Indian diaspora across the world are true and permanent ambassadors of the country, says PM Modi
In whichever part of the world Indians went, they not only retained their Indianness but also integrated the lifestyle of that nation: PM
Aspirations of India’s youth and their optimism about the country are at the highest levels: PM Modi
India, with its rich values and traditions, has the power to lead and guide the world dealing with instability: PM Modi
At a time when the world is divided by ideologies, India believes in the mantra of ‘Sabka Sath, Sabka Vikas’: PM

तुम्हा सर्वाना अनिवासी भारतीय दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! अनिवासी दिवसाच्या या परंपरेत आज पहिल्यांदाच ‘अनिवासी खासदार संमेलनाचा’ एक नवा अध्याय सुरु होतो आहे. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, युरोप, आशिया पैसिफिक क्षेत्र अशा सगळ्या भागातून आज या संम्मेलनासाठी आलेल्या अनिवासी मित्रांचे मी हार्दिक स्वागत करतो. 

भारतात तुमचे स्वागत आहे! तुमच्या या घरात तुमचे खूप खूप स्वागत ! 

तुमची जुनी पिढी, पूर्वजांच्या जुन्या आठवणी, भारताच्या विविध भागांशी जोडलेल्या आहेत. तुमच्या पूर्वजांपैकी काही लोक व्यापारासाठी तर काही लोक शिक्षणासाठी परदेशात गेले होते. काही जणांना बळजबरीने तर काही जणांना भूलथापा मारून इथून परदेशात नेले गेले. ते शरीराने भलेही भारतापासून दूर गेले असले तरी, आपले मन, आपल्या आत्म्याचा एक अंश ते याच मातीत ठेवून गेले होते. म्हणूनच आज जेव्हा तुम्हा भारतातल्या कोणत्याही विमानतळावर पाउल ठेवता, तेव्हा तुम्हाला या भूमीवर बघून आत्म्याचा तो अंश आजही प्रफुल्लीत होतो.

अशा क्षणी तुमचा कंठ दाटून येतो. काही भावना डोळ्यांवाटे वाहू लागतात. तुम्ही त्या भावनांना आवर घालण्याचा खूप प्रयत्न करता, पण त्या आवरू शकत नाही. तुमच्या डोळ्यात पाणी असतं, आणि त्याचं वेळी भारतात आल्यामुळे एक वेगळी चमकही असते. तुमच्या मनातली ही भावना मी समजू शकतो. ते प्रेम, तो स्नेह, इथली माती, इथल्या हवेतला गंध, या सगळ्याचे अस्तित्व ज्या अंशामुळे जाणवते. त्या अंशाला मी वंदन करतो. आज तुम्हाला इथे बघून तुमच्या पूर्वजांना किती आनंद होत असेल, याची आपल्या सर्वांनाच कल्पना आहे. ते जिथे कुठे असतील, तुम्हा सर्वांना भारतात बघून आनंदी झाले असतील. 

मित्रांनो,

शेकडो वर्षांच्या या कालखंडात भारतातून जे लोक परदेशात गेले, त्यांच्या मनातून भारत कधीच बाहेर निघू शकला नाही. जगाच्या ज्या भूभागात ते गेले, त्यांनी भारताची सभ्यता आणि मूल्यांना जिवंत ठेवले. पण त्यासोबत, भारतीय वंशाचे नागरिक जिथे गेले, त्या भूमीचा भाग बनून राहिले, त्या भागाला आपले घर बनवून राहिले, याचे काही नवल वाटायला नको. त्यांनी एकीकडे स्वतःमधले भारतीयत्व जागे ठेवले तर दुसऱ्या बाजूला, तिथली भाषा तिथल्या खाण्यापिण्याच्या सवयी, संस्कृती, वेशभूषा या सगळ्यात सहज मिसळून गेले.

क्रीडा, कला, चित्रपट अशा क्षेत्रात भारतीय वंशाच्या लोकांनी जागतिक व्यासपीठावर आपला ठसा उमटवला आहेच. राजकारणाविषयी बोलायचे तर, आपण बघतोच आहे, आज भारतीय वंशाच्या लोकांची एक जागतिक लघु संसद इथे भरली आहे. भारतीय वंशाचे लोक आज मौरीशस,आयर्लंड आणि पोर्तुगाल इथले पंतप्रधान झाले आहेत. याआधीही भारतीय वंशाचे लोक अनेक देशांचे राज्यांचे प्रमुख बनले होते. आपल्यासाठी विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे गयानाचे माजी राष्ट्रपती श्री भरत जगदेव आज आपल्या या संमेलनात उपस्थित आहेत. आपण सर्वजण आपापल्या देशात महत्वाची राजकीय जबाबदारी आणि भूमिका पार पाडता आहात.

मित्रांनो,

तुमच्या पूर्वजांची मातृभूमी भारताविषयी तुम्हाला अभिमान वाटतो. तुमची परदेशातील कामगिरी आणि तुमचे यश, याचा आम्हाला अभिमान आहे, आमच्यासाठी ती सन्मानाची गोष्ट आहे. तुम्ही कुठलं पद सांभाळणार आहात याची बातमी प्रसारमाध्यमात येते. किंवा तुम्ही जेव्हा कधी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरता, तेव्हा त्या वृत्ताची भारतीय लोक जास्त प्रमाणात दखल घेतात. वर्तमानपत्रे आणि वाहिन्यांवरून अशा बातम्या जास्त बघितल्या जातात. तुम्ही जिथे आहात तिथल्या भू- राजकीय परिस्थितीवर तुमचा कसा प्रभाव पडतो आहे, त्या देशांची धोरणे तयार करत आहात, अशा बातम्या भारतातले लोक मोठ्या आवडीने वाचतात. ही चर्चा पण करतात की बघा आपला माणूस तिथे एवढ्या मोठ्या पदावर पोहोचला. आम्हाला हा आनंद मिळवून देण्यासाठी, देशाचा आणि आमचाही गौरव वाढवण्यासाठी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन !!

बंधू-भगिनींनो,

तुम्ही सगळे गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या देशात राहता आहात.तुम्ही अनुभव घेतला असेल, की गेल्या तीन चार वर्षात विविध देशांचा भारताविषयीचा दृष्टीकोन बदलला आहे.भारताकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे, त्याचे मुख्य कारण हे आहे, की भारत स्वतःच बदलतो आहे. भारतात आमूलाग्र बदल होत आहेत. हा बदल केवळ आर्थिक सामाजिक स्तरावर नाही तर वैचारिक स्तरावरही होतो आहे. आधी जसे होते, तसेच चालू राहील, काही बदल होणार नाही, या देशाचे काहीच होऊ शकत नाही’ हा विचार मागे ठेवून भारत आता खूप पुढे निघाला आहे. भारताच्या लोकांच्या आशा- आकांक्षा सध्या अत्युच्च शिखरावर पोचल्या आहेत. व्यवस्थेत होणाऱ्या या आमूलाग्र परिवर्तनाचे, कायमस्वरूपी बदलाचे पडसाद आपल्याला प्रत्येक क्षेत्रात जाणवतील.

