भारतात, हा आपल्या पूर्वेकडील राज्यांचा काळ आहे: पंतप्रधान
देशाला नक्षलवादापासून पूर्णपणे मुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे: पंतप्रधान
मागासांना आमचे प्राधान्य, केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी दिली असून शेतीच्या बाबतीत सर्वात मागास 100 जिल्ह्यांमध्ये ती राबवली जाईल : पंतप्रधान

भारत माता की जय !

भारत माता की जय !

भारत माता की जय !

पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपण बाबा सोमोश्वरनाथाच्या चरणी वंदन करीत आहोत आणि संपूर्ण बिहारवासियांचे जीवन सुखमय-शुभ व्हावे, यासाठी त्याने आपल्या सर्वांना आशीर्वाद द्यावेत, अशी प्रार्थना करीत आहोत.

बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान जी, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नीतीश कुमार जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी जीतनराम मांझी, गिरीरीज सिंह, ललन सिंह, चिराग पासवान, रामनाथ ठाकूर, नित्यानंद राय, सतीश चंद्र दुबे, राज भूषण चौधरी, बिहारचे उप-मुख्यमंत्री सम्राट चौधरी, विजय सिन्हा,  संसदेतील माझे सहकारी- बिहारचे ज्येष्ठ नेते उपेन्द्र कुशवाह, बिहार भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दिलीप जैसवाल, उपस्थित मंत्रीवर्ग, लोक प्रतिनिधी तसेच बिहारच्या माझ्या बंधू आणि भगिनींनो !

राधा मोहन सिंह मला नेहमीच चंपारणला येण्याची संधी देत आले आहेत. ही भूमी चंपारणची भूमी आहे. या भूमीमध्ये इतिहास घडला आहे. स्वातंत्र्य संग्रामातील आंदोलनाच्या काळामध्ये या भूमीनेच गांधीजींना एक  नवीन दिशा दाखवली. आता या भूमीच्या प्रेरणेतून बिहारचे नवीन भविष्य बनवले जाईल.

आज इथून 7 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले त्याचबरोबर काही प्रकल्पांची आधारशिला  ठेवण्यात आली आहे. तुमच्यासाठी बनवण्यात आलेल्या आणि येत असलेल्या या सर्व प्रकल्पांबद्दल मी आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो. इथे एक नवयुवक पूर्ण राम मंदिर  प्रतिकृती  बनवून घेवून आला आहे. किती भव्य, मोठे काम केले आहे. मला मंदिर प्रतिकृती भेट देण्याची या युवकाची इच्छा असावी, हो ना? असे असेल तर, माझ्या ‘एसपीजी‘च्या लोकांना सांगू इच्छितो की, तुम्ही त्या युवकाचे नाव आणि पत्ता खालच्या बाजूला जरूर लिहून घ्यावे. बंधू, मी तुमच्याबरोबर पत्राव्दारे संपर्क साधेन. ही कलाकृती तुम्ही बनवली आहे का? बरं, माझे ‘एसपीजी‘चे लोक तिथे येतील, त्यांच्याकडे ती देणे. तुम्हाला माझे पत्र नक्की मिळेल. मी आपला खूप खूप आभारी आहे. ज्याठिकाणी सीतामातेचे नित्य, निरंतर स्मरण केले जाते, तिथेच तुमच्याकडून मला अयोध्येच्या भव्य मंदिराची कलाकृती भेट देत आहात.  त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे.

