मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करत असलेल्या आणि इतरांना बरे करून त्यांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी मदत करणाऱ्या सर्वांचे पंतप्रधानांनी केले कौतुक

जागतिक मानसिक आरोग्य दिन आपल्याला मानसिक आरोग्य हे आपल्या सर्वांगीण कल्याणाचा एक मूलभूत भाग असल्याचे ठळकपणे स्मरण करून देतो,  असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

आजच्या वेगवान जगात हा दिवस आत्मपरीक्षण करण्याचे आणि इतरांविषयी सहानुभूती बाळगण्याचे महत्त्व अधोरेखित करतो,  असेही त्यांनी म्हटले आहे. मानसिक आरोग्याविषयीच्या संवादाला मुख्य प्रवाहात अधिकाधिक स्थान मिळेल असे वातावरण निर्माण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी केले आहे.

पंतप्रधानांनी मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करत असलेल्या आणि इतरांना बरे करून त्यांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी मदत करणाऱ्या सर्वांचे कौतुक देखील केले आहे.

यासंदर्भात पंतप्रधानांनी ‘एक्स’  या समाजमाध्यमावर लिहिलेला संदेश:

जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणजे मानसिक आरोग्य हा आपल्या सर्वांगीण कल्याणाचा एक मूलभूत भाग असल्याचे ठळकपणे स्मरण करून देणारा दिवस आहे. या वेगवान जगात, हा दिवस आत्मपरीक्षण करण्याचे आणि इतरांविषयी  सहानुभूती बाळगण्याचे महत्व अधोरेखित करतो. मानसिक आरोग्याबद्दलचे संवादाला मुख्य प्रवाहात अधिकाधिक स्थान मिळेल, असे वातावरण निर्माण करण्यासाठी आपण सामूहिकपणे काम करू या. या क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच इतरांना बरे होण्यास आणि जीवनात आनंद मिळवून देण्यास मदत करणाऱ्या सर्वांचे मी कौतुक करतो.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India rolls out ₹497 crore RELIEF scheme to support exporters amid West Asia conflict

Media Coverage

India rolls out ₹497 crore RELIEF scheme to support exporters amid West Asia conflict
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares a Sanskrit Subhashitam, highlights the divine and benevolent grace of Goddess Brahmacharini
March 20, 2026

Prime Minister Shri Narendra Modi shared a Sanskrit subhashitam today, highlighting the divine and benevolent grace of Goddess Brahmacharini.

The Prime Minister wrote on X:

"मां ब्रह्मचारिणी के चरणों में कोटि-कोटि नमन! देवी मां सभी भक्तों पर अपनी कृपा बनाए रखें।

दधाना करपद्माभ्यामक्षमालाकमण्डलू।
देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा॥"

The Goddess who holds a rosary and a water pot in her lotus-like hands—may that supremely exalted Goddess Brahmacharini be gracious to me.