In the Information era, first-mover does not matter, the best-mover does : PM
It is time for tech-solutions that are Designed in India but Deployed for the World :PM

नमस्ते

माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी श्री रवीशंकर प्रसादजी, कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री बी एस येडीयुरप्पाजी आणि तंत्रज्ञान जगतातील माझ्या प्रिय मित्रांनो. तंत्रज्ञानावरील महत्त्वपूर्ण शिखर परिषद आयोजित करण्यात तंत्रज्ञान मदत करत आहे हे देखील योग्य आहे.

 

मित्रहो,

5 वर्षांपूर्वी आपण डिजिटल इंडिया मोहिमेला प्रारंभ केला होता. आज, मला सांगण्यास आनंद वाटतो की,  यापुढे डिजीटल इंडियाला कोणताही एखादा सरकारी उपक्रम म्हणून पाहिले जात नाही. विशेषतः गरिबांसाठी, उपेक्षित आणि सरकारमधील लोकांसाठी डिजिटल इंडिया ही आता लोकांची जीवनशैली बनली आहे, असे म्हणता येईल. आपल्या देशाने विकासाबाबत  अधिक मानव केंद्रित दृष्टिकोन ठेवला आहे, यासाठी डिजिटल इंडियाचे आभार. तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केल्यामुळे आपल्या नागरिकांच्या जीवनात अनेक बदल घडून आले आहेत. त्याचे फायदे सर्वांनाच दिसत आहेत.

आपल्या सरकारने डिजिटल आणि तंत्रज्ञान उपायांसाठी, यशस्वीरित्या  बाजारपेठ तयार केली आहे, मात्र सर्व योजनांचा एक भाग म्हणून तंत्रज्ञानाचा वापर झाला आहे.   तंत्रज्ञान प्रथम  हे  शासकीय पद्धतीचे मॉडेल असून ते   महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, आपण मानवी सन्मान वाढविला आहे. हजारो शेतकऱ्यांना एका क्लिकवर आर्थिक सहाय्य उपलब्ध झाले आहे. कोविड – 19 महामारी मुळे आलेल्या टाळेबंदीच्या  काळात, ज्यामुळे भारतातील गरीबांना योग्य आणि तातडीचे सहाय्य मिळाले आहे की नाही, हे सुनिश्चित   तंत्रज्ञानच करीत होते. अशा प्रकारे तंत्रज्ञानाच्या सहाय्यानें  मदत दिल्याची उदाहरणे अभावाने आढळतील.   भारत जर आयुष्मान भारत, ही जगातील सर्वांत मोठी आरोग्य योजना, हाताळत असेल, तर हे केवळ तंत्रज्ञानाच्या महत्त्वाच्या भूमिकेमुळेच शक्य आहे. विशेषतः भारतातील गरीबांना या योजनेने अधिक सहाय्य केले आहे. आता, यापुढे त्यांना भारताच्या कोणत्याही भागात उच्च दर्जाची परवडणारी आरोग्य सेवा मिळण्याची चिंता करण्याची गरज नाही.

उत्तम सेवा वितरण आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी आपल्या सरकारने माहिती विश्लेषणाचा उत्तम वापर करून घेतला आहे. भारतात 25 वर्षांपूर्वी इंटरनेट दाखल झाले आहे.  750 दशलक्ष जोडण्यांपेक्षा अधिक इंटरनेट जोडण्यांचा टप्पा अलिकडेच पार झाला आहे असे एका अहवालात म्हटले आहे. मात्र, आपण एक गोष्ट जाणता का, की, यातील अर्ध्याहून अधिक जोडण्या  गेल्या चार वर्षांत झाल्या आहेत ?  आपल्या योजना शासकीय  फायलींच्या बाहेर गेल्या आहेत, याचे एकमेव कारण तंत्रज्ञान हेच आहे  त्यामुळे नागरिकांचे आयुष्य अधिक गतिमान आणि दर्जेदार झाले  आहे. आज, आपण गरीबांना त्यांचे घर एका उत्तम  दर्जाचे, वेगाने आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देऊ शकतो, यासाठी देखील तंत्रज्ञानाची  मदत होत आहे. आज, जेव्हा आपण अगदी प्रत्येक  घरात, वीज पुरवठा करू शकत आहोत, यामध्ये देखील तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे. आज, जेव्हा आपण टोलनाके वेगाने ओलांडून पुढे जाऊ शकत आहोत, हे देखील तंत्रज्ञानामुळेच आहे. आज, तंत्रज्ञानच आहे, ज्याने आपल्याला आत्मविश्वास दिला आहे की आपण कमी काळात आपली मोठ्या  लोकसंख्येपर्यंत ते पोहोचवू शकतो.