मित्रांनो,

21 व्या शतकामध्ये अवघे जग खूप वेगाने पुढे जात आहे. एकेकाळी अशी शक्ती-ताकद पाश्चिमात्य देशांकडे होती, त्याप्रमाणे आता पूर्वेकडील देशांचा दबदबा वाढत आहे. भागीदारी वाढत आहे. पूर्वेकडील देश आता विकास घडविण्यासाठी नव्या दमाने, वेगाने पुढे जात आहेत. ज्याप्रमाणे विश्वामध्ये पूर्वेकडील देश विकासाच्या स्पर्धेमध्ये पुढे जात आहेत, त्याचप्रमाणे भारतामध्ये पूर्वेकडील राज्यांचा विकास वेगाने हेात आहे. आमचा संकल्प आहे की, आगामी काळामध्ये ज्याप्रमाणे पश्चिमेकडील भारतामध्ये मुंबई शहर आहे, तसेच पूर्वेकडील राज्यांमध्ये मोतीहारीचे नाव व्हावे. ज्याप्रमाणे ग्रुरूग्रामला संधी मिळत गेल्या, त्याचप्रमाणे तशाच संधी गयेमध्ये निर्माण  व्हाव्यात. पुणे शहराचा ज्याप्रमाणे औद्योगिक विकास झाला, तसाच विकास इथल्या शहरांचाही व्हावा. सूरतप्रमाणे संथाल परगणाही विकसित व्हावा, जयपूरप्रमाणे जलपाईगुडी आणि जाजपूर ही शहरे पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र बनून त्यांनी नवीन विक्रम स्थापित करावा. बंगलुरूप्रमाणे बीरभूमच्या लोकांनाही विकासाच्या मार्गावरून पुढे जाता यावे.

बंधू आणि भगिनींनो,

पूर्व भारताला पुढे नेण्यासाठी आपल्याला  बिहारला विकसित बिहार बनवायचे आहे. आज बिहारमध्ये इतक्या वेगाने कामे होत आहेत, प्रकल्प पूर्ण होत आहेत. याचे कारण म्हणजे केंद्र आणि राज्यामध्ये बिहारसाठी काम करणारे सरकार आहे. आपल्याला मी एक आकडा सांगतो. ज्यावेळी केंद्रामध्ये कॉंग्रेस आणि आरजेडी यांचे सरकार होते, त्यावेळी यूपीएच्या 10 वर्षांच्या कालखंडामध्ये बिहारला फक्त दोन लाख कोटी रूपयांच्या आसपास निधी मिळाला होता. 10 वर्षांमध्ये जवळपास फक्त  दोन लाख कोटी रूपये म्हणजे नीतीश जी यांच्या सरकारचा बदला घेत होते, याचा एक अर्थ  म्हणजे  ते लोक बिहारचा बदला घेत होते. 2014 मध्ये केंद्रामध्ये तुम्ही लोकांना मला सेवा करण्याची संधी दिली. केंद्रामध्ये आल्यानंतर मी बिहारचा बदला घेणारी, राजकारणाची जुनी पद्धती संपुष्टात आणली. गेल्या 10 वर्षांमध्ये, म्हणजे एनडीएच्या 10 वर्षांच्या कार्यकाळामध्ये बिहारच्या विकासासाठी जो निधी दिला गेला आहे, तो निधी पहिल्यापेक्षा कितीतरी  पट जास्त आहे, त्याचा आकडा आत्ताच आपले सम्राट चौधरी सांगत होते. इतके लाख कोटी रूपये केंद्राने बिहारला दिले आहेत.

मित्रांनो,

याचा अर्थ कॉंगेस आणि आरजेडी यांच्या तुलनेमध्ये अनेकपट जास्त निधी बिहारला आमच्या सरकारने दिला आहे. हा पैसा बिहारच्या लोकांच्या कल्याणासाठी वापरला जात आहे. हा पैसा इथल्या  विकास प्रकल्पांच्या कामासाठी वापरला जात आहे.