  • याचाच परिणाम म्हणून वर्ष २०१६-२०१७ मध्ये भारतात ६० अब्ज डॉलर्सची अभूतपूर्व अशी थेट परदेशी गुंतवणूक झाली.
  • देशातील उद्योगस्नेही वातावरणाच्या जागतिक क्रमवारीत भारताने मोठी झेप घेतली. गेल्या तीन वर्षात या क्रमवारीत भारत ४२ अंकांनी वर गेला आहे.
  • गेल्या दोन वर्षात जागतिक आर्थिक मंचाच्या जागतिक स्पर्धात्मक निर्देशांकात भारत ३२ अंकांनी वर गेला आहे.
  • जागतिक स्तरावर नवनवीन संशोधन करण्याच्या निर्देशाकातही भारत २१ अंकांनी वर गेला आहे.
  • लॉजिस्टीक परफॉरमन्स म्हणजेच प्रत्यक्ष कार्याविषयीच्या निर्देशांकातही १९ अंकांनी सुधारणा झाली आहे.
  • आज जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. मुडीज या जागतिक दर्जाच्या वित्तीय संस्था भारताकडे अतिशय सकारात्मक दृष्टीने बघत आहेत.
  • बांधकाम क्षेत्र, हवाई वाहतूक, खनिज उद्योग, सोफ्टवेअर इलेक्ट्रीकल उपकरणे अशा सर्व क्षेत्रात आतापर्यत निश्चित झालेल्या एकूण गुंतवणुकीपैकी अर्ध्यापेक्षा जास्त गुंतवणूक केवळ गेल्या तीन वर्षातच झाल्या आहे.

हे सगळे यासाठी शक्य झाले कारण भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात आम्ही दूरगामी परिणाम घडवणाऱ्या धोरणात्मक सुधारणा केल्या आहेत. “रिफॉर्म टू ट्रान्सफॉर्म” म्हणजेच सुधारणेकडून आमूलाग्र परिवर्तनाकडे हे आमचे मार्गदर्शक तत्व आहे. देशातली सर्व व्यवस्था जबाबदार, पारदर्शक बनवणे आणि भ्रष्टाचार मुळापासून संपवणे हा आमचा उद्देश आहे.

मित्रांनो,

वस्तू आणि सेवा कर, जी एस टीच्या माध्यमातून आम्ही देशातल्या शेकडो अप्रत्यक्ष करांचा गुंता संपवला आहे. एका अर्थाने देशाचे आर्थिक एकीकरण केले आहे. खनिज उद्योग, खते, वस्त्रोद्योग, नागरी हवाई सेवा, आरोग्य, संरक्षण, बांधकाम व्यवसाय, रियल इस्टेट, अन्नप्रक्रिया… असे एकही क्षेत्र नाही ज्यात आम्ही सुधारणा आणल्या नाहीत. 

मित्रांनो,

भारत आज जगातला सर्वात युवा देश आहे. या युवकांची स्वत:ची अपरिमित स्वप्ने आहेत, आशा- आकांक्षा आहेत. त्यांनी आपली ही युवा शक्ती, उर्जा योग्य क्षेत्रात खर्च करावी, स्वतःच्या भरवशावर रोजगार निर्माण करावा, या दृष्टीने सरकार सातत्याने काम करत आहे.  स्कील इंडीया अभियान, स्टार्ट अप योजना, स्टैंड अप योजना, मुद्रा योजना याच दृष्टीने सुरु करण्यात आल्या आहेत. मुद्रा योजनेअंतर्गत स्वयंरोजगारासाठी सुमारे १० लाख रुपयांपर्यतचे कर्ज दिले जाते. अनेक लोकांना ४ कोटी रुपयांपर्यतचे कर्ज तारण हमीशिवाय दिले गेले आहे. केवळ या एका योजनेमुळे देशाला ३ कोटी नवे स्वयंउद्योजक दिले आहेत. २१ व्या शतकाच्या गरजा ध्यानात घेऊन, सरकार पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था यात सुधारणा करण्यावर भर देत आहे. आमच्या धोरणातही भविष्यात भारताला काय पायाभूत सुविधा आवश्यक ठरतील यावर भर दिलेला आहे. जसे रेल्वे, महामार्ग, जलमार्ग, बंदरे विकसित केली जत आहेत. या सगळ्या वाहतूक साधनांच्या एकमेकांच्या समन्वयातून उद्योजकांना मालवाहतूक करणे सोपे जाईल, यावर सरकारचा भर आहे. 

मित्रांनो,

आज भारतात दुप्पट वेगाने रेल्वेमार्गाचे काम सुरु आहे. दुप्पट वेगाने रेल्वेमार्गाचे दुपदरीकरणहि होते आहे. तसेच दुप्पट वेगाने राष्ट्रीय महामार्ग बांधले जात आहेत. अक्षय उर्जेची दुपटीपेक्षा अधिक क्षमता असलेले विद्युतग्रीड एकमेकांशी जोडले जात आहेत. 

जहाजबांधणी उद्योगात पूर्वी मालवाहतूकीचा विकास नकारात्मक होता, आता आमच्या सरकारने त्यात ११ टक्क्यांपर्यत वाढ केली आहे. या सगळ्या प्रयत्नांमुळे देशात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. स्थानिक स्तरावर लघु उद्योजकांना नवनवी कामे मिळताहेत. जसे उज्ज्वला योजनेविषयी सांगायचे तर ही योजना केवळ गरीब महिलांना मोफत गॅस जोडणी पुरवठा करण्यापर्यंतच मर्यादित नाही.  या योजनेमुळे आतापर्यत ३ कोटींपेक्षा अधिक महिलांना धुरापासून मुक्ती मिळाली आहे. राज्यांना केरोसिनमुक्त होण्यात मदत मिळाली आहे. पण त्या पलीकडे या योजनेचा आणखी एक फायदा आहे. उज्ज्वला योजना लागू झाल्यानंतर देशात स्वयंपाकाच्या गॅसचे अनेक वितरक तयार झाले आहेत. घराघरात सिलेंडर पोचवणाऱ्याची संख्या वाढली आहे. म्हणजेच सामाजिक सुधारणेसह आर्थिक सशक्तीकरण पण होते आहे.

बंधू भगिनीनो,

वसुधैव कुटुंबकम या परंपरेवर विश्वास ठेवणाऱ्या आपल्या संस्कृतीने जगाला खूप काही दिले आहे. मी जेव्हा पहिल्यांदा संयुक्त राष्ट्र संघात गेलो होतो, तेव्हा मी जगासमोर आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा प्रस्ताव ठेवला होता. तुम्हा सर्वाना माहीतच असेल की ७५ पेक्षाही कमी दिवसांच्या काळात हा प्रस्ताव सर्वसंमतीने मंजूर झाला. एवढच नाही तर, १७७ अशा विक्रमी संख्येच्या देशांनी ह्या योगदिनाला सहप्रायोजकत्वही दिलं. आजही  संपूर्ण जगातले कोट्यवधी लोक २१ जूनला ज्या उत्साहाने योग दिवस साजरा करतात, ती आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

सर्वसमावेशक जीवनपद्धती ही भारताच्या समृद्ध परंपरेने जगाला दिलेली देणगी आहे.

मित्रांनो,

हवामान बदलाविषयी पॅरीस करारासंदर्भात चर्चेसाठी मी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटलो, त्यावेळी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी बनवण्याचा प्रस्ताव मांडला होता. आता हे प्रत्यक्षात अवतरले आहे. या माध्यमातून आम्ही विपुल सौर उर्जा असलेल्या देशांसोबत सौर तंत्रज्ञान विकसित करणे आणि आर्थिक पाठबळासाठी एक जागतिक मंच बनवतो आहोत.

निसर्गाचा समतोल राखून मार्गक्रमण करण्याची प्राचीन जीवनशैली ही देखील भारताचीच देणगी आहे.

बंधू भगिनीनो ,

नेपाळमध्ये जेव्हा भूकंप आला होता, किंवा श्रीलंकेत पूर आला होता, अथवा मालदीव मध्ये पाण्याचे संकट निर्माण झाले, अशा सर्व संकटात भारताने या राष्ट्रांना सर्वात आधी मदत करण्यासाठी पुढाकार घेतला.

