बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे सुरक्षा सल्लागार मेजर जनरल (निवृत्त) तारिक अहमद सिद्दिक यांनी आज पंतप्रधान मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. पंतप्रधानांनी या भेटीदरम्यान मार्च 2021 मधील आपल्या बांग्लादेश भेटीच्या आठवणींना उजाळा दिला, तसेच पंतप्रधान शेख हसीना यांच्याप्रती सदिच्छा व्यक्त केली.

भारत व  बांग्लादेश मधील मैत्रीचे संबंध बळकट करण्यासाठी, तसेच कोविड-19 महामारीदरम्यान बांग्लादेशच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी सिद्दीक यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

पंतप्रधान शेख हसीना त्यांच्या नेतृत्वाखाली बांग्लादेशची सर्वांगीण प्रगती सुनिश्चित करत असल्याची प्रशंसा करत पंतप्रधानांनी यापुढेही भारत बांग्लादेश यांच्यातील मैत्री बळकट करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्याची वचनबद्धता प्रकट केली.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India among Asia's fastest-growing green economies with $110 billion revenue in 2025: LSEG

Media Coverage

India among Asia's fastest-growing green economies with $110 billion revenue in 2025: LSEG
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 26 जून 2026
June 26, 2026

From Buyer to Supplier: PM Modi's India Achieves Record Defence Exports, Tech Investments & Strategic Autonomy