मित्रांनो,

आजच्या पिढीने हे जाणून घेणे गरजेचे आहे की, बिहार राज्य दोन दशकांपूर्वी कशा प्रकारे निराशाग्रस्त झाले होते. आरजेडी आणि कॉंग्रेस यांच्या कार्यकाळामध्ये बिहारच्या विकासाला ब्रेक लागला होता. गरीबांचा पैसा गरीबांपर्यंत पोहोचणेही अशक्य झाले होते. त्यावेळी  जे शासन करीत होते, ती मंडळी गरीबांच्या हक्काचा पैसा कसा लुटायचा याचाच फक्त विचार करीत होते. परंतु बिहारची भूमीही अशक्य गोष्टी शक्य करून दाखविणा-या वीरांची भूमी आहे. ही भूमी परिश्रम करणा-यांची आहे. तुम्ही लोकांनी या भूमीला आरजेडी आणि कॉंग्रेसच्या जोखडातून मुक्त केले. जी गोष्ट अशक्य होती,  ती शक्य करून दाखवली. त्याचाच परिणाम म्हणजे, आज बिहारमध्ये गरीब-कल्याणाचा योजना थेट गरीबांपर्यंत पोहोचत आहे. गेल्या 11 वर्षांमध्ये पीएम घरकुल योजने अंतर्गत देशातील गरीबांसाठी 4 कोटींपेक्षा जास्त घरकुले बनविण्यात आली. त्यापैकी जवळपास 60 लाख घरकुले एकट्या बिहारमधल्या गरीबांसाठी बनविण्यात आली आहेत. याचा अर्थ, जगातल्या नॉर्वे, न्यूजीलंड आणि सिंगापूर या देशांची मिळून जितकी लोकसंख्या आहे, त्यापेक्षाही जास्त लोकांसाठी आम्ही एकट्या बिहारमध्ये गरीबांना पक्की घरे दिली आहेत. बिहारच्या पुढे जावून मी आणखी सांगू इच्छितो की, आपल्या एकट्या मोतीहारी जिल्ह्यामध्ये जवळपास 3 लाख गरीब कुटुंबांना पक्की घरे मिळाली आहेत. आणि हा आकडा सातत्याने आणि वेगाने वाढत आहे. आजही इथे 12 हजार पेक्षा जास्त कुटुंबांना आपल्या पक्क्या घरामध्ये गृह प्रवेश करण्याचे सद्भाग्य मिळाले आहे.

पक्के घर बांधण्यासाठी 40 हजाराहून जास्त गरिबांना थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यात आले आहेत. यामध्ये बहुतेक लोक माझे दलित बंधुभगिनी आहेत, माझे महादलित बंधुभगिनी आहेत. तुम्हालाही माहिती आहे कि राजद आणि काँग्रेसच्या राज्यात तुम्हाला अशी पक्की घरे मिळणे अशक्य होते. ज्या राजद च्या राज्यात तुम्ही घरांना साधा रंग देखील लावलात तर घरमालकाला जीवास मुकावे लागण्याची भीती होती, अशा राजद चे लोक तुम्हाला पक्की घरे देणार होते का ?

मित्रांनो,

आज बिहारची जी प्रगती सुरु आहे त्यामागे बिहारच्या माताभगिनींची ताकद सर्वात मोठी आहे. आणि आज मी पाहत होतो, कि लाखो भगिनी आम्हाला आशीर्वाद देत होत्या. हे दृश्य आमच्या मनाला भिडून गेले. एनडीए ने उचललेल्या प्रत्येक पावलाचे महत्व बिहारच्या माताभगिनींना , इथल्या महिलांना पूर्णपणे पटले आहे. इथे इतक्या मोठ्या संख्येने माता भगिनी आल्या आहेत, आपल्याला आठवते का, जेव्हा तुम्हाला तुमच्याकडचे दहा रुपये देखील लपवून ठेवायला लागत होते कारण बँकांमध्ये खाते नव्हते, बँकेत प्रवेश देखील नव्हता. गरिबांचा स्वाभिमान कसा असतो हे मोदीला माहिती आहे. मोदीने बँकांना म्हटलं, कि गरिबांसाठी आपली दारे खुली का करत नाही? त्यानंतर आम्ही मोठे अभियान सुरु करून जनधन खाती उघडली. माझ्या गरीब कुटुंबांमधील महिलांना याचा सर्वात जास्त लाभ झाला. बिहारमध्येही सुमारे साडेतीन कोटी महिलांची जनधन खाती उघडली गेली. यानंतर आम्ही सरकारी योजनांचे पैसे याच खात्यांमध्ये थेट पाठवायला सुरुवात केली. काही दिवसांपूर्वीच माझे मित्र नितीश यांनी घोषणा केली, कि वृद्ध, दिव्यांग आणि विधवा मातांना मिळणाऱ्या पेन्शनची रक्कम दरमहा 400 रुपयांवरून वाढवून आता 1100 रुपये केली जात आहे. हे पैसे थेट तुमच्याच  बँक खात्यात जाणार आहेत. गेल्या दीड महिन्यातच बिहारच्या 24 हजाराहून जास्त स्वयंसाहाय्य्यता गटांसाठी 1000 कोटी रुपयांहून अधिक मदत पाठवली गेली आहे. माताभगिनींच्या जनधन खात्यांच्या ताकदीमुळेच हे आज शक्य झालं आहे.

