पंतप्रधानांनी दिल्या ईदच्या शुभेच्छा आणि पश्चिम आशियातील प्रादेशिक स्थैर्याबाबत केली चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांच्याशी आगामी उत्सवाबाबत शुभेच्छा देण्यासाठी आणि या प्रदेशातील नव्याने निर्माण झालेल्या स्थितीबाबत फलदायी चर्चा केली.

पंतप्रधानांनी सुलतान हैथम बिन तारिक यांच्याशी संवाद साधला आणि ओमानच्या जनतेला ईदच्या आगाऊ शुभेच्छा दिल्या. या चर्चेदरम्यान, दोन्ही नेत्यांनी या प्रदेशातील तणाव कमी करण्यासाठी आणि त्यानंतर शांतता आणि स्थैर्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी संवाद आणि मुत्सद्दी वाटाघाटींना प्राधान्य देण्याच्या गरजेवर सहमती दर्शवली. ओमानचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या उल्लंघनाचा भारताने निषेध केल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला, तसेच भारतीय नागरिकांसह हजारो लोकांना मायदेशी सुरक्षित परतण्यासाठी ओमानने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. भारत आणि ओमान 'हॉर्मुझच्या सामुद्रधुनी'तून  सुरक्षित आणि मुक्त नाविक परिचालनाचे पुरस्कर्ते आहेत यावर पंतप्रधानांनी भर दिला.

पंतप्रधानांनी एक्सवर लिहिलेः

"माझे बंधू सुलतान हैथम बिन तारिक यांच्याशी फलदायी चर्चा झाली आणि ओमानच्या जनतेला ईदच्या आगाऊ शुभेच्छा दिल्या. तणाव कमी करण्यासाठी आणि त्यानंतर शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी संवाद आणि मुत्सद्दी वाटाघाटींना प्राधान्य देण्याच्या गरजेवर आमचे एकमत झाले.

ओमानच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन झाल्याबद्दल भारताने आपला निषेध पुन्हा व्यक्त केला आणि भारतीय नागरिकांसह हजारो लोकांना मायदेशी सुरक्षित परतण्यासाठी ओमानने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. भारत आणि ओमान हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतूनसुरक्षित आणि मुक्त नाविक परिचालनाचा पुरस्कार करत आहेत.”

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Stranded in Tehran, 50 Iranian Sikhs return safely to India

Media Coverage

Stranded in Tehran, 50 Iranian Sikhs return safely to India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 02 ऑगस्ट 2026
August 02, 2026

Youth. Manufacturing. Digital Trust. The Three Engines Powering New Bharat Under PM Modi