शेअर करा
 
Comments
The development journey of the nation is getting new strength: PM Modi
The bus port in Bharuch would benefit the pooerst of the poor: PM Modi
The Bharatmala and Sagarmala projects will give a strong boost to port-led development: PM
By 2022, when we mark 75 years of Independence, every Indian must have a home: PM
From dams to drip irrigation, we are working to provide irrigation facilities to the farmers. We need to embrace new trends & technology: PM

काल मी माता गंगेजवळ होतो, आज माता नर्मदेजवळ आहे, काल बनारसला होतो, आज भरुचला आहे, बनारस इतिहासापेक्षाही जुने भारतातील शहर आहे, भरुच गुजरातमधील प्राचीन शहर आहे.

बंधू भगिनींनो, सर्वप्रथम श्री. नितीन गडकरीजी यांचे, त्यांच्या संपूर्ण चमूचे, गुजरात सरकारचे मनापासून खूप-खूप अभिनंदन करतो. जगाला कळणार नाही हा पूल बनण्याचा अर्थ काय आहे ते, कारण भरुचने पूल नसल्यामुळे किती त्रास होतो तो सोसला आहे. जेव्हा इतका त्रास सहन केला असेल, तासनतास रुग्णवाहिकांना देखील थांबून राहावे लागले असेल, तेव्हा ही सुविधा मिळणे ही किती मोठी गोष्ट आहे , हे गुजरातची जनता चांगल्या प्रकारे जाणते. आणि बंधू भगिनींनो, हा पूल बनणे हा केवळ भरुच अंकलेश्वरच्या समस्यांचा मुद्दा नाही , हा भारताच्या पश्चिमेकडील प्रत्येकाला भेडसावणारा मुद्दा होता.

मी जेवढी वर्षे मुख्यमंत्री होतो, या गोष्टीसाठी लढत होतो. मात्र जेव्हा मला सेवा करण्याची संधी मिळाली, निर्धारित कालावधीत, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एवढा लांब पूल बनला आणि तो देखील माता नर्मदेच्या किनाऱ्यावर बांधण्यात आला.

नितीनजींनी मनापासून हे काम हाती घेतले, नियमितपणे पाठपुरावा केला, त्यांच्या विभागाचे सर्वजण काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहिले. आणि त्याचाच परिणाम आहे, की आज मी या पुलाचे उदघाटन करू शकत आहे.

नुकताच मी उत्तर प्रदेशात जाऊन आलो. निवडणूक सभांसाठी  विविध भागांत जायचो, तेव्हा लोकं मला काही स्मारके दाखवायची. काय स्मारके होती? कुणी म्हणायचे की तो दूर जो दिसतोय ना खांब, तो 15  वर्षांपूर्वी पुलाचा शिलान्यास झाला होता. आतापर्यंत दोन खांब उभारले आहेत, पुढे काही झालेले नाही. काशी मध्ये देखील 13 वर्षे जुने एक अपूर्ण बांधकाम तसेच पडून आहे. मी म्हटले, भारत सरकारला दिले असते तर बरे झाले असते, मी येऊन ते पूर्ण केले असते. एकीकडे देशभरात कोणतेही काम 10 वर्षे, 12 वर्षे, 15 वर्षे रखडले आहे आणि हे सामान्य वाटते, त्या तुलनेत निर्धारित कालावधीत काम पूर्ण करण्याची संस्कृती जी आम्ही गुजरातमध्ये लागू केली, आज संपूर्ण भारतात लागू करण्याच्या दिशेने आम्ही काम करत आहोत.

