आलं की माझी जे टेक्निक आहे ते सर्वात वेगळे आहे आणि माझे टेक्निक माझ्यासाठीच कामी येईल. सर,  I used to be scared of dissected but now I don’t have any fear.

 

विद्यार्थी: सर मी लिहिलं आहे, I used to be scared to be of time management but it is my friend now. सर मी लहानपणापासून म्हणजे मला नेहमी घरचे, शाळेतले, मित्र म्हणजे मी नेहमी वेळेच्या नियोजनाबाबतच संघर्ष केला आहे. मला प्रत्येक जण म्हणतो, प्रत्येक काम लवकर कर, लवकर कर, तू हुशार आहेस, तुला कल्पना सुचतात, पण तू वेळेवर करत नाहीस. तीच तुझी सर्वात मोठी समस्या आहे. तर सर मी एक्झाम वॉरियर मधून शिकले आहे. मी रोज सकाळी लवकर उठणार.

पंतप्रधान: बरं, मी एक सोपा आणि एक मार्ग सांगतो. रात्री तुम्ही जेव्हा झोपता ना, त्याआधी डायरीत लिहा की उद्या मला जे नक्की करायचेच आहेत, असे कोणते काम आणि दुसरं मग आज जे लिहिलं आहे, ते दुसऱ्या दिवशी तपासा, झालं की नाही झालं आणि बरोबरची खूण करा की, काल मी लिहिलं होतं की मी आज पाच कामं करेन, पण तीनच केली, तर खूण करा, दोन राहिले, मग विचार करा हे दोन का राहिले? तर मी मित्रांसोबत फोनवर जास्त बोलले, एक टीव्ही मालिका होती, तर मी 30 मिनिटं त्यातच वाया घालवली. तेव्हा तुम्हाला स्वतःला वाटेल, हो मी हा वेळ वाचवू शकतो. कधीकधी काय होतं, आपल्याला माहितच नसतं की आपण वेळ कसा वाया घालवतो. जीवनात जर वेळेचं नियोजन शिकलात आणि वेळेचा उत्पादक वापर शिकलात, तर तुम्ही पहा तुम्हाला कधीही दडपण जाणवणार नाही, थकवा जाणवणार नाही. आता जसा मी आहे, इतकी सगळी कामं असतात, पण मला ताण नाही, कारण मला खूप आधीपासूनच एक प्रकारे वेळेचा योग्य वापर करण्याची सवय लागली.

विद्यार्थी: I used to think the maths, maths is the ghost but now I am the ghost. मी लहानपणी maths ला पाहून इतका घाबरलो की ते जणू भूत, पण आता मी इतका जवळ आलो आहे की आता maths ला सोडून राहू शकत नाही.

पंतप्रधान: अच्छा! इतका मोठा बदल घडला. तुम्ही वैदिक गणित पाहिलं आहे का?

विद्यार्थी: नाही.

पंतप्रधान: ऑनलाइन वैदिक गणिताचे वर्ग चालतात, कारण ते जादूच्या खेळासारखं आहे. जर थोडा त्यात रस घेतलात, तर तुम्हाला खूप मजा येईल आणि आपल्या मित्रांनाही maths चे त्या प्रकारचे खेळ दाखवू शकता, तर तुमचा रस अजून वाढेल.

विद्यार्थी: सर I used to be scared of exams but it is my friend now. परीक्षा, जेव्हा वेळापत्रक यायचे तेव्हा खूप भीती वाटायची की, आता परीक्षेत काय होईल किंवा मग एक्झाम वॉरीयर पुस्तकाचा तुमच्या याचा पहिला मंत्र हा आहे की परीक्षेला आपण उत्साह किंवा आशेसारखं पाहीलं पाहिजे, उत्सवासारखं पाहीलं पाहिजे. तुमचं वाचून त्यातून मला खूप प्रेरणा मिळाली.

पंतप्रधान: कधीकधी तुम्हाला ज्या अडचणी येतात ना त्या घरातूनच येतात. तर जी गोष्ट यातली तुम्हाला उपयोगी पडली आहे, त्या गोष्टी त्यांच्याही उपयोगाला येतील. किमान तुमच्या कुटुंबातील जे मोठे लोक आहेत ना, त्यांना परीक्षा पे चर्चा वाचायला सांगा. त्याची चर्चा करा.

 

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: आणि कोणताही मंत्र असेल, तर खास ओळ आखून सांगा. पहा, हे पंतप्रधानांनी हे म्हटलं आहे, तुम्ही वाचा.

विद्यार्थी: सर माझ्या मम्मीने सर्व मंत्र वाचले आणि मम्मी खूप खूश झाली.

पंतप्रधान: पहा तुमची ताकद वाढली.

विद्यार्थी: I used to be scared of low marks but now it is my friend. सर आधी असं होतं की म्हणजे आम्हाला वाटायचं की गुणच सर्वकाही आहेत. परीक्षांनंतर आमचे गुण कमी यायचे, तर असं वाटायचं की, आता म्हणजे सर्वकाही संपलं. पण जेव्हा आम्ही पुस्तक वाचलं, तर म्हणजे तुम्ही जसं लिहिलं होतं, परीक्षा फक्त, एक आयुष्याची तयारी आहे आणि तुम्ही आम्हाला डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं उदाहरण दिलं.

पंतप्रधान: हो, आठवतंय तुम्हाला?

विद्यार्थी: म्हणजे त्यांनी अपयश अनुभवलं, पण जर त्यांनी पुन्हा प्रयत्न केला नसता, तर आपल्याला, म्हणजे मिसाईल मॅन ऑफ इंडिया मिळाला नसता. तर त्यानंतर मला शिकवण मिळाली की परीक्षेचे गुण काहीच नाहीत. म्हणजे जर आपण पुन्हा प्रयत्न केले तर अजून चांगलं आणि अधिक उत्तम करू शकू.

प्रधानमंत्री: बरं आता तुझं दडपण कमी झालं, मग काही नवीन गोष्ट शिकण्याचं मन करतं?

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: गाणं शिकू, वाद्य शिकू, असा काही नवीन विचार येतो, चित्रकला शिकू.

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: असा वेळ मिळाला तर, करत आहेस का मग?

विद्यार्थी: हो सर! तेच म्हणजे कविता लिहायला सुरुवात केली आहे.

पंतप्रधान: कविता लिहायला, अच्छा!

विद्यार्थी: I used to be scared of presentations but now it’s one of my friend. जसं तुमच्याकडे आहे, पाहिलं आहे की तुम्ही किती जसा तो आत्मविश्वास आहे आणि हे पुस्तकही मी वाचतो. आता मी आत्मविश्वासपूर्ण आहे आणि हे सातत्य की जर मी अपयशी झालो, तर मी हार मानणार नाही, मी पुन्हा तयारी करेन, तर मी आता जसं पुढे मी हे सादरीकरण करू शकतो.

