पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दि. 6 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी, शेती आणि ग्रामीण परिवर्तन या संकल्पनेवरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करणार आहेत.

या संकल्पनेअंतर्गत (i) शेती, (ii) पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, (iii) मत्स्यव्यवसाय आणि (iv) ग्रामीण उपजीविका या चार मुख्य क्षेत्रांवरील आठ वेगवेगळ्या सत्रांचे आयोजनही करण्यात आले आहे.

या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये काजू, नारळ, चंदन, आगरवुड, बदाम, अक्रोड आणि पाइन नट्स यांसारख्या पिकांच्या  क्षमतांचा पूरेपूर वार करून  घेत उच्च मूल्य असलेल्या शेतीला चालना देण्यावर भर दिला जाणार आहे.
यासोबतच शेतीसाठी असलेल्या भारत विस्तार या कृत्रिम बुद्धिमत्ताधारित डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधेच्या माध्यमातून  उपलब्ध होणाऱ्या संधींवरही यावेळी चर्चा होईल. त्याचबरोबरीने पशुसंवर्धन मूल्य साखळीत खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक आणि उद्योजकता, मत्स्यव्यवसायासाठी जलाशय आणि अमृत सरोवरांचा एकात्मिक विकास, किनारपट्टीवरील मत्स्यव्यवसायाशी संबंधित मूल्य साखळीला बळकटी देणे आणि ग्रामीण महिला उद्योजकांनी शी-मार्ट्सच्या (SHE-Marts - Self Help Entrepreneurs-Marketing Avenues for Rural Transformation) माद्यमातून तयार केलेल्या उत्पादनांसाठी बाजारपेठेचा विस्तार करणे या विषयांवरही या सत्रांमध्ये सविस्तर चर्चा केली जाणार आहे.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India remains among best-performing major economies: S&P Global

Media Coverage

India remains among best-performing major economies: S&P Global
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 19 एप्रिल 2026
April 19, 2026

Building a Stronger Bharat: Infrastructure Revolution, Economic Resilience & Inclusive Welfare Under PM Modi