पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन षण्मुगरत्नम यांची भेट घेतली.

 

भारत - सिंगापूर भागीदारीसाठी राष्ट्रपती थर्मन यांच्या  समर्थनाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या द्विपक्षीय आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. विश्वास, परस्परांचा आदर आणि पूरकतेवर आधारित दोन्ही देशांमधील दीर्घकालीन मैत्री आणि सहकार्याची त्यांनी नोंद घेतली. या संदर्भात, त्यांनी नमूद केले की हे संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीत रूपांतरित झाल्यामुळे संयुक्त सहकार्यासाठी पुढे जाण्याचा एक ठोस मार्ग आखला जाईल. प्रगत उत्पादन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यासारख्या नवीन क्षेत्रांमध्ये भारत आणि सिंगापूर कशा प्रकारे सहकार्याचा विस्तार करू शकतात यावर त्यांनी विचार सामायिक केले. पुढील वर्षी राष्ट्रपती थर्मन यांचे भारतात स्वागत करण्यास उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
How GST 2.0 changed India’s car market and boosted small car sales

Media Coverage

How GST 2.0 changed India’s car market and boosted small car sales
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 19 मे 2026
May 19, 2026

Exports Up, Economy Strong, World Collaborating: PM Modi's Reforms Delivering Jobs, Growth & Green Future