 

मित्रहो,

तंत्रज्ञानाचा विचार केला तर पुढे जाण्याचा मार्ग शिकणे आणि एकत्र विकसित होणे  हेच योग्य आहे. या दृष्टिकोनातून प्रेरणा घेऊन, भारतात अनेक इन्क्युबेशन  केंद्र सुरू होत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये, भारतात हॅकथॉनची एक मोठी संस्कृती उदयास आली आहे. त्यापैकी काहींमध्ये मी सहभागी झालो आहे. आपल्याकडील तरूण मने एकत्र येतात आणि देशातील आणि या ग्रहावरील प्रमुख आव्हाने सोडविण्याचा मार्गांचा विचार करतात. सिंगापूर आणि आसियान (ASEAN) देशांच्या सहकार्याने अशीच हॅकथॉनसाठी  भागीदारी करण्यासही मदत केली आहे. यशस्वी होत असलेल्या देशातला स्टार्ट-अप समुदायाला, ज्यांचे कौशल्य आणि यश आता जगविख्यात आहे, त्यांना भारत सरकार आधार देत आहे.

 

मित्रहो,

आपण बरेचदा ऐकले आहे की :  प्रतिकूल वातावरणात प्रतिभेला धुमारे फुटतात. लोकांमधील उत्तम गोष्टी आव्हानांमधूनच पुढे येतात. कदाचित हे भारतातील बऱ्याच  तंत्रज्ञाना लागू आहे.  जेव्हा ग्राहकांकडून मागणी असेल किंवा मुदतीत काम पूर्ण करण्याचा दबाव असेल, तेव्हा आपण पाहिलेच असेल, की, काही प्रतिभा, ज्यांची आपल्याला कधीच निव्वळ कल्पना देखील नसते, अशा बाहेर येऊ लागतात. जागतिक टाळेबंदी, प्रवासावरील निर्बंध यामुळे लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणापासून दूर आपापल्या घरांमध्येच राहणे बंधनकारक होते. अशा काळात, आमच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्राची लवचिकता दिसून आली. आपल्या तंत्रज्ञान क्षेत्राने एक पाऊन पुढे टाकले आणि घरातून आणि असाल त्या ठिकाणाहून (कोठूनही) कार्य चालू ठेवण्यासाठीचा तंत्रज्ञानाचा उपाय वापरला. लोकांना एकत्र आणण्याची एक मोठी संधी तंत्रज्ञान उद्योगाने उपलब्ध करून दिली.

 

कोविड – 19 महामारीचा काळ हा आपल्या मार्गातला एक अडथळा होता, ना की आपल्या मार्गाचा शेवट – !   तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे प्रमाण केवळ काही महिन्यांमध्ये घडले ते  दशकात झाले नव्हते. ज्या ठिकाणी असालअसाल तेथून काम करणे हे सर्वसामान्य झाले असून आता हेच कायम राहणार आहे. शिक्षण, आरोग्य, खरेदी आणि अशा अनेक क्षेत्रांमध्ये आता तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे आपण पाहणार आहोत. तरीही, मला तंत्रज्ञान जगतातील हुशार  लोकांमध्ये वावरण्याची संधी असल्याने मला आत्मविश्वासाने सांगायचे आहे. आपल्या प्रयत्नांबद्दल धन्यवाद, आम्ही भौतिक – डिजिटल अभिसरण अखंडित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून वापरकर्त्याचे अनुभव निश्चित उत्कृष्ट बनवू शकतो. आपण निश्चितच तंत्रज्ञानाची साधने ही वापरकर्त्यांसाठी अधिकाधिक अनुकूल अशी तयार करू शकतो.