बंधू-भगिनींनो, आज मला दहेजला जाण्याचे सौभाग्य लाभले. कुणी कल्पना करू शकत नाही की दहेज, तो केवळ भरुचचा अलंकार नाही, दहेज संपूर्ण भारताचा अलंकार आहे. जेव्हा त्याचा पूर्ण विकास होईल आणि ज्या वेगाने पुढे जात आहे, जवळ-जवळ 8 लाख लोकांना रोजगार देण्याची त्याच्यात क्षमता असेल. तुम्ही विचार करा, या क्षेत्रात एवढी मोठी रोजगाराची संधी निर्माण झाली, या भागाचे स्थान, स्थिती कशी असेल याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. आणि मी पुन्हा-पुन्हा दहेजला जायचो, तुम्हाला चांगले माहित आहे. तेथील गल्ली-गल्लीशी मी परिचित आहे. स्वतःच्या डोळ्यांनी त्याला विकसित होताना पाहिले आहे. आणि आज जेव्हा पूर्णत्वाच्या दिशेने पाऊल टाकत आहे, पीसीपीआर, डीएचईजे, ओपीएएल, बंधू-भगिनींनो, देशाच्या आर्थिक जगताला एक नवीन ताकद मिळणार आहे, आणि हे भरुचच्या धरतीवर होत आहे. मी तुमचे खूप-खूप अभिनंदन करतो.

मला मुख्यमंत्र्यांचेही अभिनंदन करायचे आहे कारण जेव्हा बस पोर्टची कल्पना केली होती, मी इथे मुख्यमंत्री होतो, तेव्हा माझ्या मनात एक विचार यायचा की असे कसे सरकार आहे, हे श्रीमंत लोक जेव्हा विमानतळावर जातात, विमानात बसतात तेव्हा त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असतात. थंड हवा सुरु असते, थंड पाणी मिळते, खाण्यासाठी हवे ते मिळते, माझ्या देशातील गरीबाला हा अधिकार असू नये का? विमान प्रवास करणाऱ्यांनाच हे मिळावे का? ही गोष्ट प्रत्येक क्षणी  माझ्या मनात रुंजी घालत राहिली.

 आणि त्याचा परिणाम असा झाला की वडोदरा येथे सर्वप्रथम सार्वजनिक-खासगी भागीदारी मॉडेलनुसार एक असे बस स्थानक बनले, एक असे पोर्ट बनले, ज्याचा व्हिडिओ यू ट्यूब वर जगभरात लाखो लोक पाहत राहिले की असाही एखादा बस पोर्ट असू शकतो? आणि बसमधून गरीबातील गरीब व्यक्ती प्रवास करते. गरीबातील गरीब माणूस आपल्या हातात झोळी घेऊन बसमधून जातो. विडी पितो, कुठेही विडी टाकतो. आज जर वडोदरा इथे गेलात, तर तुम्हाला स्वच्छ बस स्थानक आढळेल. त्याच मॉडेलनुसार अहमदाबाद मधेही बांधण्यात आला. आतापर्यंत बहुधा चार बनले आहेत आणि मला आनंद आहे की राज्य सरकारने तीच योजना पुढे सुरु ठेवत तसाच शानदार बस तळ भरुचमध्ये बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

तुम्ही कल्पना करा, भरूच पासून सरदार सरोवर धरणापर्यंतचा सुमारे सव्वाशे, दीडशे किलोमीटरचा पूर्ण रस्ता पाण्याने भरलेला असेल, ते दृश्य किती आनंददायी असेल. त्या संपूर्ण परिसरात जमिनीवर पाणी गेल्यामुळे सुमारे दीडशे किलोमीटरचा परिसर, दोन्ही बाजूला २०-२० किलोमीटर पाण्यातून वर येईल.

भरुचमध्ये मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा देखील हा विषय आला होता. तेव्हा आमचे रमेश इथले एक आमदार होते. तेव्हा देखील हा विषय निघायचा की इथे पिण्याच्या  पाण्याची सोय होईल.

मी माझ्या डोळ्यांसमोर ते चित्र व्यवस्थित पाहू शकतो आणि जगातील सर्वात उंच सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बनेल, एकतेचा पुतळा. जगभरातील पर्यटक येतील, केवडीया कोरिन पर्यंत अतिशय उत्तम प्रकारचा रस्ता आपल्या नितीनजींचा विभाग बांधत आहे. मात्र आणखी एका शक्यतेचा अभ्यास आतापासून सुरु करायला मी नितीनजींना सांगितले आहे, जर भाडभूजचा प्रकल्प देखील झाला तर,  आणि नर्मदेत पाणी असेल तेव्हा पर्यटकांना आपण इथल्या छोट्या-छोट्या स्टीमरमधून सरदार सरोवर धरणापर्यंत घेऊन जाऊ शकतो का?

