भूमिहीन शिबीरातील पात्र झोपडपट्टीवासीयांना पंतप्रधान देणार सदनिकांच्या किल्ल्या
सर्वांना घरे उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार
हा प्रकल्प चांगले आणि निरोगी वातावरण प्रदान करेल; सर्व नागरी सोयी, सुविधांनी सुसज्ज
सदनिका, मालकी हक्क आणि सुरक्षिततेची भावना प्रदान करेल

‘यथास्थान(इन-सिटू) झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत’ दिल्लीतील कालकाजी, येथे नव्याने बांधलेल्या 3024 ईडब्लूएस सदनिकांचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्‌घाटन करतील. तसेच भूमिहीन शिबिरातील पात्र लाभार्थ्यांना किल्ल्या सुपूर्द करतील. दिल्लीतील विज्ञान भवन येथे 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 4:30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

सर्वांसाठी घरे उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार, दिल्ली विकास प्राधिकरण (डीडीए) 376 झोपडपट्टी समूहात यथास्थान(इन-सिटू) झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करत आहे. झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना योग्य सोयी, सुविधांसह चांगले आणि निकोप वातावरण प्रदान करणे हे पुनर्वसन प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

डीडीएने, कालकाजी विस्तारीकरण, जेलरवाला बाग आणि कठपुतली कॉलनी येथे असे तीन प्रकल्प हाती घेतले आहेत.  कालकाजी विस्तार प्रकल्पांतर्गत, कालकाजी येथे भूमिहीन शिबीर, नवजीवन शिबीर आणि जवाहर शिबीर या तीन झोपडपट्ट्यांचे यथास्थान(इन-सिटू) झोपडपट्टी पुनर्वसन टप्प्याटप्प्याने केले जात आहे.  टप्पा I अंतर्गत, जवळपासच्या रिकाम्या व्यावसायिक केंद्राच्या जागेवर 3024 इडब्लूएस सदनिका बांधण्यात आल्या आहेत. पात्र कुटुंबांचे नव्याने बांधलेल्या इडब्लूएस सदनिकांमधे पुनर्वसन करून भूमिहीन शिबीर येथील झोपड्यांची जागा मोकळी केली जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात, या मोकळ्या केलेल्या जागेचा उपयोग नवजीवन शिबीर आणि जवाहर शिबीराच्या पुनर्वसनासाठी केला जाईल.

प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे आणि 3024 सदनिका राहण्यासाठी तयार आहेत. या सदनिकांच्या बांधकामासाठी  345 कोटी रुपये खर्च आला असून त्या सर्व नागरी सुविधांनी सुसज्ज आहेत. यात व्हिट्रीफाइड फ्लोअर टाइल्स, सिरॅमिक्स टाइल्स, किचनमध्ये उदयपूर ग्रीन मार्बल काउंटर, इत्यादींचा समावेश आहे. याचबरोबर सामुदायिक उद्याने, इलेक्ट्रिक उपकेंद्र, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, पाण्याच्या दुहेरी पाईपलाईन यांसारख्या सार्वजनिक सुविधा, स्वच्छ पाणीपुरवठ्यासाठी लिफ्ट, भूगर्भातील जलाशय इत्यादींचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या सदनिका लाभार्थ्यांना मालकी हक्क तसेच सुरक्षिततेची भावना प्रदान करेल.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
How NPS transformed in 2025: 80% withdrawals, 100% equity, and everything else that made it a future ready retirement planning tool

Media Coverage

How NPS transformed in 2025: 80% withdrawals, 100% equity, and everything else that made it a future ready retirement planning tool
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 20 डिसेंबर 2025
December 20, 2025

Empowering Roots, Elevating Horizons: PM Modi's Leadership in Diplomacy, Economy, and Ecology