जी7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीतील अपुलिया इथे गेले असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  युनायटेड किंगडम (युके) चे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह द्विपक्षीय बैठक घेतली. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून आल्याबद्दल मोदी यांचे सुनक यांनी अभिनंदन केले. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार या बैठकीत केला.

 

उच्चस्तरीय राजकीय संवाद, संरक्षण व सुरक्षा, व्यापार व आर्थिक सहयोग, महत्त्वाची व उच्च तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रे आणि दोन्ही देशांतील जनतेतील परस्परसंबंध यांसह सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीतील प्रगतीबद्दल आनंद व्यक्त करत दोन नेत्यांनी ‘रोडमॅप 2030’च्या अंमलबजावणीविषयी चर्चा केली. मुक्त व्यापार कराराबाबत दोन्ही देशांत झालेल्या प्रगतीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय महत्त्वाच्या प्रादेशिक व बहुपक्षीय मुद्यांवर चर्चा केली.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनायटेड किंगडममध्ये पुढच्या महिन्यात होणार असलेल्या निवडणुकांच्या तयारीसाठी त्या देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या.

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
'Housing for all' by 2029: Centre approves Rs 10,021 crore fund for PMAY-G in 12 states

Media Coverage

'Housing for all' by 2029: Centre approves Rs 10,021 crore fund for PMAY-G in 12 states
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 3 जून 2026
June 03, 2026

One Vision, Many Fronts: How PM Modi is Building Viksit Bharat Across Tech, Defense, Green Energy & Welfare