गोव्यात वाढदिवस साजरा करायचा असेल तर लोकं छोट्या-छोट्या स्टीमरमधून पाण्याच्या मधोमध जातात. या परिसरात देखील सुरती लोकांना वाढदिवस साजरा करायचा असेल तर ते देखील इथे येतील आणि भरुचवाले तर जातीलच जातील.

बंधू भगिनींनो, एकाच व्यवस्थेद्वारे किती परिवर्तन घडवून आणता येऊ शकते, जर स्वप्न स्पष्ट असेल, नियत ठीक असेल, धोरणे योग्य असतील तर यशाच्या आड काहीही येत नाही बंधू, भगिनींनो, यश नक्कीच मिळते.

मी आज गुजरातमध्ये आलोच आहे , नितीनजी आले आहेत, तर त्यांची इच्छा आहे की त्यांच्या विभागाची घोषणा मी करावी. भले मी करतो मात्र श्रेय नितीनजींना जाते. त्यांची कल्पना आणि त्यांची धाडसी निर्णय घेण्याची जी क्षमता आहे त्याचा हा परिणाम आहे. त्यांच्या विभागाने निर्णय घेतला आहे आणि मला आनंद होणे अतिशय स्वाभाविक आहे. त्यांनी गुजरातमध्ये आठ महामार्गाना राष्ट्रीय महामार्गांमधे रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे करण्यासाठी जवळ-जवळ १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल, १२ हजार कोटी रुपये. एकट्या नितीनजींच्या विभागाद्वारे या आठ रस्त्यांवर १२ हजार कोटी रुपये लागतील. तुम्ही कल्पना करू शकता, गुजरातच्या पायाभूत सुविधांना चार चांद लागतील बंधू, भगिनींनो. चार चांद. आणि या आठ रस्त्यांची लांबी जवळपास १२०० किलोमीटर आहे. ज्यामध्ये ऊना, धारी, बगसरा, अमरेली, बाबरा, जसदन, चोटीला, हा जो पूर्ण राज्य महामार्ग आहे, आता राष्ट्रीय महामार्ग बनेल. दुसरा, नागेसरी, खांबा, चलाला, अमरेली, राज्य महामार्ग आहे, राष्ट्रीय महामार्ग बनेल. पोरबंदर, भानवड, जाम-जोधपूर, तालावाड, राज्य महामार्ग आहे, राष्ट्रीय महामार्ग बनेल. आणंद, कठवाल, कपरवंच, पायड़, धनसुरा, मोढ़ासा, हे राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग बनतील. पूर्ण, पूर्ण आदिवासी पट्ट्याला याचा सर्वात मोठा लाभ मिळणार आहे. लखपत, कच्छचा विकास करायचा आहे, धौलावीराचा विकास करायचा आहे, पर्यटनाला चालना द्यायची आहे.

लखपत, गढूली, हाजीपुर, खावड़ा, धैलाविरा, मौवाना, सांकलपुर;तुम्ही भारताच्या सीमेची सुरक्षा म्हणा, कच्छच्या पर्यटनाचा विकास म्हणा, धौलावीरा जे मानस संस्कृतीचे प्राचीन आणि मान्यताप्राप्त शहर ५ हजार वर्षे जुने आहे, एका कोपऱ्यात आहे. जेव्हा ते मध्यवर्ती केंद्र बनेल, जगभरातील पर्यटकांना आकर्षित करेल, ज्याचा गुजरातला लाभ होईल.

खंभालिया, अड़वाना, पोरबंदर; चितौढ़ा, रापर, धौलाविरा; खंभालिया, वाणवढ़, राणावा; तुम्ही विचार करा की या पायाभूत विकासातून एवढ्या मोठ्या खर्चातून लोकांना तर रोजगार मिळेल, काम मिळेल, हे तर होणारच आहे. मात्र सर्वात मोठी गोष्ट, अपघातामुळे, विशेषतः आपण आपले तरुण गमावतो. तरुण मंडळी मोठ्या उत्साहाने वेगात गाडी चालवतात, मोटारसायकल वेगात चालवतात, अपघात होतात, लाखो लोक अचानक मरण पावतात. या रचनेमुळे अपघातांवर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवू शकतो, कारण रस्त्याची रचना अशी आहे. एक प्रकारे मानवतेचे देखील काम आहे.