जेव्हा यमन देशात यादवीचे संकट आले तेव्हा आम्ही आमच्या चार हजार नागरिकांना सुरक्षित मायदेशी परत आणले, पण त्यासोबतच आम्ही इतर ४८ देशांच्या नागरीकांचीही सुटका केली होती.

कठीण परिस्थितीतही मानवी मूल्यांचे संरक्षण करणे हा विचार आणि पध्दत आपल्या “वसुधैव कुटुंबकम्‌” परंपरेचा भाग आहे.

मित्रांनो,   

२०१८ मध्ये पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीला शंभर वर्षे पूर्ण होतील. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात दीड लाखांहून अधिक भारतीय सैनिकांचा बळी गेला होता. आणि खरं तर त्या युद्धांशी भारताचा काहीही थेट संबंध नव्हता. दोन्ही महायुद्धात भारताला एक इंचही भूमी मिळवण्यात रस नव्हता. तरीही भारतीय सैनिक लढले, जगाला मान्य करावेच लागेल, की भारताने हे किती मोठे बलिदान दिले आहे. स्वातंत्र्यानंतरही ही परंपरा कायम राहिली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता सैन्यदलात भारताचे मोठे योगदान आहे. मानवी मूल्यांसाठी तसेच शांततेसाठी बलिदान देण्याचा विचार ही देखील भारताची जगाला दिलेली देणगी आहे. 

ही नि:स्वार्थ भावना, त्याग आणि सेवाभाव हीच भारतीयांची ओळख आहे. 

या मानवी मूल्यांमुळेच भारताला जगभरात मान्यता मिळालेली आहे. आणि भारतासोबतच भारतीय वंशाच्या लोकांना, समाजालाही जगाने विशेष स्थान दिले आहे.

मित्रांनो, 

मी जेव्हाही कोणत्या देशाचा दौरा करतो, तेव्हा त्या देशातल्या भारतीय वंशाच्या लोकांना भेटण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा माझा प्रयत्न असतो. याचा दौऱ्यादरम्यान तुमच्यापैकी अनेक लोकांना भेटण्याची संधी मला मिळाली. माझ्या या प्रयत्नामुळेच मी आज ठामपणे सांगू शकतो की जगाशी भारताचे उत्तम संबंध कायम ठेवण्यात जर कोणी स्थायी राजदूत असतील तर ते भारतीय वंशाचे लोक आहेत. अनिवासी भारतीयांच्या संपर्कात राहणे, त्यांच्या समस्या जाणून घेत त्यावर उपाय शोधणे याचा आम्ही निरंतर प्रयत्न करत असतो.

पूर्वी अनिवासी भारतीयांसाठी एक वेगळे मंत्रालय असायचे, मात्र अनिवासी भारतीयांकडून आम्हाला कळले की परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधण्यात काही त्रुटी राहून जातात. या सूचनेवर विचार करून आम्ही दोन्ही मंत्रालयांना एक केले. तुम्हाला आठवत असेल, पूर्वी पीआयओ आणि ओसीआय या दोन वेगवेगळ्या योजना होत्या. अनेक लोकांना या दोन योजनांमधला फरकही कळत नसे. आम्ही या कार्डांची प्रक्रिया सुलभ केली आणि दोन्ही कार्ड योजना विलीन केल्या.

आमच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमाजी, फक्त भारतीय नागरिकच नाही तर अनिवासी भारतीयांना येणाऱ्या समस्यांवरही सतत नजर ठेवून असतात. दिवसाचे २४ तास त्या या समस्या निवारणासाठी सक्रीय असल्याचे तुम्हाला आढळेल. त्यांच्या नेतृत्वाखाली परराष्ट्र मंत्रालयाने वाणिज्यदूत तक्रारींचा त्याचं वेळी निपटारा करण्यासाठी ‘मदद’ पोर्टल सुरु केले आहे. आता दर दोन वर्षानी अनिवासी भारतीय दिवसाचे आयोजन केले जाते. त्याशिवाय प्रादेशिक स्तरावरही अनिवासी भारतीय दिवस साजरे केले जातात. अलीकडेच सिंगापूर इथे झालेल्या अशाच एका संमेलनात सुषमा स्वराज सहभागी झाल्या होत्या.

बंधू भगिनीनो,

आज आपण सगळे जण ज्या इमारतीत जमलो आहोत ती इमारत २ आक्टोबर २०१६ रोजी सगळ्या अनिवासी भारतीयांना समर्पित करण्यात आली होती. अगदी कमी काळात हे केंद्र अनिवासी भारतीयांसाठी एक महत्वाचे केंद्र ठरले आहे, ही खूप आनंदाची गोष्ट आहे.  इथे, या भवनात महात्मा गांधींच्या जीवनकार्याशी निगडीत प्रदर्शन सुरु करण्यात आले आहे, तुम्ही सर्वानी त्या प्रदर्शनाला भेट द्यावी अशी माझी आग्रही विनंती आहे. अनिवासी भारतीयांना भारताविषयी वाटणारी आत्मियता आम्हाला ‘भारत को जानीये’ या स्पर्धेला मिळालेल्या प्रतिसादातून जाणवली. या स्पर्धेला खूप भव्य प्रतिसाद मिळाला, सुमारे शंभर देशातील ५७०० पेक्षा अधिका अनिवासी भारतीयांनी यात भाग घेतला. भारताविषयी त्यांचा उत्साह त्यांच्या इच्छा आकांक्षा आमच्यासाठी फार उत्साहवर्धक ठरली. या प्रतिसादापासून प्रेरणा घेत यावर्षी आम्ही यावर्षी आणखी मोठ्या प्रमाणावर ही स्पर्धा आयोजित करतो आहोत.  

मित्रांनो,

आपापल्या कर्मभूमीत तुम्ही करत असलेल्या प्रगतीमुळे , त्या देशाला तुम्ही दिलेल्या योगदानामुळे, भारताचेही नाव उंचावते. आणि भारताच्या प्रगतीमुळे अनिवासी भारतीय समाजाची परदेशात प्रतिष्ठा वाढते. भारताच्या विकासासाठी आम्ही करत असलेल्या प्रयत्नात अनिवासी भारतीयही भागीदार आहेत असे आम्ही मानतो. नीती आयोगाने भारताच्या विकासासाठी २०२० चे उद्दिष्ट निश्चित करत जो अजेंडा ठरवला आहे त्यात अनिवासी भारतीय नागरीकाना विशेष स्थान दिले आहे.

बंधू- भगिनीनो, 

भारताच्या विकास यात्रेत आपला सहभाग देणाऱ्या अनिवासी भारतीयांसमोर अनेक मार्ग आहेत. अनिवासी नागरिकांकडून आज सर्वाधिक पैसा भारतात येतो.

भारताच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देणाऱ्या अनिवासी भारतीयांचे मी विशेष आभार मानतो. भारतात गुंतवणूक करणे हा अर्थव्यवस्थेशी संबंधित एक महत्वाचा मार्ग आहे. आज जगभरात थेट परदेशी गुंतवणुकीसाठी भारतात सर्वाधिक सोपी आणि आकर्षक व्यवस्था आहे. मात्र या व्यवस्थेविषयी परदेशात जागरूकता निर्माण करण्याचे आणि पर्यायाने गुंतवणूक वाढवण्याचे महत्वाचे काम अनिवासी भारतीय करत आहेत. तुमच्या समाजात तुमचे आज महत्वाचे स्थान आहे, याचा उपयोग करून आपण भारतासाठी परिवर्तनाचे साधन म्हणून भूमिका बजावू शकता. तसेच, याच संदर्भात, पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय वंशाचे नागरिक काम करू शकतात.