मित्रांनो,

महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांचे जबरदस्त परिणाम आता दिसत आहेत. देशात , बिहारमध्ये लखपती दीदी ची संख्या सतत वाढत आहे. देशभरात आम्ही 3 कोटी भगिनींना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आपल्या बिहारमध्येच 20 लाखाहून जास्त लखपती दीदी तयार झाल्या आहेत. आपल्या चंपारण मधेही 80 हजारहून जास्त महिला स्वयंसाहाय्य्यता गटाच्या सदस्य बनल्यामुळे लखपती दीदी झाल्या आहेत.

मित्रांनो,

आज इथे 400 कोटी रुपयांचा सामुदायिक गुंतवणूक निधी जारी केला गेला आहे. महिलांची शक्ती वाढवण्यासाठीच  हा पैसा कामी येणार आहे. इथे नितीशजींनी चालू केलेल्या जीविका दीदी योजनेमुळे बिहारच्या लाखो महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचा मार्ग दाखवला आहे.

मित्रांनो,

भाजप आणि एनडीए चे व्हिजन आहे – ‘बिहार प्रगती करेल तेव्हाच देशाची प्रगती होईल’. बिहारची प्रगती तेव्हाच होईल, जेव्हा बिहारचा युवक प्रगती करेल. आमचा संकल्प आहे, आमचा संकल्प आहे, - ‘समृद्ध बिहार , प्रत्येक युवकाला रोजगार’ ! बिहारच्या तरुणांना बिहारमध्येच रोजगार मिळावा यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये इथे वेगाने कामे झाली आहेत. नितीशजी च्या सरकारने लाखो तरुणांना पूर्ण पारदर्शक पद्धतीने सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत. नितीशजींनी बिहारच्या तरुणांच्या रोजगारासाठी नवीन निश्चय केले आहेत, आणि केंद्र सरकार त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना साथ देत आहे.

मित्रांनो,

काही दिवसांपूर्वीच सरकारने एका नवीन योजनेला मंजुरी दिली आहे. या योजने अंतर्गत खाजगी कंपनीत पहिल्यांदाच नोकरी मिळवणाऱ्या , पहिली संधी मिळवणाऱ्या तरुणाला केंद्र सरकारतर्फे 15 हजार रुपये मिळतील. काही दिवसांनी 1 ऑगस्टपासूनच ही योजना लागू होणार आहे. यावर केंद्र सरकार एक लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. नवीन तरुणांना नवा रोजगार. याचा खूप मोठा लाभ बिहारच्या तरुणांना देखील होणार आहे.

मित्रांनो,

बिहारमध्ये स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी मुद्रा योजनेसारख्या मोहिमांना अधिक गती दिली जात आहे. गेल्या दोन महिन्यातच बिहारमध्ये मुद्रा योजने अंतर्गत लाखो कर्जे दिली गेली आहेत. इथल्या चंपारण च्या 60 हजार तरुणांना स्वयंरोजगारासाठी मुद्रा कर्जे दिली गेली आहेत.

मित्रांनो,

राजदचे लोक रोजगाराची आमिषे दाखवून तुमच्या जमिनींवर कब्जा करत होते, ते तुम्हाला कधीच रोजगार देऊ शकणार नाहीत. एकीकडे कंदीलाच्या राज्यातील बिहार होता  आणि दुसरीकडे हा नवीन आशेच्या प्रकाशातील बिहार आहे. हा प्रवास बिहारने एनडीए च्या साथीने चालून पूर्ण केला आहे. म्हणूनच , ‘बिहारचा संकल्प अटल , एनडीए च्या साथीने सतत’ !