तुम्हा लोकांना जर आठवत असेल, अहमदाबाद, राजकोट, बगोदरा; कोणताही दिवस असा जात नव्हता की बगोदराजवळ अपघात झालेला नाही आणि रात्री मरण पावले नाहीत, दररोज, जेव्हा केशूभाई पटेल मुख्यमंत्री बनले, ते हे दृश्य दररोज पाहायचे. ते राजकोटहून यायचे जायचे. आमच्या पक्षाचे देखील अनेक ज्येष्ठ नेते अहमदाबाद-राजकोट महामार्गावर अपघातात मारले गेले.आणि मी अहमदाबादमध्ये असताना, तेव्हा तर मी राजकारणात नव्हतो, साधारणपणे मला रात्री दूरध्वनी यायचा की एवढा मोठा अपघात आज झाला आहे. अहमदाबाद-राजकोटचा रस्ता चार पदरी केला, अपघातांचे प्रमाण खूप कमी झाले, खूप मोठी घट झाली आहे.

हे राष्ट्रीय महामार्गांचे जाळे, अशा प्रकारे सुरक्षेच्या दृष्टीने, मानवतेच्या दृष्टीने एक खूप मोठी व्यवस्था उभी राहत आहे. आता रस्त्याचे मॉडेल देखील आम्ही बदलले आहे. रस्त्यावर व्यवस्था देखील विकसित व्हाव्यात, रस्त्यांच्या जवळ हेलिपॅड देखील असावे, रस्त्याजवळ खाण्या-पिण्याची, शौचालय, आदी व्यवस्था देखील उपलब्ध असाव्यात. कारण वाहतूक, लोक रोज जातात-येतात, त्यांना या सुविधा मिळाव्यात, प्रसाधनगृहे उपलब्ध व्हावीत. या सर्व सुविधांनी युक्त राष्ट्रीय महामार्ग बनवण्याच्या दिशेने आणि आधुनिक रस्ते, नितीनजी आपल्या नवीन कल्पनांसह या कामाला लागले आहेत.

एक सागरमाला प्रकल्प, बघा दिल्लीमध्ये एक असे सरकार बसले आहे जे तुकड्यांमध्ये विचार करत नाही. आम्ही समस्यांचे निराकरण करण्याच्या दिशेने विचार करतो. आम्ही एक सागरमाला योजना बनवली, या सागरमाला योजनेअंतर्गत भारताचा संपूर्ण नकाशा तुम्ही जिथे काढता, तो पूर्णच्या पूर्ण पायाभूत सुविधांनी युक्त असायला हवा. रस्त्यावरून कुठेही फाटे फुटायला नकोत, एका टोकाकडून निघाले की त्याच रस्त्यावरून संपूर्ण भारताची भ्रमंती करून तुम्ही परत येऊ शकता. असा एक सागरमाला प्रकल्प, भारतमाला प्रकल्प, त्याची आम्ही रचना करत आहोत. या भारतमालामुळे रस्त्याचे जाळे निर्माण होईल, सागरमालामुळे जे समुद्र किनारे आहेत त्याच्या पायाभूत विकासाचे काम होईल. भारतमाला आणि सागरमाला बंदर-भू विकासाला एक नवीन ताकद देतील. आणि त्यामुळे एकट्या बंदर क्षेत्रात सागरमाला अंतर्गत 8 लाख कोटी रुपयांहून अधिक नवीन भांडवल गुंतवणूक आगामी काही वर्षात करण्याच्या दिशेने आपण पुढे जात आहोत. आणि त्याचा परिणाम गुजरातला विशेष लाभ मिळेल, येथील बंदरांना लाभ मिळेल, येथील बंदरांशी जोडलेली  रेल्वे, रस्ते, संपर्क होईल, त्याचा लाभ मिळेल.