पंतप्रधान: तर आता हिंमत आली.

विद्यार्थी: हो, म्हणूनच सर!

पंतप्रधान: असं समजा, पदपथावर गरीब महिला सामान विकत आहेत आणि इतक्यात काही भांडण झालं, तर ती गरीब महिला, जिने कधी टीव्हीवर उत्तर दिलं नाही, तुम्ही पाहिलं असेल ती किती छान मुलाखत देते. कसं झालं? काय झालं? कसं झालं? कारण काय आहे, जी गोष्ट तिने आपल्या अनुभवातून, डोळ्यांसमोर पाहिली, फिरवून बोलणं नाही, खोटं बोलायचं नाहीये, तर एकदम थेटपणे ती सांगून टाकते. हा आत्मविश्वास कुठून आला? खरेपणामुळे आला. तुमचाही आत्मविश्वास कसा आला? त्या खरेपणामुळे आला की जे मी करत आहे, मी जे केलं आहे, मी जे म्हणत आहे, मी योग्य करत आहे.

विद्यार्थी: मला भीती वाटत होती की मी परीक्षा देताना घाबरून जाईन, विशेषतः साहित्य विषयात. मला वाटायचे खूपच कंटाळवाणे असेल आणि पुस्तक वाचल्यानंतर मी घाबरून जाईन. पण आता मला वाटतेय, मी आता करू शकते, मी आता नाही घाबरणार. आता मला सराव करावा लागेल, लिहिण्याचा सराव करेन, जेणेकरून मी मोठ्या पेपरला घाबरून जाणार नाही आणि मी अधिक वेगाने आणि भराभर लिहिण्याचा प्रयत्न करेन. मी हस्ताक्षर सुधारेन, सर्व काही सुधारेन.

 

पंतप्रधान: वा, आता लगेच  आत्मविश्वास आला. आता तुमच्या लक्षात येईल, पण नंतर तर चुका लक्षात येणार नाहीत.

विद्यार्थी: अजिबात नाही. कारण आता माझी अडचण काय ते मला कळली ना. मी प्रश्नपत्रिका पाहूनच घाबरून जायचो, पण आता नाही.

पंतप्रधान: बघ, अगदी योग्य मुद्दा कळला आहे तुला. आपण अभ्यासात कच्चे नाही पण घाईघाईत चुका करतो.

विद्यार्थी: हो, सर.

पंतप्रधान: काही तंत्र उपयुक्त ठरतात. समजा, असा एखादा पेपर असेल, तर 30 सेकंद शांत बसा आणि दीर्घ श्वास घ्या. एकदम छाती भरून जाईल इतका मोठा श्वास घ्या आणि मग हळूहळू श्वास सोडा, तुमचे मन एकदम वेगळे होऊ लागेल आणि मनाच्या आत डोकवा. तुमच्या हाती एक नवीन, योग्य गोष्ट हाती लागेल. उत्तर येत नाही म्हणून चुका होणे ही वेगळी गोष्ट आहे, पण येत असून चूक होणे, असे कधी होणार नाही.

विद्यार्थी: नमस्कार सर! जय गुरु शंकर!

पंतप्रधान: नमस्कार!

विद्यार्थी: माझे नाव निडुमल बर्मन आहे. तर माझा प्रश्न असा आहे की लहान घर, गोंधळ आणि काम या गोंधळात अभ्यास कऱणे अनेकदा अवघड असते. आणि जर पालक आमच्या स्वप्नांना पाठबळ देत नसतील, गांभीर्याने घेत नसतील तर आम्ही काय करू शकतो?

पंतप्रधान: मी सांगतो, बघा मी समाज माध्यमांवर एक ध्वनिचित्रफीत पाहिली होती, ती माझ्या मनाला भावली. एक वडील आपल्या उदरनिर्वाहासाठी काही सामान घेऊन बैलगाडीतून प्रवास करत होते आणि त्यांचा मुलगा सामान भरलेल्या गाडीत सामानाच्या वर कुठेतरी बसला होता, पण काय करत होता? तर तो आपले पुस्तक वाचत होता म्हणजेच तो त्याच्या आरामाची काळजी करत नव्हता.

विद्यार्थी: हो, सर.

पंतप्रधान: काही मुले असतात त्यांना झोप येत नाही. का येत नाही? खोली अशी आहे. त्यांना जर पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले ना तरीही त्यांना झोप येणार नाही. त्यामुळे सोयीसुविधांमुळे क्षमता येईल, हा विचार योग्य नाही. आपल्या देशात बोर्ड परीक्षेत उत्तम गुण मिळवणारी मुले कोण आहेत? लहान लहान गावांतील ती मुले आहेत. पूर्वी काय होते? केवळ मोठ्या कुटुंबातील मुले मोठ्या शाळांमध्ये जात. आता ही परिस्थिती नाही. लहान लहान कुटुंबातून मुले येतात. मी काही दिवसांपूर्वी अंध मुलींच्या क्रिकेट संघातील मुलींना भेटलो आणि त्या विजयी होऊन आल्या होत्या. मी त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा डोळ्यांत पाणी येईल, अशा गोष्टी त्या सांगत होत्या. घर नाही आणि अंध आहेत, खेळायला शिकल्या. दिव्यांग असूनही त्या इथपर्यंत पोहोचल्या. त्यासाठी त्या कुठे जन्माला आल्या, कुठे राहात होत्या या गोष्टी महत्त्वाच्या नव्हत्या. दिलासादायक परिस्थितीमुळेच आपले आयुष्य घडते, हा भ्रमात आपण राहू नये. जीवन घडते ते आपण आयुष्य कसे जगतो त्यावरून.

विद्यार्थी: जेव्हा मी माननीय पंतप्रधानांना पाहिले, तेव्हा मला स्वतःविषयी विश्वास वाटत नव्हता की ते येत आहेत. भारताचे नेते आहेत तर मला वाटले की खूप गंभीर असतील, पण जेव्हा त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा ते आपले वाटले. त्यांनी दिलेला सल्ला ऐकून मला असे वाटते की हो मी हे करू शकतो. त्या गोष्टींचे मी पालन करेन आणि माझ्या आयुष्यात त्यांचा सल्ला अमलात आणण्याचा प्रयत्न करेन.

विद्यार्थी: वणक्कम सर!

पंतप्रधान: वणक्कम!

