शेअर करा
 
Comments
PM Modi greets Mata Amritanandamayi on her 63rd birthday, prays for her long life and good health
Fortunate to be among those who have been receiving Amma’s blessings and unconditional love: PM Modi
India is the land of such saints who have seen God in everything that can be seen. Mankind is prominent among those things: PM
Serving the old and the aged, and helping the needy have been Amma’s childhood passions: PM
Amma’s initiative on building toilets has been a great help in our Swachh Bharat Programme: PM Modi
Amma’s ashram has already completed construction of two thousand toilets: PM Modi
One year ago, Amma generously donated one hundred crore rupees to the Namami Gange programme: PM Modi

प्रणाम अम्मा,

व्यासपीठावरील माननीय महोदय,

नमस्कारम्‌ !

या धार्मिक आणि पवित्र दिवशी मी अम्मांप्रती आदर व्यक्त करतो. परमेश्वरांकडे मी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो. लाखो भाविकांना त्या प्रकाश दाखवतात. एवढेच नव्‍हे तर अनेक भाविकांसाठी त्या जणू जीवनच आहेत.

खऱ्या मातेप्रमाणेच त्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कृतीतून, दृश्य आणि नकळत त्या त्यांच्या भक्तांचे पालन करतात. अम्मांचे आशीर्वाद आणि निर्व्याज प्रेम मिळण्याचे भाग्य मला लाभले आहे. तीन वर्षांपूर्वी अम्मांच्या 60 व्या जन्मदिन सोहळयाला अमृतापुरी येथे उपस्थित राहून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याचे भाग्य मला लाभले. आज सोहळयाला व्यक्तीश: उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले नसले तरी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देता येत असल्याबद्दल मला आनंद आहे. नुकताच मी केरळहून परतलो. केरळातल्या जनतेकडून मिळालेल्या प्रेम आणि स्नेहामुळे मी भारावून गेलो.

दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीत देव पाहणाऱ्या संतांची भूमी भारत आहे. यात मनुष्य प्रामुख्याने येतो. म्हणूनच मानवजातीची सेवा हे त्यांचे ब्रीदवाक्य झाले. बालपणीही अम्मा आपले अन्न इतरांना वाटयाच्या हे मला माहित आहे. वृध्दांची सेवा करण्याची आणि गरजूंना मदत करण्याची कळकळ त्यांना बालपणापासूनच होती.

बालपणी त्या भगवान कृष्णाची पूजा करायच्या. हे त्यांचे गुण ही त्यांची ताकद होती. देवाप्रती भक्तीभाव आणि गरिबांप्रती समर्पणभाव हा संदेश मी त्याच्याकडून घेतला आहे. जगभरातल्या त्यांच्या भक्तांचीही हीच भावना आहे.

अम्मा चालवत असलेल्या संस्था आणि उपक्रमातून त्यांनी केलेल्या सामाजिक आणि सेवाभावी कार्याविषयी मला माहित आहे. गरिबांना अन्न, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि उपजीविका या पाच गरजा भागवण्यासाठी मदत करण्याबाबत त्या दक्ष असतात.
स्वच्छता, पाणी, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात अम्मांनी केलेले कार्य आणि देणगी उल्लेखनीय आहे. मला असे समजले आहे की यातील काही लाभार्थ्यांना आज प्रमाणपत्र मिळणार आहेत. विशेषत: शौचालय बांधणीसाठी अम्मांनी घेतलेल्या पुढाकाराचा खूप मोठा फायदा स्वच्छ भारत उपक्रमाला झाला आहे. केरळमध्ये स्वच्छतेसाठी एक कोटी रुपयांचे योगदान देण्याची प्रतिज्ञा अम्मांनी घेतली होती. या प्रतिज्ञेत गरिबांसाठी 50 हजार शौचालये निर्मितीचाही समावेश आहे. संपूर्ण राज्यभरात अम्मांच्‍या आश्रमाकडून दोन हजार शौचालये बांधूनही झाली असल्याचे आज मला सांगण्यात आले.

पर्यावरण संवर्धन आणि शाश्वतता या क्षेत्रात त्या करत असलेल्या विविध कार्यक्रमाचे हे एक उदाहरण आहे. वर्षभरापूर्वी अम्मांनी “नमामी गंगे” उपक्रमासाठी एक कोटी रुपयांची मदत सढळ हस्ते केली होती. नैसर्गिक आपत्तीनंतर अम्मा करत असलेल्या मदतीबाबतही मला माहित आहे. जगाला भेडसावत असलेल्या अत्यंत कठीण समस्या सोडवण्यासाठी विद्यापीठातील संशोधक नवीन दृष्टिकोन शोधत असल्याची बाब आनंददायी आहे.

 

या उत्सवात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मी मन:पूर्वक आभार व्यक्त करतो.

अम्मांना पुन्हा एकदा शुभेच्छा.

Modi Govt's #7YearsOfSeva
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
All citizens will get digital health ID: PM Modi

Media Coverage

All citizens will get digital health ID: PM Modi
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
एस. सेल्वागणपती यांची राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
September 28, 2021
शेअर करा
 
Comments

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी,  एस. सेल्वागणपती यांची पुदुच्चेरीमधून राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

ट्वीट संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे;

"आपल्या पक्षाला पुदुच्चेरीमधून एस. सेल्वागणपतीजी यांच्या रुपाने राज्यसभेचे पहिले खासदार मिळाले आहेत ही प्रत्येक भाजप कार्यकर्त्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. पुदुच्चेरीच्या लोकांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास आदरास पात्र आहे. आम्ही पुदुच्चेरीच्या प्रगतीसाठी काम करत राहू."