एक पंतप्रधान कृषी सिंचन योजना आम्ही लागू केली आहे. तुम्ही हैराण व्हाल, आपल्या देशात सरकारं कशी चालली, धरण तर बांधले मात्र धरणातून पाणी कुठे घेऊन जायचे, कसे घेऊन जायचे, त्याची योजनाच तयार केली नाही. 20-20 वर्षांपूर्वी धरणे बांधली आहेत, पाणी भरलेले आहे, कालवे नाहीत. मी हे सर्व शोधून काढले, आणि सुमारे 90 हजार कोटी रुपये खर्चून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत धरण ते सिंचन म्हणजेच ड्रिपरीकेशन करण्यापर्यंत, शेतात धरण ते ड्रिपरीकेशन पर्यंत संपूर्ण साखळी उभी करणे, 90 हजार कोटी रुपये गुंतवून शेतकऱ्याला पाणी पोहोचवण्यासाठी, संपूर्ण देशात असे बंद पडलेले प्रकल्प होते, त्यावर काम करत आहोत.

देश आधुनिक असायला हवा. आपण पुराणपंथी जीवन जगू शकत नाही. 20 व्या शतकात राहून आपण 21 व्या शतकातील जगाचा सामना करू शकत नाही. जर 21 व्या शतकातील जगाचा सामना करायचा असेल ते आपल्याला देखील स्वतःला 21 व्या शतकात घेऊन जावे लागेल. आणि असे मानून चला बंधू-भगिनींनो, आता भारत जगाशी बरोबरी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. आता आपण आपल्या घरात हे, ते, तू-तू, मी-मी मध्ये वेळ वाया घालवणाऱ्यातले नाही आहोत, आपण जगाच्या फळ्यावर भारताला आपले स्थान देण्याच्या कामाला लागले आहोत. आणि यामुळे आपल्याला देखील 21व्या शतकाच्या गरजांनुसार भारत बनवायला लागेल आणि तिथे आपल्याला जसे हायवे हवेत तसे आय-वेज देखील हवेत. आय-वेज म्हणजे इन्फॉर्मेशन वेज. संपूर्ण देशात ऑप्टिकल फायबर नेटवर्क. आता जसे पूल बांधण्यात आले, काही लोक त्याचे श्रेय घेण्यासाठी हिंडत-फिरत असतात, फायदा उचला, काहीही बोला, फायदा उचला. करायला काही नको. 

बंधू-भगिनींनो, आपल्या देशात जुने सरकार असताना ऑप्टिकल फायबर नेटवर्क, ही योजना बनली होती. ती योजना अशी होती की जेव्हा मी पंतप्रधान बनलो तोपर्यंत सर्व लाख गावांमध्ये हे काम पूर्ण करायचे त्यांच्या फायलींत लिहिले आहे. मार्च 2014 पर्यंत सव्वा लाख गावांमध्ये ऑप्टिकल फायबर लावणे, हा जुन्या सरकारचा निर्णय होता, योजना बनवली होती. आणि जेव्हा मी पंतप्रधान बनलो, तेव्हा मी चौकशी केली; मी म्हटले, भाऊ, सव्वा लाख गावांपैकी किती झाले? तुम्ही विचार करा किती झाले असतील सव्वा लाख गावांपैकी? किती झाले असतील? कुणी विचार करेल, एक लाख झाले असतील, कुणी विचार करेल 50 हजार झाले असतील, जेव्हा मी हिशोब मागितला तर केवळ 59 गावं, 50 आणि ९.६० ही नाहीत, एवढ्या गावात ऑप्टिकल फायबर लावले होते.

अशी काम करण्याची रीत होती, आम्ही काम हाती घेतले, या देशात अडीच लाख पंचायती आहेत, अडीच लाख पंचायतींमध्ये ऑप्टिकल फायबर नेटवर्क टाकायचे आहे. आतापर्यंत 68 हजार गावांमध्ये काम झाले आहे. कुठे 59 आणि कुठे 68 हजार, हा फरक आहे  बंधू-भगिनींनो . जर हेतू चांगला असेल, जनता-जनार्दनाचे कल्याण करण्याचा हेतू असेल तर कामात कधीही अडथळे येत नाहीत. जनतेचेही सहकार्य मिळते, काम होते, देश पुढे जातो.