मित्रांनो,

गेल्या काही वर्षांत बिहारमधील नक्षलवादावर जो प्रहार झाला आहे, त्याचा मोठा  लाभ बिहारच्या युवकांना झाला आहे. चंपारण, औरंगाबाद, गयाजी,जमुई सारख्या अनेक जिल्ह्यांना वर्षानुवर्षे मागासलेले ठेवणाऱ्या माओवादाचे आता दिवस भरले आहेत. ज्या भागावर आधी माओवादाचे काळे सावट होते, आज तिथले तरुण मोठी स्वप्ने पाहत आहेत. भारताला नक्षलवादातून पूर्णपणे मुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे.

ले आहेत. यामध्ये बहुतेक लोक माझे दलित बंधुभगिनी आहेत, माझे महादलित बंधुभगिनी आहेत. तुम्हालाही माहिती आहे कि राजद आणि काँग्रेसच्या राज्यात तुम्हाला अशी पक्की घरे मिळणे अशक्य होते. ज्या राजद च्या राज्यात तुम्ही घरांना साधा रंग देखील लावलात तर घरमालकाला जीवास मुकावे लागण्याची भीती होती, अशा राजद चे लोक तुम्हाला पक्की घरे देणार होते का ?

सहकाऱ्यांनो,

हा नवा भारत आहे, भारत मातेच्या शत्रूंना शिक्षा देण्यासाठी आकाशपाताळ एक करणारा भारत देश आहे. बिहारच्या याच भूमीवर मी ऑपरेशन सिंदूरचा संकल्प केला होता आणि त्याच्या यशाने साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

मित्रांनो,

बिहारकडे ना क्षमतेची कमतरता आहे ना संसाधनांची. बिहारची हीच संसाधने आज बिहारच्या प्रगतीचे माध्यम झाली आहेत. एनडीए सरकारच्या प्रयत्नांनंतर मखान्याच्या किंमतीत वृद्धी झाली आहे, याकडे आपण पहा. कारण, आम्ही इथल्या मखाना शेतकऱ्यांना मोठ्या बाजारपेठेशी जोडले. आम्ही मखाना बोर्ड स्थापन करतो आहोत. इथे केळी, लीची, मरचा तांदूळ, कटारनी तांदूळ, जरदाळू आंबा, मघई पान अशी कितीतरी उत्पादने इथे आहेत, जी बिहारच्या शेतकऱ्यांना, तरूणांना जगभरातल्या बाजारपेठेशी जोडतील.

भावांनो, बहिणींनो,

शेतकऱ्यांचे उत्पादन आणि त्यांचे उत्पन्न वृद्धी करणे याला आमचे प्राधान्य आहे. पीएम-किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना सुमारे साडेतीन लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. इथे एकट्या मोतीहारीमध्येच पाच लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दीड हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे.

मित्रांनो,

आम्ही ना केवळ घोषणांमध्ये अडकतो, ना आश्वासनांपर्यंत आम्ही मर्यादीत राहिलो नाही, तर आम्ही काम करून दाखवतो. आम्ही जेव्हा म्हणतो की, मागासवर्गीय आणि अतिमागासावर्गीय सातत्याने काम करतो आहोत, ते आमच्या धोरणांमध्ये आणि निर्णयांमध्येही दिसून येते. एनडीए सरकारचे ध्येयही हेच आहे की- प्रत्येक मागासवर्गीयाला प्राधान्य! प्रत्येक मागासवर्गीयाला प्राधान्य! मागासलेला प्रदेश असो किंवा मागासवर्गीय असो, ते आमच्या सरकारसाठी प्रथम प्राधान्य आहे. देशातले110 हून अधिक जिल्हे दशकांपासून मागासलेले म्हणून मागे पडले आहेत, ते आणि त्यांचे नशीब अशी त्यांची अवस्था करून टाकली होती. आम्ही या जिल्ह्यांना प्राधान्य दिले, आणि आम्ही नावेच ना ही तर व्याख्याच बदलून टाकली, ते शेवटचे नव्हे तर देशाचे पहिले गाव होते. म्हणजेच मागासांना प्राधान्य. आपला ओबीसी समाज दशकांपासून ओबीसी कमिशनला संवैधानिक दर्जा देण्याची मागणी करत होता. हे कामही आमच्या सरकारने केले. आपल्या आदिवासी समाजातही जे सर्वात मागासवर्गीय होते, त्यांच्यासाठी सरकारने जनमन योजना सुरू केली, आता त्यांच्या विकासासाठी २५ हजार कोटी रूपये खर्च केले जात आहेत. म्हणूनच मी म्हणतो ना - जो मागासलेला आहे त्यांना आमचे प्राधान्य आहे. आता याच भावनेतून आणखी एक खूप मोठी योजना सुरू केली जाणार आहे. दोन दिवस आधीच केंद्रीय मंत्रीमंडळाने प्रधान मंत्री धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत, शेतीशी निगडीत सर्वात मागसलेले 100 जिल्हे आकांक्षित केले जातील. शेतीशी निगडीत अनेक शक्यता असलेले हे जिल्हे आहेत, परंतु शेती उत्पादन आणि शेतकरी उत्पन्न या बाबतीत हे जिल्हे अजूनही मागास आहेत.  या योजनेअंतर्गत या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. म्हणजेच देशातील सुमारे पावणे दोन कोटी शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होणार आहे. यामध्ये खूप मोठ्या संख्येने बिहारमधील माझे शेतकरी बंधू आणि भगिनी असतील.

