‘जन औषधी दिना’निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या- दि. 7 मार्च, 2022 रोजी दुपारी 12.30 वाजता जन औषधी केंद्रांचे मालक आणि या योजनेच्या लाभार्थींबरोबर दूरदृष्यप्रणालीव्दारे संवाद साधणार आहेत. याप्रसंगी प्रथम पंतप्रधानांचे मार्गदर्शनपर भाषण होईल, त्यानंतर ते संबंधित लाभार्थींबरोबर संवाद साधतील. या कार्यक्रमासाठी ‘जन औषधी- जन उपयोगी’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे.

जेनरिक औषधांचा वापर आणि जन औषधी योजनेचे लाभ याविषयी जनजागृती करण्यासाठी दि. 1 मार्चपासून  देशभरामध्ये जन औषधी सप्ताह साजरा केला जात आहे. या सप्ताहामध्ये जन औषधी संकल्प यात्रा, मातृशक्ती सन्मान, जन औषधी बाल मित्र, जन औषधी जन जागरण अभियान, ‘आओ जन औषधी मित्र बने’ आणि जन औषधी जन आरोग्य मेळा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्वांना परवडणा-या किंमतीमध्ये औषधे उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेनुसार देशभरामध्ये 8,600 पेक्षा जास्त जनऔषधी दुकाने सुरू करण्यात आली आहेत. देशातल्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे जन औषधी दुकान आहे.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM Modi’s FTA push: Why India’s MSMEs now have a bigger export opportunity

Media Coverage

PM Modi’s FTA push: Why India’s MSMEs now have a bigger export opportunity
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 17 ऑगस्ट 2026
August 17, 2026

India Ascendant: Citizens Hail PM Modi's Vision and India’s Multi-Sectoral Growth