पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जगभरातील नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि अभिनंदनासाठी आभार मानले.

नेपाळच्या पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले:

"तुमच्या हार्दिक शुभेच्छांसाठी धन्यवाद पंतप्रधान @kpsharmaoli. भारत आपल्या प्रजासत्ताकाची 75 वर्षे पूर्ण करत असताना, आम्ही आपल्या दोन्ही देशांच्या लोकांमधील मैत्रीच्या ऐतिहासिक बंधांना देखील मनापासून जपत आहोत. येणाऱ्या काळात हे बंध आणखी दृढ होत जातील याचा मला विश्वास आहे."

 

मालदीवच्या राष्ट्रपतींनी X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले:

"भारताच्या प्रजासत्ताक दिनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल राष्ट्रपती @MMuizzu यांचे आभार. भारत आणि मालदीवमधील दीर्घकालीन भागीदारीबद्दल तुमच्या आणि माझ्या भावना पूर्णपणे एकरुप  आहेत. मैत्री आणि सहकार्याचे हे बंध अधिक दृढ करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत."

 

भूतानच्या पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले:

“भारतीय प्रजासत्ताकाच्या 75 व्या वर्षपूर्तीनिमित्त दिलेल्या शुभेच्छांसाठी माझे मित्र, पंतप्रधान @tsheringtobgay यांचे आभार. भारत आणि भूतानमधील अनोखी आणि विशेष भागीदारी आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.”

 

नेपाळच्या माजी पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले:

“भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त @SherBDeuba यांच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. आपल्या देशातील नागरिकांमधील मैत्रीचे जुने संबंध असेच वाढत राहोत आणि अधिक दृढ होत राहोत.”

 

मालदीवच्या माजी राष्ट्रपतींनी X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले:

“भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्याबद्दल @ibusolih यांचे आभार.”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's new FTA playbook looks beyond trade and tariffs to investment ties

Media Coverage

India's new FTA playbook looks beyond trade and tariffs to investment ties
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 14 जानेवारी 2026
January 14, 2026

Viksit Bharat Rising: Economic Boom, Tech Dominance, and Cultural Renaissance in 2025 Under the Leadership of PM Modi