मित्रांनो,

आज जगातल्या अनेक मोठ्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नेते आपले अनिवासी भारतीय आहेत.भारतीय अर्थव्यवस्थेची त्यांना उत्तम जाण आहे. म्हणूनच, भारताच्या विकास यात्रेत त्यांनी दाखवलेल्या विश्वासासाठी आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो. आज परदेशात असलेला भारतीय नागरिक स्वतःला देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावणारा घटक समजतो. देशात आज सुरु असलेल्या सुधारणांचा भाग होण्याची त्याची इच्छा आहे.

जागतिक पटलावर भारताचे स्थान अधिकाधिक उंच व्हावे असे त्याला वाटते. देशाच्या सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनात तुमचा अनुभव अतिशय महत्वाचा आहे, याची आम्हाला जाणीव आहे. तुमच्या या अनुभवाचा देशाला लाभ मिळावा, यासाठी आम्ही ‘वज्र’ म्हणजेच ‘जवळपास सुरु असलेल्या संयुक्त संशोधन सुविधेला भेट द्या’ (VAJRA) ही योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत आपण भारतातल्या कोणत्याही संस्थेत एक ते तीन महिने काम करू शकता. आज या व्यासपीठावरून मी तुम्हा सर्वाना आवाहन करतो, की या योजनेशी संलग्न व्हा, तुमच्या ज्ञानाचा भारतीयाना लाभ होऊ द्या. देशातल्या युवकांना त्याचा लाभ मिळाला तर तुम्हालाही विशेष आनंद मिळेल. भारताच्या गरजा, त्याची बलस्थानं आणि वैशिष्ट्ये जगापर्यत पोचवण्याची क्षमता जितकी तुमची आहे, तितकी कदाचितच इतर कोणाची असेल.

जगाच्या आजच्या अस्थिर वातावरणात भारतीय सभ्यता आणि संस्कृतीची मूल्ये संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरू शकतात. जगात आज आरोग्याच्या काळजीविषयी एक चिंतेचे वातावरण आहे. अशावेळी तुम्ही जगाला प्राचीन भारतीय संस्कृतीमधील सर्वसमावेषक जीवनशैलीविषयी सांगू शकता. आज सगळे जग वेगवगेळ्या स्तरात आणि विचारसरणीमध्ये विभागून जात आहे, अशा स्थितीत सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या, ‘सबका साथ सबका विकास’ या भारतीय परंपरेविषयी तुम्ही सांगू शकता. आणि जगभरात कट्टरतावाद आणि धार्मिक तेढ वाढत असतांना, तुम्ही भारताच्या ‘सर्वपंथसमभाव’ या तत्वज्ञानाची ओळख जगाला करून देऊ शकता. 

मित्रांनो,

तुम्हा सगळ्यांना कल्पना असेलच की २०१९ मध्ये प्रयाग- अलाहाबाद येथे कुंभमेळ्याचे आयोजन केले जाणार आहे. आपल्या कुंभमेळ्याला युनेस्कोच्या “मानवी संस्कृतीतील अनाकलनीय गूढ परंपरा” या यादीत स्थान मिळाले आहे, हे आपल्या सर्वांसाठी गौरवास्पद आहे. उत्तरप्रदेश सरकारने या कुंभमेळ्याची जय्यत तयारी सुरु केली आहे. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की जेव्हा पुढच्या वर्षी तुम्ही भारतात याल तेव्हा प्रयाग दर्शनाच्या तयारीनेच या. एवढेच नाही तर तुमच्या देशातील नागरिकांनाही तुम्ही या मेळ्याच्या भव्य आयोजनाविषयी माहिती द्या. त्यांनाही भारतीय संकृतीची ओळख होईल. 

 बंधू-भगिनीनो,

जगापुढे आज अनेक गंभीर समस्या आहेत, ज्यांचा सामना करण्यासाठी गांधीजींचे विचार आजही उपयुक्त ठरतात. अहिंसा आणि सत्याच्या मार्गाने वाटचाल केली तर कोणताही प्रश्न सुटू शकतो. कट्टरतावाद आणि अतिवादापासून जगाला बाहेर काढायचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे महात्मा गांधी यांची विचारसरणी! भारतीय मूल्यांची विचारसरणी !

मित्रांनो,

 एक विकसित भारत निर्माण करण्यासाठी, नव्या भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत, एकत्रित प्रगती करू इच्छितो. या संमेलनादरम्यान तुमच्या विचारांचा लाभ, मार्गदर्शन आम्हाला मिळावे अशी आमची इच्छा आहे. न्यू इंडीयाच्या विकासाविषयी आम्हाला तुम्हाला काही सांगायचे आहे. तुमच्यासोबत काम करायचे आहे. तुम्ही जिथे असाल, ज्या देशात राहत असाल, तिथेच नव्या भारताच्या निर्मितीसाठी तुमचे सहकार्य घेण्याचा आमचा मानस आहे.

मित्रांनो,

एकविसाव्या शतकाला आशियाचे शतक म्हटले जाते. या शतकाच्या उभारणीत भारताची निश्चितच महत्वाची भूमिका आहे. या भूमिकेचा, भारताच्या वाढत्या प्रभावाचा परिणाम तुम्ही जिथे कुठे असाल तिथे तुम्हाला जाणवेल. भारताची वाढणारी ताकद, विकसित अर्थव्यवस्था बघून जेव्हा परदेशात तुमची मान उंचावेल, तेव्हा ते बघून आमची, आणखी काम करण्याची उमेद वाढेल. 

बंधू भगिनीनो ,

जागतिक व्यासपीठावर भारताने कायमच सकारात्मक भूमिका घेतली आहे. आम्ही कोणत्याही देशांशी नफ्या-तोट्याचे हिशेब मनात ठेवून वागलो नाहीत, तर त्याला नेहमीच मानवी दृष्टीकोनातून बघितले आहे.  

इतर देशांना विकासासाठी निधी देण्याची आमची पध्दत देखील ‘व्यवहार’ स्वरूपाची नाही. तर आम्ही नेहमीच त्या देशांचे प्राधान्यक्रम आणि त्यांच्या गरजा याला महत्व दिले. आम्ही कधीही कोणाचेही नैसर्गिक स्त्रोत किंवा  भूभाग बळकावण्याची इच्छा केली नाही. आमचा पूर्ण भर कायम क्षमता बांधणी आणि मनुष्यबळ विकासासावर होता आणि असेल. द्विपक्षीय, बहुपक्षीय चर्चा, संमेलने, बहरत-आफ्रिका शिक्र परिषद असो किंवा मग इतर काही, प्रत्येक जागतिक मंचावर आम्ही सर्वाना एकत्रित घेऊन वाटचाल करण्याचीच भूमिका मांडली आहे, तसा प्रयत्न केला आहे. 

आशियाना देशांशी असलेले संबंध अधिक मजबूत करत आम्ही ती संघटनाही अधिक मजबूत बनवली आहे. भारत आणि आशियान देशांचे संबंध आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याविषयीचे चित्र आपल्याला येणाऱ्या गणराज्य दिनाच्या कार्यक्रमातच बघायला मिळेल.

