शेअर करा
 
Comments

“सागरी सुरक्षा वाढविणे- आंतरराष्ट्रीय सहकार्याचा एक भाग” या विषयावरील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (यूएनएससी) उच्चस्तरीय मुक्त चर्चेचे अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदी भूषविणार आहेत. ही चर्चा 9 ऑगस्ट रोजी भारतीय प्रमाणित वेळेनुसार सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीमध्ये काही देशांचे प्रमुख आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे उच्च स्तरीय प्रवक्ते आणि प्रमुख प्रादेशिक संस्था उपस्थित राहणे अपेक्षित आहे. सागरी चाचेगिरी (गुन्हेगारी) आणि असुरक्षिततेचा प्रभावी सामना करण्याच्या मार्गांवर लक्ष केंद्रित करणे आणि सागरी क्षेत्रामध्ये समन्वय दृढ करणे आदी विषयांवर मुक्त चर्चेत लक्ष केंद्रित केले जाईल.

संयुक्त राष्ट्र परिषदेने सागरी सुरक्षा आणि सागरी गुन्हेगारीच्या विविध पैलूंवर चर्चा आणि ठराव पारित केले आहेत. तथापि, प्रथमच अशा उच्चस्तरीय मुक्त चर्चासत्रामध्ये सागरी सुरक्षेबाबत लक्षणीय मुद्दा म्हणून समग्र पद्धतीने चर्चा केली जाणार आहे. कोणताही एकटा देश हा सागरी सुरक्षेबाबत असलेल्या विविधपूर्ण बाबींकडे स्वतंत्रपणे लक्ष देऊ शकत नाही, ही बाब लक्षात घेता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत या विषयावर समग्र पद्धतीने विचार करणे महत्त्वाचे आहे. सागरी क्षेत्रामध्ये पारंपरिक आणि अपारंपरिक धोक्यांना सामोरे जात असताना सागरी सुरक्षेसाठी एक व्यापक दृष्टीकोन, वैध अशा सागरी उपक्रमांना चालना देणे आणि त्यांचे समर्थन केले पाहिजे.

भारताच्या इतिहासात सिंधू संस्कृतीच्या काळापासून महासागरांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सागरी शांतता आणि समृद्धीला सक्षम करणारा म्हणून पाहिला जाणाऱ्या भारताच्या सभ्यतेच्या नीतिमत्तेवर आधारित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये ‘SAGAR - या क्षेत्रातील सर्वांची सुरक्षा आणि त्यातील वाढ’ याबाबतच दृष्टिकोन मांडला. त्याद्वारे महासागरांच्या शाश्वत वापरासाठी सहयोगी उपायांवर लक्ष केंद्रित करणे आणि या प्रदेशातील सुरक्षित, आणि स्थिर सागरी क्षेत्रासाठी एक साचा तयार करण्याचा दृष्टीकोन देण्यात आला. 2019 मध्ये, पूर्व आशिया शिखर परिषदेत हा उपक्रम इंडो-पॅसिफिक महासागरांच्या पुढाकाराने (आयपीओएस) अधिक विस्ताराने सागरी सुरक्षेच्या सात स्तंभांवर लक्ष केंद्रित करून सागरी पर्यावरणासह, सागरी संसाधने, क्षमता वाढविणे, आणि संसाधने सामायिक करणे, आपत्ती जोखीम कमी करणे, विज्ञान, तंत्रज्ञान आणि शैक्षणिक सहकार्य आणि व्यापार जोडणी आणि सागरी वाहतूक या मुद्यांपर्यंत विस्तारण्यात आला.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या मुक्त चर्चासत्राचे अध्यक्षपद भूषविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. हा कार्यक्रम संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या संकेतस्थळावरून थेट प्रसारित केला जाईल आणि भारतीय प्रमाण वेळेनुसार 17:30 वाजता आणि न्यूयॉर्क प्रमाण वेळेनुसार 08:00 वाजता पाहता येईल.

 

' मन की बात' बाबतच्या तुमच्या कल्पना आणि सूचना पाठवा!
21 Exclusive Photos of PM Modi from 2021
Explore More
उत्तरप्रदेशात वाराणसी इथे काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण

लोकप्रिय भाषण

उत्तरप्रदेशात वाराणसी इथे काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण
UK Sikhs push back against anti-India forces, pass resolution thanking PM Modi

Media Coverage

UK Sikhs push back against anti-India forces, pass resolution thanking PM Modi
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 18 जानेवारी 2022
January 18, 2022
शेअर करा
 
Comments

India appreciates PM Modi’s excellent speech at WEF, brilliantly putting forward the country's economic agenda.

Continuous economic growth and unprecedented development while dealing with a pandemic is the result of the proactive approach of our visionary prime minister.