मित्रांनो,

आज, इथे रेल्वे आणि रस्ते यांच्याशी निगडीत हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. या प्रकल्पांमुळे बिहारच्या लोकांची मोठी सोय होईल. देशातील विविध मार्गांवर अमृत भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. अमृत भारत एक्स्प्रेस आता मोतीहारी- बापूधाम ते दिल्ली आनंद-विहार पर्यंत थेट धावणार आहे. दरभंगा-नरकटियागंज रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण झाल्याने या मार्गावरील प्रवाशांची मोठीच सुविधा होणार आहे.

मित्रांनो,

आपल्या श्रद्धा आणि संस्कृतीशी चंपारणचा प्रदेश जोडला गेला आहे. राम-जानकी पथ हा मोतीहारीच्या सत्तरघाट, केसरिया, चकिया, मधुबन इथून पार जाणार आहे. सीतामढी ते अयोध्या या नवीन रेल्वे मार्गामुळे भाविकांना चंपारणहून अयोध्येला जाऊन दर्शन घेणे शक्य होते. या सर्व प्रयत्नांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे बिहारचे संपर्कजाळे सुधारेल आणि इथे नव्या रोजगाराच्या संधीही निर्माण होतील.

मित्रांनो, काँग्रेस आणि आरजेडी गरीब, दलित, मागासवर्गीय आणि आदिवासी यांच्या नावावर राजकारण करत आली आहे. मात्र समानतेचे अधिकार सोडाच पण कुटुंबाबाहेरील लोकांना साधा आदरसन्मानही देत नाहीत. या लोकांचा अहंकार संपूर्ण बिहार पाहात आहे. यांच्या वाईट हेतूंपासून बिहारला वाचवायचे आहे. नीतिशकुमार यांच्या गटाने, भाजपाच्या गटाने आणि संपूर्ण एनडीएने इतकी वर्ष कठोर परिश्रम केले आहेत, श्री. चंद्र मोहन राय जी सारख्या महान व्यक्तिमत्वाने आम्हाला मार्गदर्शन दिले आहे. आपणा सर्वांना एकत्रितपणे बिहारच्या सोनेरी भविष्याकडे वाटचाल करायची आहे. आपल्याला संकल्प घ्यायचा आहे - पुन्हा उभारू नवा बिहार, पुन्हा एकदा एनडीए सरकार!(बनाएंगे नया बिहार, फिर एक बार NDA सरकार! ) त्याचबरोबर, मी पुन्हा एकदा आजच्या प्रकल्पांसाठी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. दोन्ही हात वर करत पूर्ण शक्तिनिशी माझ्याबरोबर म्हणा,

भारत माता की जय।

भारत माता की जय।

भारत माता की जय।

खूप खूप आभार.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Republic Day sales see fastest growth in five years on GST cuts, wedding demand

Media Coverage

Republic Day sales see fastest growth in five years on GST cuts, wedding demand
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 27 जानेवारी 2026
January 27, 2026

India Rising: Historic EU Ties, Modern Infrastructure, and Empowered Citizens Mark PM Modi's Vision