परिषदेची संकल्पना: सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय म्हणजेच सर्वांचे कल्याण, सर्वांचा आनंद
परिषदेचे तीन प्रमुख स्तंभ: लोक, पृथ्वी ग्रह आणि प्रगती
परिषदेत एआय क्षेत्रातील 500 हून अधिक जागतिक नेते, 20 हून अधिक राष्ट्रांचे आणि सरकारांचे प्रमुख आणि सुमारे 60 मंत्री आणि उपमंत्री सहभागी होणार
पंतप्रधान जागतिक नेत्यांच्या पूर्ण सत्रात तसेच सीईओंच्या गोलमेज परिषदेत सहभागी होणार
पंतप्रधान इतर जागतिक नेत्यांसह इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पो 2026 मधील विविध देशांच्या दालनांना भेट देणार
पंतप्रधान 18 फेब्रुवारी रोजी शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या नेत्यांचे स्वागत करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारीला नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 ला भेट देतील आणि या परिषदेचे उद्घाटन करतील. यापूर्वी, 18 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता, पंतप्रधान भारत मंडपम येथे शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या विविध देशांच्या नेत्यांचे स्वागत करतील. यावेळी पंतप्रधान शिखर परिषदेला उपस्थित राहणाऱ्या अनेक जागतिक नेत्यांबरोबर द्विपक्षीय बैठकाही घेतील.

पंतप्रधान 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:40 च्या सुमाराला इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 च्या उद्घाटन समारंभात सहभागी होतील. पंतप्रधानांबरोबरच, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस तसेच जगभरातील उद्योग क्षेत्रातील धुरीण उद्घाटन समारंभाला संबोधित करतील.

त्यानंतर पंतप्रधान सकाळी 11 च्या सुमाराला इतर नेत्यांसह इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पो 2026 ला भेट देतील, आणि विविध देशांच्या दालनांना भेट देतील.

त्यानंतर पंतप्रधान नेत्यांच्या सर्वसमावेशक बैठकीत सहभागी होतील, ती दुपारी 12 वाजल्यापासून सुरू  होईल. यामध्ये राष्ट्रप्रमुख, मंत्री आणि बहुपक्षीय संस्थांचे वरिष्ठ प्रतिनिधी एकत्र येऊन एआयसंबंधी प्रशासन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासह राष्ट्रीय आणि जागतिक प्राधान्यांची रूपरेषा तयार करतील.

त्यानंतर पंतप्रधान सायंकाळी 5:30 पासून सीईओ गोलमेज परिषदेत सहभागी होतील. यामध्ये जागतिक तंत्रज्ञान आणि उद्योग कंपन्यांमधील वरिष्ठ अधिकारी सरकारी नेतृत्वासह गुंतवणूक, संशोधन सहकार्य, पुरवठा साखळी आणि एआय प्रणालींच्या तैनातीबद्दल एकत्रितपणे चर्चा करतील.

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय म्हणजेच सर्वांच्या कल्याणासाठी, सर्वांच्या सुखासाठी या संकल्पनेवर आधारित आहे. एआयच्या क्षेत्रात अग्रणी म्हणून भारताचे स्थान निर्माण करणे तसेच भविष्यात मानवतेच्या भल्यासाठी, समावेशक विकासाला चालना देण्यात आणि आपल्या सर्वांच्या पृथ्वीचे रक्षण करण्यात एआयने प्रगती करावी अशी त्यामागे कल्पना आहे .

पिपल (लोक), प्लॅनेट (पृथ्वी) आणि प्रोग्रेस (प्रगती) या तीन प्रमुख घटकांशी निगडित सात कार्यगट या शिखर परिषदेचा मुख्य आधार आहेत. हे गट विविध क्षेत्रांमध्ये एआयचे ठोस परिणाम दाखवून देण्यासाठी  काम करतील. हे सात विषय पुढीलप्रमाणे: आर्थिक वृद्धी आणि सामाजिक कल्याणासाठी एआय; एआय संसाधनांचे लोकशाहीकरण; सामाजिक सक्षमीकरणासाठी समावेश; सुरक्षित आणि विश्वासार्ह एआय; मानवी भांडवल; विज्ञान; लवचिकता, नवोन्मेष आणि कार्यक्षमता.

या शिखर परिषदेत जवळपास 100 सीईओ आणि संस्थापकांसह सीईओ/सीएक्सओ, 150 शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधक आणि 400 सीटीओ, उपाध्यक्ष आणि मानवतावादी व्यक्तींसह एआय क्षेत्रातील 500 हून अधिक जागतिक अग्रणी एकत्र येणार आहेत. यामध्ये 20 हून अधिक राष्ट्र आणि सरकार प्रमुख तसेच सुमारे 60 मंत्री आणि उपमंत्र्यांसह 100 हून अधिक सरकारी प्रतिनिधींचाही समावेश असेल.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Empowering the street vendors: Six transformative years of PM SVANidhi - By Ashok Chandra

Media Coverage

Empowering the street vendors: Six transformative years of PM SVANidhi - By Ashok Chandra
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister congratulates Indian contingent on winning 19 medals at 22nd Asian U20 Athletics Championships
June 01, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi today congratulated the Indian contingent for its outstanding performance at the 22nd Asian U20 Athletics Championships.

The Prime Minister congratulated the Indian contingent on winning 19 medals, including 10 Gold medals, at the Championships.

The Prime Minister said that the achievement reflects the determination and excellence of India’s young athletes.

He expressed hope that these accomplishments would inspire many more young Indians to pursue sports in the years to come.

The Prime Minister wrote on X;

“Congratulations to the Indian contingent at the 22nd Asian U20 Athletics Championships for winning 19 medals, including 10 Golds. This outstanding performance reflects the determination and excellence of India’s young athletes. May these achievements inspire many more young Indians to pursue sports in the years to come.”