 

मित्रहो,

औद्योगिक युगाची प्रगती आता मागच्या टप्प्यात आहे आणि आता आपण माहितीच्या युगात मध्यभागी आहोत. भविष्य अपेक्षेपेक्षा लवकर येत आहे, आपण पूर्वीच्या युगाची विचारसरणी आता पटकन मागे सोडली पाहिजे. औद्योगिक युगात बदल एकरेषीय होता परंतु, माहितीच्या युगात बदल विघटनकारी आणि मोठा आहे. औद्योगिक युगात वेगाने पुढे जाण्याचा फायदा हा प्रत्येक गोष्टीत होता. माहितीच्या युगात  महत्व  प्रथम  पुढे जाण्याला  नाही मात्र उत्तम पद्धतीने पुढे जाणाऱ्याला आहे. बाजारपेठेतील सर्व विद्यमान समीकरणे विस्कळीत करणारी कोणतीही वस्तू कधीही कोणालाही तयार करता येते.

औद्योगिक क्षेत्रात सीमारेषांचे बंधन आहे. मात्र माहितीचे युग हे सीमांपलिकडे आहे. औद्योगिक क्षेत्रात कच्च्या मालाचा माध्यम म्हणून वापर करणे हे मोठे आव्हान होते आणि केवळ काही मोजक्याच व्यक्तींना ते करण्याची मुभा होती. माहितीच्या क्षेत्रामध्ये कच्चा माल म्हणजे अर्थातच माहिती ही आपल्यासमोर सगळीकडे उपलब्ध आहे, आणि प्रत्येकाला त्याची उपलब्धता अगदी सहज आहे. एक देश म्हणून भारत एका अद्वितीय स्थितीत माहिती युगाच्या दिशेने झेपावण्यास सज्ज आहे. आपल्याकडे सर्वोत्तम बुद्धिमत्ता आणि सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. आपल्या स्थानिक तंत्रज्ञान उपायांमध्ये जागतिक पातळीवर जाण्याची क्षमता आहे. भारत आता एका उत्तम स्थानावर आहे. आता अशा तंत्रज्ञान उपायांची वेळ आलेली आहे, जी भारतात तयार झाली आहेत मात्र जगभरासाठी वापरासाठी उपलब्ध आहेत.

 

मित्रहो,

आपले धोरणात्मक निर्णय नेहमीच तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उद्योगांचे उदारीकरण करण्याच्या उद्देशाने असतात. अलिकडेच तुम्ही कदाचित ऐकले असेल, आपण आयटी उद्योगातील अनुपालनाचे ओझे वेगवेगळ्या प्रकारे कमी केले आहे. त्याखेरीज सरकार तंत्रज्ञान उद्योगातील हितधारकांना सहभागी करून घेण्याचा  आणि भारतासाठी सुरक्षित भविष्यातील धोरण आराखडा तयार करण्याचा नेहमीच प्रयत्न करते.  तुम्ही सगळेजण हे उद्योग क्षेत्र चालविणारे आहा त. आम्ही आमचे उत्पादनस्तरीय नवकल्पना पुढील स्तरावर नेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करू शकतो?  एका योजनाबद्ध आखणीच्या मानसिकतेत वैविध्यपूर्ण  यशस्वी उत्पादनांची परिसंस्था  तयार करण्याची क्षमता असते.

यूपीआय हे अशाच योजनाबद्ध आखणीतून तयार झालेले एक उत्तम उदाहरण आहे, पारंपरिक उत्पादनस्तरीय विचारांचा अर्थ असा आहे की आम्ही फक्त डिजिटल पेमेंट उत्पादन घेऊन आलो आहोत. त्याऐवजी, आपण भारताने, यूपीआय सारखे एकच व्यासपीठ निर्माण केले आहे, जिथे प्रत्येकजण आपापले डिजिटल माध्यमातील उत्पादनाचे पेमेंट आणि प्लग-इन डिजिटल पेमेंट करू शकेल. यामुळे अनेक उत्पादनांचे सक्षमीकरण झाले आहेत. मागील महिन्यात 2 अब्जापेक्षा अधिक व्यवहारांची नोंद करण्यात आली आहे. आम्ही राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मोहिमेत असेच काही करत आहोत. आपल्यापैकी काहीजणांनी स्वामित्व (SVAMITVA)  योजनेबद्दल ऐकले असेल. आपल्या ग्रामीण भागातील कोट्यवधी लोकांनी जमीनीचे अधिकार देण्याची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. ड्रोनसारख्या तंत्रज्ञानामुळे देखील हे करणे  शक्य होणार आहे. हे केवळ अनेक विवाद संपविणार नाही तर लोकांना सक्षम बनविणार आहे. एकदा मालमत्तेचे हक्क दिले की तंत्रज्ञानाची साधने समृद्धीची खात्री देऊ शकतात.