विद्यार्थी: माझे नाव निखिल आहे, सर! मंदिरांची भूमी तामिळनाडूमधून मी आलो आहे. सर, परीक्षा काळात काही वेळा आमच्या घरी पाहुणे येतात, आणि ते आमच्या अभ्यासाच्या तयारीविषयी विचारतात.  काही गोष्टी म्हणजे आमच्या मनातून त्या काढून टाकतो, त्या विसरू इच्छितो, पण ते पुन्हा त्याविषयी विचारतात आणि आम्हाला त्याची आठवण करून देतात. आणि सर आमचे पालकही याबद्दल काही करू शकत नाहीत. तेव्हा सर मी विचारू इच्छितो की, अशी परिस्थिती आम्ही कशी हाताळू शकतो?

पंतप्रधान: मी तुम्हाला एक युक्ती सांगतो, की काय करायला हवे? जशी ही व्यक्ती येईल, तेव्हा म्हणा, काका तुम्ही खूपच यशस्वी व्यक्ती आहात, तुम्ही मला सांगा ना की लहानपणी तुम्ही कसा अभ्यास करायचात? तुम्हांला कधी राग यायचा का? तुमचे शिक्षक कधी तुम्हाला मारत होते का? तुम्ही कसे वागत होता? त्यांनी काही विचारण्याआधी तुम्ही विचारा. बघा, परिस्थिती एकदम पालटेल.

विद्यार्थी: हो सर.

पंतप्रधान: जेव्हा ते आले तेव्हा मी आश्चर्यचकित झालो. ज्यांना आत्तापर्यंत टीव्हीवर पाहिले आहे. त्यांना प्रत्यक्ष आयुष्यात थेट पाहाण्याची संधी मिळाली आणि त्यांनी मला खूप सर्जनशील उत्तर दिले. ते मला अपेक्षितच नव्हते. त्यांनी सरळ खेळी उलटवायला सांगितले. आपण त्यांना जाऊन विचारायला हवे की तुम्ही हे कसे केले? आयुष्यात या वळणावर या टप्प्यावरून कसे तरून गेले?

विद्यार्थी: जुलेय सर! माझे नाव पद्मा आहे. मी लडाखहून आले आहे. तर माझा प्रश्न असा आहे की, सर माझ्या सारख्या वयाच्या मुलांनी स्वप्ने पाहावीत का? आणि ती पूर्ण करण्यासाठी सुरुवात कुठून करावी?

पंतप्रधान: स्वप्न न पाहाणे हा तर गुन्हा आहे. स्वप्ने पाहायलाच हवी, मात्र केवळ स्वप्न रंजन काही कामाचे नाही त्यामुळे आयुष्यात कर्म/ प्रत्यक्ष कृतीला प्राधान्य दिले पाहिजे. मी आत्ता जिथे आहे, मला तिथे यशस्वी व्हायचे आहे, तेव्हा मी पुढे मार्गक्रमण करे. जर मी झाडावर्या आंब्याकडे पाहात बसलो, तर मला झाडावर चढता येणार नाही आणि आंबे काढता येणार नाही. आता, समजा मला वाटलं की मला अंतराळवीर व्हायचं आहे आणि चंद्रावर जायचे आहे, तर मला कोण अंतराळवीर होऊन गेले हे वाचले पाहिजे, त्यांचे जीवनचरित्र कसे होते?अवकाश काय असते? हळूहळू त्यामध्ये रस वाढला पाहिजे. जर टीव्हीवर त्यासंबंधीचा कार्यक्रम असेल तर तो जरूर पहायला हवा, जेणेकरून तुमच्या विचारांना खतपाणी मिळेल. तुमच्या विचारांना पोषक घटक मिळतील तेव्हा तुमच्या विचारांना चालना मिळेल. इतरांनी सांगून काही फायदा होणार नाही. कधी कधी ते हा तर अंतराळवीर होणार आहे अशी आपली चेष्टाही करतील. अशा वेळी आपली स्वप्ने सर्वांना सांगू नयेत पण ती जरूर लिहून ठेवावीत.

विद्यार्थीनी: मी खूप चिंतित होते कारण परीक्षा पे चर्चा हा माझ्या आयुष्यातील पहिला अनुभव होता. मात्र पंतप्रधान माझ्यासमोर येताच माझ्या चिंतेचे उत्साहात रुपांतर झाले.

विद्यार्थीनी: सर, मला एक प्रश्न आहे की आपण दररोज पाहत असलेली मोठी स्वप्ने पूर्ण करावीत यासाठी आपण कोणती एक छोटी सवय अंगीकारली पाहिजे किंवा कोणता एक सराव केला पाहिजे जेणेकरून आपण आपल्या स्वप्नाच्या पूर्ततेच्या दिशेने मार्गक्रमण करीत राहू?

 

पंतप्रधान: प्रथम तर मला वाटते की जे मोठे झाले आहेत त्यांच्या विषयीचे चरित्र आपण वाचले पाहिजे. कधीकधी काय होते की आपल्या समोर एखादी महान व्यक्ती आल्यानंतरच आपल्या लक्षात येते. पण ती व्यक्ती देखील कधीतरी लहान असते. तुम्हाला आज पंतप्रधान मिळाला असेल, पण तो पंतप्रधानही कधीतरी लहान असेल, म्हणून जेव्हा आपण चरित्र वाचतो तेव्हा असे दिसते. की अरे नाही हे महाशय मोठे तर झाले पण आधी ते येथेच तर होते. मग तुम्ही त्याच्याशी सह:संबंध प्रस्थापित कराल, की महोदय मी सुद्धा हे करतो. हे केवळ तेच करतात असे काही नाही. मग तुमचा विश्वास वाढेल. हो हो येथून सुरुवात करू शकता. ही पहिली पायरी आहे. त्यांनी दुसरे पाऊल. त्याने असे केले होते हे झाले तिसरे पाऊल. म्हणजे तुम्ही तुमचा मार्ग मजबूतपणे पार करू शकाल.

विद्यार्थीनी: त्यांचा सल्ला हा मला माझा आदर्श वाटतो. मी याचा विचार करतो आणि याबाबत  संपूर्ण माहिती पाहू आणि ते कोणत्या पार्श्वभूमीतून आले आहेत आणि त्यांच्यासमोर कोणत्या समस्या होत्या ते पाहू. त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला? मग ते ते जाणून घेऊन मी कोणते छोटे पाऊल उचलू शकते आणि मी त्यावर काम करू शकते आणि जेव्हा पहिले पाऊल पूर्ण होईल तेव्हा आपण दुसरे पाऊल उचलू शकतो.

विद्यार्थीनी: सर, मी तुम्हाला एक कविता ऐकवू इच्छिते.

पंतप्रधान: कविता ऐकवायची आहे. ऐकवा.

