पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. "या घृणास्पद कृत्यामागील लोकांना न्यायालयाच्या चौकटीत आणले जाईल.त्यांना माफ केले जाणार नाही! त्यांचा कुटील  हेतू कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा निर्धार अढळ आहे आणि तो आणखी मजबूत होईल", असे मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे :

"जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती माझ्या सहवेदना व्यक्त करतो. या हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत  लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी मी प्रार्थना करतो. या हल्ल्यातील पीडितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे.

या घृणास्पद कृत्यामागील लोकांना न्यायालयाच्या चौकटीत आणले जाईल...त्यांना माफ केले जाणार नाही! त्यांचा कुटील हेतू कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा संकल्प अढळ आहे आणि तो आणखी मजबूत होईल."

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Khichdi To Moringa Paratha: 7 Traditional Foods PM Modi Loves

Media Coverage

Khichdi To Moringa Paratha: 7 Traditional Foods PM Modi Loves
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 26 ऑगस्ट 2026
August 26, 2026

Accountability Meets Ambition: Record Low NPAs, Record Defence Output, Record Digital Adoption Under the Leadership of PM Modi