मित्रांनो,

सगळ्या जगात सुख शांतता, समृद्धी नांदावी, लोकशाही मूल्ये, सर्वसमावेशकता, सहकार्य आणि बंधुभाव याचे भारताने नेहमीच समर्थन केले आहे.  हे तेच सूत्र आहे, जी आपल्याला आपल्या मतदारांशी जोडते. जगात शांतता, समृद्धी नांदावी, यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत, आम्ही यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

मित्रांनो,

आमच्या निमंत्रणाचा स्वीकार करून, तुमच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून आपण सगळे इथे आलात, यासाठी मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. मला विश्वास आहे, की तुमच्या सक्रीय सहभागामुळे  हे संमेलन नक्कीच यशस्वी होईल. पुढच्या वर्षीच्या अनिवासी भारतीय दिवस संमेलनात तुम्हाला पुन्हा एकदा भेटण्याचा योग येईल अशी मी आशा करतो,

खूप खूप धन्यवाद ! जय हिंद !

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
'Will walk shoulder to shoulder': PM Modi pushes 'Make in India, Partner with India' at Russia-India forum

Media Coverage

'Will walk shoulder to shoulder': PM Modi pushes 'Make in India, Partner with India' at Russia-India forum
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Today, India is becoming the key growth engine of the global economy: PM Modi
December 06, 2025
India is brimming with confidence: PM
In a world of slowdown, mistrust and fragmentation, India brings growth, trust and acts as a bridge-builder: PM
Today, India is becoming the key growth engine of the global economy: PM
India's Nari Shakti is doing wonders, Our daughters are excelling in every field today: PM
Our pace is constant, Our direction is consistent, Our intent is always Nation First: PM
Every sector today is shedding the old colonial mindset and aiming for new achievements with pride: PM

आप सभी को नमस्कार।

यहां हिंदुस्तान टाइम्स समिट में देश-विदेश से अनेक गणमान्य अतिथि उपस्थित हैं। मैं आयोजकों और जितने साथियों ने अपने विचार रखें, आप सभी का अभिनंदन करता हूं। अभी शोभना जी ने दो बातें बताई, जिसको मैंने नोटिस किया, एक तो उन्होंने कहा कि मोदी जी पिछली बार आए थे, तो ये सुझाव दिया था। इस देश में मीडिया हाउस को काम बताने की हिम्मत कोई नहीं कर सकता। लेकिन मैंने की थी, और मेरे लिए खुशी की बात है कि शोभना जी और उनकी टीम ने बड़े चाव से इस काम को किया। और देश को, जब मैं अभी प्रदर्शनी देखके आया, मैं सबसे आग्रह करूंगा कि इसको जरूर देखिए। इन फोटोग्राफर साथियों ने इस, पल को ऐसे पकड़ा है कि पल को अमर बना दिया है। दूसरी बात उन्होंने कही और वो भी जरा मैं शब्दों को जैसे मैं समझ रहा हूं, उन्होंने कहा कि आप आगे भी, एक तो ये कह सकती थी, कि आप आगे भी देश की सेवा करते रहिए, लेकिन हिंदुस्तान टाइम्स ये कहे, आप आगे भी ऐसे ही सेवा करते रहिए, मैं इसके लिए भी विशेष रूप से आभार व्यक्त करता हूं।

साथियों,

इस बार समिट की थीम है- Transforming Tomorrow. मैं समझता हूं जिस हिंदुस्तान अखबार का 101 साल का इतिहास है, जिस अखबार पर महात्मा गांधी जी, मदन मोहन मालवीय जी, घनश्यामदास बिड़ला जी, ऐसे अनगिनत महापुरूषों का आशीर्वाद रहा, वो अखबार जब Transforming Tomorrow की चर्चा करता है, तो देश को ये भरोसा मिलता है कि भारत में हो रहा परिवर्तन केवल संभावनाओं की बात नहीं है, बल्कि ये बदलते हुए जीवन, बदलती हुई सोच और बदलती हुई दिशा की सच्ची गाथा है।

साथियों,

आज हमारे संविधान के मुख्य शिल्पी, डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी का महापरिनिर्वाण दिवस भी है। मैं सभी भारतीयों की तरफ से उन्हें श्रद्धांजलि अर्पित करता हूं।

Friends,

आज हम उस मुकाम पर खड़े हैं, जब 21वीं सदी का एक चौथाई हिस्सा बीत चुका है। इन 25 सालों में दुनिया ने कई उतार-चढ़ाव देखे हैं। फाइनेंशियल क्राइसिस देखी हैं, ग्लोबल पेंडेमिक देखी हैं, टेक्नोलॉजी से जुड़े डिसरप्शन्स देखे हैं, हमने बिखरती हुई दुनिया भी देखी है, Wars भी देख रहे हैं। ये सारी स्थितियां किसी न किसी रूप में दुनिया को चैलेंज कर रही हैं। आज दुनिया अनिश्चितताओं से भरी हुई है। लेकिन अनिश्चितताओं से भरे इस दौर में हमारा भारत एक अलग ही लीग में दिख रहा है, भारत आत्मविश्वास से भरा हुआ है। जब दुनिया में slowdown की बात होती है, तब भारत growth की कहानी लिखता है। जब दुनिया में trust का crisis दिखता है, तब भारत trust का pillar बन रहा है। जब दुनिया fragmentation की तरफ जा रही है, तब भारत bridge-builder बन रहा है।

साथियों,

अभी कुछ दिन पहले भारत में Quarter-2 के जीडीपी फिगर्स आए हैं। Eight परसेंट से ज्यादा की ग्रोथ रेट हमारी प्रगति की नई गति का प्रतिबिंब है।

साथियों,

ये एक सिर्फ नंबर नहीं है, ये strong macro-economic signal है। ये संदेश है कि भारत आज ग्लोबल इकोनॉमी का ग्रोथ ड्राइवर बन रहा है। और हमारे ये आंकड़े तब हैं, जब ग्लोबल ग्रोथ 3 प्रतिशत के आसपास है। G-7 की इकोनमीज औसतन डेढ़ परसेंट के आसपास हैं, 1.5 परसेंट। इन परिस्थितियों में भारत high growth और low inflation का मॉडल बना हुआ है। एक समय था, जब हमारे देश में खास करके इकोनॉमिस्ट high Inflation को लेकर चिंता जताते थे। आज वही Inflation Low होने की बात करते हैं।

साथियों,

भारत की ये उपलब्धियां सामान्य बात नहीं है। ये सिर्फ आंकड़ों की बात नहीं है, ये एक फंडामेंटल चेंज है, जो बीते दशक में भारत लेकर आया है। ये फंडामेंटल चेंज रज़ीलियन्स का है, ये चेंज समस्याओं के समाधान की प्रवृत्ति का है, ये चेंज आशंकाओं के बादलों को हटाकर, आकांक्षाओं के विस्तार का है, और इसी वजह से आज का भारत खुद भी ट्रांसफॉर्म हो रहा है, और आने वाले कल को भी ट्रांसफॉर्म कर रहा है।

साथियों,

आज जब हम यहां transforming tomorrow की चर्चा कर रहे हैं, हमें ये भी समझना होगा कि ट्रांसफॉर्मेशन का जो विश्वास पैदा हुआ है, उसका आधार वर्तमान में हो रहे कार्यों की, आज हो रहे कार्यों की एक मजबूत नींव है। आज के Reform और आज की Performance, हमारे कल के Transformation का रास्ता बना रहे हैं। मैं आपको एक उदाहरण दूंगा कि हम किस सोच के साथ काम कर रहे हैं।