विद्यार्थी: आम्हा सर्वांच्या आकांक्षा आहात आपण. भारताचा अभिमान आहात आपण. भारतवर्षाचे नाविक आहात आपण. मानवतेचे सेवक आहात आपण. मी फार दुरून आले आहे आणि आपल्यासोबत काही प्रश्नही घेऊन आले आहे. 'परीक्षा पे चर्चा'ची ही भेट घेऊन आम्ही आलो आहोत आणि आम्हा सर्वांना ही संधी मिळाली आहे. आपण मायेची सावली आहात, वंचितांचे सोबती आहात. देशाला नेहमी प्रथम स्थानी ठेवता आणि 'भारत माता की जय' म्हणता. म्हणून आज मी सुद्धा हे म्हणते, माझी 'मन की बात' मांडते. आपण साधना पुरुष आणि योगी आहात. भारताच्या स्वप्नांचे मोदी आहात. एवढे बोलून मी माझ्या वाणीला विराम देते आणि पुन्हा एकदा आपल्याला प्रणाम करते.

​पंतप्रधान: वा! वा! उत्तम कविता करतेस तू.

विद्यार्थीनी: जेव्हा ते मला भेटले, जेव्हा मी कविता ऐकवत होते आणि जेव्हा माझ्याशी हितगुज करत होते आणि जेव्हा ते माझ्या जवळ येत होते, तेव्हा मला असं वाटत होतं की आता मला चक्कर येईल आणि मी इथेच पडेन.

​पंतप्रधान: हे चांगलं झालं की तुम्ही सर्वांनी आपापले विचार मांडले.

​विद्यार्थी: धन्यवाद सर!

​पंतप्रधान: या! 

​पंतप्रधान: बरं मुलांनो, मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. तुम्ही मला खूप प्रश्न विचारले. मी भारतात जो विकसित भारताचा विषय मांडतो, तेव्हा मी विकसित भारतासाठी कोणतं वर्ष सांगतो?

​विद्यार्थी: 2047.

​पंतप्रधान: 2047

​विद्यार्थी: येस सर

पंतप्रधान: 2047 का सांगतो?

विद्यार्थी: कारण हे स्वातंत्र्याच्या 100 वर्षांच्या शतकपूर्तीचे ध्येय आहे.

​पंतप्रधान: स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील. जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील, तेव्हा तुमचं वय किती असेल?

विद्यार्थी: 39

विद्यार्थी: 40.

पंतप्रधान: हे जे 39:40:35:45 वयोमान असेल, ते तुमच्या आयुष्यातील किती महत्त्वाचं वय असेल, किती गोष्टी तुमच्या समोर तयार असतील? मग मी ही सगळी मेहनत कोणासाठी करत आहे?

​विद्यार्थी: आमच्यासाठी!

 

पंतप्रधान: मग आता आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत की नको?

विद्यार्थी: येस सर!

पंतप्रधान: आता हे पहा, महात्मा गांधीजी 1915 मध्ये आफ्रिकेहून परत आले आणि त्यांनी स्वातंत्र्याची चळवळ चालवली. 1915 पासून 1947 पर्यंत ते स्वातंत्र्यासाठी झटत राहिले की नाही?

​विद्यार्थी: येस सर!

​पंतप्रधान: स्वातंत्र्य मिळालं की नाही?

​विद्यार्थी: येस सर!

​पंतप्रधान: भगतसिंगजी फासावर चढले. 

​विद्यार्थी: येस सर!

​पंतप्रधान: अगदी लहान वयात ते शहीद झाले, पण स्वातंत्र्याचं स्वप्न पेरून गेले की नाही?

विद्यार्थी: हो सर!

​पंतप्रधान: त्यांनी प्रत्येक तरुणाला स्वातंत्र्यासाठी जगायला शिकवलं की नाही?

विद्यार्थी: हो सर!

​पंतप्रधान: जर स्वातंत्र्याच्या 25:30 वर्षे आधी जे स्वप्न पाहिलं गेलं, त्यासाठी त्यांनी जे कष्ट सोसले, त्याग आणि बलिदान दिलं, त्यामुळे स्वातंत्र्य मिळालं की नाही?

​विद्यार्थी: हो सर!

​पंतप्रधान: जर एवढं मोठं स्वातंत्र्य मिळू शकतं, तर मग आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी विकसित भारत बनू शकतो की नाही?

​विद्यार्थी: येस सर!

​पंतप्रधान: तुम्हाला विश्वास आहे?

विद्यार्थी: हो सर!

​पंतप्रधान: आणि म्हणूनच हे कधीही विसरता कामा नये. हे स्वप्न तुम्हीदेखील घरी जाऊन लिहिलं पाहिजे. विकसित भारतासाठी मला हे करायचं आहे. आता अशा कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्या मी विकसित भारतासाठी करू शकतो?

​विद्यार्थी: सर, आम्ही स्वतःमध्ये कौशल्ये विकसित करू.

विद्यार्थी: सर, आम्ही स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाऊ.

​पंतप्रधान: स्वतःवर विश्वास ठेवू.

​विद्यार्थी: स्वदेशी वस्तूंचा जास्तीत जास्त वापर करू.

​पंतप्रधान: आता हे स्वदेशी वापरायचं तर कसं करावं लागेल? त्यासाठी आधी आपल्याला मनाची तयारी करावी लागेल. 

​विद्यार्थी: येस सर!

​पंतप्रधान: स्वदेशी वस्तू तर नंतरची गोष्ट आहे. 

विद्यार्थी: येस सर!

पंतप्रधान: आपण गुलामगिरीच्या मानसिकतेत जगतो. समजा, शाळेत एखादा मित्र परदेशी जॅकेट घालून आला आणि म्हणाला की हे अमुक देशाचं आहे, तर आपल्याला कसं वाटतं? अरे वा! खूप छान आहे, असंच वाटतं ना?

​विद्यार्थी: हो सर!

​पंतप्रधान: मुलांनो, तुम्ही एक काम कराल का?

विद्यार्थी: हो सर!

​पंतप्रधान: सकाळी दात घासण्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी दात घासेपर्यंत आपण ज्या ज्या गोष्टी वापरतो, त्यांची एक यादी बनवा. तुम्हाला कल्पनाही नसेल, तुमचा कंगवाही विदेशी असेल. तुमचे बूटही विदेशी असतील. एकदा तुम्ही हे लिहून पाहिलं पाहिजे. मग ठरवा की, चला, या महिन्यात या 10 गोष्टी जुन्या होणार आहेत, आता नवीन घेताना भारतीय वस्तूच घेऊ. पुढच्या महिन्यात आणखी 10 भारतीय वस्तू  घेऊ. असं केलं तर एका वर्षाच्या आत सर्व विदेशी वस्तू निघून जातील आणि घरात भारतीय वस्तू येतील. आपण हे ठरवलं पाहिजे की काहीही असो, माझ्या शरीरावर, माझ्या कुटुंबात आणि माझ्या जीवनात, मी आधी हे पाहीन की ही वस्तू भारतीय आहे का? तर कराल ना हे?