गॅसची पाईपलाईन, ऑप्टिकल फायबर नेटवर्क, पाण्याची व्यवस्था. आता आम्ही स्वप्न पाहिले आहे 2022, जेव्हा भारत स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करेल. 2022 पर्यंत भारतातील गरीबातील गरीब व्यक्तीला देखील त्याचे स्वतःचे घर राहायला मिळायला हवे आणि यावर आम्ही काम करत आहोत. जगातील छोटे-छोटे देश म्हणत आहेत. एक प्रकारे इतकी घरे बांधावी लागतील की भारतात एक नवीन छोटा देश बनवावा लागेल, इतकी घरे बांधायची आहेत. मात्र बंधू-भगिनींनो , हे स्वप्न देखील पूर्ण करण्याच्या कामाला आम्ही लागलो आहोत.

तुम्ही कल्पना कराल कसा आहे देश. कोणताही देश, त्याच्याकडे स्वतःचा हिशोब असायला हवा की नको? त्याच्याकडे काय आहे, काय नाही, माहित असायला हवे की नको? मी जेव्हा पंतप्रधान बनलो, तेव्हा मी बैठक घेत होतो, सुरुवातीला मी म्हटले सांगा, आपल्या देशात बेटं किती आहेत? जसे आपल्याकडे आलिया बेत आहे, किंवा बेट द्वारका आहे, अशी किती बेटे आहेत? हे मी विचारत होतो.

वेगवेगळे विभाग, कुणी म्हणायचे 900, कुणी म्हणायचे 800, कुणी 600 सांगायचे, कुणी 1000 सांगायचे. मी म्हटले काय सरकार आहे? हा इतके सांगतो, तो इतके सांगतो. काहीतरी गडबड वाटते. नंतर मला समजले की कुणीही वैज्ञानिकाने अभ्यासच केला नव्हता. आता भारताकडे किती बेटे आहेत? त्यांचे वैशिष्ट्य काय? भारताला पुढे घेऊन जाण्यासाठी याचा काही उपयोग होऊ शकतो का? मी हैराण होतो, त्यांच्याकडे माहितीच नव्हती. मी टीम बसवली, उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर केला, आणि सगळी माहिती बाहेर काढली. भारताकडे 1300 हून अधिक बेटे आहेत. 1300 हून अधिक आणि त्यातील काही बेटं  तर सिंगापूरपेक्षाही मोठी आहेत. म्हणजे आपण आपल्या बेटांचा किती विकास करू शकतो, किती वैविध्य भरू शकतो, पर्यटनाच्या विकासासाठी काय काय करू शकत नाही. भारत सरकारने स्वतंत्र व्यवस्था केली आहे आणि आगामी दिवसांत भारताच्या समुद्र किनाऱ्यावर जेवढे टापू आहेत, आता त्यापैकी 200 निवडले आहेत.

प्रथम त्या 200 बेटांच्या विकासाचे मॉडेल तयार होत आहे.बंधू-भगिनींनो जर अशा गोष्टी होत असतील तर सिंगापूरला भेट देण्याची काय गरज आहे? सगळे काही माझ्या देशात होऊ शकते. आपला देश सामर्थ्यवान आहे, शक्तिवान आहे. आपण देखील विकासाची नवी शिखरे पार करू शकतो. आणि म्हणूनच बंधू-भगिनींनो  , रेल्वे, जसे नितीनजी सांगत होते ना , की आपल्या देशात यापूर्वी एका दिवसात भारतातील कानाकोपऱ्यातील हिशोब लावला तर सरासरी एका दिवसात दोन किलोमीटरचा रस्ता बनायचा. आमचे सरकार बनण्यापूर्वी एका दिवसात दोन किलोमीटर. नितीनजींनी आल्यावर असा धक्का दिला, आणि जसे ते आता सांगत होते, एका दिवसात 22 किलोमीटरचे काम होते, 11 पट अधिक. बंधू-भगिनींनो  रेल्वे, यापूर्वी आपल्या देशात रेल्वेचे गेज परिवर्तन म्हणा किंवा नवीन रूळ टाकण्याचे काम म्हणा, एका वर्षात 1500 किलोमीटरचे काम होत होते.

