पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक 6 मार्च रोजी उत्तराखंडला भेट देणार आहेत.सकाळी 9:30 च्या सुमारास ते मुखवा या हिवाळा ऋतूतील वास्तव्यस्थानी गंगामातेची पूजा करून दर्शन घेतील.सकाळी सुमारे 10:40 वाजता, ते एका ट्रेक आणि बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवतील आणि हरसिलमधील एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत उपस्थितांना संबोधित करतील.
उत्तराखंड सरकारने यावर्षी हिवाळी पर्यटन उपक्रमास आरंभ केला आहे. हजारो भाविकांनी आधीच गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथला हिवाळा ऋतूत भेट दिली आहे. धार्मिक पर्यटनाला चालना देणे,स्थानिक अर्थव्यवस्थेला गती देणे, गृहआतिथ्य, पर्यटन व्यवसाय यासह इतर उद्योगांना चालना देणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.