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: जर आपणच आपल्या देशातील गोष्टींचा अभिमान बाळगला नाही, तर जग काय करणार?

विद्यार्थी: नाही सर!

पंतप्रधान: आपण उशीर झाला तर काय म्हणतो? “हा तर इंडियन टाइम आहे” असं म्हणतो ना?

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: म्हणजे उशीर आपणच केला, कार्यक्रम आपणच उशिरा सुरू केला आणि दोष कुणाला दिला?

विद्यार्थी: भारताला.

पंतप्रधान: भारताला. दुसरी गोष्ट म्हणजे कर्तव्यपालन. आधी आपली जीवनशैली बदला. सुरुवात स्वच्छतेपासून करा. आपण घाण करणार नाही असा निश्चय करा. जगात कुठलाही एखादा देश पाहिला तर तो स्वच्छ दिसतो.

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: तो स्वच्छ का दिसतो? केवळ सफाई कर्मचाऱ्यांमुळे की लोकांनी घाण केली नाही म्हणून?

विद्यार्थी: लोकांनी घाण केली नाही म्हणून!

पंतप्रधान: जर आपल्याला विकसित भारत घडवायचा असेल, तर आपण ठरवूया की आपण घाण करणार नाही. स्वच्छतेबाबत घरात, बाहेर, परिसरात कुठेही तडजोड करणार नाही. कुणी कचरा टाकला तर त्याच्याशी भांडणार नाही, आपणच तो उचलू. मग त्याला लाज वाटेल. 

विद्यार्थी: हो सर!

विद्यार्थी: की माझा कचरा याने उचलला.

पंतप्रधान: म्हणून नागरिक म्हणून आपले कर्तव्य पाळले पाहिजे. निरोगी राहणे हेही एक प्रकारचे कर्तव्य आहे.

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: आपण आपली कर्तव्ये पार पाडली, तर जगातील कोणतीही ताकद भारताला विकसित राष्ट्र होण्यापासून रोखू शकत नाही. आणि जेव्हा तुम्ही 35:40 वर्षांचे व्हाल, तेव्हा त्याचा सर्वाधिक आनंद तुम्हालाच मिळेल.

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: ज्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे, ते काम तुम्ही करायला हवे का नाही?

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: जास्तीत जास्त प्रयत्न करायला हवेत का नाही?

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: चला, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही त्या पिढीत आहात ज्यांच्यासमोर मोठे आकाश आणि मोठा कॅनव्हास आहे. आज आपण काय करू शकतो, याचा विचार करा.

विद्यार्थी: आजचे संपूर्ण जगच कृत्रिम बुद्धिमत्तेचे आहे. अनेक गोष्टी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करूनच होतात.

पंतप्रधान: तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याच्या मोठ्या संधी मिळाल्या आहेत. त्याचा योग्य वापर करण्याची विवेकबुद्धी विकसित केली पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर तुमची ताकद वाढवण्यासाठी असावा. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करावा? एक तर जर मी कृत्रिम बुद्धिमत्तेला एखाद्या व्यक्तीमत्वाबाबत ठळक मुद्दे सांगायला सांगितले, तर ते 10 मुद्दे सांगेल आणि मला वाटेल की मला खूप ज्ञान मिळाले. चला, आपली गरज भागली. मित्रांना म्हणतो चला गप्पा मारू, तर तुम्ही मोठ्या सहजतेने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला. पण त्याचा खरा लाभ मिळाला का? नाही. पण जर मी कृत्रिम बुद्धिमत्तेला विचारले की माझे वय अमूक इतके आहे, मला या विषयांत रस आहे, तर वाचण्यासाठी 10 चांगली जीवनचरित्रे सुचवा. मग कृत्रिम बुद्धिमत्ता 10 चांगली जीवनचरित्रे शोधून देईल. आपण बाजारात जाऊन ती पुस्तके खरेदी करून वाचू. तेव्हाच आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्ता खरोखर उपयोगी पडेल.

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: तुमचा विकास होईल. 

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: तुम्हाला लाभ होईल.

विद्यार्थी: हो सर!

विद्यार्थी: मला त्यांचा कृत्रिम बुद्धिमत्तेविषयीचा भाग खूप आवडला, जेव्हा ते म्हणाले की कृत्रिम बुद्धिमत्तेचा तुम्ही वापर करा. कृत्रिम बुद्धिमत्ता आपली मदत करू शकते, पण तो थेट आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचवू शकत नाही. मीही तंत्रज्ञानाशी संबंधित अ‍ॅप्स बनवताना कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करते. त्यामुळे त्यांनी सांगितलेला कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर करण्याचा संदेश मला आवडला.

विद्यार्थी: सर, मला तुम्हाला बासरी वाजवून दाखवायची आहे. मी कर्नाटक शास्त्रीय संगीताचा अभ्यास करतो. आज मी एक संस्कृत रचना सादर करणार आहे.

पंतप्रधान: हो, ऐकव!

पंतप्रधान: वा! खूप छान. धन्यवाद!

विद्यार्थी: सर, मी तुमचे एक स्केच काढले आहे. दाखवू का?

पंतप्रधान: कुठे आहे?

विद्यार्थी: हे मी तुमच्यासाठी बनवले आहे.

पंतप्रधान: काय बनवले, बेटा?

विद्यार्थी: हाताने बनवलेला पुष्पगुच्छ आहे.

पंतप्रधान: छान!

विद्यार्थी: हे उत्तराखंडमधील पारंपरिक आहे. वसंत पंचमीला आम्ही सकाळी उठून फुले तोडतो आणि लोकांच्या घरात देतो.

विद्यार्थी: त्रिपुराचे प्रसिद्ध!

पंतप्रधान: त्रिपुरा सुंदरी!

विद्यार्थी: हे नारळाच्या करवंटीपासून बनवले आहे.

विद्यार्थी: आणि सर, हा चहा आहे.

पंतप्रधान: वा! चहावाल्याला चहा!

विद्यार्थी: सर, ही सेंद्रिय चहा आहे.

पंतप्रधान: सेंद्रिय चहा! तुम्ही खूप छान कविता लिहिता. लिहित राहा!

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: आसामचा गमछा! शाबास! सर्वांना खूप धन्यवाद! शुभेच्छा!

विद्यार्थी: धन्यवाद सर! बाय सर ! बाय!

पंतप्रधान: धन्यवाद!

विद्यार्थी: धन्यवाद सर!