आता एवढा मोठा देश, रेल्वेची मागणी, त्याच्या पुढे जाऊ शकत नव्हता. आम्ही येऊन विडा उचलला, हे वाढवायचे, आणि मला आनंद आहे की आज एका वर्षात आपण पूर्वीच्या तुलनेत दुप्पट काम करतो रेल्वेच्या रुळांचे, दुप्पट, 3000 किलोमीटर. काम करायचा जर निर्धार असेल, जसे तुम्ही बस पोर्टचे काम पाहिलंत, याच संदर्भात मी रेल्वे वाल्यांची बैठक बोलावली. मी म्हटले, ही आपली रेल्वे स्थानके, मेल्यागत अवस्था झाली आहे त्यांची. 19 व्या शतकातील आहेत, त्यात थोडा बदल करता येईल की नाही करता येणार?

आता रेल्वेच्या विभागाचा मोठा विडा उचलला आहे. भारताची 500 रेल्वे स्थानके बनवायची आहेत. आता सुरुवातीला सुरत, गांधीनगरमध्ये दोन प्रकल्प ठरवले आहेत. आगामी काळात सर्व रेल्वे स्थानके बहुमजली का नसावीत? रेल्वे स्थानकात चित्रपटगृह देखील असू शकते, रेल्वे स्थानकात मॉल देखील होऊ शकतो. रेल्वे स्थानकात मनोरंजन केंद्र होऊ शकते, खाण्या -पिण्याच्या वस्तूंची बाजारपेठ असू शकते. रुळांवर गाडी चालत राहील, अन्य जागेचा तर विकास व्हायला हवा. बंधू-भगिनींनो  विकासासाठी दूरदृष्टी असायला हवी, स्वप्ने देखील हवीत, संकल्पही हवा, सामर्थ्य देखील हवे, मग सिद्धी आपोआप होते. आणि ते काम हाती घेऊन आम्ही मार्गक्रमण करत आहोत.

भरुचच्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आज माता नर्मदेच्या किनाऱ्यावर एवढे मोठे काम झाले आहे. माझ्याबरोबर पूर्ण ताकदीनिशी म्हणा

मी म्हणेन नर्मदे, तुम्ही सर्वजण दोन्ही मुठी वर करत म्हणा सर्वदे.

नर्मदे – सर्वदे

नर्मदे – सर्वदे

नर्मदे – सर्वदे

नर्मदे – सर्वदे

नर्मदे – सर्वदे

तुमचे खूप-खूप आभार.

Share beneficiary interaction videos of India's evolving story..
Explore More
पंतप्रधानांच्या ‘परीक्षा पे चर्चा पीएम मोदी के साथ’ चा मराठी अनुवाद

लोकप्रिय भाषण

पंतप्रधानांच्या ‘परीक्षा पे चर्चा पीएम मोदी के साथ’ चा मराठी अनुवाद
Smriti Irani writes: On women’s rights, West takes a backward step, and India shows the way

Media Coverage

Smriti Irani writes: On women’s rights, West takes a backward step, and India shows the way
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
G-7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्जेंटिनाच्या राष्ट्रपतींची बैठक
June 27, 2022
शेअर करा
 
Comments

G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्जेंटिनाचे राष्ट्रपती  अल्बर्टो फर्नांडीझ यांची 26 जून 2022 रोजी म्युनिकमध्ये भेट घेतली.

या दोन्ही नेत्यांमधील ही पहिली द्विपक्षीय बैठक होती. 2019 मध्ये दोन्ही देशांमध्ये सुरु झालेल्या धोरणात्मक भागीदारीच्या अंमलबजावणीचा आढावा त्यांनी या बैठकीत घेतला.  यावेळी व्यापार, गुंतवणुकीसह इतर विविध विषयांवर चर्चा झाली; दक्षिण-दक्षिण सहकार्य, विशेषतः औषधनिर्माण  क्षेत्रातील सहकार्य ; हवामान विषयक  कृती, नवीकरणीय ऊर्जा, आण्विक औषध, विद्युत गतिशीलता, संरक्षण सहकार्य, कृषी आणि अन्न सुरक्षा, पारंपारिक औषधे , सांस्कृतिक सहकार्य,तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये समन्वय इत्यादी विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये विचारविनिमय झाला. भविष्यात या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर दोन्ही राष्ट्रांचे एकमत झाले.