साथियों,

आप भी जानते हैं कि भारत के सामर्थ्य का एक बड़ा हिस्सा एक लंबे समय तक untapped रहा है। जब देश के इस untapped potential को ज्यादा से ज्यादा अवसर मिलेंगे, जब वो पूरी ऊर्जा के साथ, बिना किसी रुकावट के देश के विकास में भागीदार बनेंगे, तो देश का कायाकल्प होना तय है। आप सोचिए, हमारा पूर्वी भारत, हमारा नॉर्थ ईस्ट, हमारे गांव, हमारे टीयर टू और टीय़र थ्री सिटीज, हमारे देश की नारीशक्ति, भारत की इनोवेटिव यूथ पावर, भारत की सामुद्रिक शक्ति, ब्लू इकोनॉमी, भारत का स्पेस सेक्टर, कितना कुछ है, जिसके फुल पोटेंशियल का इस्तेमाल पहले के दशकों में हो ही नहीं पाया। अब आज भारत इन Untapped पोटेंशियल को Tap करने के विजन के साथ आगे बढ़ रहा है। आज पूर्वी भारत में आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर, कनेक्टिविटी और इंडस्ट्री पर अभूतपूर्व निवेश हो रहा है। आज हमारे गांव, हमारे छोटे शहर भी आधुनिक सुविधाओं से लैस हो रहे हैं। हमारे छोटे शहर, Startups और MSMEs के नए केंद्र बन रहे हैं। हमारे गाँवों में किसान FPO बनाकर सीधे market से जुड़ें, और कुछ तो FPO’s ग्लोबल मार्केट से जुड़ रहे हैं।

साथियों,

भारत की नारीशक्ति तो आज कमाल कर रही हैं। हमारी बेटियां आज हर फील्ड में छा रही हैं। ये ट्रांसफॉर्मेशन अब सिर्फ महिला सशक्तिकरण तक सीमित नहीं है, ये समाज की सोच और सामर्थ्य, दोनों को transform कर रहा है।

साथियों,

जब नए अवसर बनते हैं, जब रुकावटें हटती हैं, तो आसमान में उड़ने के लिए नए पंख भी लग जाते हैं। इसका एक उदाहरण भारत का स्पेस सेक्टर भी है। पहले स्पेस सेक्टर सरकारी नियंत्रण में ही था। लेकिन हमने स्पेस सेक्टर में रिफॉर्म किया, उसे प्राइवेट सेक्टर के लिए Open किया, और इसके नतीजे आज देश देख रहा है। अभी 10-11 दिन पहले मैंने हैदराबाद में Skyroot के Infinity Campus का उद्घाटन किया है। Skyroot भारत की प्राइवेट स्पेस कंपनी है। ये कंपनी हर महीने एक रॉकेट बनाने की क्षमता पर काम कर रही है। ये कंपनी, flight-ready विक्रम-वन बना रही है। सरकार ने प्लेटफॉर्म दिया, और भारत का नौजवान उस पर नया भविष्य बना रहा है, और यही तो असली ट्रांसफॉर्मेशन है।

साथियों,

भारत में आए एक और बदलाव की चर्चा मैं यहां करना ज़रूरी समझता हूं। एक समय था, जब भारत में रिफॉर्म्स, रिएक्शनरी होते थे। यानि बड़े निर्णयों के पीछे या तो कोई राजनीतिक स्वार्थ होता था या फिर किसी क्राइसिस को मैनेज करना होता था। लेकिन आज नेशनल गोल्स को देखते हुए रिफॉर्म्स होते हैं, टारगेट तय है। आप देखिए, देश के हर सेक्टर में कुछ ना कुछ बेहतर हो रहा है, हमारी गति Constant है, हमारी Direction Consistent है, और हमारा intent, Nation First का है। 2025 का तो ये पूरा साल ऐसे ही रिफॉर्म्स का साल रहा है। सबसे बड़ा रिफॉर्म नेक्स्ट जेनरेशन जीएसटी का था। और इन रिफॉर्म्स का असर क्या हुआ, वो सारे देश ने देखा है। इसी साल डायरेक्ट टैक्स सिस्टम में भी बहुत बड़ा रिफॉर्म हुआ है। 12 लाख रुपए तक की इनकम पर ज़ीरो टैक्स, ये एक ऐसा कदम रहा, जिसके बारे में एक दशक पहले तक सोचना भी असंभव था।

साथियों,

Reform के इसी सिलसिले को आगे बढ़ाते हुए, अभी तीन-चार दिन पहले ही Small Company की डेफिनीशन में बदलाव किया गया है। इससे हजारों कंपनियाँ अब आसान नियमों, तेज़ प्रक्रियाओं और बेहतर सुविधाओं के दायरे में आ गई हैं। हमने करीब 200 प्रोडक्ट कैटगरीज़ को mandatory क्वालिटी कंट्रोल ऑर्डर से बाहर भी कर दिया गया है।

साथियों,

आज के भारत की ये यात्रा, सिर्फ विकास की नहीं है। ये सोच में बदलाव की भी यात्रा है, ये मनोवैज्ञानिक पुनर्जागरण, साइकोलॉजिकल रेनसां की भी यात्रा है। आप भी जानते हैं, कोई भी देश बिना आत्मविश्वास के आगे नहीं बढ़ सकता। दुर्भाग्य से लंबी गुलामी ने भारत के इसी आत्मविश्वास को हिला दिया था। और इसकी वजह थी, गुलामी की मानसिकता। गुलामी की ये मानसिकता, विकसित भारत के लक्ष्य की प्राप्ति में एक बहुत बड़ी रुकावट है। और इसलिए, आज का भारत गुलामी की मानसिकता से मुक्ति पाने के लिए काम कर रहा है।

साथियों,

अंग्रेज़ों को अच्छी तरह से पता था कि भारत पर लंबे समय तक राज करना है, तो उन्हें भारतीयों से उनके आत्मविश्वास को छीनना होगा, भारतीयों में हीन भावना का संचार करना होगा। और उस दौर में अंग्रेजों ने यही किया भी। इसलिए, भारतीय पारिवारिक संरचना को दकियानूसी बताया गया, भारतीय पोशाक को Unprofessional करार दिया गया, भारतीय त्योहार-संस्कृति को Irrational कहा गया, योग-आयुर्वेद को Unscientific बता दिया गया, भारतीय अविष्कारों का उपहास उड़ाया गया और ये बातें कई-कई दशकों तक लगातार दोहराई गई, पीढ़ी दर पीढ़ी ये चलता गया, वही पढ़ा, वही पढ़ाया गया। और ऐसे ही भारतीयों का आत्मविश्वास चकनाचूर हो गया।

साथियों,

गुलामी की इस मानसिकता का कितना व्यापक असर हुआ है, मैं इसके कुछ उदाहरण आपको देना चाहता हूं। आज भारत, दुनिया की सबसे तेज़ी से ग्रो करने वाली मेजर इकॉनॉमी है, कोई भारत को ग्लोबल ग्रोथ इंजन बताता है, कोई, Global powerhouse कहता है, एक से बढ़कर एक बातें आज हो रही हैं।