पंतप्रधान: अनेक विद्यार्थ्यांनी मला असे सूचवले होते की देशाच्या विविध भागांमध्येही “परीक्षा पे चर्चा” आयोजित केली पाहिजे. या विशेष भागात तुम्ही तेच पाहणार आहात. जर कुटुंबात एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या गुणांची चर्चा होत असेल, तर आपण त्या भावाच्या किंवा बहिणीच्या चांगल्या गुणांपासून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणी खूप मोठे झाले आहे, तर मोठे होण्याची इच्छा असणे चुकीचे नाही. पण तो मोठा झाला आहे म्हणून स्वतःची तुलना त्याच्याशी करू नका. शिक्षणाची गरज जीवनातही आहे आणि समाजजीवनातही आहे. पण आयुष्यात खेळ असणेही तितकेच आवश्यक आहे. म्हणून तुमच्यापैकी जर कोणी काही बोलू इच्छित असेल, आपली भावना व्यक्त करू इच्छित असेल आणि मला ऐकवू इच्छित असेल : तर कोण सुरुवात करणार?

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Govt directs faster processing of city gas projects, hikes commercial LPG allocation to ease supply stress

Media Coverage

Govt directs faster processing of city gas projects, hikes commercial LPG allocation to ease supply stress
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
This is the New India that leaves no stone unturned for development: PM Modi
March 23, 2026
Today, India is moving forward with a new confidence; Now India faces challenges head-on: PM
From the Gulf to the Global West and from the Global South to neighbouring countries, India is a trusted partner for all: PM
What gets measured gets improved and ultimately gets transformed: PM
This is the new India, It is leaving no stone unturned for development: PM

नमस्कार!

पिछले कुछ समय में मुझे एक-दो बार टीवी9 भारतवर्ष देखने का मौका मिला है। नॉर्मली भी युद्धों और मिसाइलों पर आपका बहुत फोकस होता है और आजकल तो आपको कंटेंट की ओवरफीडिंग हो रही है। बड़े-बड़े देश टीवी9 को इतना सारा कंटेंट देने पर तुले हुए हैं, लेकिन On a Serious Note, आज विश्व जिन गंभीर परिस्थितियों से गुजर रहा है, वो अभूतपूर्व है और बेहद गंभीर है। और इन स्थितियों के बीच, आज टीवी-9 नेटवर्क ने विचारों का एक बेहद महत्वपूर्ण मंच बनाया है। आज इस समिट में आप सभी India and the world, इस विषय पर चर्चा कर रहे हैं। मैं आप सबको बधाई देता हूं। इस समिट के लिए अपनी शुभकामनाएं देता हूं। सभी अतिथियों का अभिनंदन करता हूं।

साथियों,

आज जब दुनिया, conflicts के कारण उलझी हुई है, जब इन conflicts के दुष्प्रभाव पूरी दुनिया पर दिख रहे हैं, तब India and the world की बात करना बहुत ही प्रासंगिक है। भारत आज वो देश है, जिसकी अर्थव्यवस्था तेजी से आगे बढ़ रही है। 2014 के पहले की स्थितियों को पीछे छोड़कर के आज भारत एक नए आत्मविश्वास के साथ आगे बढ़ रहा है। अब भारत चुनौतियों को टालता नहीं है बल्कि चुनौतियों से टकराता है। आप बीते 5-6 साल में देखिए, कोरोना की महामारी के बाद चुनौतियां एक के बाद एक बढ़ती ही गई हैं। ऐसा कोई साल नहीं है, जिसने भारत की, भारतीयों की परीक्षा न ली हो। लेकिन 140 करोड़ देशवासियों के एकजुट प्रयास से भारत हर आपदा का सामना करते हुए आगे बढ़ रहा है। इस समय युद्ध की परिस्थितियों में भी भारत की नीति और रणनीति देखकर, भारत का सामर्थ्य देखकर दुनिया के अनेकों देश हैरान हैं। हमारे यहां कहावत है, सांच को आंच नहीं। 28 फरवरी से दुनिया में जो उथल-पुथल मची है, इन कठोर विपरीत परिस्थितियों में भी भारत प्रगति के, विकास के, विश्वास के संकल्प के साथ आगे बढ़ रहा है। इन 23 दिनों में भारत ने अपनी Relationship Building Capacity दिखाई है, Decision Making Capacity दिखाई है और Crisis Management Capacity दिखाई है।

साथियों,

आज जब दुनिया इतने सारे खेमों में बंटी हुई है, भारत ने अभूतपूर्व और अकल्पनीय bridges बनाए हैं। Gulf से लेकर Global West तक, Global South से लेकर पड़ोसी देशों तक भारत सभी का trusted partner है। कुछ लोग पूछते हैं, हम किसके साथ हैं? तो उनको मेरा जवाब यही है कि हम भारत के साथ हैं, हम भारत के हितों के साथ हैं, शांति के साथ हैं, संवाद के साथ हैं।

साथियों,

संकट के इसी समय में जब global supply chains डगमगा रही हैं, भारत ने diversification और resilience का मॉडल पेश किया है। Energy हो, fertilizers हों या essential goods अपने नागरिकों को कम से कम परेशानी हो, इसके लिए भारत ने निरंतर प्रयास किया है और आज भी कर रहे है।

साथियों,

जब राष्ट्रनीति ही राजनीति का मुख्य आधार हो, तब देश का भविष्य सर्वोपरि होता है। लेकिन जब राजनीति में व्यक्तिगत स्वार्थ हावी हो जाता है, तब लोग देश के फ्यूचर के बजाय अपने फ्यूचर के बारे में सोचते हैं। आप ज़रा याद कीजिए 2004 से 2010 के बीच क्या हुआ था? तब कांग्रेस सरकार के समय पेट्रोल-डीजल और गैस की कीमतों का संकट आया था और तब कांग्रेस ने देश की नहीं बल्कि अपनी सत्ता की चिंता की। उस वक्त कांग्रेस ने एक लाख अड़तालीस हज़ार करोड़ रुपए के ऑयल बॉन्ड जारी किए थे और प्रधानमंत्री मनमोहन सिंह जी ने खुद कहा था कि वो आने वाली पीढ़ी पर कर्ज का बोझ डाल रहे हैं। यह जानते हुए भी कि ऑयल बॉन्ड का फैसला गलत है, जो रिमोट कंट्रोल से सरकार चला रहे थे, उन लोगों ने अपनी सत्ता बचाने के लिए यह गलत निर्णय किया क्योंकि जवाबदेही उस समय नहीं होनी थी, उस बॉन्ड पर री-पेमेंट 2020 के बाद होनी थी।

