पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेदरलँड्सचे पंतप्रधान महामहिम रॉब जेटन यांच्यासमवेत नेदरलँड्समधील जलव्यवस्थापनासाठी प्रसिद्ध असलेल्या अफ्स्लाउटडाइक या धरणाला भेट दिली.

या भेटीद्वारे नाविन्यपूर्ण जलव्यवस्थापन उपाययोजना, हवामान लवचिकता आणि शाश्वत पायाभूत सुविधांप्रति दोन्ही देशांची सामायिक बांधिलकी अधोरेखित झाली. 32 किलोमीटर लांबीचे अफ्स्लाउटडाइक धरण आणि मार्गिका ही पूरनियंत्रण आणि भूमी सुधारणा क्षेत्रातील जागतिक स्तरावरील आदर्श संरचना मानली जाते. ही संरचना नेदरलँड्सच्या मोठ्या भूभागाचे उत्तर समुद्रापासून संरक्षण करते तसेच गोड्या पाण्याच्या साठवणीलाही सक्षम करते.

या धरणभेटीदरम्यान अफ्स्लाउटडाइक आणि गुजरात राज्यातील भारताच्या महत्त्वाकांक्षी कल्पसर प्रकल्पातील साम्य अधोरेखित करण्यात आले. कल्पसर प्रकल्पाचा उद्देश खंभातच्या आखातावर गोड्या पाण्याचा साठा निर्माण करणे असून त्यात भरती ओहोटीवर आधारित ऊर्जा निर्मिती, सिंचन आणि वाहतूक पायाभूत सुविधांचा समावेश आहे. या संदर्भात भारताच्या जलशक्ती मंत्रालय आणि नेदरलँड्सच्या पायाभूत सुविधा व जलव्यवस्थापन मंत्रालय यांच्यात कल्पसर प्रकल्पावरील तांत्रिक सहकार्यासाठी इरादा पत्रावर स्वाक्षरी झाल्याचे दोन्ही बाजूंनी स्वागत करण्यात आले.

दोन्ही नेत्यांनी नमूद केले की, जलअभियांत्रिकी क्षेत्रातील नेदरलँड्सचे कौशल्य आणि भारताची व्यापक अंमलबजावणी क्षमता यामुळे परस्पर लाभदायी भागीदारीच्या अनेक संधी उपलब्ध होतात. या भेटीद्वारे जलविषयक भारत-नेदरलँड्स धोरणात्मक भागीदारीची पुष्टी झाली असून नाविन्य आणि शाश्वततेप्रति असलेली समान बांधिलकी अधोरेखित झाली.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's manufacturing outlook remains resilient despite global headwinds; machine tools, metals and auto lead optimism

Media Coverage

India's manufacturing outlook remains resilient despite global headwinds; machine tools, metals and auto lead optimism
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 1 जुलै 2026
July 01, 2026

PM Modi's Vision: Driving Digital Empowerment, Inclusive Development and India's Global Rise