 

मित्रहो,

तंत्रज्ञानाच्या विकासामुळे सरंक्षण क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. पूर्वी चांगले हत्ती, आणि घोडे कोणाकडे आहेत, यावरून युद्ध निर्धारित केले जात होते. त्यानंतर आगीचे युग (फायर पॉवर) आले. आता, जागतिक पातळीवरील संघर्षामध्ये तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सॉफ्टवेअरपासून यूएव्ही आणि ड्रोनपर्यंत तंत्रज्ञान  आता संरक्षण क्षेत्राची नव्याने व्याख्या करीत आहे.

 

मित्रहो,

तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये जलद वाढ होत असल्याने माहिती संरक्षण आणि सायबर सुरक्षा आता खूप महत्त्वाची झाली आहे. आपले तरूण व्यापक स्वरूपातील सायबर सुरक्षा उपाययोजनासाठी खूप मोठ्या प्रमाणात भूमिका बजावू शकतात. हे उपाय सायबर हल्ले आणि व्हायरसपासून डिजिटल उत्पादनांची प्रभावीपणे संरक्षण करू शकतात. आज आपली फिन्टेक  इन्डस्ट्री खूप चांगले काम करीत  आहे. कोट्यवधी लोक कोणत्याही संकोचाशिवाय व्यवहार करू शकत आहेत. हे लोकांच्या विश्वासामुळे शक्य आहे,  सुरक्षित आणि स्थिर राहणे खूप महत्त्वाचे आहे. योजनाबद्ध आखणी असलेली शासकीय सांख्यिकिय माहिती हे देखील आपले प्राधान्याने करण्याचे काम आहे.

 

मित्रहो,

एकीकडे आज मी माहिती तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केले आहे, विशेषतः विज्ञान क्षेत्रात नवकल्पना आवश्यक आहेत. जैवविज्ञान असो वा अभियांत्रिकी, यामध्ये संशोधन आणि नाविन्यपूर्ण गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जेव्हा नाविन्याचा विचार केला जाईल, तेव्हा भारताकडे एक स्पष्ट शस्त्र आहे, जे आहे आपल्या तरूणांची प्रतिभा आणि त्यांच्यातील नाविन्यतेची आवड.

 

मित्रहो,

आपल्या तरुणांच्या कौशल्य आणि तांत्रिक शक्यता अमर्याद आहेत. आता ते सर्व मागे टाकून पुढे जाण्याची वेळ आली आहे. मला खात्री आहे की आमचे माहिती तंत्रज्ञान क्षेत्र आम्हाला अभिमानाची भावना नेहमी देत राहील.

खूप खूप धन्यवाद !

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
LIC outperforms private peers in new premium mop-up in August

Media Coverage

LIC outperforms private peers in new premium mop-up in August
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi welcomes Crown Prince of Abu Dhabi
September 09, 2024
Two leaders held productive talks to Strengthen India-UAE Ties

The Prime Minister, Shri Narendra Modi today welcomed His Highness Sheikh Khaled bin Mohamed bin Zayed Al Nahyan, Crown Prince of Abu Dhabi in New Delhi. Both leaders held fruitful talks on wide range of issues.

Shri Modi lauded Sheikh Khaled’s passion to enhance the India-UAE friendship.

The Prime Minister posted on X;

“It was a delight to welcome HH Sheikh Khaled bin Mohamed bin Zayed Al Nahyan, Crown Prince of Abu Dhabi. We had fruitful talks on a wide range of issues. His passion towards strong India-UAE friendship is clearly visible.”