साथियों,

बीते 5-6 वर्षों में हमारी सरकार ने कांग्रेस सरकार के उस पाप को धोने का काम किया है, और इस धुलाई का खर्चा कम नहीं आया है, ऐसी लाँड्री आपने देखी नहीं होगी। 1 लाख 48 हज़ार करोड़ रुपए की जगह, देश को 3 लाख करोड़ रुपए से अधिक की पेमेंट करनी पड़ी क्योंकि इसमें ब्याज भी जुड़ गया था। यानी हमने करीब-करीब दोगुनी राशि चुकाने के लिए मजबूर हुए। आजकल कांग्रेस के जो नेता बयानों की मिसाइलें दाग रहे हैं, मिसाइल आई तो टीवी9 को मजा आएगा, उनकी इस विषय का जिक्र आते ही बोलती बंद हो जाती है।

साथियों,

पश्चिम एशिया में बनी परिस्थितियों पर मैंने आज लोकसभा में अपना वक्तव्य दिया है। दुनिया में जहां भी युद्ध हो रहे हैं, वो भारत की सीमा से दूर हैं। लेकिन आज की व्यवस्थाओं में कोई भी देश युद्धों से दुष्प्रभाव से दूर रहे, ऐसा संभव नहीं होता। अनेक देशों में तो स्थिति बहुत गंभीर हो चुकी है। और इन हालातों में हम देख रहे हैं कि राजनीतिक स्वार्थ से भरे कुछ लोग, कुछ दल, संकट के इस समय में भी अपने लिए राजनीतिक अवसर खोज रहे हैं। इसलिए मैं टीवी9 के मंच से फिर कहूंगा, यह समय संयम का है, संवेदनशीलता का है। हमने कोरोना महासंकट के दौरान भी देखा है, जब देशवासी एकजुट होकर संकट का सामना करते हैं, तो कितने सार्थक परिणाम आते हैं। इसी भाव के साथ हमें इस युद्ध से बनी परिस्थितियों का सामना करना है।

साथियों,

दुनिया की हर उथल-पुथल के बीच, भारत ने अपनी प्रगति की गति को भी बनाए रखा है। अगर मैं 28 फरवरी को युद्ध शुरू होने के बाद, बीते 23 दिनों का ही ब्यौरा दूं, तो पूरब से पश्चिम तक, उत्तर से दक्षिण तक देश में हजारों करोड़ के डेवलपमेंट प्रोजेक्ट्स का काम हुआ है। दिल्ली मेट्रो रेल के महत्वपूर्ण कॉरिडोर्स का लोकार्पण, सिलचर का हाई स्पीड कॉरिडोर का शिलान्यास, कोटा में नए एयरपोर्ट का शिलान्यास, मदुरै एयरपोर्ट को इंटरनेशनल एयरपोर्ट का दर्जा देना, ऐसे अनेक काम बीते 23 दिनों में ही हुए हैं। बीते एक महीने के दौरान ही औद्योगिक विकास को गति देने के लिए भव्य स्कीम को मंजूरी दी गई है। इसके तहत देशभर में 100 plug-and-play industrial parks विकसित किए जाएंगे। देश में Small Hydro Power Development Scheme को भी हरी झंडी दी गई है। इससे आने वाले वर्षों में 1,500 मेगावाट नई hydro power capacity जोड़ी जाएगी। इसी दौरान जल जीवन मिशन को साल 2028 तक बढ़ाने का निर्णय लिया गया है। किसानों के हित में भी अनेक बड़े निर्णय लिए गए हैं। बीते एक महीने में ही पीएम किसान सम्मान निधि के तहत 18 हजार करोड़ रुपए से अधिक सीधे किसानों के खातों में ट्रांसफर किए गए हैं। और जो हमारे MSMEs हैं, जो हमारे निर्यातक हैं, उनके लिए भी करीब 500 करोड़ रुपए के राहत पैकेज की भी घोषणा की गई है। यह सारे कदम इस बात का प्रमाण हैं कि विकसित भारत बनाने के लिए देश कितनी तेज गति से काम कर रहा है।

साथियों,

Management की दुनिया में एक सिद्धांत कहा जाता है - What gets measured, gets managed. लेकिन मैं इसमें एक बात और जोड़ना चाहता हूं, What gets measured, gets improved और ultimately, gets transformed. क्योंकि आकलन जागरूकता पैदा करता है। आकलन जवाबदेही तय करता है और सबसे महत्वपूर्ण आकलन संभावनाओं को जन्म देता है।

साथियों,

अगर आप 2014 से पहले के 10-11 साल और 2014 के बाद के 10-11 साल का आप आकलन करेंगे, तो यही पाएंगे कि कैसे इसी सिद्धांत पर चलते हुए, भारत ने हर सेक्टर को Transform किया है। जैसे पहले हाईवे बनते थे, करीब 11-12 किलोमीटर प्रति दिन की रफ्तार से, आज भारत करीब 30 किलोमीटर प्रतिदिन की स्पीड से हाईवे बना रहा है। पहले पोर्ट्स पर शिप का Turnaround Time, 5-6 दिन का होता था। आज वही काम, करीब-करीब 2 दिन से भी कम समय में पूरा हो रहा है। पहले Startup Culture के बारे में चर्चा ही नहीं होती थी। 2014 से पहले, हमारे देश में 400-500 स्टार्ट अप्स ही थे। आज भारत में 2 लाख से ज्यादा रजिस्ट्रर्ड स्टार्ट अप्स हैं। पहले मेडिकल education में सीटें भी सीमित थीं, करीब 50-55 हजार MBBS seats थीं, आज यह बढ़कर सवा लाख से ज्यादा हो चुकी हैं। पहले देश के Banking system से भी करोड़ों लोग बाहर थे। देश में सिर्फ 25 करोड़ के आसपास ही बैंक account थे। वहीं जनधन योजना के माध्यम से 55 करोड़ से ज्यादा बैंक अकाउंट खुले हैं। पहले हमारे देश में airports की संख्या भी 70 से कम थी। आज एयरपोर्ट्स की संख्या भी बढ़कर 160 से ज्यादा हो चुकी है।

साथियों,

पहले भी योजनाएं तो बनती थीं, लेकिन आज फर्क है, आज परिणाम दिखते हैं। पहले गति धीमी थी, आज भारत fastrack पर है। पहले संभावनाएं भी अंधकार में थीं, आज संकल्प सिद्धियों में बदल रहे हैं। इसलिए दुनिया को भी यह संदेश मिल रहा है कि यह नया भारत है। यह अपने विकास के लिए कोई कोर-कसर बाकी नहीं छोड़ रहा है।