लेकिन साथियों,

आज भारत की जो तेज़ ग्रोथ हो रही है, क्या कहीं पर आपने पढ़ा? क्या कहीं पर आपने सुना? इसको कोई, हिंदू रेट ऑफ ग्रोथ कहता है क्या? दुनिया की तेज इकॉनमी, तेज ग्रोथ, कोई कहता है क्या? हिंदू रेट ऑफ ग्रोथ कब कहा गया? जब भारत, दो-तीन परसेंट की ग्रोथ के लिए तरस गया था। आपको क्या लगता है, किसी देश की इकोनॉमिक ग्रोथ को उसमें रहने वाले लोगों की आस्था से जोड़ना, उनकी पहचान से जोड़ना, क्या ये अनायास ही हुआ होगा क्या? जी नहीं, ये गुलामी की मानसिकता का प्रतिबिंब था। एक पूरे समाज, एक पूरी परंपरा को, अन-प्रोडक्टिविटी का, गरीबी का पर्याय बना दिया गया। यानी ये सिद्ध करने का प्रयास किया गया कि, भारत की धीमी विकास दर का कारण, हमारी हिंदू सभ्यता और हिंदू संस्कृति है। और हद देखिए, आज जो तथाकथित बुद्धिजीवी हर चीज में, हर बात में सांप्रदायिकता खोजते रहते हैं, उनको हिंदू रेट ऑफ ग्रोथ में सांप्रदायिकता नज़र नहीं आई। ये टर्म, उनके दौर में किताबों का, रिसर्च पेपर्स का हिस्सा बना दिया गया।

साथियों,

गुलामी की मानसिकता ने भारत में मैन्युफेक्चरिंग इकोसिस्टम को कैसे तबाह कर दिया, और हम इसको कैसे रिवाइव कर रहे हैं, मैं इसके भी कुछ उदाहरण दूंगा। भारत गुलामी के कालखंड में भी अस्त्र-शस्त्र का एक बड़ा निर्माता था। हमारे यहां ऑर्डिनेंस फैक्ट्रीज़ का एक सशक्त नेटवर्क था। भारत से हथियार निर्यात होते थे। विश्व युद्धों में भी भारत में बने हथियारों का बोल-बाला था। लेकिन आज़ादी के बाद, हमारा डिफेंस मैन्युफेक्चरिंग इकोसिस्टम तबाह कर दिया गया। गुलामी की मानसिकता ऐसी हावी हुई कि सरकार में बैठे लोग भारत में बने हथियारों को कमजोर आंकने लगे, और इस मानसिकता ने भारत को दुनिया के सबसे बड़े डिफेंस importers के रूप में से एक बना दिया।

साथियों,

गुलामी की मानसिकता ने शिप बिल्डिंग इंडस्ट्री के साथ भी यही किया। भारत सदियों तक शिप बिल्डिंग का एक बड़ा सेंटर था। यहां तक कि 5-6 दशक पहले तक, यानी 50-60 साल पहले, भारत का फोर्टी परसेंट ट्रेड, भारतीय जहाजों पर होता था। लेकिन गुलामी की मानसिकता ने विदेशी जहाज़ों को प्राथमिकता देनी शुरु की। नतीजा सबके सामने है, जो देश कभी समुद्री ताकत था, वो अपने Ninety five परसेंट व्यापार के लिए विदेशी जहाज़ों पर निर्भर हो गया है। और इस वजह से आज भारत हर साल करीब 75 बिलियन डॉलर, यानी लगभग 6 लाख करोड़ रुपए विदेशी शिपिंग कंपनियों को दे रहा है।

साथियों,

शिप बिल्डिंग हो, डिफेंस मैन्यूफैक्चरिंग हो, आज हर सेक्टर में गुलामी की मानसिकता को पीछे छोड़कर नए गौरव को हासिल करने का प्रयास किया जा रहा है।

साथियों,

गुलामी की मानसिकता ने एक बहुत बड़ा नुकसान, भारत में गवर्नेंस की अप्रोच को भी किया है। लंबे समय तक सरकारी सिस्टम का अपने नागरिकों पर अविश्वास रहा। आपको याद होगा, पहले अपने ही डॉक्यूमेंट्स को किसी सरकारी अधिकारी से अटेस्ट कराना पड़ता था। जब तक वो ठप्पा नहीं मारता है, सब झूठ माना जाता था। आपका परिश्रम किया हुआ सर्टिफिकेट। हमने ये अविश्वास का भाव तोड़ा और सेल्फ एटेस्टेशन को ही पर्याप्त माना। मेरे देश का नागरिक कहता है कि भई ये मैं कह रहा हूं, मैं उस पर भरोसा करता हूं।

साथियों,

हमारे देश में ऐसे-ऐसे प्रावधान चल रहे थे, जहां ज़रा-जरा सी गलतियों को भी गंभीर अपराध माना जाता था। हम जन-विश्वास कानून लेकर आए, और ऐसे सैकड़ों प्रावधानों को डी-क्रिमिनलाइज किया है।

साथियों,

पहले बैंक से हजार रुपए का भी लोन लेना होता था, तो बैंक गारंटी मांगता था, क्योंकि अविश्वास बहुत अधिक था। हमने मुद्रा योजना से अविश्वास के इस कुचक्र को तोड़ा। इसके तहत अभी तक 37 lakh crore, 37 लाख करोड़ रुपए की गारंटी फ्री लोन हम दे चुके हैं देशवासियों को। इस पैसे से, उन परिवारों के नौजवानों को भी आंत्रप्रन्योर बनने का विश्वास मिला है। आज रेहड़ी-पटरी वालों को भी, ठेले वाले को भी बिना गारंटी बैंक से पैसा दिया जा रहा है।

साथियों,

हमारे देश में हमेशा से ये माना गया कि सरकार को अगर कुछ दे दिया, तो फिर वहां तो वन वे ट्रैफिक है, एक बार दिया तो दिया, फिर वापस नहीं आता है, गया, गया, यही सबका अनुभव है। लेकिन जब सरकार और जनता के बीच विश्वास मजबूत होता है, तो काम कैसे होता है? अगर कल अच्छी करनी है ना, तो मन आज अच्छा करना पड़ता है। अगर मन अच्छा है तो कल भी अच्छा होता है। और इसलिए हम एक और अभियान लेकर आए, आपको सुनकर के ताज्जुब होगा और अभी अखबारों में उसकी, अखबारों वालों की नजर नहीं गई है उस पर, मुझे पता नहीं जाएगी की नहीं जाएगी, आज के बाद हो सकता है चली जाए।

आपको ये जानकर हैरानी होगी कि आज देश के बैंकों में, हमारे ही देश के नागरिकों का 78 thousand crore रुपया, 78 हजार करोड़ रुपए Unclaimed पड़ा है बैंको में, पता नहीं कौन है, किसका है, कहां है। इस पैसे को कोई पूछने वाला नहीं है। इसी तरह इन्श्योरेंश कंपनियों के पास करीब 14 हजार करोड़ रुपए पड़े हैं। म्यूचुअल फंड कंपनियों के पास करीब 3 हजार करोड़ रुपए पड़े हैं। 9 हजार करोड़ रुपए डिविडेंड का पड़ा है। और ये सब Unclaimed पड़ा हुआ है, कोई मालिक नहीं उसका। ये पैसा, गरीब और मध्यम वर्गीय परिवारों का है, और इसलिए, जिसके हैं वो तो भूल चुका है। हमारी सरकार अब उनको ढूंढ रही है देशभर में, अरे भई बताओ, तुम्हारा तो पैसा नहीं था, तुम्हारे मां बाप का तो नहीं था, कोई छोड़कर तो नहीं चला गया, हम जा रहे हैं। हमारी सरकार उसके हकदार तक पहुंचने में जुटी है। और इसके लिए सरकार ने स्पेशल कैंप लगाना शुरू किया है, लोगों को समझा रहे हैं, कि भई देखिए कोई है तो अता पता। आपके पैसे कहीं हैं क्या, गए हैं क्या? अब तक करीब 500 districts में हम ऐसे कैंप लगाकर हजारों करोड़ रुपए असली हकदारों को दे चुके हैं जी। पैसे पड़े थे, कोई पूछने वाला नहीं था, लेकिन ये मोदी है, ढूंढ रहा है, अरे यार तेरा है ले जा।

