पंतप्रधानांच्या हस्ते 5500 कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण आणि पायाभरणी
रस्ते आणि रेल्वे क्षेत्रातील अनेक पायाभूत सेवा सुविधा प्रकल्पांमुळे व्यापार आणि वाणिज्य क्षेत्राला चालना मिळेल
पंतप्रधानांच्या हस्ते उदयपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाची पायाभरणी केली जाईल
पंतप्रधान अबू रोड येथील ब्रह्माकुमारी यांच्या शांतीवन संकुलाला देणार भेट, बहुउद्देशीय धर्मादाय जागतिक रुग्णालयाची करणार पायाभरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 मे रोजी राजस्थानला भेट देणार आहेत. सकाळी 11 वाजता, पंतप्रधान नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरात दर्शन घेतील. सकाळी 11:45 सुमारास, नाथद्वारा मधील विविध विकासप्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होईल. त्यानंतर 3:15 वाजता, पंतप्रधान अबू रोड येथील ब्रह्माकुमारी यांच्या शांतीवन संकुलाला भेट देतील.

नाथद्वारा मध्ये पंतप्रधान

पंतप्रधानांच्या हस्ते 5500 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण आणि पायाभरणी होणार आहे. या क्षेत्रात पायाभूत सेवा सुविधांचा विकास करणे आणि संपर्क यंत्रणा अधिक मजबूत करणे हे या विकास प्रकल्पांचे उद्दिष्ट आहे. रस्ते आणि रेल्वे प्रकल्पांमुळे वस्तू आणि सेवांची वाहतूक अधिक सुलभ होऊन परिणामी व्यापारउदीम आणि वाणिज्य क्षेत्राला चालना मिळते आणि त्या प्रदेशातील नागरिकांचा  सामाजिक आणि आर्थिक विकास शक्य होतो.

पंतप्रधान, राजसमंद आणि उदयपूरमध्ये दुपदरीकरणासाठी रस्ते बांधकाम प्रकल्पांची पायाभरणी  देखील करणार आहेत.

पंतप्रधान उदयपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी करतील . या पुनर्विकासामुळे जनतेला अधिकाधिक सुविधा मिळतील. पंतप्रधान याशो गेज रूपांतरण प्रकल्प आणि राजसमंदमधील नाथद्वारा ते नाथद्वारा शहरापर्यंत नवीन मार्गिका तयार करण्याच्या कामाची देखील पायाभरणी करतील.

त्यानंतर, पंतप्रधान तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 च्या उदयपूर ते शामलाजी विभागाच्या 114 किमी लांबीचा सहा पदरी रस्ता; राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 25 च्या बार-बिलारा-जोधपूर विभागातील 110 किमी लांबीच्या 4 पदरी रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 58E च्या 47 किमी लांबीच्या दोन पदरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाड्या उभ्या करण्यासाठी जागा तयार करणे यांचा समावेश आहे.

ब्रह्मकुमारींच्या शांतीवन संकुलाला पंतप्रधानांची भेट

देशभरात आध्यात्मिक कायाकल्पाला चालना देण्यावर पंतप्रधानांचे विशेष लक्ष आहे. याच प्रयत्नांतर्गत पंतप्रधान ब्रह्मकुमारींच्या शांतीवन संकुलाला भेट देतील. यावेळी ते सुपर स्पेशालिटी चॅरिटेबल ग्लोबल रुग्णालय, शिवमणी वृद्धाश्रमाचा दुसरा टप्पा आणि नर्सिंग कॉलेजच्या विस्ताराची पायाभरणी करणार आहेत. सुपर स्पेशालिटी चॅरिटेबल ग्लोबल रुग्णालय अबू रोड येथे 50 एकर परिसरात उभारले जाणार आहे. हे रुग्णालय जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा प्रदान करेल आणि विशेषत: या भागातील गरीब आणि आदिवासी लोकांसाठी ते फायदेशीर ठरेल.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM-VBRY: The Employment Scheme Delivering on India’s Social Security Promise

Media Coverage

PM-VBRY: The Employment Scheme Delivering on India’s Social Security Promise
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 13 जून 2026
June 13, 2026

Viksit Bharat Accelerating: Tech, Defense, Infra & Exports Power India's Global Leap Under the Leadership of PM Modi