साथियों,

आज हमारा प्रयास है कि अतीत में विकास का जो असंतुलन पैदा हो गया था, उसको अवसरों में बदला जाए। अब जैसे हमारा पूर्वी भारत है। हमारा पूर्वी भारत संसाधनों से समृद्ध है, दशकों तक वहां जिन्होंने सरकारें चलाई हैं, उनकी उपेक्षा ने पूर्वी भारत के विकास पर ब्रेक लगा दी थी। अब हालात बदल रहे हैं। जिस असम में कभी गोलियों की आवाज सुनाई देती थी, आज वहां सेमीकंडक्टर यूनिट बन रही है। ओडिशा में सेमीकंडक्टर से लेकर पेट्रोकेमिकल्स तक अनेक नए-नए सेक्टर का विकास हो रहा है। जिस बिहार में 6-7 दशक में गंगा जी पर एक बड़ा पुल बन पाया था एक, उस बिहार में पिछले एक दशक में 5 से ज्यादा नए पुल बनाए गए हैं। यूपी में कभी कट्टा मैन्युफैक्चरिंग की कहानियां कही जाती थीं, आज यूपी, मोबाइल फोन मैन्युफैक्चरिंग में दुनिया में अपनी पहचान बना रहा है।

साथियों,

पूर्वी भारत का एक और बड़ा राज्य पश्चिम बंगाल है। पश्चिम बंगाल, एक समय में भारत के कल्चर, एजुकेशन, इंडस्ट्री और ट्रेड का हब होता था। बीते 11 वर्षों में केंद्र सरकार ने पश्चिम बंगाल के विकास के लिए बड़ी मात्रा में निवेश किया है। लेकिन दुर्भाग्य से, आज वहां एक ऐसी निर्मम सरकार है, जो विकास पर ब्रेक लगाकर बैठी है। TV9 बांग्ला के जो दर्शक हैं, वो जानते हैं कि बंगाल में आयुष्मान योजना पर निर्मम सरकार ने ब्रेक लगाया हुआ है। पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना पर ब्रेक लगाया हुआ है। पीएम आवास योजना पर ब्रेक लगाया हुआ है। चाय बागान श्रमिकों के लिए शुरू हुई योजना के लिए ब्रेक लगाया हुआ है। यानी विकास और जनकल्याण से ज्यादा प्राथमिकता निर्मम सरकार अपने राजनीतिक स्वार्थ को दे रही है।

साथियों,

देश में इस तरह की राजनीति की शुरुआत जिस दल ने की है, वो अपने गुनाहों से बच नहीं सकती और वो पार्टी है - कांग्रेस। कांग्रेस पार्टी की राजनीति का एक ही लक्ष्य रहा है, किसी भी तरह विकास का विरोध और कांग्रेस यह तब से कर रही है, जब मैं गुजरात में था। गुजरात में वर्षों तक जनता ने हमें आशीर्वाद दिया, तो कांग्रेस ने उस जनादेश को स्वीकार नहीं किया। उन्होंने गुजरात की छवि पर सवाल उठाए, उसकी प्रगति को कटघरे में खड़ा किया और जब यही विश्वास पूरे देश में दिखाई दिया, तो कांग्रेस का विरोध भी रीजनल से नेशनल हो गया।

साथियों,

जब राजनीति में विरोध, विकास के विरोध में बदल जाए, जब आलोचना देश की उपलब्धियों पर सवाल उठाने लगे, तब यह सिर्फ सरकार का विरोध नहीं रह जाता, यह देश की प्रगति से असहज होने की मानसिकता बन जाती है। आज कांग्रेस इसी मानसिकता की गुलाम बन चुकी है। आज स्थिति यह है कि देश की हर सफलता पर प्रश्न उठाया जाता है, हर उपलब्धि में कमी खोजी जाती है और हर प्रयास के असफल होने की कामना की जाती है। कोविड के समय, देश ने अपनी वैक्सीन बनाई, तो कांग्रेस ने उस पर भी संदेह जताया। Make in India की बात हुई, तो कहा गया कि यह सफल नहीं होगा, बब्बर शेर कहकर इसका मजाक उड़ाया गया। जब देश में डिजिटल इंडिया अभियान शुरू हुआ, तो उसका मजाक उड़ाया गया। लेकिन हर बार यह कांग्रेस का दुर्भाग्य और देश का सौभाग्य रहा कि भारत ने हर चुनौती को सफलता में बदला। आज भारत दुनिया की सबसे बड़ी वैक्सीनेशन ड्राइव का उदाहरण है। भारत डिजिटल पेमेंट्स में दुनिया का अग्रणी देश है। भारत मैन्युफैक्चरिंग और स्टार्टअप्स में नई ऊंचाइयों को छू रहा है।

साथियों,

लोकतंत्र में विरोध जरूरी होता है। लेकिन विरोध और विद्वेष के बीच एक रेखा होती है। सरकार का विरोध करना लोकतांत्रिक अधिकार है। लेकिन देश को बदनाम करना, यह कांग्रेस की नीयत पर सवाल खड़ा करता है। जब विरोध इस स्तर तक पहुंच जाए कि देश की उपलब्धियां भी असहज करने लगें, तो यह राजनीति नहीं, यह दृष्टिकोण की समस्या है। अभी हमने ग्लोबल AI समिट में भी देखा है। जब पूरी दुनिया भारत में जुटी हुई थी, तो कांग्रेस के लोग कपड़े फाड़ने वहां पहुंच गए थे। इन लोगों को देश की इज्जत की कितनी परवाह है, यह इसी से पता चलता है। इसलिए आज आवश्यकता है कि देशहित को, दलहित से ऊपर रखा जाए क्योंकि अंत में राजनीति से ऊपर, राष्ट्र होता है, राष्ट्र का विकास होता है।

साथियों,

आज का यह दिन भी हमें यही प्रेरणा देता है। आज के ही दिन शहीद भगत सिंह, शहीद राजगुरु और शहीद सुखदेव ने देश के लिए सर्वोच्च बलिदान दिया था। आज ही, समाजवादी आंदोलन के प्रखर आदर्श डॉ. राम मनोहर लोहिया जी की जयंती भी है। यह वो प्रेरणाएं हैं, जिन्होंने देश को हमेशा स्व से ऊपर रखा है। देशहित को सबसे ऊपर रखने की यही प्रेरणा, भारत को विकसित भारत बनाएगी। यही प्रेरणा भारत को आत्मनिर्भर बनाएगी। मुझे पूरा विश्वास है कि टीवी9 की यह समिट भी भारत के आत्मविश्वास और दुनिया के भरोसे पर, भारतीयों पर जो भरोसा है, उस भरोसे को और सशक्त करेगी। आप सभी को मेरी तरफ से बहुत-बहुत शुभकामनाएं हैं और आपके बीच आने का अवसर दिया, आप सबसे मिलने का मौका लिया, इसलिए बहुत-बहुत धन्यवाद!

नमस्‍कार!