साथियों,

ये सिर्फ asset की वापसी का मामला नहीं है, ये विश्वास का मामला है। ये जनता के विश्वास को निरंतर हासिल करने की प्रतिबद्धता है और जनता का विश्वास, यही हमारी सबसे बड़ी पूंजी है। अगर गुलामी की मानसिकता होती तो सरकारी मानसी साहबी होता और ऐसे अभियान कभी नहीं चलते हैं।

साथियों,

हमें अपने देश को पूरी तरह से, हर क्षेत्र में गुलामी की मानसिकता से पूर्ण रूप से मुक्त करना है। अभी कुछ दिन पहले मैंने देश से एक अपील की है। मैं आने वाले 10 साल का एक टाइम-फ्रेम लेकर, देशवासियों को मेरे साथ, मेरी बातों को ये कुछ करने के लिए प्यार से आग्रह कर रहा हूं, हाथ जोड़कर विनती कर रहा हूं। 140 करोड़ देशवसियों की मदद के बिना ये मैं कर नहीं पाऊंगा, और इसलिए मैं देशवासियों से बार-बार हाथ जोड़कर कह रहा हूं, और 10 साल के इस टाइम फ्रैम में मैं क्या मांग रहा हूं? मैकाले की जिस नीति ने भारत में मानसिक गुलामी के बीज बोए थे, उसको 2035 में 200 साल पूरे हो रहे हैं, Two hundred year हो रहे हैं। यानी 10 साल बाकी हैं। और इसलिए, इन्हीं दस वर्षों में हम सभी को मिलकर के, अपने देश को गुलामी की मानसिकता से मुक्त करके रहना चाहिए।

साथियों,

मैं अक्सर कहता हूं, हम लीक पकड़कर चलने वाले लोग नहीं हैं। बेहतर कल के लिए, हमें अपनी लकीर बड़ी करनी ही होगी। हमें देश की भविष्य की आवश्यकताओं को समझते हुए, वर्तमान में उसके हल तलाशने होंगे। आजकल आप देखते हैं कि मैं मेक इन इंडिया और आत्मनिर्भर भारत अभियान पर लगातार चर्चा करता हूं। शोभना जी ने भी अपने भाषण में उसका उल्लेख किया। अगर ऐसे अभियान 4-5 दशक पहले शुरू हो गए होते, तो आज भारत की तस्वीर कुछ और होती। लेकिन तब जो सरकारें थीं उनकी प्राथमिकताएं कुछ और थीं। आपको वो सेमीकंडक्टर वाला किस्सा भी पता ही है, करीब 50-60 साल पहले, 5-6 दशक पहले एक कंपनी, भारत में सेमीकंडक्टर प्लांट लगाने के लिए आई थी, लेकिन यहां उसको तवज्जो नहीं दी गई, और देश सेमीकंडक्टर मैन्युफैक्चरिंग में इतना पिछड़ गया।

साथियों,

यही हाल एनर्जी सेक्टर की भी है। आज भारत हर साल करीब-करीब 125 लाख करोड़ रुपए के पेट्रोल-डीजल-गैस का इंपोर्ट करता है, 125 लाख करोड़ रुपया। हमारे देश में सूर्य भगवान की इतनी बड़ी कृपा है, लेकिन फिर भी 2014 तक भारत में सोलर एनर्जी जनरेशन कपैसिटी सिर्फ 3 गीगावॉट थी, 3 गीगावॉट थी। 2014 तक की मैं बात कर रहा हूं, जब तक की आपने मुझे यहां लाकर के बिठाया नहीं। 3 गीगावॉट, पिछले 10 वर्षों में अब ये बढ़कर 130 गीगावॉट के आसपास पहुंच चुकी है। और इसमें भी भारत ने twenty two गीगावॉट कैपेसिटी, सिर्फ और सिर्फ rooftop solar से ही जोड़ी है। 22 गीगावाट एनर्जी रूफटॉप सोलर से।

साथियों,

पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना ने, एनर्जी सिक्योरिटी के इस अभियान में देश के लोगों को सीधी भागीदारी करने का मौका दे दिया है। मैं काशी का सांसद हूं, प्रधानमंत्री के नाते जो काम है, लेकिन सांसद के नाते भी कुछ काम करने होते हैं। मैं जरा काशी के सांसद के नाते आपको कुछ बताना चाहता हूं। और आपके हिंदी अखबार की तो ताकत है, तो उसको तो जरूर काम आएगा। काशी में 26 हजार से ज्यादा घरों में पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना के सोलर प्लांट लगे हैं। इससे हर रोज, डेली तीन लाख यूनिट से अधिक बिजली पैदा हो रही है, और लोगों के करीब पांच करोड़ रुपए हर महीने बच रहे हैं। यानी साल भर के साठ करोड़ रुपये।

साथियों,

इतनी सोलर पावर बनने से, हर साल करीब नब्बे हज़ार, ninety thousand मीट्रिक टन कार्बन एमिशन कम हो रहा है। इतने कार्बन एमिशन को खपाने के लिए, हमें चालीस लाख से ज्यादा पेड़ लगाने पड़ते। और मैं फिर कहूंगा, ये जो मैंने आंकडे दिए हैं ना, ये सिर्फ काशी के हैं, बनारस के हैं, मैं देश की बात नहीं बता रहा हूं आपको। आप कल्पना कर सकते हैं कि, पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना, ये देश को कितना बड़ा फायदा हो रहा है। आज की एक योजना, भविष्य को Transform करने की कितनी ताकत रखती है, ये उसका Example है।

वैसे साथियों,

अभी आपने मोबाइल मैन्यूफैक्चरिंग के भी आंकड़े देखे होंगे। 2014 से पहले तक हम अपनी ज़रूरत के 75 परसेंट मोबाइल फोन इंपोर्ट करते थे, 75 परसेंट। और अब, भारत का मोबाइल फोन इंपोर्ट लगभग ज़ीरो हो गया है। अब हम बहुत बड़े मोबाइल फोन एक्सपोर्टर बन रहे हैं। 2014 के बाद हमने एक reform किया, देश ने Perform किया और उसके Transformative नतीजे आज दुनिया देख रही है।

साथियों,

Transforming tomorrow की ये यात्रा, ऐसी ही अनेक योजनाओं, अनेक नीतियों, अनेक निर्णयों, जनआकांक्षाओं और जनभागीदारी की यात्रा है। ये निरंतरता की यात्रा है। ये सिर्फ एक समिट की चर्चा तक सीमित नहीं है, भारत के लिए तो ये राष्ट्रीय संकल्प है। इस संकल्प में सबका साथ जरूरी है, सबका प्रयास जरूरी है। सामूहिक प्रयास हमें परिवर्तन की इस ऊंचाई को छूने के लिए अवसर देंगे ही देंगे।

साथियों,

एक बार फिर, मैं शोभना जी का, हिन्दुस्तान टाइम्स का बहुत आभारी हूं, कि आपने मुझे अवसर दिया आपके बीच आने का और जो बातें कभी-कभी बताई उसको आपने किया और मैं तो मानता हूं शायद देश के फोटोग्राफरों के लिए एक नई ताकत बनेगा ये। इसी प्रकार से अनेक नए कार्यक्रम भी आप आगे के लिए सोच सकते हैं। मेरी मदद लगे तो जरूर मुझे बताना, आईडिया देने का मैं कोई रॉयल्टी नहीं लेता हूं। मुफ्त का कारोबार है और मारवाड़ी परिवार है, तो मौका छोड़ेगा ही नहीं। बहुत-बहुत धन्यवाद आप सबका, नमस्कार।