पंतप्रधानांनी, कोविड-19 विरोधातल्या आतापर्यंच्या लढ्यात देशातील आरोग्य क्षेत्रातल्या सर्वांचे मानले आभार
पंतप्रधानांनी डॉक्टरांची समाजासाठीची परिवर्तनकारी भूमिका आणि सामाजिक प्रभाव यावर दिला भर
कोविड व्यवस्थापनाचा अनुभव असलेल्या शहरातल्या डॉक्टरांनी सहयोग, प्रशिक्षण, ऑनलाइन मार्गदर्शन यामाध्यमातून पुरेशा सुविधा नसलेल्या भागापर्यंत पोहचावे- पंतप्रधानांचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-19 शी  संबंधित मुद्दे आणि लसीकरणाच्या प्रगतीबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातील डॉक्टरांसोबत आज चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महामारीच्या काळात अमूल्य सेवा दिल्याबद्दल डॉक्टर्स, चिकित्सा कर्मचारी आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली.

पंतप्रधान मोदी म्हणाले की गेल्या वर्षी याच दरम्यान आपल्या डॉक्टरांचे अथक परिश्रम आणि देशाच्या धोरणामुळे आपण कोरोना विषाणूची लाट थोपवण्यात सक्षम राहिलो.

देश आज जेव्हा कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे, सर्व डॉक्टर्स आणि आपले कार्यकर्ते महामारीचा सामना करत आहेत आणि लाखो लोकांचं जीवन वाचवत आहेत.

पंतप्रधान मोदी म्हणाले की सध्याच केंद्र सरकारने आवश्यक औषधांचा पुरवठा, इंजेक्शन आणि ऑक्सीजनची पुरेशी उपलब्धता या संबंधित अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारांना याबाबबत अनेक आवश्यक दिशा-निर्देश देण्यात आले आहेत.

कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत लसीकरण हे सर्वात मोठं शस्त्र आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले. अधिकाधिक व्यक्तींनी लसीकरण करून घ्यावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे असे आवाहन त्यांनी डॉक्टरांना केले. कोविड महामारी रोखण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न आणि उपचाराबाबत पसरत असलेल्या अफवा निष्फळ करण्यासाठी डॉक्टरांनी नागरिकांना शिक्षित करावे असे आवाहनही पंतप्रधानांनी केले. या कठीण काळात नागरिकांवर भीतीचे सावट पसरू नये हे अत्यंत महत्वपूर्ण आहे असे मोदी म्हणाले .

यासाठी योग्य उपचाराबरोबरच रुग्णालयात रुग्णांच्या समुपदेशनावरही त्यांनी भर दिला. आपत्कालीन स्थिती नसेल तिथे डॉक्टरांनी टेली मेडीसिनचा उपयोग करावा असे ते म्हणाले.

यावेळी महामारी देशातील  दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरांमध्येही वेगाने पसरत आहे. अशा शहरांमधे पायाभूत सुविधा वाढवण्याच्या प्रयत्नांमधे गती आणण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.  मोठ्या शहरांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतल्या शहरांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना ऑनलाईन मार्गदर्शन करावे. यामुळे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे याची खातरजमा होईल.

डॉक्टरांनी यावेळी कोविड महामारीचा सामना करतानाचे आपले अनुभव मांडले. महामारी रोखण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या प्रयत्नांसाठी त्यांनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या.

आरोग्यसेवेच्या पायाभूत संरचनेत आपण कशा प्रकारे वाढ करत आहोत याची माहितीही डॉक्टरांनी यावेळी दिली. मास्कचा वापर आणि सुरक्षित अंतर राखावे याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.

कोविड रुग्ण नसलेल्यांसाठी आरोग्य व्यवस्था उत्तम राखण्यावरही त्यांनी भर दिला. औषधांच्या गैरवापराबाबत रुग्णांना कशाप्रकारे ते जागृत करत आहेत याची माहितीही त्यांनी दिली.

बैठकीला केन्द्रीय आरोग्य मंत्री श्री हर्षवर्धन, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्‍य मंत्री श्री अश्विनी कुमार चौबे, केन्द्रीय रसायन और खते मंत्री श्री डी.वी. सदानंद गौड़ा आणि  राज्‍य मंत्री मनसुख मांडविय, पंतप्रधानाचे प्रधान सचिव, डॉ. वी.के. पॉल सदस्य (आरोग्य ) नीति आयोग, कॅबिनेट सचिव, केंद्रीय आरोग्य सचिव, केंद्रीय औषध सचिव, केन्‍द्र सरकारच्या मंत्रालय / विभागांचे अन्य अधिकारी यासोबतच आईसीएमआरचे महासंचालक, डॉ. बलराम भार्गव ही उपस्थित हाेते.

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM Modi Meets Amazon CEO Andy Jassy, Tech Giant To Invest $48 Billion In India By 2030

Media Coverage

PM Modi Meets Amazon CEO Andy Jassy, Tech Giant To Invest $48 Billion In India By 2030
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister pays homage to Bankim Chandra Chattopadhyay on His Jayanti
June 26, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi, today, paid tributes to the great Bankim Chandra Chattopadhyay on his Jayanti, remembering him as a towering literary luminary whose writings ignited the spirit of patriotism and cultural pride among generations of Indians.

Highlighting the significance of the year, Shri Modi noted that India is commemorating the 150th anniversary of Vande Mataram. He remarked that through Vande Mataram, Bankim Chandra Chattopadhyay gifted the Indian freedom movement and the nation one of its most enduring sources of inspiration.

The Prime Minister posted on X:

Tributes to the great Bankim Chandra Chattopadhyay on his Jayanti.

A towering literary luminary, his writings awakened a spirit of patriotism and cultural pride among generations of Indians. His rich literary work continues to illuminate minds and strengthen our collective resolve towards nation-building.

This is a time when we are marking the 150th anniversary of Vande Mataram. Through Vande Mataram, he gifted the freedom movement and our nation one of its most enduring inspirations.

মহান বঙ্কিম চন্দ্র চট্টোপাধ্যায়ের জয়ন্তীতে তাঁর প্রতি শ্রদ্ধাঞ্জলি।

এক সুবিশাল সাহিত্যিক আলোকবর্তিকা হিসেবে, তাঁর লেখা প্রজন্মান্তরের ভারতীয়দের মধ্যে দেশপ্রেম এবং সাংস্কৃতিক গৌরবের চেতনা জাগ্রত করেছিল। তাঁর সমৃদ্ধ সাহিত্যকর্ম মনকে উদ্ভাসিত করে চলেছে এবং জাতি গঠনের প্রতি আমাদের সম্মিলিত সংকল্পকে শক্তিশালী করছে।

এখন আমরা বন্দে মাতরমের ১৫০তম বার্ষিকী উদযাপন করছি। বন্দে মাতরমের মাধ্যমে, তিনি স্বাধীনতা আন্দোলন এবং আমাদের জাতিকে অন্যতম দীর্ঘস্থায়ী অনুপ্রেরণা উপহার দিয়েছিলেন।